Friday, 31 March 2023

राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार

 राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी

दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. 30 : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत आहोत. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


               मंत्रालयात पार पडलेल्या सामंजस्य कराराप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. 


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून 'अंगणवाडी दत्तक' धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी,अशासकीय स्वयंसेवी संस्था,ट्रस्ट इ. आणि व्यक्ती,कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. आज दालमिया फांउडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूर मधील १० अंगणवाड्या दुरूस्तीसाठी, भागीरथी फांउडेशनने पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे १५ अंगणवाडी दुरूस्तीसाठी, कॉरबेट फाउंडेशन पुणे येथे १६ अंगणवाड्या दुरूस्तीसाठी व पूर्व शालेय शिक्षण, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील २० अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, आर.एस.एस.जनकल्याण समितीने मुंबई उपनगर मधील २५ अंगणवाडी बळकटीकरण, होप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुणे येथे ४१ अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृध्दी,युनायटेड वे दिल्ली पुणे ४५ अंगणवाडी दुरूस्ती, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी पुणे येथील १०० अंगणवाडी दुरुस्ती, के कॉर्प फांउडेशन गडचिरोली, नंदुरबार १७९ अंगणवाडी दुरूस्ती आणि न्युट्रीशियन, यार्दी फाउंडेशन पुणे ३०० अंगणवाडी दुरूस्ती, न्युट्रीशियन, जीवनंदन फाऊंडेशन यांनी पुणे येथील सहा अंगणवाड्या, मुस्कान प्रतिष्ठाणने मुंबई उपनगर येथील सात अंगणवाड्या तसेच क्षमता वृद्धीसाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत.


पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये सर्वोत्कृष्ठ काम केलेल्या


जिल्हा आणि नागरी बाल विकास प्रकल्प अधिका-यांचा सत्कार


               पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांची आधार सिडींगमध्ये यशस्वी नोंद घेतलेल्या भंडारा जिल्ह्याचा ९८ टक्के नोंद केल्याबद्दल प्रथम क्रमांक, पालघरमध्ये ९७ टक्के नोंद केल्याबद्दल द्वितीय क्रमांक, हिंगोली जिल्ह्याचा ९६ टक्के नोंद केल्याबद्दल तृतीय क्रमांक आहे.


            तर नागरी प्रकल्पामध्ये तुंगा मोहिली, मुंबईमध्ये ९९ टक्के नोंद असल्याने प्रथम क्रमांक, घाटकोपर १ मुंबई ९८.२ टक्के नोंद असल्याने द्व‍ितीय क्रमांक, तर दापोडी बोपोडी मुंबई ९८ टक्के नोंद असल्याने तृतीय क्रमांक आहे. या जिल्ह्यांना व नागरी बाल विकास प्रकल्पांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


                आयसीडीएस योजनेसोबत प्रशंसनीय काम केल्याबद्दल सीएसआर कंपनी पारले ॲग्रो प्रा.लिमिटेड, यार्दी सॉफ्टवेअर इंडिया प्रा.लिमिटेड यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. पुणे १ नागरी प्रकल्पच्या महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी सीएसआर सहभाग वाढविल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, दालमिया फांउडेशन,भागीरथी फांउडेशन, कॉरबेट फाउंडेशन, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद,आर.एस.एस.जनकल्याण समिती, होप फॉर दि चिल्ड्रेन, युनायटेड वे दिल्ली, रोटरी डिस्ट्रीक्ट,के कॉर्प फांउडेशन, जीवनंदन फाऊंडेशन आणि मुस्कान प्रतिष्ठाण, यार्दी फाउंडेशन यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


                                                              *****

आजपासून राज्यात थॉयरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचा शुभारंभ.

 आजपासून राज्यात थॉयरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचा शुभारंभ.

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या थायरॉईड ओपीडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन.

            मुंबई, दि. 30: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामार्फत थॉयरॉईड जनजागृती व उपचार अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या थायरॉईड ओपीडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन आज करण्यात आले.


            यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, आमदार राजू भोळे, जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आदी उपस्थित होते.


            वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियान सुरु केले आहेत. राज्यात 30 मार्च 2023 पासून “मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार आहे.


