Tuesday, 7 November 2023

कुणबी' नोंदी शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष कार्यान्वित करावेत

 कुणबीनोंदी शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष कार्यान्वित करावेत

 - निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे

 

            मुंबईदि. 6 : मराठा- कुणबीकुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर विशेष कक्ष स्थापन करून या कक्षाला मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावेअसे निर्देश निवृत्त न्यायमूर्ती तथा गठित समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिले.

            शासन निर्णय 3 नोव्हेंबर 2023 नुसार मराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना संपूर्ण महाराष्ट्रात सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आले आहे. या समितीची 13 वी बैठक आज न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीस अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रेडॉ. राजगोपाल देवरा  अपर मुख्य सचिव (महसूल)मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगेविधी व न्याय विभागाचे सचिव अमोघ कलोतीइतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव वीरेंद्र सिंहसामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्तसर्व जिल्हाधिकारी यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयजालना व छत्रपती संभाजीनगर येथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

            यावेळी सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कक्ष स्थापन करून त्या कक्षाला मनुष्यबळ पुरवण्यात यावे.  तसेच मराठवाडा विभागाने ज्या पद्धतीने काम केले आहे त्या पद्धतीने अभिलेख शोधण्याचे काम करावे.  सन 1967 पूर्वीचे अभिलेख तपासण्याच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत चर्चा करण्यात आली.  विभागीय आयुक्त नाशिकअमरावती आणि नागपूर यांनी यापूर्वी कुणबी’ जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने झालेली कार्यवाही याबाबत समितीस अवगत केले.  सक्षम प्राधिकारी यांनी मागील 5 वर्षातील दिलेली मराठा-कुणबीकुणबी-मराठा या जात प्रमाणपत्रांची वर्षनिहाय माहिती विहित विवरणपत्रात उपलब्ध करुन देण्याबाबत सूचित करण्यात आले.  त्यामध्ये प्रामुख्याने जात प्रमाणपत्र मंजूर करताना ग्राह्य धरण्यात आलेले पुरावेजात प्रमाणपत्र नामंजूर करताना नामंजुरीची कारणे याबाबतचा तपशील शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत सादर करण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.

            न्यायमूर्ती श्री. शिंदे (निवृत्त) समितीने गेल्या महिन्याभरात मराठवाडा विभागात जिल्हानिहाय आढावा बैठक घेतलेली होती.  त्यानुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून कागदपत्रेअभिलेख तपासणीचे कामकाज प्रभावीपणे करण्यात आले.  मराठवाडा विभागात 1.74 कोटींपेक्षा जास्त नोंदींची तपासणी केली आहे. त्यामध्ये सद्य:स्थितीत 14,976 ‘कुणबी’ जातीच्या नोंदी आढळलेल्या आहेत.  त्यापैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त नोंदींचे स्कॅनिंग करण्याचे काम मराठवाडा विभागात झालेले आहे. शोधण्यात आलेली जुनी कागदपत्रे (मोडी / ऊर्दू / फारसी इ.) संबंधित भाषा तज्ञांकडून भाषांतरीत करुनडिजिटलाईजेशन तसेच प्रमाणिकरण करुन संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत सूचित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जी संस्थाने होतीत्या संस्थांनांकडून ज्या अभिलेखात कुणबी’ जातीच्या नोंदी आढळून येतील असे कायदेशीर अभिलेख उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.

            उपलब्ध अभिलेखांशिवाय अन्य कोणत्या प्रकारच्या अभिलेखांत कुणबी’ जातीच्या नोंदी आढळल्यास त्या अभिलेखांबाबत शुक्रवार  10 नोव्हेंबर2023 पर्यंत समितीस अवगत करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या.

०००००

कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात

 कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात

          - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 

             मुंबईदि. 6 :- पंढरपूर (जि.सोलापूर) येथे कार्तिकी यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती व सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात येईलअशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

            यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्ही. सी. रूम येथून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादपोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडेजिल्हाधिकारी तुषार ठोंबरेअपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधवनिवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळेप्रांत अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गजानन गुरवमंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकरपंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकरजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोलेपंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकरपंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

       पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले कीपंढरपूर येथे कार्तिकी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना जिल्हा प्रशासन व मंदिर समिती यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व्यतिरिक्त अन्य सोयी सुविधा तसेच विशेष बाब म्हणून खर्च करावयाच्या कामासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. येथे येणारा एकही भाविक पायाभूत सोयीसुविधा पासून वंचित राहणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी.

