Friday, 10 November 2023

धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत

 धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत

 

            मुंबई, दि.  :- पणन हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात किमान आधारभूत  खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी ९ नोव्हेंबर२०२३ रोजी शासन आधारभूत निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रसिद्धीपत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

            धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी  यामध्ये  खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे

            शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून केंद्र शासनाने हंगाम २०२३-२४ करीता पुढीलप्रमाणे आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत.

 

पिकाचे प्रकार

आधारभूत किंमत (रुपये)

शेतकऱ्यांना प्रदान करावयाची रक्कम (रुपये)

धान /भात

साधारण (एफ..क्यु.)

२१८३

२१८३

अ दर्जा

२२०३

२२०३

भरडधान्य

ज्वारी (संकरीत)

३१८०

३१८०

 

ज्वारी(मालदांडी)

३२२५

३२२५

 

बाजरी

२५००

२५००

 

मका

२०९०

२०९०

 

रागी

३८४६

३८४६

००००

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या समग्र साहित्याच्या चार खंडांचे प्रकाशन शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या समग्र साहित्याच्या चार खंडांचे प्रकाशन

शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती

 सन्मान व्यक्त करण्यासाठी मेरी माटी मेरा देश’ अभियान

- राज्यपाल रमेश बैस

मेरी माटीमेरा देश’ अभियानांतर्गत सेल्फी विथ मेरी माटीचे

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र महाराष्ट्राला प्रदान

 

            मुंबईदि. 9 - मेरी माटीमेरा देश’ अभियान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुबीयांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या अभियानाच भाग म्हणून महाराष्ट्रात सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये झाली आहे. ही बाब अभिमानाची असल्याचे सांगून राज्यपाल रमेश बैस यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

            मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात राष्ट्रीय सेवा योजनाउच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरकौशल्यरोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढाविधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेविधान सभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरआमदार चंद्रशेखर बावनकुळेउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीउच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकरतंत्र शिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकरराष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडेमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णीसावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावीगिनीज बुक रेकॉर्ड भारतातील प्रतिनिधी ऋषिनाथ ॲड्ज्युरिकेटर उपस्थित होते.

            या उपक्रमामध्ये ४० विद्यापीठातील ७ हजार महाविद्यालयातील २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यास प्रोत्साहित करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अभिनंदन करून २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करावेतअसे आवाहन राज्यपाल यांनी युवकांना केले.

            लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या नव्या आवृत्तीचेई-बुक आणि ऑडिओ बुकचे यावेळी प्रकाशन झाले याचा आनंद आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी मोठ्या प्रमाणातनाटककथाकादंबरीलोककथाप्रवासवर्णन आदी लेखन केले. त्यांच्या साहित्याचे भारतीय आणि विदेशी भाषेत सुद्धा अनुवाद झाले आहे. त्यांचे साहित्य पुनर्मुद्रीत करून ई-बुक तयार केल्याबद्दल राज्यपालांनी समितीचे अभिनंदन केले. लोकशाहिरांचे साहित्य वाचण्याचे आणि देशातील लोकांची सेवा करण्याचे आवाहन राज्यपालांनी युवकांना केले.

सेल्फी विथमेरी माटी’ अभियानाचे

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद ही महाराष्ट्राला दिवाळी भेट

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            विक्रमविरांची परंपरा महाराष्ट्राला आणि इथल्या मातीला लाभली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान देशभरात राबविण्यात आले. याचाच भाग म्हणून ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणे ही दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला मिळालेली भेट आहे. देश प्रेमाच्या या भावनेतून हा उपक्रम यशस्वी करून 

अनुदानित वसतिगृहांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी

 अनुदानित वसतिगृहांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी

सामाजिक न्याय विभागाची माहिती

 

            मुंबई, दि. ९ : राज्यातील अनुदानित वसतिगृहांचा अनुदान प्रश्न मार्गी लागला आहे. या वसतिगृहांना अनुदान मिळणार असल्याची माहिती, सामाजिक न्याय विभागाने दिली आहे. शासन स्तरावरून निधीचे वितरण झाले असून  क्षेत्रीय कार्यालयांना निधी वितरणाची कार्यवाही सुरू आहे.

            राज्यातील अनुसूचित जातीअनुसूचित जमाती तसेच विजाभजइमाव घटकातील विद्यार्थ्यांसाठी विभागामार्फत स्वयंसेवी संस्था संचलित वसतिगृहांची योजना राबविण्यात येते. राज्यात एकूण २३८८ अनुदानित वसतिगृहे आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून या वसतिगृहांना निवासी विद्यार्थ्यापोटी दरमहा प्रति विद्यार्थी १५०० रुपये इतके परिपोषण अनुदान देण्यात येते. या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना अधीक्षक- १० हजार रुपये ,स्वयंपाकी ८५०० रुपये, मदतनीस ७५०० रुपये, तर चौकीदार ७५०० रुपये याप्रमाणे दरमहा मानधन देण्यात येते. तसेचसार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केल्याप्रमाणे वसतिगृहाच्या जागेच्या क्षेत्रफळानुसार अनुज्ञेय रकमेच्या ७५ टक्के इतकी रक्कम स्वयंसेवी संस्थेस भाड्याची रक्कम म्हणून देण्यात येते.

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन अनेक उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी

 शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊनअनेक उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी


उमेदवारांनी मानले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार


 


          मुंबई, दि. 9 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार शिक्षक भरतीच्या अंतिम निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकले आहेत. या उमेदवारांनी मंत्री श्री.केसरकर यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘शासन आपल्या दारी- जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात धाराशीव जिल्ह्यातील नळदुर्गच्या शुभांगी कदम यांनी मंत्री श्री.केसरकर यांना याअनुषंगाने अर्ज दिला होता.


            शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. केसरकर दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी सुसंवाद साधतात. दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजीच्या या कार्यक्रमात धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या रहिवासी कु.शुभांगी शशिकांत कदम यांनी पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर करण्याबाबत विनंती अर्ज केला होता. याची मंत्री श्री.केसरकर यांनी विशेष बाब म्हणून तातडीने दखल घेऊन ही अडचण दूर करण्याचे आदेश विभागाला दिले. दिनांक 3 नोव्हेंबर रोजी तांत्रिक अडचण दुरुस्तीबाबत अधिसूचना जारी करून अर्ज करण्यास आणखी काही दिवस मुदतवाढ देण्यात आली. याबद्दल कु. कदम यांनी मंत्री श्री.केसरकर आणि तत्पर शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.


            सन 2017 मध्ये शासनामार्फत पवित्र पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या शिक्षक भरतीमध्ये कु.कदम यांचे नाव प्रतीक्षा यादीमध्ये होते. या यादीतील उमेदवारांची आता निवड करण्यात येत असून पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येत नव्हते. यामुळे त्या निराश झालेल्या असताना त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील जनतेशी सुसंवाद कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री या नात्याने श्री.केसरकर यांना पवित्र पोर्टल बाबत विनंती अर्ज केला. विशेष म्हणजे त्या स्वत: उपस्थित नसतानाही श्री.केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन दिलासा दिल्याबद्दल शुभांगी कदम यांनी आभार व्यक्त केले आहेत.


            शासन आपल्या दारी संकल्पनेचे स्वागत करून राज्य शासनाने जनता दरबाराची संकल्पना संपूर्ण राज्यभर राबवावी, जेणेकरून त्यांच्यासारख्या अनेक सामान्य नागरिकांना आपल्या अडचणी शासनासमोर मांडता येतील आणि त्यांना तातडीने दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शुभांगी कदम यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता शेवटची मेट्रो धावणार रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याची अंमलबजावणी

 मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट

मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता शेवटची मेट्रो धावणार रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता

शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याची अंमलबजावणी

 

            मुंबईदि. ९ :-  मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरा पर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता १०:३०  वाजे ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय घेऊन मुंबईकरांना दिवाळीची भेट दिली आहे. 

            या निर्णयानुसार शनिवार ११ नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायक मेट्रोने रात्री ११ पर्यंत सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

            मुंबईकर प्रवाशांच्या हिताचा निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, 'दिवाळी सण हा उत्साहाचा आहे. मुंबई मेट्रोची वेळ वाढवून हा उत्साह द्विगुणित करताना आनंद होत आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रोची वेळ वाढविण्याचा महत्वाचा निर्णय आपण घेतला आहे.

            दिवाळी निमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होतीपण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही, तर कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. मुंबई महानगर प्रदेशात ती एक भक्कम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरताना दिसत आहे. दररोज लाखो नागरिक मेट्रोने सुखकर असा प्रवास करू लागले आहेत. नागरिकांचे आयुष्य आणखी सुखकर होऊ लागले आहे. मेट्रोची वेळ वाढविल्यामुळे मुंबईकर प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.पर्यावरणपूरक आणि इंधनवेळेची मोठी बचत करणारी ही मेट्रो आपल्या मुंबईची शान ठरेल असा विश्वास आहे. आपली मेट्रो स्वच्छ ठेवासुंदर ठेवा. फलाटावर आणि स्थानक परिसरातही सुरक्षा नियमांचे आणि शिस्तीचे पालन करावेअसे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

            मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिवाळी निमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याचे सुचविले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही वेळ केवळ सणासाठी न वाढवता नियमितपणे वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

            मुंबई मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या सेवा या साडेसात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. आता मेट्रोच्या वाढीव वेळेमुळे या स्थानकांदरम्यान सकाळी ५:५५ ते रात्री ११ दरम्यान मेट्रोच्या २५७ फेऱ्या होणार आहेत. तसेचरात्री १० नंतर दहिसर पश्चिम ते गुंदवलीपर्यंत २ अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या, तर डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम  दरम्यान २ अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

            'मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर आत्तापर्यंत सुमारे ६ कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. तर जवळपास १.६ लाख मुंबईकरांनी वन कार्ड खरेदी केले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावायासाठी विविध उपाययोजना राबवित आहोत. आज मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याबाबतचा निर्णय देखील मुंबईकरांसाठी दिलासा ठरेल ,'असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले आहे.

00000


महाराष्ट्र केसरी २०२३-२४ कुस्ती स्पर्धेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 महाराष्ट्र केसरी २०२३-२४ कुस्ती स्पर्धेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट




राज्यशासन मल्लांच्या पाठीशी
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करावे

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            पुणे दि. ९: महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्तीच्या विकासासाठी आवश्यक सर्व सुविधा राज्य शासन उपलब्ध करून देईल. शासन मल्लांच्या पाठिशी असून त्यांनी राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करून देत राज्याचा गौरव वाढवावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर आयोजित ६६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी २०२३-२४ स्पर्धेस भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडसआमदार भीमराव तापकीरराहुल कुलमाजी मंत्री हर्षवर्धन पाटीलमाजी राज्यमंत्री बाळा भेगडेमाजी आमदार दीपक पायगुडेबापूसाहेब पठारेभीमराव धोंडेस्पर्धेचे आयोजक प्रदीप कंदसंदीप भोंडवे आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्राचे वैभव आहे. राज्यात नामवंत पैलवान या स्पर्धेतून तयार होतात. देशात महाभारत काळापासून कुस्तीची परंपरा आहे. राज्याला देखील कुस्तीची मोठी परंपरा आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकचे पहिले पदक कुस्तीमध्ये मिळवून दिले. आज मात्र महाराष्ट्राच्या पैलवानाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळत नसल्याने कुस्तीगीर परिषदेला त्यासाठी मोठे काम करावे लागेल.

            श्री. फडणवीस पुढे म्हणाले कीमागील महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मल्लांचे मानधान वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. हिंद केसरी आणि रुस्तम ए हिंदचे मानधन ४ हजारांवरून १५ हजार रुपयेअर्जुन पुरस्कार विजेत्यांचे मानधन ६ हजारावरून २० हजारवयोवृद्ध खेळाडूंचे मानधन अडीच हजारांवरून साडेसात हजार रुपये केले. खुराकाचा खर्च ३ हजारांवरून १८ हजार रुपये केला. वेगवेगळी साधने घेता यावे यासाठी अनेक योजना सुरू केल्या. भविष्यातदेखील राज्य शासन मल्लांच्या पाठिशी उभे राहीलअसेही ते म्हणाले.

            यावर्षीच्या आशियायी स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्याला १ कोटी रुपये पारितोषिक देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासन खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. कुस्तीसाठीही आवश्यक सर्व सोयी शासन करेल. मात्र महाराष्ट्र केसरी स्पर्धा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धाऑलिम्पिक असे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवायला हवे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यासाठी जी मागणी करेल ती शासनातर्फे देण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली.

            खासदार श्री.तडस म्हणाले कीया स्पर्धेचे चांगले आयोजन करण्यात आले आहे. ४४ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ९०० कुस्तीगीरांचा विमा कुस्तीगीर संघाकडून उतरविण्यात येणार आहे.  महाराष्ट्राचे नाव हिंद केसरीआंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोठे करण्यासाठी शासनाने नोकरी दिलेल्या कुस्तीगीराने नोकरीत प्रवेश केल्यापासून किमान ३ वर्षे खेळले पाहिजे. पै. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर व्हावाअशी मागणी त्यांनी केली.

            यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती विभागातील पैलवान सिकंदर शेखवाशिम विरुद्ध पृथ्वीराज मोहोळपुणे या कुस्तीची सलामी लावण्यात आली. या कुस्तीमध्ये सिकंदर शेख विजयी झाला. श्री. फडणवीस यांच्या हस्ते गादी विभागातील पृथ्वीराज पाटीलकोल्हापूर विरुद्ध माऊली उर्फ हर्षल कोकाटेपुणे शहर या कुस्तीचीही सलामी लावण्यात आली. यामध्ये माऊली कोकाटे विजयी झाला.

            यावेळी श्री. कंद यांनी मान्यवरांचे स्वागत करून स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवरकुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्तराखंड समाजाचे राज्याच्या विकासात लक्षणीय योगदान

 उत्तराखंड समाजाचे राज्याच्या विकासात लक्षणीय योगदान







-
 राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र राजभवन येथे 'उत्तराखंड राज्य स्थापना दिवससाजरा

 

            मुंबई, दि. 9 : उत्तराखंड ही देवभूमी आहेतर महाराष्ट्र ही संत भूमी आहे. या देवभूमीतून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेले उत्तराखंडी लोक मृदू स्वभावाचे व मेहनती असून ते महाराष्ट्राच्या भाषा व संस्कृतीशी एकरूप झाले आहेत. महाराष्ट्रातील उत्तराखंडी  समाजाचे राज्याच्या प्रगती व विकासात लक्षणीय योगदान आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. 

            राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे आज  प्रथमच 'उत्तराखंड राज्य स्थापना दिवससाजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.  'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत विविध राज्य व केंद्र शासित प्रदेशांचा सर्व राज्यांमध्ये स्थापना दिवस साजरा करण्याच्या प्रथेप्रमाणे उत्तराखंड राज्य स्थापना दिवस राजभवन येथे साजरा करण्यात आला.

            या राज्याने देशाच्या सैन्यदलामध्ये शेकडो वीर जवान व अधिकारी दिले आहेत. उत्तराखंडच्या अनेक घरांमध्ये एका मुलाला देशसेवेसाठी लष्करात दाखल करण्याची प्रथा असून या भूमीने जनरल बिपीन रावत यांसारखे महान अधिकारी दिले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला 'एक भारतदिला. सर्व नागरिकांनी देशाला 'श्रेष्ठ भारतबनविण्याचा प्रयत्न करावाअसे राज्यपालांनी सांगितले.  

            यावेळी मुंबईतील उत्तराखंडी समाजाच्या 'गढवाल भ्रातृ मंडल', 'हिमालय पर्वतीय संघव 'कौथिग  फाऊंडेशनया संस्थांच्या माध्यमातून उत्तराखंडच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते तिनही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमात उत्तराखंडचे मांगल गीतपूजा नृत्यकुमाऊनी झोडा नृत्यलोकगीतजौनसारी लोकनृत्यएकल नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी प्रास्ताविक केले, तर राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांनी आभार प्रदर्शन केले. 

००००

 

Uttarakhand State Foundation Day celebrated in Maharashtra Raj Bhavan

Governor hails the contribution of people of Uttarakhand in progress and development of Maharashtra

      Mumbai Dated 9 : The State Foundation Day of Uttarakhand was celebrated in Maharashtra Raj Bhavan in the presence of Maharashtra Governor Ramesh Bais on Thursday (9 Nov).

            The Uttarakhand State Foundation Day was celebrated in Maharashtra Raj Bhavan as part of the 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative of Government of India.

Speaking on the occasion, Governor Ramesh Bais hailed the contribution of the people of Uttarakhand origin to the progress and development of Maharashtra.

            A cultural programme depicting the rich culture and traditions of Uttarakhand was presented on the occasion. The Cultural programme was presented by Garhwal Bhratri Mandal, Himalaya Parvatiya Sangha and Kauthig Foundation. The Governor felicitated the office bearers of the three organisations and the artists.

            Mangal Geet, Puja Dance, Kumauni Jhoda Dance, Jaunsari Folk Dance, Solo Dance and other cultural programmes were presented.

Secretary to the Governor (in charge) Shweta Singhal delivered the welcome speech while Comptroller of the Governor's Households Arun Anandkar proposed vote of thanks.

0000


Featured post

Lakshvedhi