Sunday, 2 July 2023

Medicine म्हणजे काय


 

पचनसंस्थेसाठी बडिशेप.....*

 पचनसंस्थेसाठी बडिशेप.....*

*१. उत्तम औषध...*


 रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.

*२. पोटात गॅस...*

 होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते.


*३. अपचनाच्या सर्व तक्रारींत...*


 बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे इ. थोडक्यात, सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.

L

*४. मुलांना दात येताना...* जुलाबाचा त्रास होतो, त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण घ्यावे

 *५. वीर्यवृद्धी करते.*

*६. भूक लागत नसेल...* तर रोज बडिशेप खावी. त्यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे.

*७. स्मरणशक्ती...* सुधारण्यासाठी व बुद्धी तरतरीत ठेवण्यासाठी बडिशेप चूर्ण+ तूप, चाटण द्यावे.

*८. तापामध्ये अंगाची आग होत असेल...*


जिभेला शोष पडत असेल तर बडिशेपेचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा.

*९. मासिक पाळीचे वेळी...* पोटात दुखत असेल, तर त्यासाठी एक चमचा बडिशेप रोज तीन वेळा चावून खावी. 

*१०. लघवी कमी होत असेल...*


तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर एक चमचा बडिशेपेचा काढा करून प्यावा.

L

*११. उलट्या होत असल्यास...*


अर्धा चमचा बडिशेप चूर्ण, एक चमचा


मोरावळ्यांत टाकून चाटण करणे.

*१२. कोरडा खोकला...*


 असेल तर, एक चमचा बडिशेप चूर्ण + एक चमचा पत्री खडीसाखर बरोबर घेणे.

*१३. सूज व वेदना...*


असतील तर बडिशेप, सैंधव पूड व ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे.

*१४. बडीशेप सरबत...*

बडिशेप ४ वा ५ चमचे घेऊन ती एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात ४ वा ५ चमचे खडीसाखरेचा पाक करून घालावा. म्हणजे चांगले सरबत तयार होते.


उपयोग - या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते. शिवाय ते पौष्टिक आहे.

*१५. स्वादिष्ट विरेचन चूर्ण...*


बडिशेप, ज्येष्ठमध व सोनामुखी प्रत्येकी १५० ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात ३०० ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. उपयोग - रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे.


त्याने पोट साफ होते. तसेच मूळव्याध, तोंड येणे इ. उष्णताविकार व त्वचाविकार बरे होतात.


*१६. बलदायी पेय (Energy Drink )...*


बडिशेप एक चमचा, एका वेलचीचे दाणे व दोन खजुराच्या आठळ्या ( बिया काढाव्यात. ) हे सर्व मिसळून दोन कप पाण्यात रात्री भिजत घालावे. सकाळी मिक्सरमधून काढावे म्हणजे बलदायी पेय तयार होते, ते रोज सकाळी ताकदीसाठी प्यावे.

संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*








 

चेहऱ्यासाठी टिप्स*

 *चेहऱ्यासाठी टिप्स*

 

*चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी :*


१) पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल.


२) नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल. 


३) पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.


४) त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे.


५) कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे. 


६) साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.


७) सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग 

उजळण्यास मदत होईल.


८) आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.


तेलकट त्वचेसाठी उपाय :


१) १ चमचा दह्यामध्ये प्रत्येकी १ चमचा मुलतानी माती आणि पुदिना पावडर अर्धा तास भिजवून ठेवा. तो लेप चेह-यावर १५ मिनिटे लावून ठेवा. जेव्हा चेह-यावरील लेप सुकेल तेव्हा कोमट पाण्याने धुवा.


२) १ चमचा मुलतानी माती, १ चमचा कडूलिंबाची पानांचा रस पाण्यामध्ये भिजवून ठेवा. अर्ध्या तासाने एका अंड्याच्या बलकामध्ये ती मुलतानी माती मिक्स करून तो लेप चेह-यावर लावून ठेवा. १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. cp



फक्त आणि फकत तुझीच आहे


 

पुरस्कार

 


साप- विंचू ,कीटक,मधमाशी,मुंगी, उंदिर,कोळी चावल्यास : घरगुती उपाय*

 *🎙साप- विंचू ,कीटक,मधमाशी,मुंगी, उंदिर,कोळी चावल्यास : घरगुती उपाय*


🦋 पावसाळ्यात घराच्या आसपास गवत झाडेझुडपे तयार होतात. यामुळे साप-विंचू असे प्राणी आपल्या घराच्या आसपास असण्याच्या शक्यता वाढतात. 

🦇 यातील एखादा किटक जर आपल्याला चावला घरगुती उपाय :

🦞 जर तुम्हाला विंचू चावला तर हळद गरम करून विंचूने जिथे डंख मारला तिथे लावा.

🐍 जर तुम्हाला सापाने दंश केलं असेल तर ज्या ठिकाणी उभे आहात तिथेच थांबा. अजिबात चालू नका. कारण चालल्याने विष पटकन शरिरात पसरतं. जिथे सापाने दंश केला तिथला भाग घट्ट बांधा, ज्यामुळे विष वर शरीरात चढणार नाही.

🦟 जर मुंगी किंवा मधमाशी चावली तर विक्स किंवा कांद्याचा रस चावलेल्या भागावर लावावा यामुळे आराम मिळतो.

🐀 उंदराने चावले असता घरात असलेला जुना नारळ जो लाल होऊन खराब झाला असेल तो थोडा किसून घ्या आणि त्यात मुळ्याचा रस मिसळून चावलेल्या भागावर लावा.

🕷 जर तुम्हाला कोळीने चावलं तर सर्वात आधी तो भाग स्वच्छ धुवून घ्या. आमचूर अर्थात आंब्याची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट चावलेल्या भागावर लावा.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


आहार सेवनाविषयीचे नियम

 📌 आहार सेवनाविषयीचे नियम 📌


🍎अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.


🍎अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.


🍎अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.


🍎भूक लागल्याशिवाय जेवू नये.भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.


🍎आधी खाल्लेले अन्न नीट पचल्याखेरीज जेवू नये.अन्यथा अन्नपाचक रसांना,आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.


🍎दोन परस्परविरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये.अशाने रोगाला आमंत्रण मिळते.


🍎अस्वच्छ जागी बसून जेवू नये.याने जंतुसंसर्ग वाढतो.


🍎खूप भराभर असे जेवू नये.अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.


🍎अति सावकाश रेंगाळत देखील जेवू नये.असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते,भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.


🍎जेवताना टीव्ही, मोबाईल,लॅपटॉप,व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे.यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.


🍎यासाठी जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने करावी.


📚संदर्भ-- डॉक्टर मी काय खाऊ?


📝माहिती संकलन👇

डॉ.स्वाती पाटील

होमिओपॅथ|बॅच फ्लॉवर रेमेडी थेरपिस्ट|आहारतज्ज्ञ.



*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_*(

Featured post

Lakshvedhi