तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाही अशी अप्रतिम कलाकृती.👌👌👌
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 30 June 2023
रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टरकेंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी
रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टरकेंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार
मुंबई, दि. ३० :- केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
केंद्र शासनाच्या भारतीय पादत्राणे, चर्मोद्योग आणि साहित्य विकास कार्यक्रमाच्या उपयोजनेतून पादत्राणे आणि चर्मोद्योगासाठी हा विशाल समूह प्रकल्प करण्यात येणार आहे. ३२३ कोटींच्या या प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. उर्वरित पायाभूत सुविधांच्या खर्चाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रातवड औद्योगिक क्षेत्राची निवड केली त्यातून सुमारे २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
राज्यात विविध औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नुकतीच ४० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिली
आहे.
००००
दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात ?*
दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात ?*
*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*
नळाचे पाणी कधी कधी खूपच खराब दिसते. गढूळ पाणी पिण्यास अयोग्य असते, हे कोणीही सांगेल: पण वरून स्वच्छ दिसणारे पाणीही पिण्यास योग्य असेलच असे नाही. साध्या डोळ्यांनी न दिसणारे असंख्य जिवाणू व विषाणू तसेच परजीवी त्यात असू शकतात. काही रासायनिक पदार्थ असल्यामुळे किंवा किरणोत्सर्गी पदार्थामुळेही पाणी दूषित होऊ शकते.
रासायनिक पदार्थ कोणता आहे, यावर रोगाची लक्षणे अवलंबून राहतील. पाण्यात जिवाणू असतील तर ते पाणी पिण्याने टायफॉईड, कॉलरा, हगवण असे रोग होऊ शकतात. विषाणूंमुळे कावीळ, पोलिओ यांसारखे रोग होतात. परजीवी जंतूंमुळे अमिवा व जिआर्डीया यांची लागण होते. गोल कृमी, अंकुश कृमी, तंतू कृमी इत्यादींची लागण त्या जंतूंची अंडी पाण्यात असतील तर होते.
पाण्यात सायक्लोप्स नावाचे किटक असल्यास नारू हा रोग होऊ शकेल, तर गोगलगायीमुळे शिस्टोसोमीयासीस हा रोग होईल. दूषित पाण्यामुळे असे अनेक रोग होतात.
नुसते पाहून पाणी चांगले की वाईट ते कळत नाही. त्यामुळे पिण्याच्या आधी ते शुद्ध आहे याची खात्री करून घ्यावी हेच चांगले. पाण्यात तुरटी फिरवणे, गाळणे, उकडून गार करणे या उपायांनी जतूंचा नाश होतो. क्लोरीनच्या गोळ्या वा द्रावण वापरून गुद्धा पाणी शुद्ध करता येते. ही पाण्याच्या शुद्धिकरणाची स्वस्त व परिणामकारक अशी पद्धत आहे. पाण्याच्या बाबतीत दिसते तसे नसते. म्हणून जग त्याला फसते ही म्हण अगदी सार्थ ठरते. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास प्रदूषित पाण्यापासून होणाऱ्या रोगांना आपण सहजपणे प्रतिबंध करू शकतो.
*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर - उडुपी येथील उत्थान द्वादशी काकड आरती
*🌹🙏👆श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर - उडुपी येथील उत्थान द्वादशी काकड आरती - विश्वरूप दर्शन सोहोळा आणि दीपोत्सव - एक अप्रतिम संग्रही ठेवावा असा व्हिडिओ आणि त्यासाठी वापरलेलं "उठ पंढरीच्या राया... फार वेळ झाला... थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला...." एक अप्रतिम समयोचित भक्तीगीत प्रत्यक्ष अनुभवा... ..!!! 👌👌👌🙏🌹*
ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठीप्रधानमंत्र्यांचे आभार
ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठीप्रधानमंत्र्यांचे आभार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· उसाला 315 रुपये प्रती क्विंटल हा आतापर्यंतचा सर्वाधिक रास्त आणि किफायतशीर भाव
· 3.68 लाख कोटींची युरिया सबसिडी 3 वर्षांसाठी जाहीर
· युरिया अनुदान योजना सुरूच राहणार, भारत लवकरच युरियाबाबत स्वयंपूर्ण होणार
मुंबई, दि. 30 : केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्याच्या घेतलेल्या या निर्णयांबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने 3.68 लाख कोटींची युरिया सबसिडी 3 वर्षांसाठी जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. कर आणि निमलेपनाचे शुल्क वगळून 45 किलोच्या पिशवीला 242 रुपये हाच दर कायम राहणार आहे. हे अनुदान खरीप हंगाम 2023-24 साठी नुकत्याच मंजूर झालेल्या 38,000 कोटी रुपयांच्या पोषण आधारित अनुदानाव्यतिरिक्त आहे. शेतकऱ्यांना युरिया खरेदीसाठी जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. सध्या प्रति 45 किलो युरियाच्या पिशवीसाठी 242 रुपये आहे (निमलेपनाचे शुल्क आणि लागू असलेले कर वगळून), तर पिशवीची वास्तविक किंमत सुमारे 2200 रुपये आहे. या योजनेसाठी पूर्णपणे केंद्र सरकार वित्तपुरवठा करते. युरिया अनुदान योजना सुरू ठेवल्याने आपण स्वयंपूर्णतेच्या दिशेने जात असून युरियाचे स्वदेशी उत्पादनही वाढणार आहे.
ऊसाला मिळालेल्या एफआरपीबाबात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2023-24 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी ऊसाला 10.25%च्या मूलभूत वसूली दरासह 315 रुपये प्रती क्विंटल रास्त आणि किफायतशीर भाव (FRP) देण्यास मंजुरी दिली आहे. वसुलीमध्ये 10.25% पुढील प्रत्येक 0.1% वाढीला 3.07 रुपये प्रती क्विंटलचा प्रीमियम देण्यास तर वसुलीमधील घसरणीसाठी प्रत्येक 0.1% घसरणीला रास्त आणि किफायतशीर भावात 3.07 रुपये प्रती क्विंटलची कपात करण्याला देखील मंजुरी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने ज्या साखर कारखान्यांची वसुली 9.5% हून कमी असेल तेथे कोणतीही कपात करण्यात येणार नाही, असा देखील निर्णय घेतला आहे.
युरियावर देण्यात आलेल्या सबसीडीबाबात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, बदलती भू-राजकीय परिस्थिती आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे खतांच्या किमती गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर अनेक पटींनी वाढत आहेत. परंतु केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना खतांच्या वाढत्या किमतीपासून वाचवले आहे. केंद्र सरकारने, शेतकऱ्यांचे हितरक्षण करत, खत अनुदान 2014-15 मधील 73,067 कोटी रुपयांवरुन 2022-23 मध्ये 2,54,799 कोटी रुपये इतके वाढवले आहे.
सन 2025-26 पर्यंत, पारंपरिक युरियाच्या 195 LMT च्या 44 कोटी बाटल्यांची उत्पादन क्षमता असलेले आठ नॅनो युरिया संयंत्र कार्यान्वित केले जाणार आहेत. नॅनो कण असलेली खते नियंत्रित रीतीने पोषक तत्वे बाहेर सोडणे, ज्यामुळे पोषक तत्वांचा वापर अधिक कार्यक्षमतेत होतो आणि शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते. नॅनो युरिया वापरल्याने पीक उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
कोटा (राजस्थान), येथे चंबल फर्टीलायझर लिमिटेड, मॅटिक्स लि. पानगढ (पश्चिम बंगाल), रामागुंडम (तेलंगणा), गोरखपूर (उत्तरप्रदेश), सिंद्री (झारखंड) आणि बरौनी (बिहार) येथे झालेल्या 6 युरिया उत्पादन युनिट्सची स्थापना आणि पुनरुज्जीवन यामुळे 2018 पासून युरिया उत्पादन आणि उपलब्धतेच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनविण्यात मदत होत आहे. 2014-15 मध्ये युरियाचे स्वदेशी उत्पादन 225 LMT वरून 2021-22 मध्ये 250 LMT पर्यंत वाढले आहे. 2022-23 मध्ये उत्पादन क्षमता 284 LMT इतकी वाढली आहे. हे नॅनो युरिया प्लांट्ससह युरियावरील आपले सध्याचे आयातीवरील अवलंबित्व कमी करतील आणि अखेर 2025-26 पर्यंत आपण नक्कीच स्वयंपूर्ण होऊ, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
***
काही घरगुती उपाय*
*👉काही घरगुती उपाय*
*डोकेदुखी :*
डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.
*अर्धशिशी (मायग्रेन) :*
रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.
*पूर्ण डोके दुखणे :*
निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.
*सायनस :*
सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.
*केसगळती :*
घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.
*डोळ्यांसाठी :*
नागवेलीचे(विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.
*नाकातील हाड वाढल्यास :*
५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.
*सर्दीचा त्रास झाल्यास :*
दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.
*वजन कमी करण्यासाठी :*
ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.
*हृदय मजबूत होण्यासाठी :*
रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.
*कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास :*
कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.
*लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी :*
अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.
*अपचनाचा त्रास :*
रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.
बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.
*हार्ट ॲटॅक आल्यास :*
लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.
*पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :*
रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा(यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल) चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.
*स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :*
पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.
*मूळव्याध :*
अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.
*मूतखडा (किडनी स्टोन) :*
दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.
*कोठा साफ होण्यासाठी :*
सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.
*दातांच्या बळकटीसाठी :*
पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.
*हिरड्या फुगल्यास :*
मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.
*गालगुंड :*
उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.
*चेहरा धुण्यासाठी :*
४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.
*मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :*
लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.
*संधिवात व हाडांचे दुखणे :*
पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.
*स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार :*
काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.
*टकलावर केस येण्यासाठी :*
सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.
कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.
*झोपेत घोरण्याची समस्या :*
तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.
*माथा उठणे :*
गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.
*त्वचेला खाज येत असल्यास :*
दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी
*मधुमेह (शुगर) :*
सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.
जेवल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत नाही.
दुपारी बाहेरुन आल्यानंतर गुळाचा एक खडा खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे साखर वाढत नाही.
*लूज मोशन :*
चमचाभर मेथीचे दाणे न चावता गिळून टाकावेत व त्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी प्यावे.
*लहान मुलांच्या पोटात दुखत असल्यास:*
वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून सकाळी उकळून व गाळून घ्यावे आणि ते पाणी मुलांना चमच्याने पाजावे.
आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन ठेवावे. त्यामुळे थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप याचा त्रास होत नाही.
स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास थायराईडचा त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे सोन्याचा मणी कायमस्वरुपी घातल्यास थायराईडचा त्रास होत नाही.
स्त्रियांनी एक मिनिटभर दोन्ही भुवयांच्या मध्ये कपाळावर अनामिकेने (करंगळीच्या शेजारच्या बोटाने)कुंकू लावतात तसे घड्याळाच्या काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज करावा,
पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज करावा. यामुळे मनावरील ताण नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, वैचारिक पातळी चांगली राहाते, डोकेदुखीचा त्रास होत नाही,चष्मा लागत नाही.
गरोदरपणात एक दिवसाआड शहाळ्याचे पाणी नियमितपणे प्यावे. यामुळे बाळंतपण सुखरुपपणे पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.l
कोणताही पदार्थ (अन्न व पेय) गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.
*रोज शक्य होईल तितके चालावे.*
*स्मरणशक्ती :*
वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.
*कॅन्सर :*
वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही.
*शरीरशुद्धीसाठी :*
ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक रोज किमान ७ लिटर प्यावे. सलग ३ दिवस हा प्रयोग केल्यास शरीरशुद्धी होते. आयुर्वेदातील पंचकर्म उपचाराचा लाभ या प्रयोगामुळे होतो.
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढणार
पूर रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढणार
राज्यात पुरामुळे मोठे नुकसान टाळण्यासाठी नद्यांमधील गाळ व वाळू तसेच राडा-रोडा बाहेर काढण्याबाबत स्वतंत्र धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पूर प्रवण क्षेत्रात शहरांमधून वाहणाऱ्या नद्यांमुळे पुराचा तडाखा बसतो. यापुर्वी २००५, २००६ व २०११, २०१९ व २०२२ मध्ये विविध शहरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुराला रोखण्यासाठी नदी पात्रात गाळामुळे निर्माण झालेली बेटे, राडा-रोडा, वाळू मिश्रीत गाळ काढण्यासाठी आता जलसंपदा विभाग, नगरविकास आणि महसूल विभाग कार्यवाही करेल. यासाठी राज्यातील १ हजार ६४८ किमी लांबीच्या नद्यांमधील गाळ काढण्यासाठी कार्यपद्धती ठरवण्यात आली असून, त्या नुसार कार्यवाही केली जाणार आहे. या कामासाठी ६ हजार ३४ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
-----०-----
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...