Sunday, 4 December 2022

भवतालनदीपात्रात दडलेली ७०,००० वर्षांपूर्वीची कहाणी !


 

भवताल नदीपात्रात दडलेली ७०,००० वर्षांपूर्वीची कहाणी !

 नदीपात्रात दडलेली ७०,००० वर्षांपूर्वीची कहाणी !


प्रत्येक नदी आपल्या पात्रात कोणता ना कोणता इतिहास घेऊन वाहत असते. ती ज्या भागातून वाहते त्या भागाचा, भूमीचा तो इतिहास असतो. पण अशीही एक नदी आहे, जी आपल्या पात्रात दूरवरच्या देशातील भूवैज्ञानिक घटनेचा इतिहास बाळगून आहे. नदी अगदीच छोटीशी आहे, वर्षाचा बराचसा काळ ती कोरडीच असते.

कऱ्हा हे त्या नदीचे नाव. आणि ठिकाण आहे बारामतीजवळील मोरगाव. तिथे नदीपात्रात व्यवस्थित शोध घेतला तर कदाचित अर्ध्या फुटाच्या जाडीचा थर सापडेल. तो आहे राखेचा. साध्यासुध्या नव्हे, तर ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेचा. या राखेची गोष्ट भलतीच रंजक आहे. ही राख तिथं कुठून आली, कशी आली ही कहाणी तर त्याहून रोमांचक आहे. कारण ही गोष्ट आहे तब्बल ७० हजार वर्षांपूर्वीची!

ही कहाणी आणि इथल्या मातीत दडलेल्या इतर भन्नाट गोष्टी समजून घेण्यासाठी ‘भवताल’ प्रस्तुत,


वंडर्स ऑफ जिऑलॉजी !

- अनोखा महाराष्ट्र एक्सप्लोर करणारी फिल्ड टूर


माहिती व नावनोंदणीसाठी:

https://bhavatal.com/EcoTours/Geology


संपर्कासाठी :

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


विशेष आकर्षण:

• ६.५० कोटी वर्षे जुना खडक, त्यातील पुराव्यांची ओळख

• लाव्हारसामुळे तयार झालेल्या नैसर्गिक बोगद्यात प्रवेश

• सत्तर हजार वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या राखेचा शोध

• आशियातील सर्वांत मोठ्या रांजणखळग्यांचा अनुभव

• इतिहास घडवणाऱ्या दगडी भिंतीची (डाईक) ओळख

• प्राचीन हवामानबदलाची कहाणी सांगणाऱ्या दगडाचा शोध

• ठिबकणाऱ्या पाण्याने घडवलेल्या लवणस्तंभांची गोष्ट

• नदीकाठी आदिमानवाच्या दगडी हत्यारांच्या खाणाखुणा

• प्राचीन हिमयुगाच्या नदीपात्रातील पुराव्यांची हाताळणी

• आणि खडकात दडलेल्या बऱ्याच रहस्यमय गोष्टी...

(महाराष्ट्र एक्सप्लोर करणारा ‘भवताल’चा उपक्रम...)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाण­­’’




 मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाण­­’’ अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

माझे ठाणे ही भावना लक्षात ठेवून

स्वच्छसुंदर ठाण्यासाठी सर्वांनी काम करावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            ठाणे दि.03 (जिमाका) :  ठाण्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकाराण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी माझे ठाणे ही भावना मनात ठेवून ठाण्याच्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जाचे काम करावेअशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

            ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.  यावेळी आमदार प्रताप सरनाईकमाजी आमदार रविंद्र फाटकमाजी महापौर नरेश म्हस्केमाजी महापौर मिनाक्षी शिंदेठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आदि मान्यवर उपस्थित होते. 

बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच ठाणे महानगरपालिकेचा विशेष उपक्रम मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा व आनंदाचा दिवस आहे. विकासाचा शुभारंभ हा मुख्यमंत्री म्हणून आनंदाचा दिवस आहे. मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची व राज्याची सेवा करण्याची संधी ठाणेकरांनीच दिली आहे.  ठाणेकरांनी ठाण्याच्या विकासात पुढे येऊन योगदान देणे आवश्यक आहे.  ठाणेकर सुज्ञ आहेत. या ठाण्यावर बाळासाहेबांनी विशेष प्रेम केले आहे. बाळासाहेबांच्या काळातील दादोजी कोंडदेव स्टेडियम कात टाकतेय. या स्टेडियमच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.  वाड्यापाड्याचे टुमदार जुने ठाणे विकसित होत आहे. ठाण्यात भविष्याच्या दृष्टीने नवनवीन बदल होत आहेत. यामुळे ठाणेकरांना आधुनिक सेवासुविधा मिळत आहेत.  ठाण्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी  नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

            मुंबईच्या जडणघडणीतसुद्धा ठाण्याचे वेगळे योगदान आहे. कोवीड काळात ठाण्यातील डॉक्टरनर्स हे मुंबईत सेवा देत होते. राज्याचेदेशाचे वैभव असलेल्या मुंबईला साथ देणारे ठाणे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावेयासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. हे शहर स्वच्छसुंदरनिरोगीहिरवेगार असले पाहिजे. हे शहर आणखी हिरेवगार करण्यासाठी काय केले पाहिजे यावर विचार व्हावा.  सार्वजनिक जागामंडईमच्छी मार्केट,  बागा हे कायमस्वरुपी स्वच्छ करुन त्यांचे सुशोभीकरण करावे. हे काम  युद्ध पातळीवर करायचे आहे. शहरातील रस्तेउड्डाणपूल हे यांत्रिकीकरणाद्वारे स्वच्छ झाले पाहिजे. शहराचे प्रवेशव्दारभितीचित्रेरस्ते दूभाजकांची रंगरंगोटीचे काम सुरु आहे. चांगल्या रस्त्यांवर लेन मार्किंगउड्डाणपूलाचे सौंदर्यीकरण व्हायला हवे. लोकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. यावर महापालिका काम करत आहे. पुढील चार महिन्यात शंभर टक्के रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. एकूण 142 किमीचे रस्त्यांचा काम सहा महिन्यात करावे.  सेवा रस्ते वापरात आणून मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईलअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

         ठाणे शहराच्या स्वच्छते सोबतही स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपुलकीची भावना व्यक्ती केली. ते म्हणाले कीशहराच्या स्वच्छतेतील महत्त्वाचे योगदान असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या  समस्या सोडविण्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी महापालिकेमार्फत करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. 

जनतेचा निधी जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधापुरवण्यासाठी वापरण्यात यावा.  ठाणे शहराच्या विकासासाठी 605 कोटींचा निधी दिला आहे. राज्य सरकार व महापालिका निधी देईल. मात्र अधिकाऱ्यांनी दर्जात्मक कामे करावे. यामध्ये कुठलेही कसूर करू नये विकास कामांना गती देण्याची क्षमता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे.  अधिकाऱ्यांनी त्या क्षमतेचा वापर करुन विकास कामांना गती द्यावीअशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केली.  

नव नियुक्त आयुक्तांचे विशेष कौतुक

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या कामाबद्दल विशेष कौतुक केले.  श्री. शिंदे म्हणाले की आयुक्त बांगर यांचे नवी मुंबईतील काम प्रशंसनीय आहे. ज्याप्रमाणे त्यांनी नवी मुंबई शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर ही ओळख निर्माण करुन दिली.  हीच अपेक्षा ठाण्याबद्दल आहे.  बांगर यांच्या कार्यकाळात ठाणे शहराचाही कायापालट होईल आणि एक स्वच्छ व सुंदर ठाणे पहायला मिळेल. 

            यावेळी श्री बांगर यांनी मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान आणि महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पना व ध्येयानुसार विकास कामे सुरू आहेत. ठाणे सुंदर व स्वच्छ दिसावेवाहतूक

Saturday, 3 December 2022

ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन व वापरास परवानगी

 विघटनशील पदार्थांपासून बनविण्यात येणाऱ्या एकल वापरस्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन व वापरास परवानगी

- सचिव प्रविण दराडे

            मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


       शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणेबाबत माहिती देण्यासाठी मंत्रालय वार्ताहर संघात पर्यावरण विभागाचे संचालक अभय पिंपरकर, उपसचिव, चंद्रकांत विभुते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नंदकुमार गुरव यावेळी उपस्थित होते.


        सचिव श्री. दराडे म्हणाले की, प्लास्टिक आणि थर्माकोल उत्पादन बंदीबाबत पर्यावरण विभागाच्या शक्तीप्रदत्त समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, कामगार मंत्री सुरेश खाडे, पर्यावरण विभागाचे सचिव प्रविण दराडे आणि शक्तीपदत्त समितीचे सदस्य उपस्थित होते.


            या बैठकीत विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थांपासून बनविलेल्या एकल वस्तूंना वापराची अनुमती देण्यात आलेली आहे. मात्र, सदरहू वस्तु कंपोस्टेबल पदार्थांपासून बनविलेल्या असल्याबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहणार आहे. राज्यातील उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळावी आणि प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध असल्यामुळे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामध्ये सुसंगती राहण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असेही श्री. दराडे म्हणाले.


         सचिव श्री. दराडे म्हणाले की, या संदर्भातील तज्ज्ञांच्या समितीने बैठक घेवून अभ्यास करून बदला बाबत शक्तीप्रदत्त समितीला शिफारस केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अधिसुचनेमध्ये सुधारणा करण्याकरिता उद्योग-व्यावसायिक, उद्योजक संघटना व काही नागरिकांमार्फत शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती. विघटनशील पदार्थापासून तयार करण्यात येणाऱ्या एकल वापर वस्तूंच्या उत्पादनासाठी अनुमती देण्याची मागणी करतानाच पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या जाडीचा उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असेल अशा ठिकाणी प्लास्टिक पॅकेजिंग जाडीची मर्यादा शिथिल करण्याची मागणी केली होती. नॉन-ओवेन पॉलीप्रॉपीलीन बॅग्स 60 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) पेक्षा जास्त जाडीच्या उत्पादनाला परवानगीचीही निवेदनांद्वारे मागणी करण्यात आली होती. या मागणीचा शासनाने विचार करुन महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये केंद्र शासनाच्या अधिसुचनेशी सुसंगत सुधारणा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


          या नव्या निर्णयामुळे पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीकच्या जाडीचा उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असेल अशा ठिकाणी वगळून इतर ठिकाणी पॅकेजिंगकरिता वापरण्यात येणारे प्लास्टीक पॅकेजिंग (आवरण) 50 मायक्रॉनपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील व नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलिन बॅग्ज) 60 ग्रॅम प्रति चौरस मीटर (जीएसएम) पेक्षा जास्त जाडीला अनुमती देण्यात आल्याची अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयामुळे राज्यामध्ये उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे असेही श्री.दराडे

सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे राज्याचा बहुआयामी संदर्भमूल्य कोष शक्य

 सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे राज्याचा बहुआयामी संदर्भमूल्य कोष शक्य

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई दि 2:- सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे विविध क्षेत्रांत उपयोगिता वाढविताना राज्याचा स्वत:चा असा एक बहुआयामी आणि बहुउपयोगी दर्जेदार संदर्भमूल्य असलेला कोष तयार करता येऊ शकतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            सॅटेलाईट तंत्रज्ञानाव्दारे विविध क्षेत्रातील संनियंत्रणाच्या उपयोगितेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.


            यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, बंदरे व परिवहन विभाग व माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मायक्रोनेट सोल्युशनचे धीरज मेहरा, एअरबसचे श्री व्ह्यूग उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विविध विभागांच्या विविध क्षेत्रातील योजना राबविताना सॅटेलाईट तंत्रज्ञानाव्दारे संनियंत्रणाची संकल्पना अतिशय उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने एखाद्या प्रणालीतील मानवी हस्तक्षेप अत्यंत कमीत कमी ठेवणे सोपे होऊ शकते व यामुळे संबंधित योजनेचा लाभ पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचवणेही सोपे होऊ शकते असे श्री फडणवीस यांनी सांगितले.


            आर्टिफिशियल इंटेलिजन्स पद्धतींच्या वापराव्दारे अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे याबाबतही संबंधित विभाग व यंत्रणांना पूर्वसूचना मिळू शकते. पूर व्यवस्थापन तसेच रस्ते व्यवस्थापन यासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरु शकते, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            सॅटेलाईटव्दारे विविध क्षेत्रातील संनियंत्रण याबाबत एअरबसच्या कामांसंदर्भात श्री व्ह्यूग यांनी सादरीकरण केले. एअरबसचे स्वतंत्र सॅटेलाईट असून संरक्षण, मेरीटाईम, ऑईल आणि गॅस, शेती, विमानचालन (एव्हिएशन) अशा विविध क्षेत्रात यासंदर्भात मोठा वाव असल्याचे त्यांनी सांगितले.


            मायक्रोनेट सोल्युशनचे धीरज मेहरा यांनी सॅटेलाईट ईमेजबाबत सादरीकरण केले. श्री मेहरा म्हणाले, सॅटेलाईट तंत्रज्ञानाव्दारे विविध क्षेत्रात वस्तूनिष्ठ संनियंत्रण करणे सोपे होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही यामध्ये वापर करण्यात येतो. रिमोट एरियावर लक्ष ठेवणे सोपे होते. थ्रीडी मॅपिंग करण्यात येते. स्मार्ट सिटीसाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. पूर नियंत्रणाच्या कामांतही या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. ड्रोन व्हिडिओग्राफीचाही यामध्ये वापर करण्यात येतो. 'रोड अॅसेट' व्यवस्थापन करण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. याद्वारे सुरक्षित रस्ते वाहतुकीचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असेही त्यांनी सांगितले.


0000

गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना.

 गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना.

            मुंबई, दि. 2: राज्यातील गड व किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आणि विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे.


            राज्यस्तरीय समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्ष तर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव, संजय केळकर, पांडुरंग बलकवडे, प्र.के. घाणेकर, ऋषिकेश यादव, डॉ. पुष्कर सोहोनी, डॉ. सचिन जोशी, अतुल गुरु, गिरीश टकले, संकेत कुलकर्णी, मुकुंद गोरक्षकर या समितीत सदस्य असतील. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील.


            विभागीय समितीमध्ये कोकण विभागासाठी डॉ. जी.एस. महाडिक, मृदुला माने, प्रवीण कदम, प्रवीण भोसले सदस्य असतील. पुणे विभागासाठी उमेश झिरपे, पंडित अतिवाडकर, संतोष हसुरकर, श्रमिक गोजमगुंडे, भगवान चिले हे सदस्य असतील. नागपूर विभागासाठी बंडु धोत्रे, राहुल नलावडे, अशोक सिंघ ठाकूर, अशोक टेमझरे हे सदस्य असतील. नाशिक विभागासाठी महेश तेंडुलकर, प्रशांत परदेशी, अंकुर काळे, राजेंद्र टिपरे हे सदस्य असतील. औरंगाबाद व नांदेड विभागासाठी राजेश नेलगे, डॉ. प्रमोद बोराडे, सतिश अक्कलकोट, तेजस्विनी जगदिश आफळे, शैलेश वरखडे हे सदस्य असतील.


0000

रोजगार उपलब्ध

 विविध कंपन्यांमधील 8 हजार 448 रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न

300 मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

            मुंबई, दि. 3 : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन 8 हजार 448 रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या.


            राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सकाळी मेळाव्याचे उद्घाटन झाले. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकरी देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

            याप्रसंगी कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, कौशल्य विकास उपायुक्त डी. डी. पवार, उपायुक्त शालिक पवार, माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्यासह विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. 

            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम राबवीत आहे. नुकतेच १ लाख २५ हजार रोजगार देण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर विभागाने सामंजस्य करार केले आहेत. रोजगार मेळावा उपक्रमालाही चालना देण्यात येत असून येत्या काळात राज्यभरात असे ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे. उद्योग आणि बेरोजगार उमेदवारांमध्ये समन्वय साधण्यासाठी येत्या दोन महिन्यात मोबाईलवर महास्वयम ॲप उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी घोषित केले. 

            कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. म्हणाले की, रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत 60 हजार रुपयांची खर्च मर्यादा होती, ती आता शासनाने ५ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. यामुळे रोजगार मेळावे प्रभावी पद्धतीने आयोजित करणे शक्य होत आहे. रोजगार मेळाव्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांची माहिती, उमेदवारांचे कौन्सिलिंग असे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. 

मेळाव्यात विविध कंपन्यांचा सहभाग

       टीएनएस एंटरप्राइजेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्विसेस, बझवर्क्स बिजनेस सर्विसेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस, युवाशक्ती स्किल इंडिया, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्पॉटलाईट, इनोवेशन कम्स जॉईन्टली, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, शार्प एचआरडी सर्विस, मॅट्रिक्स कॅड अकॅडमी, युनिकॉर्न इन्फोटेक, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस, करिअर एन्ट्री, टीम हायर, क्रिस्टल सोल्युशन्स लिमिटेड, पियानो प्रेसिडेल या कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 


            याबरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याकरिता मेळाव्यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.

            राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचेही स्टॉल मेळाव्यामध्ये होते. त्यांच्या मार्फत कौशल्य विकास आणि रोजगारविषयक विविध योजनांची माहिती देण्यात आली.

वॉर्ड बॉयपासून सायंटिस्ट पदापर्यंतच्या रिक्त जागांसाठी मुलाखती

            दहावी-बारावी पास-नापास उमेदवार, पदविकाधारक, पदवीधारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी, मॅनेजमेंट, आयटी, विज्ञान पदवीधारक, मीडिया आणि एंटरटेनमेंटअशा विविध क्षेत्रातील नोकऱ्या या मेळाव्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. बँक जॉब, एचआर एडमिन, आयटी जॉब्स, बीपीओ, बँक ऑफिसर, सेल्स ऑफिसर, पायथॉन डेव्हलपर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्विस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट, हाउसकीपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सायंटिस्ट, सीनियर सायंटिस्ट, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध पदांसाठी या कंपन्यांनी मुलाखती घेतल्या.


 

Featured post

Lakshvedhi