Tuesday, 3 January 2023

दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री

 दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री

दीपक केसरकर यांची उद्या मुलाखत.

            मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून बुधवार दिनांक 4 जानेवारी, गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.


            मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा, दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिक वापर होण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करणे, जगभरातील मराठी बांधव एकत्र यावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने मराठी तितुका मेळवावा या उदात्त हेतूने 'विश्वमराठी संमेलन 2023' आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाविषयी मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून विस्तृत माहिती दिली आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घे

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख.

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख.

अवघ्या सहा महिन्यात 2600 रुग्णांना 19 कोटी 43 लाखांची मदत.

            मुंबई, दि. 3 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यात कक्षाकडून 2600 रुग्णांना एकूण 19 कोटी 43 लाख रुपयांची मदत दिली आहे.


            मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाखाची तर डिसेंबर महिन्यात विक्रमी 8 कोटी 52 लाख रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.


            डिसेंबर महिन्यात रुग्णांना देण्यात आलेल्या विक्रमी मदतीबाबत बोलतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे.


0000



 

ग्रामविकास- सलोखा तंटामुक्त धोरण











 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन.

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन.

ठाणे, दि. 3 (जिमाका) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


“देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी घ्यावी, हेच सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन असेल”, अशा शब्दांत मुख्यमंत्री महोदयांनी अभिवादन केले.


यावेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

000

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन.

मुंबई, दि. ३ : आद्य शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, कवियित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन (प्रशासकीय सुधारणा) विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.


0000


 

निसर्गाचा चमत्कार

 नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे गुलमोहोराचे झाड आहे त्यात एक पिंपळाचे रोपटे उगवले आहे अदभूत चमत्कार म्हणजे काल पासून त्यातून झरा वाहू लागला बुंध्या तुन पाणीच पाणी वाहू लागले आहे लोक गर्दी करू लागले आहेत 🙏🏼


आरोग्यावर खर्च करा, हो

 


जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही

 जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकासकामांना

निधी कमी पडू दिला जाणार नाही


                                           - पालकमंत्री दीपक केसरकर

            मुंबई, दि. 2 : जिल्ह्यातील लोकहिताची विकासकामे दर्जेदार व्हावीत यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाते. या योजना यशस्वीपणे विहित मुदतीत कार्यरत व्हावीत यासाठी संबंधित विभागांनी व यंत्रणा प्रमुखांनी दक्षता घ्यावी व मुंबई शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असावे, असे आवाहन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.


            पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा वार्षिक योजना 2022-23 चा आढावा घेण्यात येऊन लोकहिताच्या विविध कामांना निधी मंजूर करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


            या बैठकीत प्रामुख्याने पोलीस वसाहतीसाठी शासनाने मान्यता दिलेल्या 31.50 कोटींच्या निधीतून वाडी बंदर पोलीस वसाहतीच्या देखभाल दुरूस्तीसाठी 6.19 कोटी रुपये, शिवडी पोलीस वसाहतीसाठी 4.99 कोटी, ताडदेव पोलीस वसाहतीसाठी 2.46 कोटी, बॉडीगार्ड पोलीस वसाहतीसाठी 2.50 कोटी, भायखळा पोलीस वसाहतीसाठी 2.60 कोटी, काळाचौकी पोलीस वसाहतीसाठी 5.10 कोटी तर डोंगरी पोलीस वसाहतीसाठी 1.92 कोटी असे एकूण 25.76 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून सदरील निधी अंतर्गत तातडीने कामे सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.


शासकीय रुग्णालयांना यंत्र सामग्री व इतर सुविधा


            या योजनेअंतर्गत जे. जे. हॉस्पिटलला कॅथलॅबसाठी 5.78 कोटी रूपये, गोकुळदास तेजपाल रूग्णालयाला एमआरआय, एक्स-रे मशीन व सिटीस्कॅन मशीनसाठी 13.57 कोटी, कामा व अल्ब्लेस रूग्णालय येथे आयव्हीएफ केंद्रासाठी 4.63 कोटी, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला डेंटल व्हॅन व यंत्रसामग्री साठी 2.04 कोटी तर सेंट जॉर्ज रुग्णालयाला यंत्रसामग्री व औषधीसाठी 4.15 कोटी असे एकूण 35.95 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. म.आ. पोद्दार रुग्णालय येथील केंद्रीयकृत रोग निदान प्रयोगशाळेची स्थापना करणे तसेच रक्त तपासणी प्रयोगशाळेची स्थापना करण्यासाठी एक कोटी व बांधकामासाठी 2.82 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.


            कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमधील बॅडमिंटनकोर्ट, जिम्नॅशियम हॉल व व्यायाम शाळा, आर्ट गॅलरी, लायब्ररी, ओपन बाल्कनी, स्टोअर रूम, स्विमिंग पूल, चेंजिंग रूम या बाबी अद्ययावत तयार करण्यासाठी 3.85 कोटी रुपयांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला. 


            नागरी दलितेतर पायाभूत सुविधांसाठी ९६.११ कोटी, अंगणवाडी येथील सोयी सुविधा अंतर्गत 20 अंगणवाड्या स्मार्ट करणे व 80 अंगणवाड्यांना जादुई किलबिल खुर्ची उपलब्ध करून देण्यासाठी 2.48 कोटी, महिला व बाल सशक्तीकरण योजनेअंतर्गत उमरखाडी येथील बालसुधारगृहात नुतनीकरणासाठी 4.70 कोटी तसेच डेव्हिड ससून येथील बालसुधारगृहास 3.31 कोटी रूपये मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला.


            किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी 2.50 कोटींच्या निधीस मंजुरी देऊन 1.50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तर राज्य ग्रंथालय एशियाटिक लायब्ररीच्या नुतनीकरणासाठी 40 लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मत्स्य विकास कार्यक्रमअंतर्गत सागरी मच्छीमारांना शीतपेटीसाठी 34 लक्ष तसेच माहीम नाखवा मच्छीमार सहकारी संस्था, माहीम कोळीवाडा येथे जेट्टीचा प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी 2.31 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.


            शासकीय महाविद्यालयांचा विकास या योजनेअंतर्गत एल्फिन्स्टन महाविद्यालयासाठी 2.63 कोटी, शासकीय विज्ञान संस्थेसाठी 2.78 कोटी, न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेसाठी 44 लक्ष, सिडनहॅम व्यावसायिक उद्योग शिक्षण व संशोधन संस्थेसाठी 47 लक्ष, सिडेनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयासाठी 20 लक्ष, राज्य प्रशासकीय संस्थेसाठी 29 लक्ष तर शासकीय अध्यापक महाविद्यालयासाठी 35.00 लक्ष असे एकूण 7.14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. 


            औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये यंत्रसामग्री पुरवणे व आधुनिकीकरण करणे यासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या वर्कशॉप इमारतीसाठी 78 लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, पालकमंत्री श्रीकेसरकर यांनी दिली.


0000



 

Featured post

Lakshvedhi