सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 9 July 2023
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी
25 लाखांचा निधी देणार - पालकमंत्री दीपक केसरकर
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'महिला व ज्येष्ठ नागरिकांशी सुसंव
मुंबई, दि. 8 - ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून तेथे ने-आण करण्यासाठी बेस्ट मार्फत 10 बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ - 5 च्या वतीने शनिवारी सायंकाळी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री श्री. केसरकर यांनी दादर परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे शक्य आहे, त्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, नागरिकांना त्यांच्या समस्यांवर तातडीने न्याय मिळावा, ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईसह राज्यात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. मुंबईत स्वच्छता राहावी, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, मुंबई सुंदर दिसावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आपला दवाखाना योजनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अधिकच्या तपासण्यासाठी फिरती तपासणी वाहने उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना धान्य घेण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता भासू नये यासाठी 14 वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुंबईतील नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. उद्याने, बाजारपेठांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबादेवी, महालक्ष्मी, हाजीअली, सिद्धीविनायक आदी धार्मिक स्थळांच्या परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यात येत असून उत्तम फिश मार्केटसह तेथे फूड कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. कामगारांसाठी असलेल्या कल्याण केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ड्रग्ज मुक्त मुंबईसाठी उपाय केले जात आहेत. रूग्णांच्या सोयीसाठी जे. जे. रूग्णालयात सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
श्री. केसरकर म्हणाले, मंत्री हा नागरिकांचा प्रतिनिधी असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी रहिवाशांच्या समस्या जागेवरच सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात जाऊन जनतेशी सुसंवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागरिकांमध्ये जाऊन आणि त्यांच्या समस्या जाणून त्या तातडीने सोडविण्यात येत आहेत.
खासदार राहुल शेवाळे म्हणाले, राज्य शासनाने हाती घेतलेल्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात सुमारे 45 लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. मुंबईत पालकमंत्री दीपक केसरकर हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाऊन त्यांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपला लोकसभा मतदारसंघ हा सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी परिमंडळ 5 या पोलीस विभागाने चोरीचा मुद्देमाल कौशल्याने शोधून काढल्याबद्दल त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनी पोलिसांचा घरांचा विषय अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून शासनाने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकमंत्री मंत्री श्री. केसरकर यांच्याकडे केली.
यावेळी मंत्री श्री केसरकर यांच्या हस्ते पोलीस तपासात परत मिळविलेला 40 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. यामध्ये कुर्ला पोलीस स्टेशन हद्दीतील मनोज जैन यांचे 28 लाखांचे दागिने, धारावी हद्दीतील तीन लाख रुपयांची कार यांसह दादर, माहीम आदी पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले अथवा चोरीला गेलेले विविध दागिने, मोबाईल, घड्याळ, वाहने आदी मुद्देमालाचा समावेश होता. सुमारे दोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल आतापर्यंत परत करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. पोलीस विभागाच्या या कामगिरीची मंत्री श्री केसरकर यांनी प्रशंसा केली.
या सुसंवाद कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, स्वच्छता, वाहतुकीच्या समस्या, कचरा निर्मूलन, फेरीवाले, पार्किंग आदींचा समावेश होता. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
000
अनेक प्रकारे फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बिया !!*
*अनेक प्रकारे फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बिया !!*
भोपळा ही अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. बहुतेक लोक भोपळा खातात. परंतु त्याच्या बिया फेकून देतात. पण असे केल्याने तुम्ही अनेक प्रकारचे आरोग्य फायदेही काढून टाकता. भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्याने सर्वांनाच फायदा होतो,
परंतु पुरुषांना याचे सेवन केल्याने काय फायदे होतात हे जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे.
◼️भोपळ्याच्या बियांमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब, कर्करोग, पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
◼️या बियांमध्ये झिंक, फायबर, मॅग्नेशियम, अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, प्रोटीन, ऊर्जा, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट्स, सोडियम, थायामिन, फोलेट, फॉस्फरस इत्यादी असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या निर्माण होण्यापासून बचाव होतो.
*भोपळ्याच्या बियांचे फायदे -*
◼️भोपळ्याच्या बिया त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात.
◼️यामध्ये फायबर असल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी होते.
◼️पोटात जंत होण्याची समस्या टाळते.
◼️शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही.
◼️भोपळ्याच्या बिया मेंदूला निरोगी ठेवतात.
◼️युरिन इन्फेक्शन, युरिनरी इन्कॉन्टीनन्स, यूटीआय यासारख्या समस्या दूर करते.
◼️रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया खा.
◼️यामध्ये असलेले काही घटक उच्च रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात.
◼️पचनशक्ती, हाडांना बळ देते.
◼️मूत्राशयात स्टोन होऊ देत नाही.
◼️हे हृदयासाठी आरोग्यदायी आहे.
◼️झोप न येण्याची समस्या दूर होते.
*पुरुषांसाठी भोपळ्याच्या बियांचे फायदे*
◼️प्रोस्टेटचे आरोग्य राखण्यासाठी पुरुषांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रोस्टेट ही एक प्रकारची ग्रंथी आहे, जी वीर्य निर्माण करण्यास मदत करते. पुरुषांमध्ये वाढत्या वयाबरोबर प्रोस्टेटचा आकारही वाढतो. मात्र त्याचा आकार जास्त वाढू नये अन्यथा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत भोपळ्याच्या बियांचे सेवन करून ही ग्रंथी निरोगी ठेवता येते.
◼️ज्यांना अशक्तपणा जाणवतो, त्यांनी भोपळ्याच्या बिया नक्की खाव्या. भोपळ्याच्या बिया खाल्याने शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जेने भरपूर राहाते. यासाठी भोपळ्याच्या बिया भाजून स्नॅक्समध्ये खाऊ शकता. याच्या वापराने तुमची प्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया दोन्ही मजबूत राहतात.
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
डॉ. प्रमोद ढेरे,
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
अक्रोड (वाँलनट)*
*अक्रोड (वाँलनट)*
विविध प्रकारच्या ड्राय फ्रुटमधले हे एक दर्जेदार, पौष्टिक फळ आहे, अक्रोडात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरिराचि रोगप्रतिकारकशक्ति वाढवण्यासाठि हे अतिशय फायदेशीर आहे.
अक्रोडला 'ब्रेन फूड' असे म्हणतात. अक्रोडात खुप प्रकारचे विटामिन असतात, जसे कि, विटामिन A, B,C, vitB12, विटामिन D, म्हणूनच याला विटामिनचा राजा म्हणतात.
अक्रोड आपल्या मेंदूसाठी खुपच फायदेशीर आहे. हे जवळपास मानवी मेंदू सारखेच दिसते, याच्या सेवनाने मानसिक ताण दूर होतो, मन प्रसन्न होते, बौद्धिक पातळी वाढते (I. Q.) स्मरणशक्ति वाढते, अक्रोडात शक्तिशाली न्यूरो प्रोटेक्टिव कंपाउंड सारखे विटमिन E. Omega_3 fatty acid व एंटि आँक्सिडंट असतात. ज्यामूळे मेंदूला सुरक्षा मिळते.
अक्रोड हे ह्रुदयासाठीही लाभदायक आहे. याच्या सेवनाने शरिरातील चरबी कमी होते, कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहते. कारण ओमेगा-3 फँटि ॲसिड जे हार्टकरता उपयोगी आहे, ते विपुल आहे, अक्रोडात Polyphenols या कँसरविरोधी घटकाचे प्रमाण जास्त असते त्यामूळे दररोज अक्रोड खाल्लयामूळे ब्रेस्ट, कँसर, प्रोस्टेट कँसर, व मलाशयाचा कँसर होण्याचा धोका कमी होतो,
अक्रोड खाण्यामुळे भूक कमी लागते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो, व याच कारणामूळे डायबेटिस-2 आटोक्यात राहतो, अक्रोडामूळे साखर रक्तातली नियंत्रित राहते. ऊच्च रक्तदाब आटोक्यात राहतो. अक्रोड हा दुर्बल, अशक्त व्यक्तिंकरता खूपच लाभदायी आहे, सकाळी उठून २-३ अक्रोडाचे सेवन करावे, वरून एक कप दूध घ्यावे..
ज्या पुरूषांमध्ये शुक्रजंतू कमी असतात, ज्यामूळे ते प्रजोत्पादन करू शकत नाही, अशानी नियमित अक्रोडाचे सेवन केल्यास फायदा होतो, अक्रोड हे वातघ्न असल्याने संधिवात, सायटिका, सांधेदुखी, आमवात, या आजारावर चांगले परिणाम देते ज्यांना गुडघे दुखीचा तीव्र स्वरूपात त्रास आहे त्यांनी सकाळी उठुन ३-४ अक्रोडाचे सेवन करावे.
अक्रोडाचे तेल नियमित सेवन केल्यास, आतड्यातील क्रुमि नाश पावतात. व शौचावाटे बाहेर पडतात. अक्रोड हे सारक गुणधर्माचे असल्याने बद्धकोष्ठ, मलावरोध असणाऱ्यांनी अक्रोडाचे नियमित सेवन करावे, यात फायबर विपुल असल्याने वरिल त्रास होत नाही.
अक्रोड वनस्पतीची साल, व पाने गंडमाळा, पुरळ, उपदंश, व त्वचारोग आदि रोगावर उपयोगी आहे. अक्रोडाचि पाने क्रूमिनाशक आहे.
चेहऱ्यावरील काळे वांग, पिगमेटेशन, पुरळ असणाऱ्यांनी, अक्रोड बारिक वाटुन त्याचा लेप लावावा, चेहरा सुंदर होतो, अक्रोड बीज तेल हे साबण, व सौंदर्यवर्धक गोष्टित वापरतात, सहसा जेवणानंतर अक्रोड खावा, यामूळे जेवणाचे पचन चांगले होते. अकाली केस पांढरे होणे, केस गळणे या तक्रारींवर, अक्रोड सिद्ध तेल वापरल्यास केस काळेभोर, व दाट होतात, .
तेव्हा अशा या भरपूर गुणांनी युक्त सुक्या मेवाला आपल्या दैनंदिन आहारात जरूर, सामिल करावे.
*संकलन-*
डॉ. प्रमोद ढेरे,
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
शासन आपल्या दारी’
गडचिरोलीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’
जिल्ह्यात ६.९७ लाख लाभार्थ्यांना ६०१ कोटी रुपयांच्या योजनांचा लाभ
शासन आपल्या दारी उपक्रमास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रस्तावित विमानतळ व समृद्धीमुळे जिल्ह्यात विकासाचा वेग वाढेल- उपमुख्यमंत्री अजित पवार
निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयूसह पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
गडचिरोली, दि.८: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे आज जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमास मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, पद्मश्री परशुराम खुणे, विधानसभा सदस्य देवराव होळी, विधानसभा सदस्य कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाच्या एक वर्षपूर्तीनंतर पहिलाच कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित केला आहे. ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना सर्वसामान्यांसाठी आहे, लोकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये यासाठी सरकारने हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख असून जवळपास ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना सुमारे ६०१ कोटी रुपयांच्या विविध योजनांचा जिल्हा प्रशासनाकडून लाभ दिला जात आहे. शासन प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत, अधिकारी आता गावागावात जात असल्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे अशी प्रचिती जनतेला येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार मेळाव्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. लोकहितासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४०० पेक्षा अधिक धोरणात्मक निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जनतेपर्यंत शासन पोहोचले पाहिजे या संकल्पनेतून शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना निवडायचे उद्दिष्ट होते. मात्र गडचिरोलीने सर्व रेकॉर्ड तोडून जवळपास ७ लाख लोकांना लाभ दिला आहे. विशेष म्हणजे यापैकी ५० टक्के लाभार्थी हे अति दुर्गम भागातील आहेत असे सांगून छत्तीसगड, झारखंडच्या धर्तीवर गडचिरोलीमध्येही स्टील सिटी उभी करण्याचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
मी मुख्यमंत्री असताना येथील खनिज प्रकल्पाला चालना दिली. येथेच गुंतवणूक, येथेच रोजगार आणि नफा सुद्धा गडचिरोलीमध्येच हे धोरण अवलंबिले. ३० हजार कोटींची गुंतवणूक गडचिरोलीसाठी मंजूर करण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी देण्यात आल्या आहे. शासकीय वैद्यकी
य महाविद्यालयाला मान्यता देवून कृषी विद्यालयाची जागा उपलब्ध करून दिली आहे असे ते म्हणाले. तसेच गडचिरोलीमध्ये मोठे विमानतळ होण्यासाठी १४६ हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे मोठे उद्योगही येथे येण्यास मदत होईल. जिल्ह्यातील एकही आदिवासी घरकुलापासून वंचित राहणार नाही, सर्वांना योजनेतून घरकुल उपलब्ध करुन देण्याची ग्वाहीही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
प्रस्तावित विमानतळ व समृद्धीमुळे जिल्ह्यात विकासाचा वेग वाढेल- उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि समृद्धी महामार्ग यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यामुळे विकास कामांना गती मिळेल अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यातील युवकांना जास्तीत- जास्त रोजगार मिळाल्यास इतर घटकांकडून होणारा त्रास होणार नाही. तसेच लोकांच्या डोक्यातून नक्षलवादही संपेल असेही ते म्हणाले.
मंत्री धर्मराव आत्राम यानीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर स्थानिक युवकांनी रेला हे पारंपारीक नृत्य सादर केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री यांनी युवकांबरोबर नृत्यात सहभाग घेतला.
योजनांच्या लाभ वितरणासह विविध मान्यवर, युवकांचा सन्मान
‘शासन आपल्या दारी’ निमित्त आयोजित महाशिबिरादरम्यान मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील पद्मश्रीप्राप्त जेष्ट कलाकार परशुराम खुणे यांचा सन्मान करण्यात आला. १० मीटर शुटींगमध्ये राष्ट्रीय विजेता महेश ठवरे, सिकई मार्शल आर्टमधील एंजल देवकुले यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनांमधील लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचे लाभही प्रातिनिधिक स्वरुपात वितरीत करण्यात आले. यात जानु मट्टामी (शबरी आवास), राजेश मडावी (गोडावून अंतर्गत चेक वाटप), नंदा सयाम (मानव विकास-वाहन), तानुबाई गावडे (श्रावणबाळ पेंशन योजना) राधा तुमरेडी (संजय गांधी निराधार) यांना योजनांचा लाभ देण्यात आला. विविध योजनांमधून लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, सायकल, रिक्षा, घंटागाडी, शेतीपयोगी यंत्रसामुग्री, दिव्यांगांना सायकली आदी साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयू, पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत), गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत ४२ खाटांचे पेडियाट्रिक मॉड्युलर आयसीयू, कोविड-१९ कार्यक्रम कृती आराखड्यांतर्गत ५० खाटांचे मॉड्युलर आयसीयूचेही यावेळी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. पोलीस विभागाच्या मुरूमगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.
000
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्राची मान्यता
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्राची मान्यता
मुंबई दि.08 : परभणी येथील 100 विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयास केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश सुरू होणार आहे. राज्यातील हे 25 वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. गिरीष महाजन म्हणाले, स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास 60 वर्षात केवळ 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली होती. तर 2014 ते 2023 पर्यंत 9 वर्षात 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स तयार होवून राज्यभर आरोग्य सेवेचा विस्तार होणार आहे. परभणी येथील वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून मागील 9 वर्षातील 11 वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. तसेच ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा 9 जिल्हांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार आहेत.
मागील 09 वर्षात 11 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा अनोखा उपक्रम शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानंकानानुसार 1000 लोकसंख्येमागे एक डॉक्टर आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांचे प्रमाण कमी आहे तरीही प्रत्येक नागरीकाला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण विभागातील तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील बहुतांश डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम, तसेच अतिदुर्गम भागातील लोकांना आरोग्य विषयक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे दरवर्षी नवीन 100 प्रशिक्षित डॉक्टर राज्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी तयार होतील. परभणी येथे 430 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू झाल्यामुळे आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य विषयक चांगल्या सोईसुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सामान्य नागरिकांतून स्वागत केले जात असल्याचे मंत्री श्री महाजन यांनी यावेळी सांगितले.
स्ट्रेच मार्क*
*स्ट्रेच मार्क*
* अर्धा चमचा बदाम पावडर, चमचाभर खोबरेल
तेल, चमचाभर काँफी पावडर याच मिश्रण करून या प्रमाणात फ्रीजमध्ये स्क्रब तयार करून ठेवा हे फक्त स्ट्रेच मार्कवर नाहीतर जिथे जिथे त्वचा टॅन दिसते तिथे लावा फरक आठ दिवसात जाणवेलच. *एक चमचा ऑरेंज पावडर, एक चमचा मध घालून स्ट्रेच मार्कवर स्क्रब करा फरक दिसायला
लागेलच.
*एरंडेल तेल चमचाभर बटाट्याचा रस चमचाभर, चिमूटभर हळद घालून स्ट्रेच मार्क वर लावा. गायबच व्हायला लागतील * बेकिंग सोडा, बदामाचे तेल, आणि चमचाभर लिंबाचा रस घालून पेस्ट करा ही हलकेच मसाज करून चोळा.
*ट्री ट्री ऑईल बदाम ऑईल व कोरफडीच जेल एकत्र करून लावा फरक आठ दिवसात जाणवेल.
वैद्य गजानन
_*(
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...