Tuesday, 6 December 2022

अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती द्यावी

 अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती द्यावी

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूरला ग्रामविकास विभागाचे भव्य 'महारुद्र' केंद्र उभारणार

            मुंबई, दि. 5 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व नियोजित कामांना गती देऊन दर्जा व वेळ यांस प्राधान्य द्यावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या बैठकीत, ग्रामविकासाला गती प्राप्त करुन देणारी प्रबोधिनी नागपूरला उभारण्याचा व यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कोअर समितीची बैठक सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे झाली. या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभाग आणि इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            अमृत महोत्सवी वर्षात राज्यातील विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम व उपक्रमांचा आढावा घेत असताना "यशदा" च्या माध्यमातून पुणे जवळील ताथवडे परिसरात अद्ययावत सुसज्ज सभागृह, प्रशिक्षणासाठी छोटी सभागृहे एका वर्षात पूर्ण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली.

            चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथे एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र निर्माण करुन अमृत महोत्सवी वर्षात महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी 43 विविध कौशल्य प्रशिक्षणासाठी प्राधान्य दिले जाईल. यासाठी 55 कोटीच्या निधीस मान्यता प्रदान करण्यात आली. या विद्यापीठ परिसरात महिला क्रांतीकारकाच्या आठवणी जागृत व्हाव्या, प्रेरक माहिती, चित्रकृती त्या भागात असावी, असे निर्देश देण्यात आले.

            दिव्यांगांसाठी नुकताच स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना दिव्यांगासाठी विशेष आणि नावीन्यपूर्ण योजना आखली जावी.

            ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्र ग्रामविकास व संशोधन प्रबोधिनी ‘महारुद्र’ हे अमृत महोत्सव वर्षानिमित्त उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही प्रबोधिनी नागपूर येथे उभारली जाईल. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थावर काम करणाऱ्या सदस्य, कर्मचारी यांच्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन या संस्थेतून होईल. येत्या काही दिवसात या विषयासाठी स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित राहतील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

            भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात येत्या काळात विविध विभागामार्फत सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे. या उपक्रमांबाबत बैठकीत सादरीकरण करण्यात आले. हा उपक्रम राबविण्यासाठी येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या करण्यात येतील.

            यावेळी सामान्य प्रशासन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शालेय शिक्षण, पर्यटन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, नियोजन, सामाजिक न्याय विभागाने सादरीकरण केले.

'एक भारत, श्रेष्ठ भारत' संकल्पनेनुसार राज्यात बंगाली, तेलगू अकादमीचा समावेश करणार.


            सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यापूर्वी हिंदी, गुजराती आणि सिंधी अकादमी स्थापन करण्यात आल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात बंगाली आणि तेलगू अकादमी लवकरच स्थापन करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.


            श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आज महाराष्ट्रात मराठीसह विविध भाषा बोलल्या जातात. मराठी बरोबर हिंदी, गुजराती, सिंधी, तेलगू आणि बंगाली लोक येथे राहतात. एक भारत , श्रेष्ठ भारत या संकल्पनेनुसार येणाऱ्या काळात तेलगू आणि बंगाली अकादमी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्थापन करण्यात येईल.

००००




 



 





गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा

 गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना, अतिरिक्त लसीकरणही करणार.

            पुणे, दि. 5 : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्‍यात यावा, असेही त्यांनी सांगितले.


            पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.


            बैठकीत डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितलं की, गोवरचा उद्रेक थांबविण्यासाठी सर्वप्रथम ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरविण्यात येण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यासाठी लागणारी यंत्रणा, लसीच्या मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय उद्रेक झालेल्या भागात अतिरिक्त डोस देखील नऊ महिने ते पाच वर्षांच्या बालकांना देण्यात यावे असे सांगितले.


            या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य तसेच आय एम एचे सदस्य उपस्थित होते. अडीच तास चाललेल्या या बैठकीत दहा कलमी कार्यक्रमाबाबत चर्चा होऊन यात नियंत्रणासाठी पुढील दहा कलमी कृती योजना निश्चित करण्यात आल्या आहेत.


            तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सदस्यांनी लसीकरण तसेच विलगीकरण यावर भर देत कुपोषित बालकांकडे अधिक लक्ष देण्यासंदर्भात मत व्यक्त केले. काही खाजगी डॉक्टर्स यांनी जनजागृतीवर भर देऊन लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविताना ती ठराविक काळापुरती घ्यावी. याबाबत व्यापक जनजागृती करावी, अशाही सूचना यावेळी मांडण्यात आल्या.


               या बैठकीतील आलेल्या सूचना आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.सावंत यांच्याशी पुन्हा सविस्तर चर्चा करून अतिरिक्त डोस, मनुष्यबळ आणि जनजागृती तसेच धर्मगुरू, लोकप्रतिनिधींचा सहभाग यावर बैठक घेवून पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले.


            बैठकीत आयएमए, बालरोग तज्ज्ञ, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासह आरोग्‍य विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.


दहा कलमी कार्यक्रम


o ताप–पुरळ रुग्णाचे गतीमान सर्वेक्षण


o राज्यातील गोवर हॉट स्पॉटचा शोध - उद्रेक स्थळे, लसीकरण कमी असणारे भाग, लोकसंख्येची दाटीवाटी असणारे, वंचित समाज समूह राहत असणारे आणि कुपोषण अधिक असणारे भाग या क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार आहे.


o विभागीय स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके आणि स्थानिक सूक्ष्म कृती आराखडा


o ९ महिने ते ५ वर्षेवयोगटातील बालकांसाठी विशेष लसीकरण अभियान आणि उद्रेक प्रतिसाद लसीकरण


o कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष – प्रत्येक कुपोषित बालकाला प्राधान्याने उपचारात्मक पोषण, जीवनसत्व अ आणि गोवर लसीकरण


o आंतर विभागीय समन्वय – नगरविकास, महिला आणि


 बालविकास, अल्पसंख्याक कल्याण विभाग यांचेशी समन्वय.


o राज्यातील सर्वांसाठी गोवर उपचार मार्गदर्शन सूचना


o गोवर प्रयोगशाळा जाळ्यांचे अधिक विस्तारीकरण


o गोवर रुग्ण आणि मृत्यूचे सखोल साथरोग शास्त्रीय विशेष सर्वेक्षण आणि त्यानुसार कृती योजना, दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आवश्यक संशोधन आणि सर्वांगीण शहरी आरोग्य यंत्रणेसाठी योजना


o सामाजिक प्रबोधन, लोकसहभाग आणी आरोग्य शिक्षण


****


जिवन ऐसे







 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपट, व्याख्यान आणि चित्रपटाचे आयोजन

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपट, व्याख्यान आणि चित्रपटाचे आयोजन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार.

            मुंबई, दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह व्याख्यान आणि चित्रपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व समाजमाध्यमांवरून करण्यात येणार आहे.


            ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी ३ वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण सायं. ६ वाजता करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायं. ७.३० वा. ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमामधून ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान प्रसारित होईल. माहितीपट, व्याख्यान व चित्रपटाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.


ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपटाचे स. ११ वा. प्रसारण होणार.


            ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १७ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.


            या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. तर, जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते.


बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे दु. ३ वा. प्रसारण होणार

..

            भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ची निर्मिती असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी ३ वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन.एस. थापा यांनी १९८१ मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे सायं. ६ वा. प्रसारण होणार.

            ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण सायं. ६ वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर या समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.


            स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा.


            या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, 

गोष्ट एका पैठणीची’ हृदयापर्यंत पोहोचणारा चित्रपट

 गोष्ट एका पैठणीची’ हृदयापर्यंत पोहोचणारा चित्रपट


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. 5 : साध्या सरळ गोष्टीतून मनाचे सुख नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपले सुख, हास्य कसे मिळवता येईल हाच या सिनेमाचा गाभा असल्याने हा चित्रपट आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यावतीने मंत्रालयातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन सोमवारी संध्याकाळी नरीमन पॉईंट आयनॉक्स सिनेमागृहात करण्यात आले होते. यावेळी या चित्रपटात मुख्य भूमिका करणारी सायली संजीव, अभिनेता सुब्रत जोशी, दिग्दर्शक शंतनु रोडे, अभिनेता पुष्कर श्रोत्री, प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, सुनील बोधनकर आदी उपस्थित होते.


००००




Monday, 5 December 2022

वस्त्रोद्योग धोरणातून

 वस्त्रोद्योग धोरणातून १० लाख रोजगार निर्मिती ;३६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

       मुंबई, दि. ५ : “वस्त्रोद्योगामध्ये भारताने पूर्वीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी उपलब्ध आहे. राज्याच्या प्रस्तावित नवीन वस्त्रोद्योग धोरणात १० लाख रोजगार निर्मिती आणि ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

          टेक्नोटेक्स-२०२३ कर्टन रेझर सेरेमनीचे हॉटेल ट्रायडंट मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्‌घाटन उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रुप राशी, केंद्रीय सहसचिव राजीव सक्सेना, फिक्कीचे चेअरमन मोहन कावरीय, एसआरटीईपीसीचे चेअरमन धीरज शहा, वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


          मंत्री श्री. पाटील म्हणाले की, देशातील वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा महत्वाचा वाटा आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने वीज सवलत दिली आहे. वस्त्रोद्योगासाठी लागणारा कापूस सुरुवातीला कमी दरात उपलब्ध होतो. परंतु नंतरच्या काळात कापसाचे भाव खूप वाढलेले असतात. वस्त्रोद्योगासाठी नियमित योग्य दरात कापूस उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यशासन मोठ्या प्रमाणात कापसाची थेट खरेदी करुन खरेदी केलेल्या भावामध्ये वस्त्रोद्योगासाठी कापूस पुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. वस्त्रोद्योगातील संधी आणि त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. जागतिक पातळीचे वस्त्रोद्योग महाराष्ट्रात प्रदर्शन भरविण्यासाठी सेंटर उभारण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


          केंद्र शासनाच्या पीएम मित्र योजनेंतर्गत राज्य शासनाने अमरावती येथील ब्राऊनफिल्ड पार्क आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड पार्क असे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत, असे सांगून केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन (NTTM) अंतर्गत मुंबईत दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाने तांत्रिक वस्त्रोद्योग परिषद-टेक्नोटेक्स-2023 या परिषदेला राज्यशासन सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


वस्त्रोद्योग आत्मनिर्भर भारताच्या उभारणीतील महत्वाचे क्षेत्र


- केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश


            “भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राचा महत्वाचा वाटा आहे. भारतीय वस्त्रोद्योग बाजारपेठेत तांत्रिक वस्त्रोद्योगाचा वाटा जवळपास 13 टक्के असून जागतिक पातळीवरील तांत्रिक वस्त्रोद्योगाची वाढती मागणी लक्षात घेता वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम मित्र या योजनेमुळे या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळत आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांनी केले.


          “तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. जागतिक स्तरावर तांत्रिक वस्त्रोद्योग ही एक मोठी बाजारपेठ आहे. ती अधिक मजबूत करण्यासाठी देशांतर्गत वापर आणि निर्यात या दोन्ही घटकांवर अधिक भर देणे आवश्यक आहे, असे सांगून वस्त्रोद्योगासाठी महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा आणि पोषक वातावरण असल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहीलेले राज्य आहे”, असेही केंदीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी यावेळी नमूद केले.


          यावेळी टेक्नोटेक्स-2023 महितीपुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.


0000



विश्व मृदा दीन

 


Featured post

Lakshvedhi