            मिशन थायरॉईड या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये Physician, Surgeon, Endocrinologist, Pathologist, Sonologist व Biochemist अशा विविध तज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व ब-याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.


00000

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

 श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करणार: मिलिंदा मोरागोडा.

            मुंबई, दि. 30 :आपल्या देशात भारतीय पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करीत असून भारतीय रुपयांमध्ये आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्याबाबत देखील विचार करीत असल्याची माहिती श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज येथे दिली.  


            उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी गुरुवारी (दि.30) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 


            भारतातून श्रीलंकेत गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने आपण परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी विचारविनिमय करीत असल्याची माहिती उच्चायुक्तांनी यावेळी दिली.  


            श्रीलंकेत रामायणासंबंधीत किमान 40 ठिकाणे असून पाच शिवमंदिरे देखील आहेत. त्यापैकी त्रिंकोमाली येथील शिवमंदिर हे रावणाने बांधले असल्याची लोकांची मान्यता असल्याचे राजदूतांनी सांगितले. श्रीलंकेत एक बुद्ध मंदिर देखील असून त्याचे नजीक विभीषणाची पूजा केली जाते असेही त्यांनी यावेळी सांगितले. भगवान बुद्धांनी देखील श्रीलंकेला भेट दिली होती अशी आपल्या देशातील लोकांची धारणा असल्याचे उच्चायुक्तांनी सांगितले. बैठकीला श्रीलंकेचे मुंबईतील वाणिज्यदूत वाल्सन वेतोडी हे देखील उपस्थित होते. 

मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .

 मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  .

            मुंबई, दि. 30 : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.


             काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेवून या परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री डॉ.दीपक सावंत, माजी मंत्री राज के पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित,अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासु आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले,मुंबादेवी प्राचीन मंदिर असून याप्रती सर्वांनाच श्रध्दा,आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर परिसरात अनेक भक्तगण भेट देत असतात. श्री काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन येथील श्री.महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर, तिरूपती देवस्थानांच्या धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मागणी मुंबईकरांची आहे. या परिसरात अत्यावश्यक असणा-या सोयी सुविधा लक्षात घेवून त्या ठिकाणी दर्शन रांगा, वाहन तळ आणि आवश्यक असणा-या सुविधांच्या विकासाबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल.                       

Thursday, 30 March 2023

आरोग्यदायि... तेल...👇*

 *आरोग्यदायि... तेल...👇*


... लाकडि घाण्यावर काढलेल्या तेलाला इतके महत्व का..? खाद्यतेलाला खुप मोठा इतिहास आहे, चीन, जपान इथे इ.सन पूर्व २००० वर्षापूर्वि खाद्यतेल वापरायला सुरवात झालि, भुईमूग, व सूर्यफूलाच्या बिया 

 भाजून- कुटून त्या उकळत्या पाण्यात टाकून पहील्या वहिल्या तेलाचि निर्मिती झाली.

    त्यानंतर, पाम, नारळ यापासूनहि तेल काढले जाउ लागले. पण जसजसा तेलाचा व्यापार वाढू लागला

 तसतशि केमिकल, घटक, वापरणे, व वेगवेगळ्या प्रकारच्या चरबिंचि भेसळ करून तेलाला 

    कमर्शिअल रूप देण्यास सुरुवात झाली.


## मुद्दाम मग हेल्दि आँईल, कोलेस्ट्रोल फ्रि आँईल, मधूमेहमूक्त आँईल आशि लेबले लावून कंपन्या

 सामान्य माणसाची दिशाभूल करतात. आधुनिक यंत्राव्दारे जेव्हा तेलनिर्मिती प्रक्रिया केलि जाते तेव्हा फाँस्पेरिक अँसिड, काँस्टिक सोडा, हायड्रोजन वापरतात, त्यामूळे तेल स्वच्छ, चमकदार , पारदर्शक दिसतं

 परंतु हिच रसायने आपल्याला घातक ठरू शकतात..

       आणि चिटिंग केले जाते, तेलाच्या रिफायनरी टँकरमद्ये कच्चे तेल आणले जाते, हे सर्व प्रकारच्या खाण्यायोग्य व अयोग्य अशा तेलबियांचे अशुद्ध तेल

 असते, त्यावर प्रक्रिया करून. हवे ते फ्लेवर्स मिसळून

     हवे ते तेल फक्त वेगवेगळ्या नावांची लेबले लावून हे 

 बनावटि तेल सुंदर पँकिंग मद्दे विकल्या जाते.


## यंत्राव्दारे तेल काढण्याची प्रक्रिया खुप वेगवान व 

 उष्णता निर्माण करणारि असते, त्यामुळे तेलाचा नैसर्गिक पोत, रंग, चव, बदलते, उष्णताव रसायने यांच्या एकत्रित परीणामामूळे हे तेल घातक, व अपायकारक ठरते..

           ## 

   # लाकडी घाण्यावरिल तेलाचे आरोग्यदायि फायदेः

  लाकडि घाण्यावर तेल काढतांना अगदि नगण्य उष्णता निर्माण होते त्यामूळे नैसर्गीक तत्वे जपलि जातात.

  त्यामुळे स्वच्छ, व पौष्टिक तेल प्राप्त होते. अश्या तेलाला स्वतःचा सुगंध, व चव, रंग असतो , हे तेल घट्ट असल्याने वापरायला कमिच लागते.

      लाकडि घाणा म्हणजे तेल काढतांना फक्त लाकडाचाच वापर करतात. त्यामुळे अतिशय कमी तपमानात हि प्रक्रिया होते.. त्यामुळेच या तेलाला

..." कोल्ड प्रेस आँईल"" असेहि म्हणतात..


##.. रोग प्रतिकारशक्ति वाढते, ओमेगा फँटि अँसिड व. Mugs, pufa,.. हे शरिरातील, कोलेस्ट्रोल नियंत्रित करतात. घाण्याचे तेल हे मसाज करण्यासाठि वापरतात, हे औषधि आहे, त्यामूळे, सांधेदुखि, संधिवात बरा होतो.

 मालिशमुळे रक्ताभिसरण चांगले होउन कांतिहि तेजस्वि, चमकदार, होते, ह्रुदयरोगाचा धोका बर्याच प्रमाणात कमि होउन आपलि हाडेहि मजबूत होतात.


 ## सर्वात शेवटि सामान्य माणूस विचार करतो ते घाण्याचे तेल खिशाला परवडेल का? पण खर तर

 आरोग्याचि किंमत फार मोठि आहे, असे , घातकि, केमिकल युक्त तेल खाण्यापेक्षा, नैसर्गीक, व शुद्ध अश्या तेलाला २ पैसे जास्त लागले तर काय हरकत आहे? 

    आणि तसेहि लाकडी घाण्याच्या तेलाच्या किमति 

 इतर तेलाच्या तूलनेत सामान्य जनतेला परवडेल अशाच आहेत.

         तेव्हा आपल्या उत्तम स्वास्थाकरता केवळ लाकडी घाण्याच्याच तेलाला प्राधान्य देउन, चांगले

 आरोग्यदायि आयुष्य जगा...

     


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या कार्यकक्षेत विस्तार

 रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या कार्यकक्षेत विस्तार


            मुंबई दि. 29 : रायगड-अलिबाग येथील कुटुंब न्यायालयाच्या कार्याचा विस्तार पेण-मुरूड तालुक्याच्या क्षेत्रापर्यंत करण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रातील रहिवाशांची कौंटुबिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यास सहकार्य लाभणार आहे.


            राज्य शासनाने उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून, रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक मर्यादा, पेण व मुरूड तालुक्याच्या संपूर्ण क्षेत्रापर्यंत वाढविल्या आहेत. या न्यायालयाच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादा अलिबाग नगरपालिका क्षेत्राच्या मर्यादेशी समकक्ष तसेच तालुक्याच्या संपूर्ण स्थानिक सीमांतर्गत क्षेत्राशी तसेच मुरूड तालुक्याच्या संपूर्ण स्थानिक सीमांतर्गत क्षेत्राशी समकक्ष असतील, असे विधी व न्याय विभागाने अधिसूचनेद्वारा कळविले आहे.


००००

जय श्री राम, वनवास ठिकाणे

 *When Bhagwan Shri Ram had left for 14 years of Van-vaas, in that era during his 14 years journey, this video enlightens us about all the places that Lord Shri Ram Bhagwan had visited and whom all the great souls he met on the way. An interesting video describes it all on the map of India, the great Bharat !*


Featured post

Lakshvedhi