Tuesday, 4 July 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठीप्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठीप्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


            मुंबई, दि. 4 : महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाज सेविका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच या कार्याने प्रभावित होवून इतर समाज सेविका व संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून राज्य शासनाकडून महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असणाऱ्या समाजसेविका व संस्थाना "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. मुंबई उपनगर जिल्ह्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 ( राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय) प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.


                   जिल्हास्तरीय पुरस्कार:- जिल्ह्यात महिला व बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत समाज सेविका असाव्यात, महिला व बालकल्याण क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष काम केलेले असावे, जिल्ह्यातील एकाच महिलेस हा पुरस्कार देण्यात येईल, कोणत्याही महिलेस एकापेक्षा अधिक वेळा जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म व पंथ या गोष्टीचा विचार केला जाणार नाही, पुरस्कार मिळण्याची पात्रता व्यक्तीच्या मौलिक कार्यावरून ठरविण्यात येईल. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दलित मित्र पुरस्कार, अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला हे पुरस्कार मिळालेले आहे, त्या या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. पुरस्काराचे स्वरूप दहा हजार एक रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.


            विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी पुढीलप्रमाणे निकष आहेत. विभागीयस्तरीय पुरस्कार हा महिला व बालकल्याण क्षेत्रात महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण, पुनर्वसन, अंधश्रद्धा निमूर्लन, जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल, महिला व बाल कल्याण क्षेत्रात कमीत कमी 7 वर्षापेक्षा जास्त काम केले असावे. स्वयंसेवी संस्था धर्मदाय कायदा अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. पुरस्काराचे स्वरूप - 25 हजार एक रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.


             राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पुढीलप्रमाणे निकष आहेत, महिला व बालकल्याण क्षेत्रात मौलिक कामगिरी करणारी नामवंत समाजसेविका असावी, महिला व बालकल्याण क्षेत्रात कमीत कमी 25 वर्षे काम केलेले असावे, कोणत्याही महिलेस एकापेक्षा अधिक वेळा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म व पंथ या गोष्टीचा विचार केला जाणार नाही, पुरस्कार मिळण्याची पात्रता व्यक्तीच्या मौलिक कार्यावरून ठरविण्यात येईल, ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला हे पुरस्कार मिळालेल्या वर्षानंतर 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीयय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.


         अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय, प्रशासकीय इमारत टप्पा -2, पहिला मजला आर. सी. मार्ग, चेंबूर मुंबई 400071, दुरध्वनी क्रमांक 022-25232308 येथे संपर्क साधवा, असे आवाहन बी.एच.नागरगोजे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

ग्राहकांना सीएनजीचा सुरळीतरित्या पुरवठा करावा

 ग्राहकांना सीएनजीचा सुरळीतरित्या पुरवठा करावा


- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण


            मुंबई, दि. 4 : ग्राहकांना सीएनजी (क्रॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) या इंधनाचा नियमितपणे पुरवठा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी खबरदारी घेण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिल्या.


            मंत्रालयात आयोजित सीएनजी पुरवठ्याबाबतच्या आढावा बैठकीत मंत्री श्री.चव्हाण यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, वितरक प्रतिनिधी उपस्थित होते.


            पुरवठादार आणि वितरक यांनी जनतेची, ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेऊन सीएनजीचा विनाखंड पुरवठा उपलब्ध करुन देण्याची खबरदारी घ्यावी. सीएनजी हे अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २००६ तसेच सीएनजी चे उत्पादन, पुरवठा व वितरण हे अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा, १९८१ (ESMA) च्या कलम २ (xii) अंतर्गत अत्यावश्यक सेवेच्या कक्षेत येतात. या बाबी लक्षात घेऊन सीएनजी पुरवठा सुरळीत होण्यासाठीची कार्यवाही तसेच इंधनाच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कार्यवाही देखील संबंधित यंत्रणांनी करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी दिल्या.


००००

❤️ fail hoil बर,काय पण लैच भारी असतात

 : बँकेच्या पेन्शन पेमेंट विभागाचा बॉस बेशुद्ध झाला .


तपासल्यावर कळले की 


एका पेन्शनधारकाने त्याला विचारले होते- की......


*अधिक महिन्याची पेंशन*

या महिन्याच्या पेन्शनसोबतच मिळणार की वेगळी...?

😃😃😃😂😂😂😂: बांगडी भरतांना त्या ताईला दुकानदाराने बांगड्यांबद्दल सांगितले की ...



एकवेळ आमदार फुटतील;पण आमच्या दुकानातील बांगड्या फुटणार नाहीत...😀😂

अधिक मास ज्योतिर्लिंग दर्शन, , वर्षा सहल अलिबाग रहिवासी


 अधिक मास निमित्त ज्योतिर्लिंग दर्शन व वर्षा सहल . दिनांक 29/07/2023 रोजी सकाळी 7 वाजता अलिबाग बस स्थानकावरून बस सुटणार आहे.अलिबाग - माळशेज घाट - कसारा इगतपुरी - त्र्यंबकेश्वर   मुक्काम,दिनांक 30/07/23 रोजी 7:30 वाजता त्र्यंबकेश्वर हुन निघून भीमाशंकर दर्शन करून अलिबाग रात्री परत येईल. प्रवास भाडे प्रौढ रु 1500 व 12 वर्षाखालील लहान रु 1000 असे असेल.चहा नाश्ता ,जेवण व राहणेचा खर्च प्रत्येकांनी वैयक्तिक करावयाचा आहे

वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन

 वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन.


            मुंबई, दि. 4 : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका "पहिले वर्ष सुराज्याचे" आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाचे प्रकाशन आज करण्यात आले.


            मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित हो

ते.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नूतन मंत्र्यांसह मंत्रालयातील

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नूतन मंत्र्यांसह मंत्रालयातील



महापुरूषांना केले अभिवादन

            मुंबई, दि. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात अलिकडेच समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांसह मंत्रालयातील जीजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


            मंत्री सर्वश्री छगन भुजबळ, दिलिप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील तसेच कु. आदिती तटकरे यांनीही महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


            यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ

 राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ

            मुंबई, दि. 4 : राज्यपाल रमेश बैस यांच्या पूजेनंतर मंगळवारी (दि. ४) राजभवनातील एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी देवीची आरती केली तसेच भाविकांशी संवाद साधला.


            आरतीनंतर राज्यपालांनी परिसरातील महालक्ष्मी, दुर्गा, महादेव व हनुमान यांच्या मूर्तींना हार घातला व आपल्या वतीने प्रसाद अर्पण केला. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनात एक दिवसाची यात्रा भरते. राजभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


**


 


Sri Gundi Jatra begins with performing of puja by Governor


 


      Maharashtra Governor Ramesh Bais performed the puja and aarti of goddess Sri Gundi to mark the commencement of the annual jatra (fair) at the Sri Gundi temple located in the Raj Bhavan premises in Mumbai on Tue (4 July).


      The Governor garlanded the idols of Goddess Sri Gundi and joined the aarti alongwith the devotees assembled on the occasion.


      The Governor also performed puja at the Sri Mahalaxmi, Durga, Mahadeo and Hanuman deities and interacted with the devotees.


      The annual jatra of the Sri Gundi temple in Raj Bhavan is held on Tuesday immediately following the Guru Purnima day annually.


--



Featured post

Lakshvedhi