Monday, 10 April 2023

गुलाबी सौंदर्य

 *प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचा असाही वापर; वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा 'रोझ फेसपॅक'.....*


काल अनेक कपल्स   व्हॅलेंटाईन डे (Valentines Day)  साजरा केला. प्रेमीयुगुल हे एकमेकांना वेगवेगळे गिफ्ट देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. या दिवशी बरेच लोक आपल्या पार्टनरला गुलाब भेट म्हणून देतात. प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या गुलाबाचा वापर विविध फेसपॅक तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. गुलाबाचा वापर करुन फेसपॅक (Beauty Tips) कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या रोज फेस पॅक तयार करायची सोपीपद्धत...


*गुलाब पेस्ट तयार करण्याची सोपी पद्धत...*

गुलाबाचे विविध फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुलाबाची पेस्ट तयार करावी लागेल. ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि त्या पाण्यानं स्वच्छ करा. या पाकळ्या मिक्समध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. या पेस्टचा वापर तुम्ही विविध फेसपॅक तयार करण्यासाठी करु शकता. 


*गुलाब हनी फेस पॅक(Honey And Rose Facepack)...*

तयार केलेल्या गुलाबाच्या पेस्टचा वापर करुन तुम्ही गुलाब हनी फेस पॅक तयार करु शकता. यासाठी गुलाबपेस्टमध्ये गुलाब पाणी आणि मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला 20 मिनिटे लावा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा हायड्रेट राहिल. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील या फॅसपॅकमुळे कमी होतील.


*गुलाब चंदन फेसपॅक(Sandalwood And Rose Facepack)...*

गुलाबा पेस्टमध्ये चंदन पावडर मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात थोडे एक किंवा दोन चमचे दूध टाका. हा पॅक चेहऱ्यावर लावताना मसाज करा. हा पॅक जवळपास दहा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्याचे स्क्रबिंग होते. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. 


*कोरफड जेल आणि गुलाबाचा पॅक (Aloe Vera And Rose Facepack)...*

गुलाबाच्या पेस्टमध्ये  कोरफड जेल मिक्स करून  चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी चेहरा धुवा. या पॅकमुळे स्किन टायनिंग होते. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील जातात. 


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Sunday, 9 April 2023

आरोग्य दाई बीट

 *आरोग्य दाई बीट*


भाज्यांमध्ये बीट सर्वात फायदेशीर मानली जाते. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ते शरीरात हिमोग्लोबिन बनविण्याचे कार्य करतात. बीट रक्त स्वच्छ करण्यास देखील मदत करते. बीटरुटमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. याशिवाय लोह, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी घटकांमध्येही समृद्ध आहे. एकीकडे बीट आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर दुसरीकडे त्वचा सुधारण्यासही फायदेशीर आहे. हे अँटीएजिंग म्हणून कार्य करते.

चला तर मग जाणून घेऊया बीटाचे फायदे...


*फायदे -*


डागविरहित त्वचेसाठी - चमकदार आणि गुळगुळीत त्वचेसाठी बीटचा रस खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन-ए, सी आणि व्हिटॅमिन-के असते जे शरीराच लोह, तांबे आणि पोटॅशियमची आवश्यकता पूर्ण करते आणि त्वचा निरोगी ठेवते. बीटचा रस इतर कोणत्याही भाज्या किंवा फळांच्या रसात मिसळला जाऊ शकतो


*चमकदार त्वचेसाठी* - 

चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आपण बीट फेस मास्क वापरू शकत फेस मास्क बनविण्यासाठी, ब्लेंडरमध्ये सोलून बीटचे तुकडे घालून पेस्ट तयार करा एका भांड्यात पेस्ट काढा आणि त्यात एक चमचा मॉइश्चरायझिंग क्रीम मिसळा. ही तयार पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा. पेस्ट सुकल्यावर चेहरा धुवा. यानंतर आपल्याला आपला स्वतःचा चमकणारा चेहरा दिसेल.


*डाग नाहीसे करण्यासाठी* 

 मुरुमांचे चेहऱ्यावर कुरूप डाग पडतात. अशा प्रकारे, बीटचा मास्क चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. बीट मास्क तयार करण्यासाठी, दोन चमचे मुलतानी माती मध्ये 5-6 चमचे बीटचा रस घाला आणि एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा आणि 15 मिनिटे कोरडे होऊ द्या. जेव्हा ते कोरडे होईल तेव्हा त्यावर हातांनी चेहरा आणि गळ्यावर मालिश करा. काही काळ मालिश केल्यानंतर, ते पाण्याने स्वच्छ करा. हे डाग काढून टाकण्यास मदत करेल.


*त्वचेचे टोनिंग करण्यासाठी* 


बीटचे सेवन देखील टोनरसारखे कार्य करते. यासाठी बीटरूटचे तुकडे करा आणि त्यात थोडा कोबी घाला आणि बारीक वाटू घ्या. आइस क्यूब तयार करण्यासाठी हि तयार होणारी पेस्ट आइस ट्रेमध्ये टाका आणि डीप फ्रीजरमध्ये ठेवा. जेव्हा गोठते तेव्हा ते चेहऱ्यावर लावा.


*ओठांकरिता* 


 फाटलेल्या ओठांना बरे करण्यासाठी आणि ते मऊ करण्यासाठी बीटरूटचा रस वापरा. बीट रस फ्रिजमध्ये ठेवा, तो दाट झाल्यावर रात्री आपल्या ओठांवर लावा. सकाळी आपण मलईच्या मदतीने ते स्वच्छ करा. ओठांना मऊ आणि गुलाबी बनवण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,



*⭕️

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे सोमवारी वितरण

 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे सोमवारी वितरण

              पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत "उत्सव महासंस्कृतीचा" चे आयोजन


            मुंबई 8:कलेच्या विविध क्षेत्रात नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन आणि कलादान या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने दि.10 एप्रिल 2023 रोजी कलांगण, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे.


         रुपये एक लक्ष, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे स्वरुप असलेले राज्य सांस्कृतिक पुरस्कार

            नाटक : कुमार सोहोनी(2020) गंगाराम गवाणकर (2021), कंठसंगीत : पंडितकुमार सुरशे (2020) कल्याणजी गायकवाड (2021),उपशास्त्रीय संगीत : शौनक अभिषेकी (2020) देवकी पंडीत (2021),चित्रपट ( मराठी) : मधु कांबीकर (2020) वसंत इंगळे (2021), किर्तन : ज्ञानेश्वर वाबळे (2020) गुरुबाबा औसेकर (2021),शाहिरी : अवधूत विभूते (2020) कै. कृष्णकांत जाधव(मरणोत्तर) (2021),नृत्य : शुभदा वराडकर (2020) जयश्री राजगोपालन (2021),कलादान : अन्वर कुरेशी (2020) देवेंद्र दोडके (2021),वाद्यसंगीत : सुभाष खरोटे (2020) ओंकार गुलवडी (2021), तमाशा : शिवाजी थोरात (2020) सुरेश काळे (2021),लोककला : सरला नांदुरेकर (2020) कमलबाई शिंदे (2021),आदिवासी गिरीजन : मोहन मेश्राम (2020) गणपत मसगे (2021) या मान्यवरांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केले जाणार आहेत.

            या पुरस्कार प्रसंगी उत्सव महासंस्कृतीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्रीधर फडके, सावनी रवींद्र, भजनसम्राट ओमप्रकाश, कार्तिकी गायकवाड, संदेश उमप, संपदा माने, संपदा दाते, शाहीर संतोष साळूंखे, संघपाल तायडे तसेच शिल्पी सैनी आदि कलाकारांचे नृत्य, नाटय, भक्ती, संगीत, रंजन करणाऱ्या कलांचे सादरीकरण होणार आहे. या कायक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. महाराष्ट्राच्या कलारत्नांचा सन्मान करण्यासाठी तसेच यासोबत सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.


0000

यशराज भारती सन्मान 2022-23 पुरस्कारांचे वितरण

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत


यशराज भारती सन्मान 2022-23 पुरस्कारांचे वितरण


         मुंबई,दि.8 : यशराज रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यशराज भारती सन्मान 2022-23 करीता आरोग्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम, लोकांचे जीवनमान उंचावणे आणि एथिकॅल गव्हर्नन्स या श्रेणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले.


               जमशेद भाभा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्टस (एन.सी.पी.ए.), नरीमन पॉईंट, मुंबई येथे यशराज भारती सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्ष आणि विश्वस्त श्रीमती दीपाली भानुशाली, डॉ एस.एस. मुंद्रा, यशराज रिसर्च फाउंडेशनचे सल्लगार डॉ.डी. के. जैन, प्रो. राम चरण, प्रो. गोविंदराजन पद्मनाभन आदी मान्यवर उपस्थित होते.


               स्वयंसेवी संस्था समाजाप्रती काम करतात त्याच्यामध्ये संवेदना असतात. जे लोक समाजाप्रती काम करतात, ज्यांचे कार्य चांगले असते त्यांच्या पाठीमागे समाज उभा असतो. यशराज रिसर्च फाऊंडेशनचे समाजाप्रती अत्यंत चांगले कार्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


               यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, यशराज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम, लोकांचे जीवनमान उंचावणे आणि एथिकॅल गव्हर्नन्स या तीन श्रेणीतील काम चांगले आहे. या तीन श्रेणीवर शासन काम करत आहे.


               यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यशराज भारती सन्मान 2022-23 करीता आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम या श्रेणीसाठी ‘सर्च’ (SEARCH), गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेस पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार डॉ. अभय बंग व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथील प्रा. नवकांता भट यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. लोकांचे जीवनमान उंचावणे या श्रेणीत ‘प्रदान’ (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे सरोज महापात्रा यांनी स्वीकारला आणि एथिकॅल गव्हर्नन्स या श्रेणीसाठी डॉ. अजय भूषण पांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


               सर्च (SEARCH), गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेस व येथील प्रा. नवकांता भट यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आणि प्रदान (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस आणि डॉ. अजय भूषण पांडे यांना प्रत्येकी एक कोटी रुपये पुरस्काराची रक्कम देण्यात आली. यावेळी डॉ.अजय पांडे यांनी पुरस्काराची एक कोटी रुपये रक्कम प्रधानमंत्री साहाय्यता निधीमध्ये देत असल्याचे जाहिर केले.


               2022-2023 साठी यशराज भारती सन्मान खालील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आले.


आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम : या सन्मानाची 2 श्रेणीत विभागून देण्यात आला. पहिली म्हणजे सर्च (SEARCH), गडचिरोली या संस्थेची जी दुर्गम भागात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. जी की विशेषत: नवजात बालकांच्या आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करते. या श्रेणीतील दुसरे सन्मानकर्ते प्रा. नवकांता भट आहेत. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे जो एकाच कन्सोलद्वारे अनेक निदान चाचण्या करतो. या मशिनच्या विकासामुळे आरोग्य सेवा क्षेत्रावर मोठा प्रभाव पडण्याची क्षमता आहे आणि ते अधिक कार्यक्षम आणि परवडणारे आहे.


लोकांचे जीवनमान उंचावणे: या वर्षासाठी हा सन्मान ‘प्रदान’ (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस देण्यात आला. ही संस्था बऱ्याच काळापासून विकास क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेने जवळजवळ 19,47,979 कुटुंबांपर्यंत मोठा प्रभाव निर्माण केला आहे. ही संस्था महिला विकास आणि लिंग संवेदना याविषयावर चांगले काम करत आहे. 


एथिकॅल गव्हर्नन्स : या श्रेणीसाठी हा सन्मान डॉ. अजय भूषण पांडे यांना देण्यात आला. डॉ.पांडे हे महाराष्ट्र केडरमधील सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि सध्या एप्रिल, 2022 पासून राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. गेल्या दशकभरात, डॉ. पांडे यांनी वित्त, आधार, डिजिटल पेमेंट आदी क्षेत्रात योगदान दिले

 आहे.


0000


 


 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत


 


            नवी दिल्ली, 8 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे आज पासून उत्तर प्रदेश च्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री शिंदे यांचे स्वागत केले. तसेच उत्तर प्रदेश वासियांनी श्री. शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी येथील जनतेचे धन्यवाद मानले.


            या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील आणि अन्य मंत्री तसेच आमदार सहभागी आहेत.


            मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणारे मंत्री तसेच आमदार आज लखनऊ येथे थांबणार असून उद्या अयोध्या येथे 'प्रभू श्री रामचंद्र' यांचे दर्शन घेतील.


     


 



0000


 


प्रेमाची लाड लीं आणि बुडाला शेकली

 


Saturday, 8 April 2023

कौशल्य विकास विभागामार्फत महारोजगार मेळाव्यात

 कौशल्य विकास विभागामार्फत महारोजगार मेळाव्यात 5 हजार 583 पदांकरीताविविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती


कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन.

               मुंबई, दि. 8 : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ग्रॅंटरोड येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी त्यांच्याकडील 5 हजार 583 पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्यात नोकरीइच्छूक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मेळाव्यात 26 उद्योग तथा कंपन्यांनी सहभाग घेतला. आज सकाळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.


               गावदेवी, ग्रॅंटरोड (पश्चिम) येथील शारदा मंदिर हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमास मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.


 


5 लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट - मंत्री मंगलप्रभात लोढा


 


               मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात 5 लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे ही त्यांनी सांगितले.


               मेळाव्यात विविध 26 कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पहिल्या फेरीत साधारण 222 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. त्याचबरोबर मेळाव्यात विविध शासकीय मंडळेही सहभागी झाली. त्यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या त्यांच्याकडील विविध कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली.


0000

Featured post

Lakshvedhi