            शहरात कोठेही अस्वच्छता राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. यात्रेनिमित्त निर्माण करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष तयार करावे. दर्शन रांग लांब जात असल्याने दर्शन रांगेत ठिकठिकाणी भाविकांना विसावा घेण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण कराव्यात. तसेच स्कायवाकच्या ठिकाणीही भाविकांसाठी बैठक व्यवस्था करावीअशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

            23 नोव्हेंबर 2023 रोजी शुद्ध कार्तिकी एकादशी असल्याने या दिवशी शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. सर्व संबंधित विभागानी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी परस्परात समन्वय ठेऊन चोखपणे पार पाडावीअशी सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी करून दि. 16 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी पंढरपूर येथे येऊन करणार असल्याचेही सांगितले.

            यात्रा कालावधीत पंढरपूर येथे जनावरांचा मेळावा भरत असतोपरंतु मागील एक दोन वर्षात लंपी आजारामुळे जनावरांचे मेळावे किंवा बाजार भरले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर  जनावरांचा मेळावा घेण्याचे नियोजन असेल तर लंपीग्रस्त जनावरे या मेळाव्यास येणार नाहीत याबाबत पशुसंवर्धन विभागाने दक्षता घ्यावीअशी सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. तसेच जिल्हाधिकारी यांनी पुढील एक-दोन दिवसात जिल्हास्तरावर या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाची बैठक घेऊन पंढरपूर येथे मेळावा घेऊ शकतो का याची खात्री करावी असेही त्यांनी सूचित केले.

            प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी कार्तिकी यात्रा 2023 साठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. पोलीस अधीक्षक श्री.  सरदेशपांडे यांनी पोलीस विभागाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी श्री. गुरव व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री शेळके तसेच मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनीही बैठकीत केलेल्या कामकाजाची माहिती दिली.

0000

निलेश तायडे/विसंअ


 


भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन

 





भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन


       मुंबई दि. ७ :  भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले.

            उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,  कौशल्य विकास व पर्यटन  मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राजे वांगचुक यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.             यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त  विवेक फणसळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राष्ट्रीय टूथब्रश दिवस’ निमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मौखिक आरोग्य जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन

 राष्ट्रीय टूथब्रश दिवस निमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते

मौखिक आरोग्य जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन

 

          मुंबईदि.७ : स्वच्छ मुख आरोग्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय टूथब्रश दिवस- ०७ नोव्हेंबर रोजी जनमानसांमध्ये मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन आज करण्यात आले.

            राष्ट्रीय टूथब्रश दिवसाचे औचित्य साधून स्वच्छ मुख अभियानांतर्गत संचालनालयवैद्यकीय शिक्षण व संचालनालयमुंबई व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयमुंबईतर्फे तयार केलेल्या जनजागृतीपर पत्रिकेचे प्रकाशन मंत्रालयात मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

            राष्ट्रीय टूथब्रश दिवस जनमाणसांमध्ये मौखिक आरोग्यविषयक जनजागृती तसेच दिवसांतून दोन वेळा टूथ ब्रशिंगविषयी जागरुकता व्हावीया उद्देशाने साजरा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दातांच्या किडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या वयातच लहान मुलांना टूथब्रशिंगविषयी जागरुकता व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जनजागृतीसाठी विविध दंत महाविद्यालयेसामाजिक संस्था हिरिरीने पुढाकार घेऊन पोस्टर्सबॅनर्सरॅलीपथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करतात.

            यावेळी मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते पर्यावरणपूरक दंत ब्रश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकरसहसंचालक (वैद्य) अजय चंदनवालेडॉ. पाखमोडे (दंत),अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड, डॉ. संध्या चव्हाणडॉ. राजेश गायकवाडडॉ. सूर्यकांत पोवार, आशिष जळमकर यांची उपस्थिती होती. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेआयुक्त राजीव द. निवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

0000

मंत्रालयात दिवाळी फराळ व सजावट साहित्याच्या स्टॉलचे







 मंत्रालयात दिवाळी फराळ व सजावट साहित्याच्या स्टॉलचे

मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

 

       मुंबई, दि.७ : महिला बचत गटांनी तयार केलेले दिवाळीसाठीचे सजावट साहित्य, फराळ, सेंद्रिय शेतमाल उत्पादनाच्या साहित्यांच्या विविध स्टॉलचे मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उद्घाटन केले.

            महिलांना औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास सहकार्य करण्यासाठी राज्य शासन महिला बचत गटांना प्रोत्साहन देत असल्याचे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले. कु. तटकरे यांनी यावेळी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला आणि महिलांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

 

            मंत्रालय त्रिमुर्ती प्रांगणात दिवाळी  निमित्त महिला व बालविकास विभागातंर्गत  ६ ते १० नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील विविध महिला बचतगटांमार्फत बनविण्यात आलेल्या उत्पादनांची प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड उपस्थित होत्या.

