Thursday, 2 November 2023

राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाढविणार महिलांचा सहभाग





 राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगरात

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाढविणार महिलांचा सहभाग

 

            मुंबईदि. 2 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे अर्का रेस्टारंट पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे.

            महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचलिका श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाव्यवस्थापक  चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवासराज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहे. येथील सर्व कर्मचारी या महिला असून येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आणि आदरातिथ्याचा अनोखा अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सज्ज झाले आहे. पर्यटक निवासात आलेल्या बंगाली पर्यटक सुतापा चॅटर्जी यांच्या हस्ते आज मुंबई, छत्रपती संभाजी नगर, खारघर येथे महिला संचलित पर्यटक निवासाचा  शुभारंभ करण्यात आला.

            महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग  हा महिलांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरु शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेवृत्व गुण विकसित करणे तसेच राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण शासनाद्वारे राबविण्यात येत आहे.

            राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला केंद्रित धोरण आखण्यात आले असून त्याच्या पंचसुत्रीनुसार हे धोरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व पर्यटन संचालनालय यांच्यामार्फंत सर्व विभागांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

            त्याअनुषंगाने महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांनी तसेच पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगर व अर्का उपहारगृहखारघर येथे मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन ही योजना यशस्वीरित्या राबविण्यात येणार असून त्याअनुषंगाने सर्व प्रादेशिक कार्यालये व पर्यटक निवासे येथे आई महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे.

        पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना (होम स्टे, हॉटेल /रेस्टारंटटूर ॲण्ड ट्रॅव्हल एजन्सी इ.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विविध प्रोत्साहने आणि सवलती देण्यात येणार आहेत. नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला सहल मार्गदर्शकमहिला वाहन चालकमहिला सहल संचालक (टूर ऑपरेटर) व इतर महिला कर्मचारी यांना केद्र आणि  राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फंत आयोजित पर्यटन सर्किंट / पॅकेजस मध्ये महिला पर्यटकांना विविध सवलती देण्यात येत असून महामंडळाच्या सर्व रिसॉर्टस/युनिट्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठराविक कालावधीत फक्त ऑनलाइन बुकिंगमध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणीमहिला बचत गटांना हस्तकलाकलाकृतीप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादीच्या विक्रीसाठी स्टॉल / जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टसमध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा जसे कीअपंग किंवा वृद्ध महिलांकरीता लिफ्ट जवळच्या खोल्या उपलब्ध करुन देण्यास प्राधान्यमहिलांसाठी विशेष खेळमनोरंजन कार्यक्रमांचे आयोजनमहिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी सहल. इ. बाबी प्रामुख्याने राबविण्यात येणार आहेत.

            महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढविणे आणि सर्वसमावेशक विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्राधान्याने काम करीत असून त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवासामध्ये 82 खोल्या त्यामध्ये लक्झीरियस सूटस पासून स्टॅडर्ड रूम अशी वगर्वारी आहे. हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. निवासामध्ये उपहारगृह असुन विविध स्थानिक पदार्थ आणि रुचकर जेवणाची मेजवानी सदरच्या उपहारगृहामध्ये उपलब्ध आहे. या पर्यटक निवासामध्ये प्रशस्त लॉन असुन मुलांसाठी विविध खेळणी आहेत. साधारणपणे 50 लोकक्षमतेचा कॉन्फरन्स हॉल उपलब्ध असून आगामी काळात या ठिकाणी जलतरण तलावबॅडमिंटन कोर्टमहिला व्यायामशाळा अशा सुविधा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहेछत्रपती संभाजीनगरवासियांनी आणि राज्याच्या पर्यटन राजधानीत येणाऱ्या पर्यटकांनी सदरच्या उपक्रमात यापुढेही सहभाग घेवुन भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा जपत पर्यटनाचाही आनंद द्विगुणित करावाअसे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक  दीपक हरणे यांनी केले आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे

२ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. २ : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या २ हजार ५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री ७ नोव्हेंबर २०२३ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ८ नोव्हेंबर 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ८ नोव्हेंबर, २०२३ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ नोव्हेंबर २०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ८ मे आणि ८ नोव्हेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे दहा वर्षे मुदतीचे २ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे दहा वर्षे मुदतीचे

२ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. २ : महाराष्ट्र शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार ५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री ७ नोव्हेंबर २०२३ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ८ नोव्हेंबर 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १० वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ८ नोव्हेंबर, २०२३ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ नोव्हेंबर २०३३ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ८ मे आणि ८ नोव्हेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

 भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

           

            मुंबईदि. 02 : देशभर 30 ऑक्टोबर  ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. 

            राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करतानाभ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागमुंबई विभाग91सर पोचखानवाला मार्गवरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064दूरध्वनी क्रमांक 022-24921212संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा ईमेल acbwebmail@mahapolice.gov.inaddlcpacbmumbai@mahapolice.inफेसबुक www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप acbmaharashtra.net, एक्स (ट्विटर) - @ACB_Maharashtra आणि 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विजय पाटील यांनी केले आहे.

महापर्व छठ की महिमा को दिखाती भोजपुरी फिल्म छठ के बरतिया का ट्रेलर को एक दिन में मिले 1 मिलियन व्यूज

 महापर्व छठ की महिमा को दिखाती भोजपुरी फिल्म छठ के बरतिया का ट्रेलर को एक दिन में मिले 1 मिलियन व्यूज


भक्त और भगवान के बीच के रिश्ते को दर्शाती भोजपुरी फिल्म छठ के बरतिया के ट्रेलर को मिले इतने व्यूज

वर्ल्डवाइड रिकार्ड्स से रिलीज स्मृति सिन्हा और माही श्रीवास्तव स्टारर भोजपुरी फिल्म छठ के बरतिया के ट्रेलर को 1 दिन में एक मिलियन व्यूज

एआरके वर्कस चैनल रत्नाकर कुमार प्रस्तुत भोजपुरी फिल्म छठ के बरतिया का बेहतरीनट्रेलर वर्ल्डवाइड रिकार्ड्स के ऑफिशियल यूट्यूब चैनल से रिलीज होने के बाद से सोशल मीडिया में धमाल मचा रहा है। ट्रेलर को रिलीज हुई महज एक ही दिन हुआ है और इसे दर्शकों ने सर आंखों पर बैठा लिया है जी हां ट्रेलर को एक दिन में एक मिलियन से ज्यादा व्यूज और 9 हजार से ज्यादा लाइक्स मिल चुके हैं। वही ट्रेलर दर्शकों को बहुत ही ज्यादा पसंद आ रहा है। छठ के बरतिया के ट्रेलर की चर्चा हर तरफ हो रही है। क्योंकि इसमें सभी कलाकारों ने अपना 100 परसेंट दिया है। जो कि ट्रेलर में नजर आ रहा है।
फिल्म के ट्रेलर में दिखाया गया है कि एक नई नव विवाहिता नारी को अपने पति से ससुराल में जितना प्यार मिलता है, उससे कहीं ज्यादा ससुराल के घरवालों का अत्याचार सहन करना पड़ता है। नवविवाहिता के क़िरदार में स्मृति सिन्हा को जब-जब अधिक कष्ट मिलता है, तब तब छठ माता किसी न किसी भेष में उसकी सहायता करती हैं। ट्रेलर में दिखाया गया है कि एक वक़्त ऐसा भी आता है जब छठ माता की परम भक्त स्मृति सिन्हा जिंदगी और मौत से जूझ रही है तब जीवनदान देने के लिए छठी मइया खुद यमराज और भगवान से भीड़ जाती हैं। कुल मिलाकर फिल्म की कहानी छठी मइया के महिमा से परिपूर्ण है। 
लिंकः  https://youtu.be/XWbkFOKRgYk
फिल्म का यह ट्रेलर देखने के बाद छठ माता के भक्तों की श्रद्धा और बढ़ जाती है। फिल्म के कलाकारों की बात की जाए तो स्मृति सिन्हा ने शादी से पहले और शादी के बाद नवविवाहिता का रोल दिल से निभाया है। छठी मइया के भिन्न-भिन्न किरदार में माही श्रीवास्तव खूब जँची हैं। पति के किरदार में अंशुमान मिश्रा, ससुराल के घर वालों के किरदार में समर्थ चतुर्वेदी और रितु पांडेय आदि सभी कलाकारों ने बेहतरीन अभिनय किया है, जोकि सजीव लग रहा है। जब फिल्म का ट्रेलर इतना दिल को छू लेने वाला है तो पूरी फिल्म कितनी मर्मस्पर्शी होगी।
फिल्म का ट्रेलर अपने आप मे बहुत ही शानदार तरीके से काटा गया है। इस ट्रेलर को फैंस वर्ल्डवाइड रिकार्ड्स के ऑफिसियल चैनल पर जाकर देख रहे हैं। इसकी शूटिंग उत्तर प्रदेश से लेकर मुंबई में की गई है। वही फिल्म 10 नवंबर को सिनेमाघरों में दस्तक देने को तैयार है।

निर्माता कुलदीप श्रीवास्तव ने कहा कि ये छठ के बरतिया छठी मईया के ऊपर बनने जा रही है, जिसमें आपको छठ के व्रत की महिमा के बारे में सम्पूर्ण जानकारी दी जाएगी। ये कहानी पृरी तरह से धार्मिक परिवेश में बनाई गई है। इस व्रत को करने के लिए लोगों विदेश से भी देश में आते हैं। ये फिल्म दर्शकों को सिनेमा हॉल में आने को मजबूर कर देंगी। क्योंकि इसकी कहानी दर्शकों को बहुत पसंद आएगी।

फिल्म के निर्माता कुलदीप श्रीवास्तव और निवेदिता कुमार हैं, वही इसके निर्देशक कन्हैया एस विश्वकर्मा, कॉन्सेप्ट व प्रोजेक्ट डिजाइनर देव पाण्डेय ने किया है। फिल्म का प्रचार प्रसार ब्रजेश मेहर और रामचंद्र यादव कर रहे हैं। फिल्म में स्मृति सिन्हा, अंशुमन मिश्रा, माही श्रीवास्तव, समर्थ चतुर्वेदी, रितु पाण्डेय प्रतिभा साहु, शुभकिशन शुक्ला, अनामिका तिवारी, अंजली तिवारी, अशोक गुप्ता सहित कई कलाकार हैं।
फिल्म के डीओपी जगविंदर सिंह हुंदल (जग्गी पाजी), लेखक सभा वर्मा, संकलन गुरजंट सिंह,, संगीत साजन मिश्रा, गीत प्यारे लाल यादव (कवि जी), सभा वर्मा, शेखर मधुर, नृत्य सोनू प्रीतम, कला राम बाबू ठाकुर, पार्श्व संगीत राजेश प्रसाद, मारधाड़ दिनेश यादव, साउंड मिक्सिंग कृष्णा कुमार विश्वकर्मा, मुख्य सहायक निर्देशक राम कनोजिया, कुलदीप मिश्रा, निर्माण प्रबंधक मनोज पाण्डेय, विवेक जैसवाल, पोस्ट प्रोडक्शन 3 स्टूडियो डी आई मनिंदर सिंह (बंटी), प्रोमो विकास पवार, वी एफ एक्स रितेश दफ्तरी है।
[02/11, 09:19] Brajesh Mehar: The trailer of Bhojpuri film Chhath Ke Baratiya, showing the glory of the great festival Chhath, got 1 million views in a day.

The trailer of Bhojpuri film Chhath Ke Baratiya, depicting the relationship between a devotee and God, got so many views.

The trailer of Smriti Sinha and Mahi Srivastava starrer Bhojpuri film Chhath Ke Baratiya released from Worldwide Records got one million views in 1 day.

The excellent trailer of Bhojpuri film Chhath Ke Baratiya presented by ARK Works Channel Ratnakar Kumar is making waves on social media after its release from the official YouTube channel of Worldwide Records. Only a day has passed since the trailer was released and the audience has taken it seriously. Yes, the trailer has received more than one million views and more than 9 thousand likes in a day. The audience is liking the same trailer very much. The trailer of Chhath Ke Baratiya is being discussed everywhere. Because all the artists have given their 100 percent in this. Which is visible in the trailer.
It is shown in the trailer of the film that a newly married woman has to endure more atrocities from her in-laws than the love she gets from her husband in her in-laws' house. Whenever Smriti Sinha faces much trouble in the role of a newly married woman, then Chhath Mata helps her in some guise or the other. It is shown in the trailer that there comes a time when Chhath Mata's ardent devotee Smriti Sinha is struggling between life and death, then Chhath Maiya herself rushes to Yamraj and God to give her life. Overall, the story of the film is full of the glory of Chhathi Maiya.
After watching this trailer of the film, the devotion of the devotees of Chhath Mata increases further. Talking about the cast of the film, Smriti Sinha has played the role of a newlywed before and after marriage with all her heart. Mahi Srivastava has looked great in different roles of Chhathi Maiya. Anshuman Mishra in the role of husband, Samarth Chaturvedi and Ritu Pandey in the role of in-laws etc. all the actors have done excellent acting, which looks lifelike. When the trailer of the film is so heart touching, how touching will the entire film be.
The trailer of the film itself has been cut in a very brilliant manner. Fans are watching this trailer on the official channel of Worldwide Records. Its shooting has been done from Uttar Pradesh to Mumbai. The same film is ready to hit the theaters on November 10.

Producer Kuldeep Srivastava said that this Chhath Baratiya is going to be made on Chhathi Maiya, in which you will be given complete information about the glory of Chhath fast. This story has been made in a purely religious environment. People from abroad also come to the country to observe this fast. These films will force the audience to come to the cinema hall. Because the audience will like its story very much.

The producers of the film are Kuldeep Srivastava and Nivedita Kumar, its director is Kanhaiya S Vishwakarma, concept and project designer Dev Pandey. Brajesh Mehar and Ramchandra Yadav are promoting the film. The film has many actors including Smriti Sinha, Anshuman Mishra, Mahi Srivastava, Samarth Chaturvedi, Ritu Pandey, Pratibha Sahu, Shubhakishan Shukla, Anamika Tiwari, Anjali Tiwari, Ashok Gupta.
Film's DOP Jagwinder Singh Hundal (Jaggi Paaji), Writer Sabha Verma, Compilation Gurjant Singh, Music Sajan Mishra, Lyrics Pyare Lal Yadav (Kavi Ji), Sabha Verma, Shekhar Madhur, Dance Sonu Pritam, Art Ram Babu Thakur, Background Music Rajesh Prasad, Action Dinesh Yadav, Sound Mixing Krishna Kumar Vishwakarma, Chief Assistant Director Ram Kanojia, Kuldeep Mishra, Production Manager Manoj Pandey, Vivek Jaiswal, Post Production 3 Studio DI Maninder Singh (Bunty), Promo Vikas Pawar, VFX Ritesh It is an office.









महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाची मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली पहिली बैठक

 महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाची

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली पहिली बैठक

            मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची पहिली बैठक आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीला महामंडळाचे संचालक सदाशिव साळुखे, संजय दशपुते आदी उपस्थित होते.


            मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी ब्रिजेश दिक्षित तसेच वरिष्ठ आर्थिक सल्लागार पदी खिमजी पांडव यांची नियुक्ती करण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष मंत्री श्री. चव्हाण यांचे संचालक मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पुढील नियोजित कामांचा आढावा घेण्यात आला व त्यादृष्टीने भविष्यातील कामाची रुपरेषा आखण्यात आली.

उद्योग विभागातर्फे ७ नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन उद्योजक, निर्यातदारांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 उद्योग विभागातर्फे ७ नोव्हेंबर रोजी

कार्यशाळेचे आयोजन

उद्योजकनिर्यातदारांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. २ : उद्योग विभागातर्फे मंगळवार ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सानेगुरुजी विद्यालयात ( भिकोबा वामन पठारे मार्गदादर कॅटरिंग महाविद्यालयाजवळशिवाजी पार्कदादर (प.)मुंबई) सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत सीडबी (SIDBI), आयडीबीआय (IDBI) या संस्थांच्या सहकार्याने  एकदिवसीय इंडस्ट्री ॲण्ड गव्हर्न्मेन्ट नेटवर्किंग फॉर इनक्ल्युजीव्ह ट्रान्स्फॉर्मेशन ॲण्ड इनव्हायर्मेन्ट या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेअसे मुंबई प्राधिकरण विभागाचे उद्योग उपसंचालक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादन वाढविणेराज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभागांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येत आहेत. सर्व उद्योजकांना या योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने इंडस्ट्री ॲण्ड गव्हर्न्मेन्ट नेटवर्किंग फॉर इनक्ल्युजीव्ह ट्रान्स्फॉर्मेशन ॲण्ड इनव्हायर्मेन्ट (IGNITE MAHARASHTRA) याविषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा होईल. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर अध्यक्षस्थानी असतील.

            या कार्यशाळेस उद्योजकनिर्यातदारांनी उपस्थित राहावे. उपस्थितीबाबत उद्योग सहसंचालकमुंबई प्रादेशिक विभागचेंबूरमुंबई यांच्या कार्यालयाचा ई- मेल आयडी didicmumbai किंवा मोबाईल क्रमांक ९५९४३८१२६६ यावर संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi