Tuesday, 1 November 2022

भारत एकसंघ

 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत एकसंघ

- जिल्हाधिकारी निधी चौधरी

 

            मुंबई उपनगरदि. ३१ : "सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंघ भारताचे स्वप्न बघितले होते आणि त्यांच्या कार्यामुळेच ते स्वप्न सत्यात उतरले. त्याचबरोबर भारतात प्रशासकीय सेवा सुरू करण्याचे श्रेय देखील सरदार वल्लभभाई पटेल यांनाच जाते. त्यांचे हे कार्य देश नेहमीच लक्षात ठेवेल आणि त्यांच्या कार्यामुळे युवा पिढीला सातत्याने प्रेरणा मिळेल"असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज व्यक्त केला.

            नेहरू युवा केंद्राच्या मुंबई शाखेद्वारे आयोजित 'एकता दौडकार्यक्रमात उपस्थितांना  मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मुंबईच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडेयमुंबई विद्यापीठाचे कुलसचिव आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर सुधीर पुराणिकनेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर कार्तिकीयनमुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या प्राध्यापिका वासंती कांदीवरनराष्ट्रीय सेवा योजनेचे डॉक्टर प्रकाश कुमार वनन्जेनेहरू युवा केंद्राच्या मुंबई शाखेचे उपसंचालक श्री.यशवंत मानखेडकर आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती चौधरी यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांनी 'एकता शपथघेऊन दौडीला प्रारंभ केला.

            लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालय यांच्या अखत्यारितील नेहरू युवा केंद्राद्वारे देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये 'रन फॉर युनिटीअर्थात 'एकता दौडकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

०००

जात नाही जात....

 *थोरात म्हणजे मराठा का?* 🤔


मित्राच्या गावच्या जत्रे साठी त्याच्या बरोबर त्याच्या गावाकडे गेलो होतो. जत्रा झाल्यावर दोन दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघांनी त्याच्या शेतावर चक्कर टाकली. 

साठी पार केलेला म्हातारा पलीकडच्या ऊसाच्या बांदावर ऊन खात थांबलेला. मित्राकडे पाव्हणे कोण कुठले चौकशी झाली.  पत्रकार होतो, पुस्तकं लिहितो वगैरे सांगितल्यावर त्याला माझ्या बद्दल आदर वाटला असावा. मला साहेब म्हणू लागला. कोरोना, भाजीपाला, महागाई, गुऱ्हाळाच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लांबवर पाहत त्यानं प्रश्न विचारलाच..... 

जातीचा प्रश्न म्हणजे आपला जिव्हाळ्याचा प्रश्न.... 


*" थोरात म्हंजे म्हाराठाच न्हव ?"* म्हाताऱ्याने विचारले.


तसा मी हसत हसत  म्हणालो, *‘नाय मराठा नाय आमी'*


 तशा त्याच्या पांढऱ्या भुवया आकड्यात फिरल्या... म्हणाला, 


*‘मग काय खालचेहेत का तुमी ?'* 


गालातल्या गालात हसत म्हणालो, 

*‘हा, खालचे म्हणजे वडिल मांगाचे अन् आई मराठ्याची.'*


 तशी त्यानी टोपी नीट केली. अन् विचार करत म्हणाला,


 *‘म्हंजी तुमी मांगाचेच झाले की. पण, दिसायला तर भामणासारखे दिसता.'* 


मी मान डुलवत म्हणालो, 


*‘हा... माझी आज्जी भामणाची होती.'* 


तसा तो म्हातारा दोन सेकंदासाठी फ्रीज झाला. त्यानं तोंडात बोट घालत तंबाखुची गुळी बाहेर काढून फेकली. अन् म्हणाला, 


*‘आज्जी बामणाची, बाप मांगाचा अन् आई मराठ्याची ? असं कसं ?'* 


तसं मी म्हणालो,


 *'आजोबांनी पळवून नेऊन आज्जीशी लग्न केलं होतं'*.


 तशी डोक्यावरची सरकलेली टोपी नीट करत तो म्हणाला,


 *'मग आजोबा मांग होते का मराठा ?"*


 मी म्हणालो,


 *"नाय नाय आजोबा तर रामोशी होते. दरोडे टाकायचे."* 


तसा वैतागत तो म्हणाला,


 *"आरं बाबा, तुझे आजोबा जर रामोशी होते तर तुझे वडील मांग कशे झाले ?"* 


मी म्हणालो, 

*"अहो आजोबा म्हणजे आईचे वडील रामोशी होते. माझ्या वडलांचे वडील तर लव्हार होते."* 


तसा त्याचा पारा सटकला. वैतागत म्हणाला, 


*"आरं गयबाण्या तुझा आजोबा लव्हार होता तर तुझा बाप मांगाचा कसा झाला ?"*


 हसू लपवत म्हणालो, 


*"अहो म्हणजे आजोबानी दोन लग्न केलती. त्यांची एक बायको माळयाची अन् दुसरी बायको मांगाची होती. माझे वडील मांगाच्या बाईच्या पोटी जन्माला आलते ना."* 


तसा डोकं खाजवत तो म्हणाला,


 *"आय घातली, कसला गुतूडा करुन ठेवलाय रं ? पण मला एक सांग, तुझ्या आईची आई बामण अन् तिचा बाप रामोशी होता तर तुझी आई मराठ्याची कशी झाली ?"*


मी म्हणालो, 


*"माझ्या आज्जीला लेकरु होत नव्हतं म्हणून आईला मराठ्याच्या घरातून दत्तक घेतलं होतं."*


म्हाताऱ्याने कसं कोण जाणे शांतपणे ऐकलं अन् म्हणाला,


 *"का ? त्या मराठ्यांनी दत्तक कसकाय दिलं पोरीला ?"*


 तसं मी दीर्घ उसासा घेत म्हणालो,


 *"आवं माझ्या आईची खरी आई धनगराची होती."*


तसं ते म्हातारं रागानं पाहत खेकसलं,


 *"अय निघ हितून भाडकाव. डोक्याची पार आयमाय करुन टाकली यड्या भोकनीच्यानी. कशाचा कशाला मेळ लागाना.  कुणाच्या घरात कोण गेलंय अन् कोण कोणाचा बायला अन् कोण कोणाची बायली कायबी समजना."* 


🙏🙏 हसलात, की रडलात, का हसून,हसून रडलात.🙏🙏


*संकल्पना नाही संकल्प करा.  जाती विरहीत  समाज निर्मिती हीच काळाची गरज!* 

* जातीपाती विसरून जाऊ...समाज म्हणून एक होऊ !!


*आज देशाला कॅशलेस पेक्षा कास्टलेस इंडिया ची गरज आहे*

🙏🙏🙏🙏ही पोस्ट नांदेड येथील बाबू गंजेवार यांनी लिहिली आहे

Goodness



महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच

 महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 31 : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. उलट राज्यात नवीन सरकार आल्यानंतर 25 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. राज्यात उद्योगवाढीसाठी, रोजगारनिर्मितीसाठी नवे सरकार पूर्ण प्रयत्न करत असून राज्याला उद्योगात क्रमांक 1 चे राज्य बनवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, उद्योग राज्यात येण्यासाठी कसे वातावरण हवे हे संपूर्ण देशाला माहिती आहे. एअरबससंदर्भात आपण कंपनीशी संपर्क केला. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाठपुरावा केला.

            प्रत्येक प्रकल्पनिहाय तारखा आणि त्या-त्यावेळी प्रकाशित विविध वृत्तही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुराव्यानिशी सादर केले. फॉक्सकॉनसंदर्भात ते म्हणाले की, 7 जानेवारी 2020 रोजीच तत्कालीन उद्योगमंत्री यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही, हे स्पष्ट केले होते. डिसेंबर 2021 मध्येच एअरबससाठी गुजरातची जागा निश्चित झाली होती. मार्च 2022 मध्ये टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्स लि.ने (टीएसीएल) गुजरात अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग (जीएएआर) यांच्याकडे एक पत्र दिले आणि त्यात गुजरातमधील 4 जागा निश्चित करण्यात आल्याचे सांगितले, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            सॅफ्रनच्या बाबतीत तर ‘फेक नॅरेटिव्ह’चा कहरच झाला. फ्रान्सच्या भारतातील राजदूतांनी सॅफ्रनच्या हैदराबाद फॅक्टरीतील त्यांचे छायाचित्र 2 मार्च 2021 रोजी ट्विट केले आहे. 7 जुलै 2022 रोजी हा प्रकल्प सुरू झाल्याचे छायाचित्रासह वृत्त अनेक ठिकाणी प्रकाशित झाले आहे. काल-परवा हा प्रकल्प गेल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


००००



My City खो पोली


 

मुंबईकरांना अत्यावश्यक सोयी सुविधा

 मुंबईकरांना अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार

- पालकमंत्री दीपक केसरकर

            मुंबईदि. ३१ :- राज्य शासनजिल्हा वार्षिक योजना तसेच महानगरपालिका अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तथापिआवश्यकतेनुसार नाविण्यपूर्ण योजनेतून शहरातील विविध भागांमध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातीलअसे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. 

            मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडेसर्वश्री आशीष शर्मापी. वेलरासूडॉ. संजीव कुमारमुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकरजिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुपेकरमहानगरपालिकेतील संबंधित विभागांचे उपायुक्तसहायक आयुक्त उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. केसरकर यांनी महानगरपालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेताना जेथे निधीची अथवा यंत्रसामग्रीची आवश्यकता आहेतेथे त्या जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पुरविल्या जातीलअसे सांगितले. शहरातील मलनि:सारण करणाऱ्या वाहिन्या दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यांच्या देखभालीचे सर्वोत्तम पर्याय वापराअसेही त्यांनी सांगितले.

            श्री. केसरकर म्हणालेनागरिकांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा देताना महालक्ष्मी मंदीरहाजीअली परिसरात पार्किंगची सुविधा निर्माण करावी. सौंदर्यीकरण करताना अत्यावश्यक सेवांना प्राधान्य द्यावे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शहरातील जलतरण तलावांची संख्या वाढवावीकामगार मैदान येथे उपलब्ध असलेल्या जलतरण तलावाचा विकास करून ऑलिंपिक दर्जाचे मैदानरनिंग ट्रॅक तयार करावे. यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईलअसे त्यांनी सांगितले. मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये मलनि:सारण वाहिनीपाणीपुरवठास्मशानभूमीशौचालये आदी मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात यावा. चौपाट्यांवर स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावीअसेही श्री. केसरकर यांनी सांगितले.

            शिक्षण क्षेत्रात मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे नाव उज्ज्वल व्हावेयादृष्टीने दर्जा वाढवून मुंबईचा पॅटर्न निर्माण करावाअशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यकतेनुसार शासनाकडून मदत केली जाईलअसे त्यांनी सांगितले. मुंबईत मोठ्या प्रमाणात कचरा संकलित केला जातो. यातील ओल्या कचऱ्याचे जागेवरच कंपोस्टिंग करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर आधुनिक यंत्रांचा वापर करावाअशी सूचना त्यांनी केली. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी फिरती रूग्णालये तयार करावीततसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणारी केंद्रे उभारावीतअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


सातारा जिल्ह्यातीलपर्यटन विकासकामांचा आढावा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सातारा जिल्ह्यातीलपर्यटन विकासकामांचा आढावा

 

            सातारा दि. ३१ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दरे ता. महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत.  त्यांनी महाबळेश्वरपाचगणीसह सातारा जिल्ह्यातील ‘क’ वर्ग पर्यटन तसेच धार्मिक व यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला.

            दरे ता. महाबळेश्वर येथे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकास कामांची माहिती दिली. या प्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहियाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारीपोलीस अधीक्षक समिर शेख आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांना आणखी चांगल्या सुविधा निर्माण कराव्या. तसेच महाबळेश्वरपाचगणी व्यतिरीक्त ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ‘क’ वर्ग पयर्टन स्थळांना चांगल्या सुविधा देण्यात येतील. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे त्यामुळे इतर ठिकाणीही पर्यटन वाढीसाठी आराखडा तयार करावा.

            जिल्ह्यात विविध यात्रा व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या यात्रा व उत्सवांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यांच्या सुविधेसाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाईलअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            महाबळेश्वरपाचगणीसह जिल्ह्यातील  27 ‘क’ वर्ग पर्यटन स्थळांबरोबर धार्मिकयात्रा स्थळांचा या आराखड्यामध्ये समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या पर्यटन विकास आराखड्याबाबत समाधान व्यक्त करुन श्री. शिंदे म्हणालेया आराखड्यामध्ये स्थानिकांना रोजगार व पर्यटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच  कोयना जलाशयाच्या ठिकाणी हाऊस बोट सारखी सुविधा निर्माण करण्याच्या सूचना करुन जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात येणाऱ्या उपक्रमांना निधी तातडीने दिला जाईलअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            कास परीसरात फुलांचा हंगाम असल्यावरच पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. परंतु हे पर्यटक कास परिसरात बारमाही येण्यासाठी सुविधा वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी सूचविलेल्या उपाययोजनांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली तसेच सातारा येथील अजिंक्यतारा व महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी वास्तुविशारद नेमावा यासाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाईलअशीही ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

0000


Featured post

Lakshvedhi