Friday, 6 October 2023

कोल्हापूरच्या शेंडापार्क येथील आयटी पार्कसा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा

 कोल्हापूरच्या शेंडापार्क येथील आयटी पार्कसा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. ५ :- कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठास त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी शहरालगतची ५० हेक्टर जागा द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोल्हापूरच्या शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (व्हीसीद्वारे), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा (व्हीसीद्वारे) आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कोल्हापूरची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा वेग लक्षात घेता येथील विद्यार्थी, युवकांना स्थानिक परिसरात रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटी पार्क साठी उपलब्ध करुन द्यावी. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आयटी पार्कसाठी कृषी विद्यापीठाची मोकळी ३० हेक्टर जागा देताना, विद्यापीठाला पर्यायी ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. शहरातील या क्षेत्रापासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुण्यानंतर कोल्हापूर हा चांगला पर्याय आहे. आयटी पार्कची उभारणी निश्चित कालमर्यादेत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोल्हापूर शहरात असलेले शासकीय आयटीपार्क पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी येथे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन*

 *दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी येथे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन*


परळी( प्रतिनिधी) दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी येथे 7 व 8 ऑक्टोबर रोजी बीड जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 


      दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रिडा तसेच इतर सर्वांगिण विकासाचे माहेरघरच. दरवर्षी तालुका/ जिल्हास्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन शाळेमध्ये केले जाते. विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनात दि.7 व 8 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 


जिल्हास्तरीय बास्केटबॅाल स्पर्धेत विविध तालूक्यातून ३९ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धा आयोजित करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुल मध्ये उपलब्ध आहेत. यामुळे जिल्हाक्रीडा यावर्षीच्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी शाळेला प्राप्त झालेली आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठीची सर्व तयारी जिल्हा क्रीडा अधिकारी देशमुख मॅडम, परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कनाके सर, दिल्ली वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य विठ्ठल तुपे सर, क्रीडा शिक्षक संजय देशमुख सर आदि करत आहेत. 


बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 ऑक्टोबर 2023 ते 8 ऑक्टोबर २०२३ वार शनिवार, रविवार या दिवशी करण्यात आले आहे. परळी परिसरातील जास्तीत जास्त शाळांनी व क्रीडा प्रेमींनी जिल्हास्तरिय स्पर्धांचा आनंद व लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले 

आहे.


भावंडामध्ये असलेले प्रेम शेवटपर्यंत टिकवता आले तर ते जीवन किती आनंदमय असेल याची कल्पना जरी केली तरी आतुन

 भावंडामध्ये असलेले प्रेम शेवटपर्यंत टिकवता आले तर ते जीवन किती आनंदमय असेल याची कल्पना जरी केली तरी आतुन आनंद आणि समाधान उसळी मारते. ज्यांना हे प्रत्येक्षात उतरवता आले ती भावंडे आणि त्यांना जन्म देणारे आईवडील खरोखरच भाग्यवान आहेत.

पोटचे आले की पाठच्याचा विसर पडतो आणि ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांची परवड सुरू होते.असे चित्र सर्रास पहायला मिळत आहे, याचे कारण आपली कुटुंब व्यवस्था पूर्ण कोलमडून गेली आहे, संवाद संपला आहे.

आपले दुःख व्यक्त करायला जवळचे कोणीच नाही, असा भाव तयार होऊ लागला आहे. यामुळे माणूस एकलकोंडा होऊन मनोरूग्ण बनू लागला आहे,

याचा शेवट आनंद हरवून फक्त नैराश्य उरले आहे. आणि

मी काय मिळविले? याचे उत्तर शून्य आहे. हे शून्य मोठे असले काय आणि छोटे असले काय त्याचे मुल्य समान आहे. आपण जसा कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, तसा भावंडांनाही वेळ दिला पाहिजे.

: स्वतःला प्रश्न विचारून पहा.

कोणतेही काम नसताना आपण आपल्या बहिणीकडे किंवा भावाकडे सहज भेटायला किती वर्षे गेलो नाही. मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही.

खाऊच्या एका घासासाठी पाठीत धपाटा मारणारी मोठी बहीण, चिमटा काढून पळून जाणारी धाकटी बहीण आपण बाहेरून आलो तर काहीतरी आणले असेल म्हणून खिशाकडे हाताकडे पाहणारा धाकटा भाऊ, आजही तसेच आहेत फक्त आपला भाव आणि स्वभाव बदलला.

वय कितीही होऊ द्यात.

👉थोरल्याने अधिकार गाजवलाच पाहिजे

👉आणि धाकट्याने हट्ट केलाच पाहिजे.

आपण जेथे असू तेथे आपली भूमिका आपल्याला पार पाडता आली पाहिजे.

हे शक्य आहे त्यासाठी वर्षातून किमान एकवेळ पूर्ण एक दिवस सर्व भावंडांनी एकमेकासाठी द्या.त्यादिवशी आपले आईवडील आणि आपली भावंडे मिळून एक दिवस एकत्र येऊन, एक दिवसाची सहल आयोजित करा, कुवत असेल त्याने सर्व खर्च करा, कुवत

नसेल तर तो एक दिवस सुट्टी घेऊन फक्त सर्व

भावंडे आईवडीलांसोबत रहा आणि अनुभव

घेऊन पहा. 

हा अनुभव आईवडील व

भावंडांच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दात व्यक्त न करता येणारा आहे,

🙏🌹

जब तक मेरा बाप जिंदा है,


 

अवघे वयमन किती


 

Thursday, 5 October 2023

मातंग समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 मातंग समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक


- मंत्री शंभूराज देसाई


     


            मुंबई, दि. 4 : मातंग समाजापर्यंत विविध योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मातंग समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.


            मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. मंत्री श्री. देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही बैठक घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे मातंग समाजाच्या मागण्याबाबत सकारात्मक आहेत. मुंबईत आझाद मैदान येथे मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्यावतीने यावेळी मी उपस्थित राहून सकारात्मक चर्चा केली होती. याबाबत दोन बैठका घेतल्या आहेत, असे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.


             या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, तसेच मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजाच्या प्रश्नांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.


            मंत्री श्री. देसाई म्हणाले की, कर्नाटक व पंजाब राज्याने त्यांच्या राज्याकरिता अनुसूचित जातीचे जातीनिहाय उपवर्गीकरण केले आहे. त्या संदर्भात अवलंबिलेल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी पंजाब व कर्नाटक या राज्यांना भेट देण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या शिष्टमंडळात मातंग समाजाच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल. लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीनुसार संबंधित विभागाकडून अनुपालन अहवाल मागविण्यात येईल. या आयोगाच्या 82 शिफारशी पैकी 68 शिफारशी तत्त्वतः मान्य केल्या आहेत. मातंग समाज योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यांमध्ये जनजागृती शिबिरे आयोजित करावीत असे निर्देश संबंधितांना यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी दिले. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आर्टी) स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. तसेच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे चिरागनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याकरता विविध विभागांचे अभिप्राय मागविण्यात यावेत, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.


*****

धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार

 धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार


- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            मुंबई दि. ४ : धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


            वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंचच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री. विखे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्री श्री. विखे पाटील यांना दिले. दरम्यान, शिष्टमंडळाशी सविस्तर प्राथमिक चर्चा करून मंत्री श्री. विखे पाटील यांनी विषय समजून घेतले. तसेच लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, मेंढपाळ विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष संतोष महात्मे, मेंढपाळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक पल्लवी लांडे, संचालक प्रवीण भुजाडे यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi