Monday, 2 October 2023

मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करामच्छिमार-कोळीवाड्याचा पर्यटनस्थळ म्हणुन विकास करणार

 मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करामच्छिमार-कोळीवाड्याचा पर्यटनस्थळ म्हणुन विकास करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


· मुख्यमंत्र्यांची कुर्ल्याच्या एसआरए वसाहत, मच्छिमार नगर-कोळीवाडा, बाणगंगा येथे अचानक भेट


मुंबई, दि. १: स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता न करता गल्ली बोळातील रस्ते, झोपडपट्टीतील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी अचानक कुर्ला नेहरू नगर परिसरातील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली. तेथील शौचालय आणि परिसराच्या साफसफाईची पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल, उपायुक्त हर्षल काळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री यांच्या अचानक भेटीमुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.


मुंबई महानगरपालिका हद्दीतील स्थानिकांना तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता गृहाची पालिकेच्या खर्चाने दुरुस्ती, डागडुजी करावी, दुरूस्ती न होऊ शकणारे शौचालये तोडून नव्याने बांधण्यात यावी. यादरम्यान फिरते शौचालये उपलब्ध करून देण्यात यावे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने निधी उपलब्ध करून द्यावा. अस्वच्छता आरोग्यासाठी हानिकारक असून स्वच्छ भारत अभियान यशस्वी करायचे असेल तर या मोहिमेची सुरुवात झोपडपट्टीपासून करणे आवश्यक आहे. आपला परिसर स्वच्छ असेल तर लोकांमध्ये रोगराई पसरणार नाही आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सुंदर आणि निरोगी भारताचे उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मच्छिमार-कोळीवाड्याचा पर्यटनस्थळ म्हणुन विकास करणार

L

मच्छिमारनगर येथील जेट्टी आणि परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच दुर्घटनाग्रस्त नौकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


स्वच्छता मोहिम स्थानिक पातळीवर राबविणे गरजेचे आहे. मच्छिमारांना स्वच्छ रस्ते, पाणी, जेट्टी आणि परिसरात फूड कोर्ट बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कोळीवाड्याचे सुशोभीकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येणार असून कोळीवाडा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्याचा शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


दुर्घटनाग्रस्त चार नौकांची पाहणी करुन मुख्यमंत्र्यांनी या नौकांसाठी नुकसान भरपाई म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यालगत असलेले भंगार उचलणे गरजेचे आहे, यासाठी स्थानिकांनी शासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मार्चअखेर ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.


            ‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे हे बधवार पार्क, मच्छिमार नगर-कफ परेड, बाणगंगा येथे स्वच्छता मोहिमेस उपस्थित राहिले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यावेळी त्यांनी मच्छिमार सर्वोदय सोसायटीस भेट देऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अचानक भेटीमुळे स्थानिकांनी त्यांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले.

Sunday, 1 October 2023

खुच तो लोग कहेंगे लोगोका काम है केहेना

 


C p गोएंका school पुणे

लोकशाहीर आण्णा भाऊ

लोकशाहीर आण्णा भाऊसाठे नाट्यगृह,येरवडा, पुणे, पुणे 

जिल्हाधिकारी कार्यालयाने राबवली स्वच्छता मोहिम एक तारीख एक तास मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद

 जिल्हाधिकारी कार्यालयाने राबवली स्वच्छता मोहिम

एक तारीख एक तास मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद


मुंबई, दि १:- महात्मा गांधी यांच्या जयंतीचे (२ ऑक्टोबर) औचित्याने आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने 'एक तारीख एक तास' ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आज स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविण्यात आली.

यात अधिकारी, कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग देत श्रमदान केले. या मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील ब बाहेरील परिसर, एशियाटीक सोसायटी (सेंट्रल लायब्ररी टाऊन हॉल) परिसर, सेंट्रल लायब्ररी समोरील हर्निमन सर्कल व परिसरात तसेच क्षेत्रीय वन अधिकारी सागर माळी आणि मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने कुलाबा व शिवडी फ्री-वे येथील कांदळवन परिसरातही स्वच्छता करण्यात आली. 



            या मोहिमेत प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, एकनाथ नवले, उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी कृष्णकांत चिकुतें, तहसीलदार अतुल सावे, तहसीलदार प्रियांका ढोले, तसेच सुमारे 60 अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी मोहिमेत सहभाग

 घेतला. 


गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारतासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे:

 गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारतासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे:


 विधानसभा अध्यक्ष ॲड्. राहुल नार्वेकर


            भारत हा सर्वात मोठी लोकशाही आणि अर्थव्यवस्था असलेला देश आहे. भविष्यात स्वच्छ देश म्हणून जगात भारताची ओळख निर्माण करण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देखील अशाच प्रकारे स्वच्छ व स्वस्थ भारत ही संकल्पना अभिप्रेत होती. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची स्वच्छता हा नाविन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वच्छतेची संकल्पना रुजवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल असे सांगून, लोकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड् नार्वेकर यांनी यावेळी केले.


 


कौशल्य विकासासोबत लोकाभिमुख कार्यक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग: मंत्री मंगल प्रभात लोढा


शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना या उपक्रमाद्वारे अनोखी मानवंदना देण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या ४०० आय. टी. आय. संस्थांनी परिसर स्वच्छता व गड किल्ल्यांची स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.


            यावेळी ऑल इंडिया ट्रेड ट्रेनिंग (AITT) सन 2023 च्या परीक्षेत मुंबई शहर आय.टी. आय. च्या मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स या ट्रेडमध्ये ऋतुजा पवार, मेकॅनिक मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये जानवी धोंडींदे यांनी देशात विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


            दूर्ग मित्र संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान, मराठा वॉरियर्स, संत निरंकारी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहिमेच्या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संत निरंकारी प्रतिष्ठानच्यावतीने यावेळी पथनाट्य सादर करण्यात

 आले.


***


गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनासाठीजिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी देणार

 गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनासाठीजिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी देणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


350 गडकिल्ल्यांवर 418 आयटीआय राबविणार स्वच्छता मोहिम


 


मुंबई, दि. १: शिवछत्रपती यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त 350 गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, 'स्वच्छता हीच सेवा' या उपक्रमांतर्गत गड -किल्ल्यांची राज्यव्यापी स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. यावेळी ते बोलत होते.


             कौशल्य विकास विभागांतर्गत राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) यांच्याद्वारे परिसर स्वच्छता आणि गड किल्ल्यांची स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. दीड लाख विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.


            विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, मनपा अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन. उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या भौतिक प्रगतीसाठी स्वच्छ व स्वस्थ भारत असणे गरजेचे आहे. राज्याचे खरे वैभव हे गड किल्ले आणि जलदुर्ग आहेत. त्यांचे संवर्धन व स्वच्छता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन करित आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, राज्याचे वैभव जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


            घरोघरी शौचालय उभारणे, हागणदारीमुक्त भारत या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मल-जल शुद्धीकरण सुरु असून, राज्यात 221 सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापनातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. प्रधानमंत्री यांच्या संदेशानुसार 17 सप्टेंबरपासून सुरू असलेला स्वच्छता पंधरवडा पुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात राज्यस्तरीय सफाई कामगार उत्थान परिषद कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सफाई कर्मचारी आयोग वेगाने काम करेल

 मुंबई विद्यापीठात राज्यस्तरीय सफाई कामगार उत्थान परिषद

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सफाई कर्मचारी आयोग वेगाने काम करेल


                                      - मंत्री मंगलप्रभात लोढा


 


मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता अधिक वेगाने काम करेल व त्याद्वारे सफाई कामगारांचे हक्क व अधिकार त्यांना मिळतील असे प्रतिप्रादन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.


            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई विद्यापीठ व जनआधार सेवा फाऊंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सफाई कामगार उत्थान परिषद मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उदघाटन मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.


       कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा शुभसंदेश वाचण्यात आला. शुभसंदेशात श्री.आठवले यांनी,``केंद्र शासन सफाई कामगारांचे जीवनमान उंचावण्याकरिता `नमस्ते` योजनेव्दारे सर्वतोपरी मदत करील, अशी ग्वाही दिली. 


       मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले, राज्य शासनाच्या विविध विभागाच्यावतीने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजना, अनुकंपा वारसांना नोकरी देणे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रित कंपनीच्या योजना, `नमस्ते` मोहिम, हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन करणे या अधिनियमानुसार कामगारांना आधुनिक यंत्रसामुग्री पुरविण्याचे काम सफाई कर्मचारी आयोगामार्फत होऊ शकते. तसेच सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.


        महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले, सफाई कामगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणे, सुनियोजित प्रशिक्षण देऊन सर्वतोपरी त्यांच्या आरोग्याचे व जीवनाचे संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.


         यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी, माजी अप्पर मुख्य सचिव ए. के. जैन, अखिल भारतीय वाल्मिकी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. रेखा बहनवाल, सफाई मजदूर कॉग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री धनराज बिरदा, सल्लागार ऍड. गीरेंद्रनाथ, जनआधार सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. 


      यावेळी गटचर्चा सत्र घेण्यात आले. यामध्ये प्रशासकीय सत्र, संशोधक विद्यार्थी सत्र व आरोग्यदूत सफाई मित्र सत्र घेण्यात आले. यामध्ये झालेल्या चर्चा व ठरावाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना निवेदन देण्यात आले.


            दुपारच्या सत्रात कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशम, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी.वावा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सुभाष पारधी, आमदार सुनील कांबळे, बाटू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे , सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी विचार मांडून मार्गदर्शन केले . 


            राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशम म्हणाले, केंद्र शासन सफाई कामगारांच्या उत्थानासाठी कटिबध्द असून कायदा व वित्तीय सहाय्याव्दारे सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यात येतील. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले, सफाई कामगारांना समाजात सन्मानाने वावरता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील असून केंद्र शासनाच्या `नमस्ते` योजनेमार्फत आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणे व योजनेव्दारे सफाई कामगारांना सहाय्य करण्यात येईल.


            यावेळी जनआधार सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी जनआधार सेवा फाऊंडेशन संस्था अनेक वर्षापासून सफाई कामगारांचे कल्याण व उत्थानासाठी काम करत असून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.


      कार्यक्रमात महाप्रितचे संचालक विजयकुमार काळम-पाटील व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अन्य अधिकारी तसेच राज्यातून मोठ्या संख्येने सफाई कामगार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चाबुकस्वार यांनी केले. तर संजय कांबळे यांनी आभार मानले.

Featured post

Lakshvedhi