 

            क्षितीज सीएमआरसीमुंबई जिल्ह्याचा दिवाळी फराळस्वाभिमान प्रोजेक्ट सीएमआरसीमुंबई जिल्ह्याचा दिवाळी सजावट साहित्यदीपिका गृह उद्योगठाणे जिल्ह्याचा रुरल मार्ट, तनिष्का सीएमआरसी मुंबई जिल्ह्याचा लोकरीच्या हस्तकला तोरणलेदर वर्क आणि बुक, घे भरारी सीएमआरसीमुंबई जिल्ह्याचा ज्वेलरी आणि दिवाळी फराळउन्नती बचत गटमुंबई जिल्ह्याचा चॉकलेट आणि पणत्यानवतेजस्विनी कला दालनपुणे जिल्ह्याचा ज्यूट प्रोडक्ट,  संकल्प आणि खुशिया सीएमआरसीचंद्रपूर जिल्ह्याचे कार्पेट व बांबू आर्ट, चेतना सीएमआरसी आणि राणीकाजल सीएमआरसी, नंदुरबार जिल्ह्याचे मिलेटधूपबत्ती उत्पादनेओवी शेतकरी उत्पादक कंपनीजालना जिल्ह्याचे सेंद्रिय शेतमाल उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी मंत्रालयात उपलब्ध आहेत.

सेल्फी विथ मेरी माटी’ अभियानाची गिनीज बुकमध्ये नोंद

 सेल्फी विथ मेरी माटी’ अभियानाची गिनीज बुकमध्ये नोंद

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबईदि. ६ : देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या वीरांना श्रध्दांजली अपर्ण करण्याच्या उद्देशाने देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देशमिटटी को नमनवीरो को वंदन हे अभियान जाहीर केले होते. याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून "सेल्फी विथ मेरी माटी अभियान राबविले. या अभियानाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विश्वविक्रम अभियान  प्रमाणपत्र वितरण सोहळा पूर्व तयारीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीप्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेशस्वधर्म आणि स्वाभिमान असलाच पाहिजे. बलिदानाचे स्मरण करुन नव्हे तर त्यांची निष्ठा तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजेयाच उद्देशाने गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सेल्फी विथ मेरी माटी राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालयेउच्च शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थीशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीपालक व इतर सर्व संबंधितांनी हे अभियान यशस्वीपणे राबवून विश्वविक्रम केला आहे. ही अभिमानाची बाब आहे.

            या उपक्रमाचा  प्रमाणपत्र वितरण सोहळा राज्य संपर्क कार्यालय राष्ट्रीय सेवा योजनाउच्च व तंत्र शिक्षण विभागमहाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी दु.१.०० वाजता सर कावसजी जहांगीर दिक्षांत सभागृह येथे होणार आहे.

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन

 मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबईदि. ६ : रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठासाठी विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून पुढील वर्षीच्या जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईलअसे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणवस्त्रोद्योगसंसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आज मंत्री श्री. पाटील यांच्या दालनात मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबतचा अहवाल सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेसदस्य प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगेडॉ. रमेश वरखेडेडॉ. अविनाश आवलगावकरश्री. कारंजेकरउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीमराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावेअशी मागणी अनेक वर्षापासून होती. या मागणीचे महत्व लक्षात घेऊन शासनाने समितीचे गठन केले होते. समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल पूर्ण केला आहे. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचे ऐतिहासिक काम मार्गी लावल्याबद्दल त्यांनी समितीच्या सदस्यांचे आभार मानले. तसेच या मसुदा समितीचे रूपांतर मराठी भाषा विद्यापीठाच्या सल्लागार समितीत करावे.

            मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समितीचे यापुढेही सहकार्य राहीलअसा विश्वास व्यक्त करीत मंत्री श्री. पाटील म्हणाले कीऋद्धिपूर येथे लीळा चरित्र लिहिण्याबरोबरच मराठी भाषेतील ग्रंथ निर्मितीचे केंद्रही राहिले आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होईलअसेही त्यांनी सांगितले.

            मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखाशिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम होतील याचाही विचार करण्यात आला आहे. पारंपरिक विद्यापीठांपेक्षा मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्राची संस्कृतीपरंपरा वेगळेपण केंद्रस्थानी ठेऊन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यात येईलअसे समितीचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi