Monday, 3 April 2023

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात

 समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक


 


            मुंबई, दि. 3 :- रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची 12 वी बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी व सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळलेच पाहिजेत. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात. ब्लॅक स्पॉट कमी करण्यात यावेत.


            अपघात होण्यास कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी हटवावीत. रात्री गस्तीचे प्रमाण वाढविण्यात यावे.


            अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळण्याची गरज असते. त्यादृष्टीने ट्रॉमा केअर सेंटरमधील सुविधा वेळेवर उपलब्ध असल्या पाहिजेत. एअर अॅम्बुलन्स सुविधाही त्वरित उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी.


            सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार सर्व उपाययोजना करुन शून्य अपघाताचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हा स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. शालेय स्तरापासूनच वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले.


            सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनीही रस्ते वाहतूक सुरक्षा संदर्भात विविध सूचना मांडल्या.


            राज्यात 109 ट्रॉमा केअर सेंटर कार्यरत असून 108 क्रमांकाच्या 937 अॅम्बुलन्स 24 तास कार्यरत आहेत. वाहनांच्या तपासणीसाठी 23 ठिकाणी अद्ययावत स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. 18 अॅटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे

 शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 3 : “शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी नाबार्डच्या 2023-24 च्या स्टेट फोकस पेपरचे प्रकाशनही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टेट फोकस पेपरमध्ये विविध प्राधान्य क्षेत्रांसाठी 6 लाख 34 हजार 058 कोटी रुपयांच्या क्रेडिट क्षमतेचा आराखडा देण्यात आला आहे. 2021-22 या कालावधीच्या तुलनेत या आराखड्यात 47 टक्के वाढ झाल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.


            आजच्या स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, कृषी, सहकार, पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रमुख बँकर्स देखील उपस्थित होते.


            यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य आर्थिक परिषदेतदेखील हा स्टेट फोकस पेपर ठेवण्यात येऊन पुढील मार्गदर्शन घेण्यात येईल. राज्यातील कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि इतर क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग आणि बँकर्स यांचा सहभाग आणि समन्वय असेल, तर योग्य दिशेने विकास होऊ शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


            शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात वेगाने सुरु झाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीची मोठी समस्या देखील आहे. शेतकऱ्याच्या सर्व कर्ज - गरजा बँकिंग प्रणालीतून पूर्ण केल्या जातील याची काळजी घेतल्यास तो आत्मविश्वासाने पायावर उभा राहील, तसेच आत्महत्येचा विचार सुद्धा त्याच्या मनात येणार नाही.


            यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजनेचा उल्लेख केला. तसेच अडीच वर्षे बंद पडलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु झाल्याचे देखील सांगितले. गेल्या नऊ महिन्यांत २७ सिंचन प्रकल्पांना गती दिल्याची माहितीही त्यांनी दिली. हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानाशी जुळवून घेण्यासाठी आणि प्रतिकूलता कमी करण्यासाठी नाबार्ड राबवित असलेल्या उपक्रमांसाठी त्यांनी नाबार्डचे कौतुकही केले.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीकडे नेण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्यादृष्टीने हा स्टेट फोकस पेपर उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.


पाणंद रस्त्यांसाठीही तरतूद हवी


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यात कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यात येत असून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. पाणंद रस्त्यांसाठीही शेतकऱ्यांना वित्त पुरवठा उपलब्ध करून दिल्यास ते उपयुक्त ठरु शकेल. समृद्धी मार्ग शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कृषी आधारित उद्योग येथे उभारण्यास चालना देण्यात येत आहे.


            शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहजतेने उपलब्ध झाले पाहिजे. सिबिलची आवश्यकता नाही, याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात यावी, असेही ते म्हणाले. नवीन प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था तयार करण्याची परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.


स्टेट फोकस पेपर


            नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी. एस. रावत यांनी स्टेट फोकस पेपरची माहिती दिली. यात २०२३-२४ साठी कृषी क्षेत्राकरिता १ लाख ५६ हजार ८७३ कोटी (२४.७%), एसएमई साठी ३ लाख ५४ हजार ८५४ कोटी ( ५६%), अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी १ लाख २२ हजार ३३१ कोटी ( १९.३%) क्रेडिट क्षमता असल्याचे नमूद केले आहे.


            राज्यात सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत, कृषी मूल्य साखळ्या विकसित व्हाव्यात, कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक व्हावी, एकात्मिक शेतीला चालना द्यावी , ग्रामीण तरुणांना कृषी व पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे, हवामानावर आधारित शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्याने प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे बँकांनी देखील आपले जाळे अधिक व्यापक करावे, कृषी क्षेत्रात क्लस्टर फायनान्सिंग करावे, बचत गटांना अर्थसहाय करण्यासाठी कॉर्पोरेट धोरण आखावे, ग्रामीण सहकाराला बळकट करावे यासाठी पाऊले उचलावीत, असे नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक श्री. रावत म्हणाले.


००००



मुंबईतील एमयुटीपी प्रकल्पांसाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य

 मुंबईतील एमयुटीपी प्रकल्पांसाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 3 :- मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस (एमयुटीपी) हे मुंबई महागनर (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादनपुनर्वसन यांसह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करावीअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हे सर्व प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशीत करुन एमएमआरडीएसह अन्य यंत्रणांच्या वित्तीय तसेच करार आदी बाबींवर वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन (एमआरव्हिसी)च्यावतीने मुंबईत सुरु असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांबाबत (अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस - एमयुटीपी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सादरीकरण करण्यात आले. 

            रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणझोपडपट्ट्या हटवण्यासाठी रेल्वेने पुढाकार घ्यावा. झोपडपट्टी विकास प्राधिकरण (एसआरए)प्रमाणेच एक नियोजन प्रणाली राबवण्यात यावी. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रेल्वेला जमीन उपलब्ध होईल. तसेच अशा रहिवाशांचे सुयोग्य पुनर्वसनही शक्य होईल. यासाठी राज्य शासन आवश्यक ते सहकार्य करेलअशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीएमयुटीपीचे हे प्रकल्प मुंबई (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या वाहतूक सुविधेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे एमएमआरडीसोबतच अन्य यंत्रणांनी हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी पूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास एमएमआरडीएला या प्रकल्पांसाठी आर्थिक वाटा उचलता यावा, यासाठी कर्जाची व्याप्तीही वाढवली जाईल. रेल्वे मंत्रालयाशीही पत्रव्यवहार केला जाईल. हे सर्व प्रकल्प एकाच पद्धतीने आणि सुनियोजितपणे वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील. भू-संपादन आणि पुनवर्सनाबाबतही स्थानिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. बाधितांना आहे त्या ठिकाणीच पुनर्वसनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीलोकांसाठी हे प्रकल्प खूप फायेदशीर ठरले आहेत. यापूर्वीच हे प्रकल्प वेगाने आणि वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे आता या प्रकल्पांना कालबद्ध पद्धतीने वेग दिला पाहिजे. वित्त पुरवठ्यासहकरार आदी बाबींची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विकास कामे वेळेत आणि वेगाने पूर्ण झाली पाहिजेतयासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयाने काम करावे लागेल.

            यावेळी बैठकीत एमआरव्हिसीच्यावतीने एमयुटीपी-एमयुटीपी-२ या प्रकल्पांचा प्रगती अहवाल सादर करण्यात आला. एमयुटीपी – १ मध्ये नऊ वरून बारा डब्ब्यांच्या उपनगरीय गाड्या सुरु करण्यात यश आले. बोरिवली- विरार आणि कुर्ला – ठाणे या जादा मार्गिका सुरु करण्यात यश आले. एमयुटीपी – २ मध्ये सर्व डीसी गाड्यांचे एसीमध्ये परिवर्तन करण्याचा टप्पा पूर्ण करण्यात आला. याशिवाय ठाणे आणि दिवा दरम्यान पाचवीसहावी मार्गिकाही सुरु करता आल्याची माहिती देण्यात आली. एमयुटीपी – २मध्येच सीएसएमटी-कुर्ला पाचवीसहावी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावी मार्गिका हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत.  एमयुटीपी-३ मध्ये पनवेल – कर्जत हा प्रकल्प ३९ टक्केऐरोली-कळवा हा प्रकल्प ४३ टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय मार्गिका सुरक्षा उपाय आणि अन्य सुविधाही ५७ टक्के पूर्ण झाल्या आहेत. एमयुटीपी – ३ ए मध्ये बोरीवली- विरार पाचवी व सहावी मार्गिका तसेच गोरेगांव-बोरीवली हार्बर लाईनचा विस्तारकल्याण-बदलापूर तिसरी व चौथी मार्गिकाकल्याण-असनगांव चौथी मार्गिका या प्रकल्पांसह सुमारे १८ स्थानकांचा विकास असे प्रकल्प नियोजित असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांसाठी आवश्यक वित्तीय सहभागाबाबतही चर्चा झाली.

            बैठकीस राज्याचे मुख्य सचिव मनु कूमार श्रीवास्तवनगर विकास विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव भूषण गगराणीवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरावन विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डीउपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीमुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसूसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जीएमआरव्हिसीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्तामुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडेमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे अतिरिक्त आयुक्त के. एच. गोविंदराजनवी मुंबई महापालिकेचे आय़ुक्त राजेश नार्वेकरठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच एमआरव्हिसीच्या विविध विभागांचे संचालकरेल्वे भूमी विकास प्राधिकरणाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

०००००


 

एप्रिलला हनुमान *जन्मोत्सव* येत आहे (जयंती नव्हे).

 माझी सर्वांना हात जोडून विशेष विनंती आहे की, ६ एप्रिलला हनुमान *जन्मोत्सव* येत आहे (जयंती नव्हे).

याला *~हनुमान जयंती~* म्हणण्याऐवजी, आपण सर्वांनी याला *हनुमान जन्मोत्सव* म्हणूया आणि सर्वांना *हनुमान जन्मोत्सव* म्हणण्यास प्रोत्साहित करूया.

कारण त्यांचीच जयंती साजरी केली जाते *जे या जगात नाही* आणि कलियुगात फक्त श्री रामभक्त हनुमान जे *चिरंजीवी* आहेत, आजही अस्तित्वात आहेत.

त्यामुळे, आपण हा बदल घडवून आणला पाहिजे आणि हा संदेश *हनुमान जन्मोत्सव* पूर्वी सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे.

*हा मेसेज किमान पाच ग्रुपमध्ये पाठवा*

          *जय श्री राम*..

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

निस्तबध.

 


हार्ट अटॅक पासून दूर राहा

 *हार्ट अटॅक पासून दूर राहा* 


*हार्ट अटॅक ची काही लक्षणे-* 

तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे ही माहित असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सतत चिंता सतावणे, ह्रदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे,अंगदुखी,पाठ दुखी, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या निर्माण होणे या सर्व गोष्टी म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. ही दिसू लागल्यावर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.


*हार्ट अटॅकची कारणे-* 

लक्षणे तर आपण पाहिली पण हार्ट अटॅक नक्की कशामुळे येऊ शकतो जे जाणून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा, मधुमेह, हाय कोलेस्टेरॉल, हाय बिपी, धुम्रपान, मद्यपान, हाय फॅट डायट ही सर्व हार्ट अटॅकची कारणे ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही या सर्व कारणांकडे लक्ष दिले पाहिजे. शक्य तितके जास्त हेल्दी जगा, हेल्दी खा आणि तंदुरुस्त रहा. यामुळे तुम्हाला असलेला हार्ट अटॅकचा धोका खूप जास्त कमी होऊ शकतो आणि तुम्ही अधिक काळ निरोगी आयुष्य जगू शकाल.


*स्वत:चा कसा बचाव करावा ?* 

आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की स्वत:ला हार्ट अटॅक पासून वाचवावे कसे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे हृदय सुरक्षित राखायचे असेल तर आहारावर लक्ष द्या. सध्या धकाधकीच्या काळात हेल्दी आहाराकडे लक्ष राहत नाही आणि हेच हार्ट अटॅकला आमंत्रण ठरू शकते. शिवाय तुम्हाला धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर ही सवय सोडा. कोणत्याही प्रकारे धुम्रपान आणि मद्यपानाचे समर्थन करता येणार नाही. त्यामुळे निरोगी सवयी आत्मसात करा आणि स्वत:चा हार्ट अटॅक पासून बचाव करा.


*संकलन-* 

*डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️

अलभ्य लाभ नेत्र सुख

 सुरत मधील डी. खुशालभाई ज्वेलर्स ने राम मंदिराच्या चांदीच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. 


डी. खुशालभाई ज्वेलर्स चे मालक दीपक चोकसी यांनी सांगितलं की राम मंदिर भारतीय संस्कृती चे एक प्रतीक आहे त्यामुळे आम्ही मंदिराच्या चांदीच्या प्रतिकृती बनवण्याचा विचार केला.सध्या अयोध्या मधील मार्केट मध्ये या चांदीच्या प्रतिकृतीची तुफान चर्चा सुरु आहे.


रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून त्यांनी राम मंदिराच्या चांदीच्या वेगवेगळ्या आकारातील चार प्रतिकृती बनवल्या आहेत ज्या अत्यंत सुंदर असून त्यांनी अयोध्येतील मार्केट मध्ये खूप कौतुकाची लूट केली आहे. यातील सर्वात छोट्या चांदीच्या प्रतिकृती चे वजन सहाशे ग्रॅम असून सर्वात मोठ्या प्रतिकृतीचे वजन तब्बल पाच किलो आहे. 


जेव्हापासून या मंदिरांच्या प्रतिकृतीची वार्ता अयोध्येमध्ये समजली तेव्हापासून भाविकांनी खूप मोठ्या संख्येत या मंदिरांच्या प्रतिकृतीची मागणी वाढत जातं आहे. 

आपल्या श्रीराम मंदिर बनून तयार झालेल्या वर्षाची आठवण आणि श्रीरामांप्रती असलेल्या प्रेमासाठी या प्रतिकृती आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवण्यास अनेक लोकं उत्सुक आहेत. 


जय श्री राम!🙏🚩


जय हिंद!🇮🇳

-जयसिं


ग मोहन 🚩

Featured post

Lakshvedhi