Saturday, 4 November 2023

अनुसूचित जातीसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची राज्यात समाधानकारक अंमलबजावणी

 अनुसूचित जातीसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची

राज्यात समाधानकारक अंमलबजावणी

        राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर

    

        मुंबईदि.  : केंद्र व राज्य सरकारच्या अनुसूचित जातींसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची राज्यात समाधानकारक अंमलबजावणी होत आहे. या  अंमलबजावणीचा अहवाल एक महिन्यात सादर करावा असे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी सांगितले.

राज्याच्या अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांविषयी आढावा बैठक हॉटेल ताज पॅलेस मुंबई येथे झाली. त्यावेळी आयोगाचे श्री हलदर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधीअंजू बाला उपस्थित होते.

        श्री. हलदर म्हणाले,राज्यातील अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजना व कायद्याबाबतच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभाग व राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून  मागविलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल एक महिन्यात प्राप्त करून द्यावात्यानंतर तो अहवाल केंद्र शासनाकडे आयोगाकडून सादर करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्य सचिवसामाजिक न्याय विभागाचे सचिव व विविध विभागांच्या सचिवांसोबत अनुसूचित जातींच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा आज घेण्यात आला आहे.

         या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिकपोलीस महासंचालक रजनीश शेठमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेगृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगीशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओलसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेवस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंगमहात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळीसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभियेसमाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरियाबार्टीचे महासंचालक सुनिल वारे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे संचालक कौशल कुमार तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            या बैठकीनंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी   श्री. हलदर यांनी राज्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. अनुसूचित जातींसाठी उपलब्ध असलेल्या घटनात्मक बाबीअनुशेष, रिक्त पदेविविध पदांचे रोस्टरअनुसूचित जातींच्या संरक्षणकल्याण आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक  उपाययोजनांच्या शिफारशींचा या अहवालांमध्ये समावेश असणार असल्याचे श्री. हलदर यांनी यावेळी सांगितले.

0000


पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत कंत्राटी बाहय यंत्रणेद्वारे नियुक्त मनुष्यबळाच्या मानधनात प्रतिवर्षी ३ टक्के वाढ मंजूर

 पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत कंत्राटी 

बाहय यंत्रणेद्वारे नियुक्त मनुष्यबळाच्या मानधनात प्रतिवर्षी ३ टक्के वाढ मंजूर

                     -गिरीश महाजन

 

            मुंबदि.३ : पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत कंत्राटी व बाहय यंत्रणेद्वारे राज्यजिल्हा व तालुका स्तरावरील नियुक्त मनुष्यबळाच्या मानधनात प्रतिवर्षी ३ टक्के वाढ मंजूर करण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            मंत्री श्री महाजन म्हणाले,पुनर्रचित (Revamed) राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना सन २०२२ ते सन २०२६ या कालावधीकरीता राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.

            या योजनेसाठी ग्रामविकास विभागामधील तरतूदीनुसार राज्यजिल्हा व तालुका स्तरावर करारपध्दतीने  बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे मानधन निश्चित करण्यात आले आहे.पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळामार्फत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हातालुका व ग्रामपंचायत स्वरावरील प्रशिक्षणाकरीता समन्वय करणेपंचायती राज संस्थांच्या संबंधित विविध स्वरुपाच्या माहितीअहवाल संकलन करणेइतर विविध उपक्रमांची अंमलबजावणी व सनियंत्रण करणेजिल्ह्याचा मासिक प्रगती अहवाल तयार करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणेयोजनेंतर्गत उपलब्ध निधीचे स्वतंत्र हिशोबलेखे ठेवणेलेखापरिक्षण करुन घेणे तसेच योजनेसंदर्भात सोपविलेली सर्व कामे पार पाडणे इत्यादी कामे करण्यात येतात. त्यांच्या कामाचे व्यापक स्वरुप विचारात घेता त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांच्या मानधनात प्रतिवर्षी ३ टक्के वाढ करण्याबाबत मान्यता दिली असल्याचे श्री महाजन यांनी सांगितले.

            पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत कंत्राटी बाहय यंत्रणेद्वारे जिल्हास्तरावर ११५ पदे व तालुकास्तरावर ६७० पदे मंजुर करण्यात आलेली आहेत. यामध्ये पेसा क्षेत्रातील जिल्हा (१३) व तालुका (५९) समन्वयकांचाही समावेश आहे.

00000000000

विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी 'सखी सावित्री' समितीचे एका महिन्यात गठन करावे

 विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी

 'सखी सावित्रीसमितीचे एका महिन्यात गठन करावे

-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 3 : राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी 'सखी सावित्रीसमिती गठन करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. पुढील एका महिन्यात सर्व शाळांमध्ये या समित्यांचे गठन करावेअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

            राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी या अनुषंगाने मंत्री श्री. केसरकर यांची भेट घेतली. यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल (ऑनलाईन)प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावीउपसचिव समीर सावंतमुंबई विभागीय उपसंचालक संदीप संगवे यांच्यासह सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक (ऑनलाईन) आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. केसरकर म्हणालेविद्यार्थ्यांच्या शिक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याचबरोबर त्यांची सुरक्षाशाळेमधील पोषक वातावरणविद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षणत्यांचे समुपदेशन आदींसाठी शासनाने शाळाकेंद्रतालुका अशा विविध पातळ्यांवर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबत 10 मार्च 2022 रोजी परिपत्रक जारी केले आहे. याची तातडीने अमलबजावणी करण्यात येऊन जेथे समिती कार्यरत नसेल तेथे एका महिन्यात समिती गठन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे पालकांमध्ये देखील याबाबत जागृती करावीअसे त्यांनी सांगितले.

            शाळेत समतामुलक वातावरण राहील यासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबविले जावेत. निकोप वातावरण निर्मिती करावी. तसेच अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत असलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या 'चिरागॲप ची माहिती विद्यार्थ्यांना द्यावीअसेही मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांचा

 विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांचा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

 

            मुंबई दि.3 : विदर्भ आणि मराठवाड्यासाठी दुग्धव्यवसाय उद्यमशीलतेचा विकास या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहसूलपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय  विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली.

              यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडेराष्ट्रीय गोकुळ मिशनचे सहआयुक्त डॉ. भूषण त्यागीराष्ट्रीय डेरी विकास बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहामहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटीलपशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणालेविदर्भ आणि मराठवाड्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन दुग्धविकास  प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यात आले असून पुढील पाच वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.

            उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणालेविदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्पांचे सहकार्य घेण्यात येईल.तसेच यातून 3,30,000 रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. राज्य सरकार यासाठी निधी देणार आहे.

              पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले,विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतील.

            तसेच यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

००००


 

कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील :

 कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील :

- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

            मुंबई दि. ४ :  खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन करण्यात आले असून या समितीच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

            मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी  मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडेपशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकरसमन्वय समितीचे सदस्य आणि खाजगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीसमितीच्या कार्यकक्षेनुसार खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात शासनाच्या विविध विभागांशी आवश्यक त्या शिफारशी केल्या आहेत. ऊर्जाग्राम विकासशालेय शिक्षण आदी विभागांना प्रस्ताव पाठविला आहे. समन्वय समितीमार्फत कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर व खाजगीरीत्या संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी या वेळी सांगितले.

0000000

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार

 कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार


 - पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई दि. ४ : कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


             सह्याद्री अतिथीगृह येथे कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या समस्याबाबत नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, रघुनाथ दादा पाटील, इंद्रीस नायकवाडी यांच्यासह विविध कुक्कुटपालन सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शितलकुमार मुकणे, सहनिंबधक शहाजी पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सहकार विकास निगम मार्फत कुक्कुट पालन सहकारी संस्थांना दिलेल्या थकीत कर्ज फेडीबाबत सहकारी संस्थांकडून आलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल. तसेच या बाबतीत वित्त विभागाची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. असे ही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


 


00000

Friday, 3 November 2023

मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम

 मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम

मिशनमोडवर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

न्या. शिंदे समितीची कार्यकक्षा आता राज्यभर

 

            मुंबईदि.3 : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. या कामाच्या संनियत्रणासाठी मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी यांची देखील यावेळी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

            निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला इम्पॅरीकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून महिन्याभरात ती उपलब्ध करून द्यावीअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव मनोज सौनिकसामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरमहसुल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची बैठक घेतली. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्या समवेत काल राज्य शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेतील मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी आज विभागात कुणबी नोंदी तपासणीच्या कामाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेराज्य शासन गांभीर्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करीत आहे. त्यासाठी आता मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी. त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली  कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळसाधनसामुग्री देखील तातडीने देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव नितीन गद्रेमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगेविभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी याबाबत संनियंत्रण करतीलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

कुणबी मराठामराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी

            निवृत्त न्यायाधीश श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा संपूर्ण राज्यभर वाढविण्यात आली असून ज्या पद्धतीने मराठवाड्यात नोंदी तपासण्यात आल्या तशीच कार्यपद्धती राज्यभर राबवावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मराठवाड्यात शिंदे समितीने शिफारस केलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी मराठामराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी त्याचबरोबर प्रांत अधिकारीतहसीलदार व जातपडताळणी समित्यांमधील अधिकारीकर्मचारी यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण द्यावेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासनाचे दोन पातळीवर काम

            मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासन दोन पातळीवर काम करीत असून राज्यभर कुणबी नोंदी तपासण्याची कार्यवाही सुरू करतानाच दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पॅरीकल डेटा जमा करण्यासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावीअसेही त्यांनी सांगितले. इम्पॅरीकल डेटा गोळा करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थागोखले इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिस्टीक्स अण्ड इकॉनॉमिक्स आणि इंडियन इन्स्टीट्युट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज यासंस्थांची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

महिला उद्योजकांना कर्ज वाटपासाठी विशेष योजना तयार करावी

            अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणारे कर्ज तातडीने उपलब्ध होईल यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याचे निर्देश देतानाच कर्ज वितरणामध्ये वाढ झाली पाहिजेमहिला उद्योजकांना कर्ज वाटपासाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासंदर्भात बँकांची बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अधिक सक्षम त्याचा लाभ मराठा समाजातील नागरिकांना द्यावा.

भाडेतत्वावर जागा घेऊन तातडीने वसतीगृहे सुरू करावी

            मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी विभागाने भाडेतत्वावर जागा घेऊन तातडीने वसतीगृहे सुरू करण्याचे निर्देश देऊन त्याबाबतचा दर आठवड्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.जेथे वसतिगृह उपलब्ध होत नाहीत अशा महानगर असलेल्या मुंबईपुणेठाणेनागपूरनाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रति वर्ष प्रति विद्यार्थी 60 हजार रुपये निर्वाह भत्ताविभागीय ठिकाणविभागीय मुख्यालय व क वर्ग महापालिका असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रति वर्ष 51 हजार रुपये निर्वाहभत्ता देण्यात येणार असून अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी 43 हजार रुपये निर्वाहभत्ता तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये निर्वाह भत्ता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे.

राज्यातील विभागीय आयुक्तजिल्हाधिकाऱ्यांची कार्यशाळा

            विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांची तातडीने कार्यशाळा घेऊन  शिंदे समितीच्या कामकाजाच्या संदर्भात व कोणती अभिलेखे तपासायची याबाबत मार्गदर्शन करावेअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातील कुणबी नोंदीचे अभिलेखांचे डिजिटायजेशन आणि प्रमाणीकरण करावे. मोडीउर्दू लिपीतील अभिलेखांचे भाषांतर करून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 

००००


Featured post

Lakshvedhi