Wednesday, 3 January 2024

कामगार मंत्र्यांनी केला कंपनी मालक आणि कामगार संघटना यांच्यात समेट कामगारांशी संपमागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा

 कामगार मंत्र्यांनी केला कंपनी मालक आणि कामगार संघटना यांच्यात समेट

कामगारांशी संपमागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा

 

            मुंबईदि. 2 :- वालचंदनगर येथील मे. वालचंदनगर इंडस्ट्रीजमध्ये 42 दिवसांपासून सुरु असलेल्या कामगारांच्या संपाबाबत कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज कंपनी मालक आणि कामगार संघटना प्रतिनिधी यांच्यात समेट घडवून आणत संप मिटविण्याबाबत कामगारांशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी कामगार मंत्र्यांनी कंपनीने कामगारांचे थकीत वेतन दोन महिन्यांत द्यावेकामगार आणि कंपनीमध्ये झालेला करारनाम्याचे दोन महिन्यांत नुतनीकरण करावेअशा सूचना दिल्या.

            मंत्रालयातील समिती कक्षात याबाबत कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरेहर्षवर्धन पाटीलकामगार आयुक्त सतीश देशमुखउपायुक्त दादासाहेब खताळअभय गीतेकंपनीचे व्यवस्थपकीय संचालक चिराग दोशीमहाव्यवस्थापक संजय गायकवाडउपाध्यक्ष धीरज केसकरकामगार संघटनांचे अध्यक्ष राहुल नावडेकरकपिल गायकवाडगणेश सानपनीलेश गुळवे, सुनील माने, सराजी दबडे  उपस्थित होते.

            कंपनीच्या आस्थापनेवर असलेल्या कामगारांचे फेब्रुवारीमार्च आणि एप्रिल २०२३ या तीन महिन्यांचे वेतन थकीत होते. वेतनवाढवैद्यकीय देयके अशी २०२१ पासूनची थकीत देणीतसेच कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये कामगारांचे वेतन आणि भत्त्यासंदर्भातील करार प्रलंबित होता. या मागण्यांसाठी कामगारांनी संप पुकारला होता. हा संप मिटवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या मागणीनुसार कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी यात समेट घडवून आणला.

            यावेळी कामगार मंत्री यांनी इंडस्ट्रीने कामगारांचे थकीत वेतन आणि इतर कायदेशीर देणी मिळून होणारी ७ कोटी ८५ लक्ष रुपयांची रक्कम तीन टप्प्यात द्यावी, असे सांगितले. ४० टक्के रक्कम कामगार रुजू होताच सात दिवसांत द्यावी. तसेच उर्वरीत ६० टक्के रक्कम दोन महिन्यांत ३० टक्के प्रमाणे देऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत १०० टक्के थकित रक्कम अदा करावी. शिवाय कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील करार हा एक महिन्यात संपुष्टात येईलत्याचे नूतनीकरण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला. तसेच कामगारांनी सुद्धा ४ जानेवारीपासून संप मागे घेऊन तत्काळ कामावर रुजू व्हावे. कंपनीने कोणत्याही कामगारावर कारवाई करू नयेअसे निर्देश कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी दिले.

            कामगारांच्या विश्वासावर कंपनी उभी राहते. कामगारांनी सुद्धा संपावर जाण्यामुळे त्यांचे स्वत:चे नुकसान होते याचा विचार करावा. संपावर जाण्यापूर्वी व्यवस्थापनाशी चर्चा करावी आणि कंपनीने सुद्धा चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देऊन कामगारांच्या  मागण्या मान्य केल्यास कंपनी आणि कामगार दोघांचेही नुकसान टाळता येईल, असेही डॉ. खाडे म्हणाले.

००००

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहणार मुंबई, कोकण विभाग पदवीधरसह नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

 विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर

मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहणार

मुंबईकोकण विभाग पदवीधरसह नाशिक व मुंबई विभागातील

शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. 2 : भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला  शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 डिसेंबर 2023 रोजी संपला असलातरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीकरिता मतदार नाव नोंदणी करण्याकरिता निरंतर अद्यावतन कार्यक्रम (Continuous Updation) प्रक्रिया सुरु राहणार आहे. पुरवणी यादीच्या स्वरुपात मतदारांची नावे अंतिम मतदार यादीस जोडण्यात येतील.  मात्रया निवडणुकांच्या नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर मतदार यादीमध्ये कोणतीही दुरुस्ती/सुधारणा करता येणार नाही. 30 डिसेंबर 2023 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदारसंघाच्या  अंतिम मतदार याद्यांमध्ये पात्र  व्यक्तीचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्‍ट नसेलअशी व्यक्ती मतदार यादीमध्ये विहित प्रपत्रातील अर्जाद्वारे अद्यापही आपली नाव नोंदणी करु शकतेअसे राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपसचिव म. रा. पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            श्री. पारकर यांनी म्हटले आहे कीविधानपरिषदेच्या मुंबई व कोकण विभाग पदवीधरमुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. त्याकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात आाला. आता  अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 

            या मतदार संघामध्ये सन 2018 मध्ये नोंदविण्यात आलेल्या मतदारांची संख्या व सन 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांकरीता तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीतील मतदारांची संख्येची माहिती अशी (अनुक्रमे मतदारसंघाचे नावसन २०१८ च्या निवडणुकीकरीता झालेली एकूण मतदार नोंदणीसन २०२४ च्या निवडणुकीकरीता तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीप्रमाणे एकूण मतदार नोंदणी) :  मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ४५७३५९११२०. कोकण विभाग पदवीधार विधान परिषद मतदारसंघ१०४४८८१७७४६५. मुंबई शिक्षक विधान परिषद मतदारसंघ८७२२१४५५८. नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघ५३८९२६४८०२.

            पदवीधर मतदार नाव नोंदणी करण्याकरिता ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज (प्रपत्र क्र.18) भरु शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://gterollregistration.mahait.org/ ज्या पात्र शिक्षक मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नाहीअसे पात्र शिक्षक मतदार नाव नोंदणी करण्याकरिता ऑफलाईन अर्ज (प्रपत्र-19) त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत भरु शकतात. यासाठीचे अर्ज विभागीय आयुक्त (या निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी)संबधित जिल्हाधिकारी  (या निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी)विभागीय आयुक्तांकडून पदनिर्देशित केलेले उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. योग्यरित्या भरलेले अर्ज त्या कार्यालयात भरुन देता येतील. त्याच प्रमाणेहा नमुना मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Downloads/DownloadForms/Form-18.pdf तसेचDownloads/DownloadForms/Form-19.pdf व  Downloads/DownloadForms/Certificate -Form-19.pdf  येथे सुद्धा उपलब्ध आहेअसेही सह मुख्य निवडणूक अधिकारी श्री. पारकर यांनी म्हटले आहे.

००००

माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात माजी विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे

 माझी शाळासुंदर शाळा’ अभियानात

माजी विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे

- मंत्री दीपक केसरकर

----

अभियानातील विजेत्या शाळांना मुख्यमंत्री भेट देणार

            मुंबईदि. 2 : राज्यात सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ अभियानात राज्यातील सर्व शाळा सहभागी होत आहेत. याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन शाळांना मुख्यमंत्री स्वत: भेट देणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आपली शाळा - सुंदर शाळा ठरावी यासाठी या अभियानात माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.

            ‘मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ अभियानाचे उद्घाटन 5 डिसेंबर 2023 रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मंत्री श्री.केसरकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओलशालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरेप्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीप डांगेमाध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशीसहसचिव इम्तियाज काझीमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            या अभियानांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पत्र लिहिले असून सुमारे दोन कोटी विद्यार्थी या पत्राचे आपल्या पालकांसमोर वाचन करणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक व्यवस्थेतून आलेल्या अनुभवांवर आधारित घोषवाक्य लिहून अपलोड केले जाणार आहे. यामधून प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्यांची निवड करून विजेत्यांना मुंबई येथे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.

            राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. तर बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळावर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा अशा तीन स्तरांवर हे अभियान राबविण्यात येणार आहे.

अभियानाची उद्दिष्टे

            विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययनअध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणेक्रीडाआरोग्यवैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणेराज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणेराष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणेविशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणेत्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन व्यक्तिमत्त्वाचे जडणघडण करणे तसेच शिक्षकविद्यार्थीमाजी विद्यार्थीपालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.

अभियानाचे स्वरूप

            अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना गुणांकन देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 60 गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी 40 गुण देण्यात येतील. यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांच्या आयोजनामध्ये शाळा व परिसराच्या सौंदर्यीकरणविद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातीलव्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभागशैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रमशाळेची इमारत व परिसर स्वच्छताराष्ट्रीय एकात्मताविविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन (देशी खेळांना प्राधान्य)त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांच्या सहभागासाठी गुणांकन दिले जाणार आहे.

पारितोषिके

            राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी वर्गवारी निहाय प्रत्येकी 51 लाख रुपयेद्वितीय क्रमांकासाठी 21 लाख रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 11 लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विभागजिल्हा आणि तालुका स्तरावर देखील दोन्ही वर्गवारीमध्ये स्वतंत्ररित्या पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे

 शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी

कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            ठाणेदि. 2 :- शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्सचे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण  जास्त आहेत्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे. शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेतत्यांच्यात विचार परिवर्तन व्हावेयासाठी आपण प्रयत्न करावेतयासाठी शासन सर्वतोपरी मदत करीलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील उसाटने - नार्हेण फाटातळोजा एमआयडीसी रोड येथे आयोजित श्री मलंगगड हरिनाम सप्ताह-अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याप्रसंगी  ते बोलत होते.

            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार किसन कथोरेआमदार गणपत गायकवाड,  आमदार डॉ. बालाजी किणीकरमाजी मंत्री ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील तसेच जिल्हाधिकारी अशोक शिनगारेआचार्य प्रल्हाद महाराज शास्त्रीविश्वनाथ महाराज म्हाळुंगेचेतन महाराज म्हात्रेदिगंबर शिवनारायणविष्णू मंगरुरकरगणपत सांगू देशेकरगोपाल चेतनशंकर गायकरदिनेश देशमुखगणेश पीर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीवारकरी भाविकांची उपस्थिती पाहून पंढरी अवतरल्याचे वातावरण तयार झाले आहे. या वातावरणात हातात टाळ घेवून रिंगणामध्ये आणि दिंडीमध्ये सहभागी होताना देहभान विसरायला झाले. देवाच्या या दारी उभा क्षणभरी..!  या उक्तीची अनुभूती येऊन देवाच्याच दारी आपण सगळे उभे राहिलो आहोतअसाच भास होत आहे. अखंड हरिनामाने भरलेल्या या वातावरणात सर्व काही विसरायला लावणारी ही अध्यात्मिक ताकद आहे. आमच्या सारख्या राजकारण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये संत महात्मांच्या प्रेरणेने देश आणि समाज कार्यासाठी काम करण्याची उमेद निर्माण होते. मला काय मिळालेयापेक्षा  मी देश आणि समाजासाठी काय देतोही भावना जागृत होते. म्हणूनच राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यामिक अधिष्ठान सर्वश्रेष्ठ आहे.

            महाराष्ट्राला संतांच्या मार्गदर्शनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे. संतांचा सन्मान करणेही आपली संस्कृती आहे. श्री क्षेत्र मलंगड आणि या भूमीतील पुरातन शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मराठी संस्कृतीचे वैभव असणारा हा वारकरी संप्रदाय जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ईश्वर भक्ती शिकवितो. कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतो. कीर्तनकाराचे महत्त्व आपल्या महाराष्ट्रात खूप आहे. धर्मवीर आनंद दिघे प्रत्येक हरिनामाला उपस्थित राहायचे. धकाधकीच्या आयुष्यातूनही ते हरिनामासाठी वेळ काढायचे आणि आम्हालाही सांगायचे. सन्मार्गावर कायम चालत राहण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह ही काळाची गरज आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीभारत हा तरुणाईचा देश आहे. या तरुणांमध्ये देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी चांगले करून दाखविण्याची उमेद आहेही समाधानाची बाब आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचे तारतम्य महाराष्ट्रात नेहमीच दिसून येते. देवदेश आणि धर्म जपणारी आजची तरुण पिढी आपण तयार करतोययाची खात्री आजच्या या हरिनाम सप्ताहाच्या प्रतिसादातून दिसून येत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे राम मंदिर निर्माणाचे स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण होत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार. या दिवशी सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे.

            राज्यातल्या सर्व पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. तीर्थक्षेत्रांचा विकास केला जातोय. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरास 138 कोटी रुपयांचा निधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मिळवून दिला आहे. अशाच प्रकारे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील सरकारकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारीला जाणाऱ्या भाविकांना शासनाकडून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जात आहेतयापुढे अधिकाधिक सोयी-सुविधा दिल्या जातील. शिवप्रताप दिन साजरा करण्याचा निर्णय या शासनाकडून घेण्यात आला आणि यापुढेही  असे अनेक उपक्रम या शासनाकडून राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम

बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

            मुंबई दिनांक 2 : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना बैठकीत दिले.  

            मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांच्याशी ते बोलत होते. 

            या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटीलसमितीचे सदस्य मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटीलगिरीश महाजनदिलीप वळसे पाटीलशंभूराज देसाईआमदार बच्चू कडूनिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेनिवृत्त न्यायमूर्ती मारोती गायकवाडमहाधिवक्ता बिरेंद्र सराफविविध विभागांचे सचिव त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीजिल्ह्यांचे जात पडताळणी अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मागासलेपण सिद्ध करण्यासाठी बिनचूक सर्व्हेक्षण आवश्यक

            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कीमागासवर्ग आयोगामार्फत केल्या जाणाऱ्या या सर्व्हेक्षणाला विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांनी प्राधान्य द्यायचे असून आपापल्या जिल्ह्यात विशेष कक्षाच्या माध्यमातून कालबद्धरितीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करायचे आहे. सर्व्हेक्षण करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्नावली पाठवण्यात आली असून बिनचूक काम झाले पाहिजे. मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्व्हेक्षण उत्तम रीतीने होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल. सर्व्हेक्षणाव्यतिरिक्त इतर माहिती देखील संकलित करणे गरजेचे आहे.

            मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करतांना सर्वोच्च न्यायालयाने त्रुटी उपस्थित केल्या होत्या. आता आपण करीत असणारे सर्व्हेक्षण बिनचूक आणि निर्दोष असणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीन्यायालयात क्युरेटीव्ह याचिकेवर देखील सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्व्हेक्षण चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे हे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी लक्षात ठेवावे. सर्व्हेक्षणाचे महत्व लक्षात घेता प्रगणकांची संख्याही वाढवावी तसेच त्याना सर्व्हेक्षणाबाबत उत्तम प्रशिक्षण द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उत्तम समन्वय ठेवावा

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काम करण्याच्या आणि आयोगाशी समन्वय ठेवण्याच्या सुचना दिल्या.प्रारंभी सामान्य प्रशासन सचिव (साविस) सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची तसेच उपाययोजनांची माहिती दिली.मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती श्री सुनील शुक्रे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली असून आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. गोखले इन्स्टिट्यूटतर्फे प्रश्नावली तयार करून ती जिल्ह्यांना देण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात सॉफटवेअर तयार करणे सुरु असून लवकरच प्रगणकांचे प्रशिक्षण सुरु करण्यात येत असल्याची माहिती दिली. यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. राज्य मागासवर्ग आयोगाला ३६७ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मनुष्यबळ व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.

न्या शिंदे यांच्या शिफारशीवर चर्चा

            यावेळी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी विशेषत: मराठवाड्यात कुणबी नोंदी अधिक प्रमाणात मिळण्यासाठी केलेल्या शिफारशींवर देखील बैठकीत चर्चा झाली. हैद्राबाद येथे कुणबी नोंदीसंदर्भात उपलब्ध कागदपत्रांचा डिजिटल व इतर डेटा लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावा तसेच मोडीफारशीउर्दू  कागदपत्रांचे भाषांतर वेगाने करून ते संकेत स्थळांवर अपलोड करावे जेणे करून सर्व संबंधितांना ते सहजपणे पाहता येईल व त्यांच्या कामी येऊन कुणबी प्रमाणपत्रे मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल असेही निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

Tuesday, 2 January 2024

युवा रक्तदान करके करें नए साल का स्वागत

 युवा रक्तदान करके करें नए साल का स्वागत

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            ठाणेदि. 1:- धर्मवीर आनंद दिघे के समय से नववर्ष के स्वागत में शुरू किए गए मध्य रात्रि के रक्तदान शिविर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने खुद  रक्तदान करके एक अलग- थलग आदर्श कायम किया। आनंद दिघे द्वारा दी गई शिक्षा को आगे बढ़ाने के लिए उन्होंने युवाओं को संदेश दिया कि 31 दिसंबर की आधी रात को नशे में धुत होकर नए साल का स्वागत करने के बजायउन्हें रक्तदान करके नए साल का स्वागत करना चाहिए।

            ठाणे शहर में हर साल एक मध्यरात्रि रक्तदान शिविर और राज्य स्तरीय रक्त कर्ण पुरस्कार वितरण समारोह आयोजित किया जाता है। इस वर्ष भी इस आयोजन में प्रदेश भर से आए कई रक्तदाताओं ने रक्तदान किया. मुख्यमंत्री इस कार्यक्रम को संबोधित कर रहे थे।

            इस अवसर पर पूर्व विधायक रवींद्र फाटकपूर्व महापौर नरेश म्हस्केश्रीमती मीनाक्षी शिंदेहेमंत पवारपूर्व नगरसेवक सुधीर कोकाटेपूर्व परिवहन सभापति विलास जोशीमुख्यमंत्री मेडिकल सहायता निधि सेल के विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटेनिखिल बुडजडेस्वानंद पवार आदि उपस्थित थे।

            मुख्यमंत्री श्री शिंदे ने रक्तदाताओं को रक्तानंद पुरस्कार देकर सम्मानित किया। इस समारोह में इस क्षेत्र में कार्य करने वाले अन्य प्रतिष्ठित संगठनों और व्यक्तियों को सम्मानित किया गया। साथ ही इस कार्यक्रम में कुछ दिव्यांग भाइयों को कृत्रिम अंग व सामग्री वितरित की गई।

            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि नए साल का इस तरह से स्वागत करने का यह पूरी दुनिया में एकमात्र कार्यक्रम है और यह कार्यक्रम पिछले 29 वर्षों से बिना किसी रुकावट के चल रहा है। रक्तदान सर्वोत्तम दान हैऐसा हम कहते हैं। कुछ साल पहले इसी मैदान में नवरात्रि के नौ दिनों तक इस तरह का महारक्तदान शिविर का आयोजन किया गया था।  उस शिविर में 11 हजार से अधिक दानदाताओं ने भाग लिया। मुख्यमंत्री ने कहा कि नववर्ष का स्वागत करते हुए कई युवाओं ने खुद से आगे आकर रक्तदान कियाइसका समाधान है। इसके साथ ही मुख्यमंत्री ने इस समारोह में रक्तदान करने वाले सभी रक्तदाताओंसंस्थाओं और डॉक्टरों को धन्यवाद दिया। इस अवसर पर रक्तदान शिविर में रक्तदान करने वाले ठाणे शहर के सभी वरिष्ठ पुलिस अधिकारियों को सम्मानित किया गया।

            इस मौके पर मुख्यमंत्री ने नए साल की शुभकामनाएं दीं.  मुंबई सहित महाराष्ट्र में इस समय "डीप क्लीन ड्राइव" चल रहा है और हम "सुंदर शहर-स्वच्छ शहर-हरित शहर" की संकल्पना को लागू कर रहे हैं। इसका सकारात्मक असर अब शहर में हर जगह-जगह दिखाई देने लगा है। अब यह अभियान पूरे राज्य में चलाया जाएगा और इसकी शुरुआत "गेटवे ऑफ इंडिया" से की गई है।  आज मुंबई में 10 जगहों पर "डीप क्लीन ड्राइव" अभियान चलाया गया और उस अभियान से 1 लाख नागरिक सीधे तौर पर जुड़े थे। हम इस अभियान को बड़े पैमाने पर लागू कर रहे हैं और इसके प्रत्यक्ष परिणाम दिखाई देने लगे हैं।

            साथ ही पिछले डेढ़ वर्ष में सरकार ने हर निर्णय आम जनता को ध्यान में रखकर लिया है। राज्य ने विदेशी निवेश में कर्नाटकगुजरात को पछाड़कर फिर से शीर्ष स्थान हासिल किया है। कई उद्यमी अभी भी अपना व्यवसाय शुरू करने के लिए महाराष्ट्र को अपनी पहली पसंद के रूप में चुन रहे हैं। इस अवसर पर उन्होंने कहा कि पिछले साल दाओस में 1 लाख 37 हजार करोड़ के एमओयू पर हस्ताक्षर हुए थे और समझौते के मुताबिक 85 फीसदी काम शुरू हो चुका है और इस वर्ष भी हम राज्य में रिकॉर्ड निवेश लाएंगे।

            इस अवसर पर मुख्यमंत्री श्री शिंदे ने विश्वास जताया कि महाराष्ट्र में इस समय सबसे ज्यादा विकास परियोजनाएं चल रही हैं। इसलिए आने वाला वर्ष भी महाराष्ट्र का होगा।

कायदा निर्मिती प्रक्रिया हा ज्ञान समृद्ध करणारा अनुभ



 कायदा निर्मिती प्रक्रिया हा ज्ञान समृद्ध करणारा अनुभव

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

           

