Saturday, 6 January 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील “संपूर्ण स्वच्छता मोहिमे”चा सलग पाचवा आठवडा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील


“संपूर्ण स्वच्छता मोहिमे”चा सलग पाचवा आठवडा


---------


नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची; 


स्वच्छता मोहीम अखंडितपणे सुरु ठेवा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


 


            मुंबई, दि.6: स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी महास्वच्छता अभियानाला देखील प्रारंभ झाला आहे. शहरांमधील सर्वंकष स्वच्छतेवर भर देण्यासाठी यंत्रणा अहोरात्र काम करीत असून ही स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


 


मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी मागील 3 डिसेंबरपासून शहरात ‘संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग)’ मोहीम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. सलग पाच आठवड्यापासून मुख्यमंत्री श्री. शिंदे हे स्वत: सुट्टीच्या दिवशी पहाटेपासून स्वच्छता मोहिमेत (डीप क्लिनिंग) सहभागी होवून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवित आहेत.


            आज कुलाबा येथील आयएनएस शिक्रा येथून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. याठिकाणी कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मनपाचे आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त संजोग कबरे, डॉ संगीता हसनाळे, उल्हास महाले, प्रमुख अभियंता मनिशकुमार पटेल आदी उपस्थित होते.


       


मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद


 


मुख्यमंत्र्यांनी आयएनएस शिक्रा परिसरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधून रस्त्यावर माती, कचरा राहणार नाही, साचलेल्या कचऱ्याचे विलगीकरण याविषयी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. शिवाय येथील मुंबई पब्लिक स्कूल, कुलाबा इंग्लिशचे विद्यार्थी, शिक्षक यांनाही स्वच्छता अभियानविषयी माहिती देत मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले.


            डीप क्लिनिंग ही मोहीम मुंबईपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर करण्यात आली आहे. राज्यातही मोठ्या शहरात स्वच्छता मोहीम नियमित सुरू असल्याने हवेतील प्रदूषण कमी राहाण्यास मदत होणार आहे. यामुळे स्वच्छता करणाऱ्या खऱ्या हिरोंकडे शासनाचे लक्ष राहील, त्यांच्या समस्या, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            पूर्व मुक्त मार्गाच्या (फ्री वे) सुरूवातीला आणि या मार्गावरील वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीजवळ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याठिकाणीही मुख्यमंत्र्यांनी रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी मार्ग, भिंती पाण्याने साफ केल्या. स्वच्छता करताना पाण्यातून वाहून जाणारी माती, कचऱ्याची साफसफाई स्वच्छता कर्मचारी करीत होते. कधी हातात पाण्याचा पाईप तर कधी झाडू घेवून स्वत: मुख्यमंत्री स्वच्छता करीत असल्याचे पाहून अधिकारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रेरणा मिळत होती.


 


माध्यम प्रतिनिधींना दिल्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा


            मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा 6 जानेवारी हा जन्मदिवस, हा पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकार, कॅमेरामन यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुष्पगुच्छाने सन्मानित करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


            पूर्व द्रूतगती मार्गावरील वाहतूक पोलीस चौकीजवळही मुख्यमंत्री श्री. शिंदे, मंत्री श्री. लोढा यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आमदार यामिनी जाधव यांच्यासह मनपाचे अधिकारी सामील झाले होते.


***


00000


 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की संकल्पना के


“संपूर्ण स्वच्छता अभियान का” पांचवां सप्ताह


---------


नागरिकों के स्वास्थ्य के लिए स्वच्छता महत्वपूर्ण; 


स्वच्छता अभियान अखंडित रूप से जारी रखें - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के निर्देश


 


            मुंबई, दि.6: स्वच्छ, सुंदर व प्रदुषणमुक्त मुंबई के लिए संपूर्ण स्वच्छता अभियान की शुरुआत की है और राज्य में स्वच्छ महाराष्ट्र के लिए महास्वच्छता अभियान का भी प्रारंभ हुआ है. शहरों की सर्वंकष स्वच्छता पर जोर देने के लिए यंत्रणा दिन-रात काम कर रहीं है और स्वच्छता का अभियान अखंडित रूप से जारी रखने के निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिए है.   


मुंबई की हवा का प्रदुषण कम करने के लिए पिछले 3 दिसंबर से शहर में ‘संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग)’ अभियान मुख्यमंत्री की उपस्थिति में जारी है. लगातार पांच सप्ताह से मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वयं अवकाश के दिन सुबह से स्वच्छता अभियान में (डीप क्लिनिंग) शामिल होकर स्वच्छता कर्मचारियों का उत्साह बढ़ा रहें है. 


            आज कुलाबा स्थित आयएनएस शिक्रा से स्वच्छता अभियान का प्रारंभ हुआ. यहाँ पर कौशल विकास उद्यमिता एवं नवाचार मंत्री तथा मुंबई उपनगर के पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मनपा के आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त संजोग कबरे, डॉ संगीता हसनाळे, उल्हास महाले, प्रमुख अभियंता मनिशकुमार पटेल आदि उपस्थित थे. 


       


मुख्यमंत्री ने विद्यार्थी, स्वच्छता कर्मचारियों से साधा संवाद


 


मुख्यमंत्री ने आयएनएस शिक्रा परिसर के स्वच्छता अभियान का निरिक्षण किया. उसके बाद मुख्यमंत्री श्री. शिंदे ने स्वच्छता कर्मचारियों से संवाद साधकर सडकों की मिट्टी, कचरा, जमा कचरें का विलगीकरण को लेकर कर्मचारियों को सूचना दी. इसके अलावा यहाँ के मुंबई पब्लिक स्कूल, कुलाबा इंग्लिश के विद्यार्थी, शिक्षक को भी स्वच्छता अभियान की जानकारी देते हुए इस अभियान में शामिल होने का आवाहन किया. 


       मुख्यमंत्री श्री. शिंदे ने बताया कि डीप क्लिनिंग यह अभियान मुंबई तक ही सीमित न रखते हुए समूचे राज्य में लागू किया गया है. राज्य के बड़े शहरों में स्वच्छता अभियान नियमित शुरू रहने से हवा का प्रदुषण कम रहने तथा कम होने में मदद होगी. जिससे स्वच्छता करनेवाले असली हीरों की ओर सरकार का ध्यान रहेगा

 और बताया कि उनकी समस्याए, उनके बच्चों के शैक्षणिक प्रगति के लिए 


शिक्षण मित्र’ विद्यार्थी, शिक्षक, पालकांना देणार गतिमान सेवा

 शिक्षण मित्र’ विद्यार्थीशिक्षकपालकांना देणार गतिमान सेवा

Ø  वर्धा जिल्हा प्रशासनाचा नाविन्यपुर्ण उपक्रम

Ø  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची संकल्पना

Ø  उपक्रमास लोकसेवा हक्क कायद्याची जोड

Ø  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते शुभारंभ

वर्धादि.5 (जिमाका) : विद्यार्थीशिक्षक आणि पालकांना जलदपारदर्शक आणि कालमर्यादेत शिक्षण विभागाच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाने शिक्षण मित्र’ नावाचा नाविन्यपुर्ण उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला लोकसेवा हमी कायद्याची जोड देण्यात आली असून विविध प्रकारच्या 20 सेवा या उपक्रमाद्वारे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा वर्धा पहिलाच जिल्हा आहे. वनेसांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे न झिजवता शासकीय सेवा त्यांना कमी वेळेत आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने लोकसेवा हमी कायदा आणला आहे. या कायद्यांतर्गत विविध सेवा कालमर्यादेत उपलब्ध करून दिल्या जातात. वर्धा जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून शिक्षण मित्र’ नावाचा उपक्रम सुरु करून शिक्षण विभागाच्या 20 सेवा या कायद्यांतर्गत आणल्या. या सेवा कालमर्यादेत उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र पोर्टल देखील तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे विद्यार्थीशिक्षक व पालकांना सेवा उपलब्ध होणार आहे.

या सेवांमध्ये खाजगी माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकउपमुख्याध्यापकपर्यवेक्षकवरिष्ठ लिपीकमुख्य लिपीक व तत्सम पदावरील पदोन्नतीस मान्यता आदेश देणेशिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी नेमणूकवैयक्तिक मान्यता आदेश देणेस्वाक्षरीचे आर्थिक व प्रशासकीय अधिकारशिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदलीस मान्यताशिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी यांची विनाअनुदानित वरुन अनुदानित पदावर बदलीस मान्यता देणे.

खाजगी माध्यमिक शाळामधील अतिरिक्त शिक्षकशिक्षकेत्तर समायोजनखाजगी शाळांमधील अनुदान निर्धारण आदेश निर्गमित करणेशिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लक्ष पर्यंत वैद्यकीय प्रतीपूर्ती प्रस्ताव मंजूर करणेशिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वरिष्ठ श्रेणीनिवड श्रेणी मंजुरी आदेशसेवानिवृत्त शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण देयक मंजूर करणेविद्यार्थ्यांच्या जन्मतारखेत बदलदुरुस्तीविद्यार्थीत्यांचे वडील व आईच्या नावात बदलविद्यार्थ्यांच्या जातीच्या नावात बदल मंजुरी आदेश या सेवांचा समावेश आहे.

सोबतच इयत्ता 10 वी व 12 चे गुणपत्रकप्रमापत्रक मध्ये विद्यार्थीवडीलआईच्या नावात व जन्मतारखेत बदल करण्याबाबत शिफारसपत्र मिळणेखाजगी माध्यमिक शाळा खाते मान्यता वर्धित करणेवेतनेत्तर अनुदान मंजुरी आदेश व वेतनेत्तर अनुदान वितरित करणेखाजगी शाळा अनुदान टप्पा अनुदान वितरण आदेश निर्गमित करणे आदी सेवा या उपक्रमात घेण्यात आल्या आहे. यातील काही सेवा 15 दिवस तर काही सेवा 21 दिवसांमध्ये उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्याचे शिक्षणक्षेत्र गतिमान होईल - राहुल कर्डिले

लोकसेवा हमी कायद्यांतर्गत बऱ्याच सेवा ऑनलाईन करण्यात आल्या. यामुळे नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध होत आहे. शिक्षण विभागाचे कामकाज अधिक गतीमान झाले पाहिजेयासाठी आपण जिल्ह्यात 20 प्रकारच्या सेवा या कायद्यांतर्गत आणल्या. शिक्षण मित्र’ नावाचा स्वतंत्र उपक्रम सुरु केला. यासाठी वेगळे स्वतंत्र पोर्टल देखील सुरु करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थीशिक्षकपालकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र गतिमान होण्यास मदत होणार आहे.

शुभारंभालाच अनुकंपा नियुक्तीचे पत्र

शिक्षण मित्र’ उपक्रमाचा शुभारंभ वनेसांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाला. शुभारंभाप्रसंगीच अभिजित मधुकरराव देशमुख या युवकास उपक्रमाच्या पोर्टलद्वारे तातडीने कार्यवाही करून अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे पत्र श्री.मुनगंटीवार यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी दिवंगत शिक्षक मधुकरराव देशमुख यांच्या पत्नी भारती देशमुख उपस्थित होते.

000000

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 100 व्या अखिल भारतीय मराठी

नाट्य संमेलनाचे उद्घाटन

मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध

                  



                            -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

पुणे, दि.6: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन श्री. शिंदे यांनी केले.

 मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, ज्येष्ठ नेते तथा नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

 मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे 100 वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशात नाट्य कलेला 2 हजार वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकाने झाल्यानंतर मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत. अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाटक रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आशय, विषय, सादरीकरण, नेपथ्य, संगीत याची चाकोरी मोडण्याची गरज असते, मराठी रंगभूमीने ते केल्याने या रंगभूमीचा उत्कर्ष होत आहे. आज समाजमाध्यमांच्या काळातही प्रेक्षक नाटकांना गर्दी करतात. व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हजारो कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांनी यासाठी योगदान दिले आहे. गेल्या 100 वर्षात सुवर्णकाळ अनुभवताना अनेक अडचणींवर मात करीत रंगभूमी पुढे जात आहे. म्हणूनच या रंगभूमीचा आनंद सोहळा दिमाखात साजरा होत आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

 नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न

मराठी रंगभूमीच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद करून श्री. शिंदे म्हणाले की, 100 वे नाट्य संमेलन असल्याने नाट्य संमेलनासाठी 9 कोटी 83 लाख आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी 10कोटींचा निधी देण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृहे उभारण्यात येणार आहेत मात्र हे करतांना नाट्य कलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल.मराठी नाट्य परिषदेसाठी मुंबईत भूखंड देण्याबाबत सहकार्य करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नाट्यगृहात पूर्वीप्रमाणे विजेचा खर्च आकारला जाईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराबाबतही शासन सकारात्मक आहे. नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करताना मराठी रंगभूमीसाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

 मराठी नाटकाने मनोरंजन आणि प्रबोधनाचे कार्य केले-खासदार शरद पवार

चिंचवडच्या पावन भूमीत नाट्य संमेलन होत असल्याबाबत आनंद व्यक्त करून ज्येष्ठ नेते  खासदार शरद पवार म्हणाले की, सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम आहे. नाटकाचा मुख्य उद्देश मनोरंजन असल्याचे भरतमुनी यांनी म्हटले आहे, मात्र नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन आणि ज्ञानदानाचे कार्य उत्तमरितीने होते. रंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकप्रबोधनाचे कार्य होत आहे. मराठी नाट्यसृष्टीद्वारे नवे विषय मांडले जात आहेत. नाट्य रसिकांना नाटकांकडे आकर्षित करणारी नाटके रंगभूमीवर यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने नाट्यरसिकांना ही मोठी पर्वणी आहे, असेही श्री.पवार म्हणाले.

 उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले की, पिंपरी चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या नाट्य संमेलनानंतर कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी  बैठकीचे आयोजन व्हावे आणि ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी शासनाने निधी द्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासनातर्फे नाट्य संमेलनासाठी प्राप्त निधीचा उपयोग कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांना मानधन आणि आरोग्य विमा काढण्यासाठी करण्यात येईल, असेही श्री. सामंत म्हणाले.

 नाट्य प्रशिक्षणाद्वारे रंगभूमीचा विकास-जब्बार पटेल

नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल म्हणाले, मराठी रंगभूमी प्रगल्भ आणि विविधतेने नटलेली आहे. नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून  रंगभूमीचा अधिक विकास होईल. देशपातळीवरील उत्तम कलाकारांच्या माध्यमातून विद्यापीठातून नाट्यकलेचे प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 जगात सुंदरता निर्माण करण्यासाठी कलावंतांनी एकत्रित प्रयत्न करावा, असे मावळते संमेलनाध्यक्ष श्री. गज्वी म्हणाले.

 नाट्य संमेलन हे कलावंतांसाठी दिवाळी असून एकत्रित विचार करण्याची उत्तम जागा आहे, असे श्री. दामले म्हणाले.

 प्रास्ताविक विश्वस्त अजित भुरे यांनी केले. श्री.भोईर यांनी स्वागतपर भाषणात नाट्य संमेलनाच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले.

 यावेळी वामन पंडित संपादि 'रंगवाचा' या नियतकालिकाचे आणि 100व्या मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या 'नांदी' या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते, तर प्रेमानंद गज्वी यांचे आत्मकथन 'रंग निरंतर'चे प्रकाशन ज्येष्ठ नेते श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन आणि घंटेचे पूजन करून 100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ नेते तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते रंगमंचाच्या पडद्याचे अनावरण करण्यात आले.

 

कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त, कृष्णकुमार गोयल, पी.डी. पाटील, नाट्य कलावंत आणि नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा

1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती मुंबई, दि. 6: वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. वन विभागाकडून एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टीसीएस-आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती. वनमंत्री श्री. मुनगंटीवार हे या प्रश्नातून मार्ग काढण्याकरता सातत्याने प्रयत्नरत होते. वनमंत्र्यांच्या या सततच्या पाठपुराव्यास यश आले असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित १२५६ वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता देत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत एकूण तीन लाख ९५ हजार ७६८ परिक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली होती त्यातील एकूण दोन लाख ७१ हजार ८३८ परीक्षार्थी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या पुढील भरती प्रक्रियेत टीसीएस आयओएन कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील. ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवडसूचीतील उमेदवारांची २५ कि.मी. आणि १६ कि.मी. चालण्याची चाचणी घेण्यात येईल. या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया दि.१७ जानेवारी पासून सुरू करण्यात येत असून वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार १५ दिवस ते ४४ दिवस या कालावधीत ही प्रक्रिया वनवृत्तनिहाय पूर्ण केली जाईल. सर्वात कमी उमेदवार असलेल्या अमरावती वनवृत्तात ही प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असून सर्वात जास्त उमेदवार असलेल्या कोल्हापूर वनवृत्तात ४४ दिवसात, त्यापाठोपाठ ठाणे आणि नागपूर वनवृत्तात ४० दिवसात तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजी नगर, धुळे, नाशिक, पुणे या वनवृत्तात प्रत्येकी २० दिवसात वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांची माहिती वन विभागाच्या संबंधित संकेतस्थळांवर वेळोवेळी दिली जाणार आहे. 000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूची पाहणी अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूची पाहणी

 

अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प                                                -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई,दि.6 : देशातील सर्वात जास्त लांबी असलेला 22 किमीचा समुद्री मार्गावरील 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटात पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' (मुंबई पारबंदर प्रकल्प) चे १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या अटल सेतूची ठिकठिकाणी थांबून पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढाआमदार प्रशांत ठाकूरआमदार महेश बालदीमुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय.एस. चहलमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (एमएमआरडीए) डॉ. संजय मुखर्जीअतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेडॉ. अश्विनी जोशीरायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे,  नवी मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीअटल सेतू नवी मुंबईरायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्पमोठे उद्योग समूह येणार आहेत. त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे. हा मार्ग शिवडी येथून सुरु होवून समुद्रमार्गे चिर्ले येथील न्हावा शेवा येथ इतर मार्गांना जोडला जातो. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवीमुंबईत अवघ्या 20 मिनिटात जाता येणार आहे. प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत. हा सेतू मार्ग मुंबई- गोवा महामार्गवसई-विरारनवी मुंबईरायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योगविकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचाही विकास होणार आहे. युवकांच्या रोजगारासाठी ५०० स्किल कौशल्य विकास केंद्रे सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेतआणखी विकासात्मक निर्णय घेत आहे.

 

परिसर सुशोभिकरणवृक्षारोपणाच्या सूचना

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिवडी ते चिर्ले या अटल सेतू पुलाची पाहणी करतानाच ठिकठिकाणी उतरुन तेथील सुविधांची माहिती घेत त्याअनुषंगांने विविध सूचना एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिल्या. अटल सेतूची नियमित स्वच्छता राखण्याबरोबरच परिसर सुशोभिकरण आणि वृक्षारोपण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

 

सेतूवरील वाहतूक नियंत्रण केंद्राला मुख्यमंत्र्यांची भेट

चिर्ले टोल प्लाझाजवळील वाहतूक नियंत्रण केंद्राला (कमांड सेंटर) मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. अटल सेतूवरील वाहतुकीचे नियंत्रण आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे कार्य आदींचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासह एमएमआरडीए अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अटल सेतूची पाहणी केल्यानंतर चिर्ले येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या भागात प्रकल्पाचे उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

अटल सेतूविषयी थोडक्यात....

मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) हा अति जलदअति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना

५०० बोइंग विमाने व १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर.

शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू एकूण २२ किमी लांबीचा असून त्यातील १६.५० किमी भाग समुद्रामध्ये तर उर्वरित ५.५० किमी भाग जमिनीवर. भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील 12 व्या क्रमांकाचा सागरी सेतू. सागरी सेतूसाठी 18 हजार कोटी रुपयांचा खर्च.

सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा.

मुंबईनवी मुंबईरायगडमुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर जवळजवळ १५ किमीने कमी झाले. महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला.

 

रामजन्मूमी सम्पर्क अबियान aap बाबत

 सर्वांसाठी महत्वाची बातमी


दिलखुलास’, 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'शाश्वत पर्यावरण विकासावर संजीव कर्पे यांची मुलाखत

 दिलखुलास'जय महाराष्ट्रकार्यक्रमात

'शाश्वत पर्यावरण विकासावर संजीव कर्पे यांची मुलाखत

       मुंबईदि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'शाश्वत पर्यावरण विकास परिषदआणि ‘बांबू लागवड’ या विषयावर कोकण बांबू अॅण्ड केन डेव्हलपमेंट सेंटरचे (कोनबॅक) संचालक संजीव कर्पे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

          ग्लोबल वार्मिंगवाढते प्रदूषण आणि नैसर्गिक आपत्तीचे संकट मानवासमोर उभे राहिले आहे. या संकटांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने राज्य शासनाने पर्यावरण संरक्षणासाठी मुंबईत 9 जानेवारी 2024 रोजी शाश्वत पर्यावरण विकास परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी  उपाययोजनानागरिकउद्योगखासगी व सरकारी संस्थापर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सहभाग याबाबतची माहिती 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात संचालक श्री. कर्पे यांनी दिली आहे.  

          ‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. कर्पे यांची मुलाखत सोमवार दि. 8, मंगळवार दि. 9 आणि बुधवार दि. 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे, तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारदि. 9 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक श्रीकांत कुवळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://x.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

Featured post

Lakshvedhi