Wednesday, 4 October 2023

सोयाबीनवरील रोगाच्या प्रादुर्भावाचे तातडीने पंचनामे करावेत विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा

 सुधारित :


सोयाबीनवरील रोगाच्या प्रादुर्भावाचे तातडीने पंचनामे करावेतविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा


राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी, मदत व पुनर्वसनला निर्देश


            राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (येलो मोझॅक) हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले.


            पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशीम, नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे.


            नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत, असे निर्देश देण्यात आले.  



00000 


2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान, 3 हजार 80 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान

 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान,

3 हजार 80 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान


            मुंबई, दि. 3 : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्य पदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.    


            श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र, गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.


 


0000

Tuesday, 3 October 2023

भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्रसुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी अर्ज करावेत

 भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्रसुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी अर्ज करावेत


 


            मुंबई, दि.3: महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यालयीन कामकाजाच्या 15 दिवसांत अर्ज मागविण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.


           अर्जदार संस्था मुंबई उपनगर जिल्ह्यातील (स्थानिक) तसेच महिला पदाधिकारी असल्यास प्राधान्य असेल. संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे विना दुराचार प्रमाणपत्र जोडावे, संस्था नोंदणी अधिनियम व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे. संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेशन क्षेत्रातील अनुभव आवश्यक असून जास्त अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. समुपदेशनासाठी एमएसडब्ल्यू उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.


            संस्थेची घटना व नियमावली आवश्यक असून ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उद्देश असावा, सनदी लेखापालांची स्वाक्षरी असलेला मागील तीन वर्षाचा अहवाल (ऑडिट रिपोर्ट), संस्थेचे मागील तीन महिन्यांचे महिना निहाय बँक स्टेटमेंट जोडावे, संस्थेचे कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी, संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत तसेच कोणीही सदस्य शासकीय सेवेत नाहीत, याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे. ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते, त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.कुऱ्हाडे यांनी म्हटले आहे.

राज्य शेती महामंडळाचे प्रश्न तातडीने सोडविणार

 राज्य शेती महामंडळाचे प्रश्न तातडीने सोडविणार

- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

            मुंबई दि.3 : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची शेती व कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून त्या प्रस्तावांना मंत्रीमंडळाची मान्यता घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

            महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या विविध प्रश्नांबाबत महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकरदत्तात्रय भरणेदीपक चव्हाणवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा तसेच शेती महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीमाजी खंडकरी शेतकरी यांनी औद्योगिक उपक्रमास जमीन खंडाने देतानाचा मूळ धारणधिकार भोगवटदार वर्ग -1 असलेल्या जमिनी कोणतेही मूल्य न आकारता भोगवटदार वर्ग -1 करण्यासाठी सिलिंग कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देणे बाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. एक एकर पेक्षा कमी क्षेत्र देय असलेल्या खंडकऱ्यांना जमिनीच्या  वाटपाबाबतचा प्रस्ताव कार्यवाहीत आहे.

                 शेती महामंडळाच्या कामगारांच्या इतर प्रश्नाबाबतही शासन सकारात्मक असून जे प्रस्ताव तयार आहेत त्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल, असे ही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

००००००

वर्षा फडके/विसंअ

 


 


डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२३ सह चार नव्या चार ग्रंथाचे प्रकाशन

 डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२३ सह चार नव्या चार ग्रंथाचे प्रकाशन


मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन


चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे दोन वर्षांत १८ ग्रंथ प्रकाशित


 


मुंबई, दि. ३ : - डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २३ (इंग्रजी) , जनता ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद (भाग १ व २) या नवीन ग्रंथांचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 


मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या प्रकाशन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह, मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री, समितीचे सदस्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, सदस्य माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. संभाजी बिरांजे, डॉ. बबन जोगदंड, डॉ. सुरेंद्र धाकतोडे, ज. वि. पवार, योगीराज बागूल, रुपेंद्र मोरे, सिद्धार्थ खरात, आदी उपस्थित होते.  


यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कामाचे कौतुक केले. 


याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड ४, खंड १२, खंड १५, खंड १७ (तीन भाग), खंड १८ (तीन भाग), आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथांच्या नव्या आवृत्तींचे प्रकाशन करण्यात आले.


डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे - खंड २३ विषयी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने आतापर्यंत डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणाचे २२ खंड प्रकाशित झाले असून २३ वा खंड हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘एम. एससी.’ च्या पदवी करीता सादर करण्यात आलेल्या प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलाएझेशन ऑफ फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (‘Provincial Decentralization of Imperial Finance in British India’) या शोधप्रबंधाविषयी आहे. हा शोध प्रबंध ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ ला १९२१ मध्ये सादर केला होता. हा शोध प्रबंध तब्बल १०० वर्षानंतर प्रकाशन समितीला नोव्हेंबर २०२१ मध्ये लंडनच्या सिनेट ग्रंथालयाकडून प्राप्त झाला. 


या खंड २३ चे दोन भाग करण्यात आले आहे. पहिल्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘एम. एससी.’ चा प्रबंध आहे, तर दुसऱ्या भागात डॉ. आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणाबाबतचा दुर्मिळ दस्तऐवज आणि पत्रव्यवहार दिला आहे. त्यामध्ये ‘एम.ए.’ आणि ‘पीएच. डी.’, ‘एम. एससी.’, ‘डी.एससी.’ ‘एलएल. डी.’ च्या संदर्भातील दस्तावेज आणि पत्रव्यवहार आहे. अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाराज सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती. त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी त्यांचे चरित्र लिहिण्याचे ठरविले होते. त्यासंदर्भात त्यांनी बडोद्याचे महाराज प्रतापसिंग यांना १० ऑक्टोबर १९५० रोजी पत्र लिहिलेले पत्र देखील या खंडात आहे. 


जनता ३-३ या खंडात ‘जनता’ पत्राच्या १० डिसेंबर १९३२ ते २ डिसेंबर १९३३ पर्यंतच्या अंकांचा समावेश आहे. 


जनता खास अंक, १९३३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मादिनानिमित्त ‘जनता’ ने एप्रिल १९३३ रोजी जनताचा खास अंक प्रकाशित केला होता. इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद या ग्रंथात मुंबई विधीमंडळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, सायमन आयोगाला सादर केलेल्या शिफारशी आणि गोलमेज परिषदेतील भाषणे आणि इतर कामकाजाचा समावेश आहे.  


              भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्य प्रकाशित करून ते सर्व सामांन्यापर्यंत पोहचले पाहिजे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना केली. या समितीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर: लेखन व भाषणे (Dr. Babasaheb Ambekar Writing and Speeches) चे एकूण २२ खंड प्रकाशित केले आहेत, या २२ खंडांपैकी १ ते १७ हे इंग्रजी भाषेत आहेत. तर १८,१९ आणि २० हे मराठीत आहेत. २१ वा खंड हा पत्रांचा आहे. तर २२ खंड हा डॉ. आंबेडकरांच्या छायाचित्रांचा संग्रह (अल्बम) आहे. आता २३ वा खंड प्रकाशित झाला आहे. या व्यतिरिक्त सोर्स मटेरियल (Source Material) चे ३ खंड आणि २ पुस्तिका प्रकाशित करण्यात आले आहेत. 


याशिवाय समितीने फेब्रुवारी २०२४ इंग्रजी खंड ३, इंग्रजी खंड ४ आणि इंग्रजी खंड ९ चा मराठी अनुवाद तसेच जनता खंड क्र. ३- ४, जनता खंड क्र. ३- ५, जनता खंड क्र. ३-६ चे प्रकाशन करण्याचे नियोजन केल्याची माहिती समितीचे सचिव डॉ. आगलावे यांनी

 दिली.


0000


वारकरी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेटवारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक

 वारकरी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेटवारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मंत्रालयात घुमला ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर


 


            मुंबई, दि. ३: राज्यातील वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्य शासनाला वारकरी बांधवांविषयी आत्मियता, आदर, सन्मान आहे. वारकऱ्यांच्या मागण्यांबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्री दादाजी भुसे समन्वय करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे यावेळी वारकरी बांधवांनी 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल'चा एकच गजर केला. त्यामुळे मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ सभागृहातील मुख्यमंत्र्यांचे दालन दुमदुमले.


            मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड यांच्यासह आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, वारकरी प्रबोधन महासमिती, वारकरी महामंडळ,वारकरी प्रबोधन महासमिती, संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर, वारकरी महामंडळ (नाशिक जिल्हा व श्री वारकरी प्रबोधन महासमिती जिल्हाध्यक्ष), तारकेश्वर गड संस्थान (पाथर्डी, अहमदनगर) यांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर हे शासनाच्या ताब्यातच रहावे,संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार करणारे आळंदी येथील 'पूज्य सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत निवास, कीर्तन भवन, शिक्षण वर्ग, भजन हॉल करिता ४७ कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा यासह विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.


            वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी मंत्री श्री. भुसे समन्वयन करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी शिष्टमंडळातर्फे मुख्यमंत्र्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत भेट देण्यात आली.


            शिष्टमंडळात संदिपान शिंदे, आसाराम बडे, शिवाजी काळे, संतोष सुंबे, बालाजी भालेराव, रामेश्वर शास्त्री, आदिनाथ शास्त्री, हरिदास हरिश्चंद्र यांच्यासह वारकरी बांधव उपस्थित होते.

Finally found married monkey, नवरा धूनी धूनारच मग तो स्री चा असो नाहीतर प्राणी

 Finally found married monkey


Featured post

Lakshvedhi