            मुंबईदि. 1 :- महाविद्यालयात कायदा शिकताना केवळ कायद्याची भूमिका समजते. मात्रकायदा कसा तयार होतो. त्यामागचे तत्व कायत्यामागे काम करणारी यंत्रणा कोणती याच्या माहितीसोबतच प्रत्यक्ष कायदा तयार करण्याचा अनुभव कायद्याचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना विधी विधान आंतरवासिता उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. ज्ञान समृद्ध करणारी ही प्रक्रिया समजून घेणारा अविस्मरणीय अनुभव कायद्याचा अर्थ लावताना विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या आंतरवासिता विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावेअसे आवाहन उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            राज्यात कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेबाबत माहिती व्हावी व त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावात्यांच्या कार्य क्षेत्रातील करिअरसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी उपयोग व्हावा यादृष्टीने विधी व  न्याय विभागाच्या विधी विधान शाखेमध्ये दहा विद्यार्थ्यांकरिता सहा आठवड्यांचा आंतरवासिता उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आजपासून सुरु झालेल्या विधी विधान इंटर्नशीपच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे केले. यावेळी निवड झालेल्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री श्री.  फडणवीस मार्गदर्शन करताना बोलत होते. 

            याप्रसंगी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातील समिती कक्षात विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवलेविधी विधानचे सचिव सतीश वाघोले,  सचिव तथा वरिष्ठ विधी सल्लागार अमोघ कलोतीउपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

            कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीयुवा पिढीचा थेट शासनाशी संबंध यावाशासन - प्रशासन कसे चालते याची माहिती व्हावी आणि त्यांच्या नवनवीन संकल्पनांचा शासनालाही लाभ व्हावा या उद्देशाने मागील काळात सुरू केलेल्या सी. एम. फेलोचा लाभ शासनालाही झाला आहे. म्हणून विधी व न्याय विभागाचा मंत्री म्हणून विधी व न्याय विभागात अशा प्रकारची इंटर्नशीप सुरू करण्यासाठी प्रस्ताव येताच त्याला लगेच मान्यता दिली. हा स्तुत्य उपक्रम असून त्यासाठी त्यांनी विधी व न्याय विभागाचे अभिनंदन केले.

            कायदा तयार करताना विविध गोष्टींचा विचार करावा लागतो. तो इतर कायद्याला अधिक्षेप करणार नाहीत्यात कोणतीही अस्पष्टता राहणार नाहीत्याचे नियम स्वयंस्पष्ट व्हावेतयाकडे लक्ष ठेवावे लागते.  त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेणेत्याचा भाग होणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. केवळ कायदा समजून घेणेच नाही तर विधी व न्याय विभागाचे काम कसे चालतेत्यातील वेगवेगळ्या प्रकारची कामेविविध मते-मतांतरांची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना मिळेल. एकूणच विधी व न्याय विभाग हा शासनाचे बॅक बोन आहे. आपल्या संविधानाने अतिशय उत्तम व्यवस्था उभी केली आहे. चेक ॲण्ड बॅलन्ससोबतच अधिकारांचे विकेंद्रीकरण देखील आहे. या व्यवस्थेत शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्या विद्यार्थ्यांनी शिकून घ्याव्यात.

            ६०० अर्जदारांमधून १० विद्यार्थ्यांची निवड यासाठी झाली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना येथे प्रात्यक्षिक करायला मिळणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञान महत्वाचे नसून त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. अनेक अनुभवी अधिकाऱ्यांचे व्याख्यान येथे होणार आहे. याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त बाबी शिकाव्यात.

            या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसे सामावून घेता येईल याचाही विभागाने विचार करावाअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

            यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सुद्धा हा उपक्रम सुरु केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. सहभागी आंतरवासिता विद्यार्थ्यांमध्ये प्रियांका बोराप्रणिता गिरडेकरसौरा पाटीलमिहीर मोंडकरवैश्विक करेभार्गवी मुंडेसानिया सावंतकृष्णा शेळकेआकाश प्यातीवेदांती जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

            यावेळी सचिव श्री. वाघोले यांनी हा उपक्रम सुरु करण्यामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचालन सहसचिव सुप्रिया धावरे यांनीतर आभार सहसचिव मुग्धा सावंत यांनी मानले.

००००

मनीषा सावळे/विसंअ/


Featured post

Lakshvedhi