Friday, 6 January 2023

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक

- महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

            मुंबई, दि. ६ : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. त्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासनामार्फत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


            महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मंत्री श्री. लोढा यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुशीला कोळी, संघटनेचे सहाय्यक संघटक सुधीर परमेश्वर उपस्थित होते.


            अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी संघटनेच्या वतीने सादर करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर शासनस्तरावरून कार्यवाही करण्यात येत असून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा.

- मंत्री चंद्रकांत पाटील.

            मुंबई, दि.६ : शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे या क्षेत्राचे यश आहे. बदलत्या काळानुसार जीवन सुखकर आणि जागतिक पातळीवर ओळख निर्माण होईल, अशा संशोधनावर भर देण्याचे निर्देश देतानाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने आवश्यक शैक्षणिक सुधारणा कराव्यात, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


            आज सिडनहॅम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे बळकटीकरण आणि विविध समस्यांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.


            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव भगवान जोशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            विद्यापीठाच्या बळकटीकरणासाठी प्रादेशिक केंद्र आणि उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठातील पदभरती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भविष्यातील शैक्षणिक गरजा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत डॉ चारुदत्त मायी व पोपटराव पवार यांना मानद डी. एससी. प्रदान

 राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत डॉ चारुदत्त मायी व पोपटराव पवार यांना मानद डी. एससी. प्रदान


कृषी स्नातकांनी सेंद्रिय शेती, पारंपरिक ज्ञानाचा नव्याने अभ्यास करावा


                                        - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई दि. ६-हरित क्रांती होण्यापूर्वी देशाला अमेरिकेतून आयात होणाऱ्या निकृष्ट धान्यावर विसंबून राहावे लागे. परंतु आज जगभरातील लोक अन्नधान्य उत्पादनाकरिता भारताकडे पाहत आहेत. हरित क्रांती पाठोपाठ देशात श्वेत क्रांती आली व आता नील क्रांतीच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. जगाची वाटचाल आता पुनश्च शाश्वत शेतीकडे सुरु आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आदी कडधान्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे कृषी स्नातकांनी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करावा, तसेच पारंपरिक ज्ञानाचा नव्याने अभ्यास करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.


            राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत शुक्रवारी (दि. ६) राहुरी, जि. अहमदनगर येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा छत्तीसावा दीक्षांत समारंभ संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.


            दीक्षांत समारंभाला राज्याचे कृषी मंत्री तसेच विद्यापीठाचे प्र-कुलपती अब्दुल सत्तार, अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, कुलगुरु डॉ पी जी पाटील, कुलसचिव प्रमोद लहाळे यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.


            हरित क्रांतीच्या वेळी रासायनिक खतांचा वापर व हायब्रीड बियाणे उपयुक्त समजले गेले. परंतु रासायनिक खतांमुळे मातीचे आरोग्य बिघडले, असे सांगताना आज हरयाणा, गुजरात या राज्यांमध्ये सेंद्रिय शेतीचे यशस्वी प्रयोग होत आहेत. या दृष्टीने राज्यातील विद्यापीठांनी देखील अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. द्राक्ष, कांदा, संत्री या बाबतीत राज्याची उत्पादने देशात प्रसिद्ध आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठांनी आजवर चांगले काम केले आहे. हे कार्य अधिक पुढे नेऊन कृषी विद्यापीठांनी आदर्श व अनुकरणीय विद्यापीठ व्हावे, असे राज्यपालांनी सांगितले.


            कृषी स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा गोरगरीब जनतेच्या तसेच सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोग करावा असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले, पोपटराव पवार यांनी आपल्या ग्रामविकास कार्यातून गावातील सामान्य माणसाला सक्षम केले असे त्यांनी सांगितले.


            कृषी वैज्ञानिकांनी आपले नवनवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे कारण त्यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल असे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांनी सांगितले. ऊस उत्पादन क्षेत्रात साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर व्हावा असे त्यांनी सांगितले. कृषी स्नातकांनी निसर्ग व पर्यावरणाचे विश्वस्त असल्याची भावना ठेवून जग अधिक सुंदर करावे असे आवाहन त्यांनी केले.


            पदवीदान समारंभात विविध विद्याशाखांमधील एकुण ६८३४ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्रदान करण्यात आल्या.


0000






Governor Koshyari presides over 36th


 Convocation of Mahatma Phule Krishi Vidyapeeth


Confers Honorary D.Sc. on Agri Scientist Charudatta Mayee and Popatrao Pawar


        Mumbai Dated.6- Maharashtra Governor and Chancellor of state universities Bhagat Singh Koshyari presided over the 36th Annual Convocation of the Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Dist Ahmednagar through online mode on Fri (6th Jan).


       Padma Vibhushan Dr. Anil Kakodkar, Chairman, Rajiv Gandhi Science and Technology Commission and Former Chairman, Atomic Energy Commission delivered the convocation address.


       The Governor conferred the degrees of 'Doctor of Science' (Honoris Causa) on renowned agricultural scientist and former President of Agricultural Scientist Recruitment Board Dr Charudatta Mayee and Executive President of Hiware Bazar Adarsha Gaon Sankalpa and Prakalpa Samiti Padmashri Popatrao Pawar.


       Speaking on the occasion, the Governor called upon agricultural graduates to promote Organic Farming and study the traditional methods of farming. He said successful experiments in organic farming have been made in Haryana and Gujarat in the recent past, and added that the same can be emulated elsewhere.


       He said a marked shift has come in agriculture since the days of green revolution. He said people are reverting to millet and therefore efforts should be made to promote cultivation of Jowar, Bajra, Nachni and help the farmers increase their incomes.


       Pro Chancellor of the University and Minister of Agriculture Abdul Sattar, Vice Chancellor of the University Dr P. G. Patil, Registrar Pramod Lahale, Members of the Executive and Academic Council, Members of Faculty, invitees and Graduating Students were present. Degrees, Post Graduate Degrees and Ph Ds were conferred upon 6834 students.


0000



दिलखुलास’ या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री


चंद्रकांत पाटील यांची सोमवारी मुलाखत


 


            मुंबई, दि. 6: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 9, मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.


            पुणे येथे जी 20 परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांची सुरु असलेली तयारी, जी20 परिषदेमुळे विकासाला मिळणारी गती, पुण्यातील प्रकल्प, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग विभागातील उपक्रम याविषयी मंत्री श्री. पाटील यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून विस्तृत माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000

ऍग्रो जॉब

 


विज्ञान प्रदर्शनीतील अजब-गजबविज्ञान प्रदर्शनीत पहा ‘मातीशिवाय शेती’

 विज्ञान प्रदर्शनीतील अजब-गजबविज्ञान प्रदर्शनीत पहा ‘मातीशिवाय शेती’.

       नागपूर दि. 5 : होय, आता या विज्ञान युगात मातीशिवायदेखील शेती करणे शक्य आहे. 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनीत मातीशिवाय केवळ पाण्याचा वापर करून घरच्या घरी कमीत कमी जागेत, टेरेसवर परसबाग तयार करण्याची माहिती देणारा स्टॉल इ-हॉलमध्ये लावण्यात आला आहे.


          हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे न्युट्रीयन्ट पाण्याचा वापर करून पालेभाज्या, फळभाज्या, फुले, शोभीवंत रोपे यांचे उत्पादन घेता येते. विशेष म्हणजे यात कोणताही रासायनिक खते व किटकनाशकांचा उपयोग न करता केवळ सेंद्रीय पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

आरोग्यसेवा आणि उद्योगातील नैसर्गिक उत्पादने: शाश्वत विकासातील दृष्टीकोन’


भारतीय विज्ञान काँग्रेस :

आरोग्यसेवा आणि उद्योगातील नैसर्गिक उत्पादने: शाश्वत विकासातील दृष्टीकोन’


या विषयावर परिसंवाद.

            नागपूर, दि. 5 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील 108 वी भारतीय विज्ञान काँग्रेस कार्यक्रमात ‘आरोग्यसेवा आणि उद्योगातील नैसर्गिक उत्पादने: शाश्वत विकासातील दृष्टीकोन’, या विषयावर रसायनशास्त्र विभागामध्ये चर्चा करण्यात आली.


            अध्यक्षस्थानी कुरुक्षेत्र विद्यापीठाचे प्रा. एस. पी. सिंह हे होते. तर तिरुअनंतपुरम केरळ येथील डॉ. कौस्तभ कुमार मैती, प्रा.डॉ. नीरा राघव यांनी सहभाग घेतला.


            औषध वितरण ही मानव किंवा प्राण्यांमध्ये उपचारात्मक प्रभाव प्राप्त करण्यासाठी फार्मास्युटिकल कंपाऊंडचे व्यवस्थापन करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया आहे. अस स्पष्ट मत त्यांनी या चर्चेत मांडले. रोगाने थेट प्रभावित असलेल्या शरीराच्या विशिष्ट भागात फार्मास्युटिकल उत्पादनाचे व्यवस्थापन करण्यासाठी औषध वितरण नेहमीच डॉक्टरांच्या चिंतेचा विषय आहे. जेणेकरून उपचाराचा प्रभाव जास्तीत जास्त वाढवताना दुष्परिणाम कमी होतील. काही नैसर्गिक पॉलिमरमध्ये असलेल्या रासायनिक भागांच्या मूळ गुणधर्मांचा विचार

Featured post

Lakshvedhi