Monday, 3 October 2022

पोटनिवडणूक - 2022 अंधेरी पूर्व

 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता

पोटनिवडणूक - 2022 कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. 3 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या  एक जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर 2022 पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवारदिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.

            निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 7 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार)नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार)नामनिर्देशन पत्रांची छाननी – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2022 (सोमवार)मतदानाचा दिनांक – 3 नोव्हेंबर 2022 (गुरुवार)मतमोजणीचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2022 (रविवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 8 नोव्हेंबर 2022 (मंगळवार) आहे.

            या पोटनिवडणुकीसाठी दि. 1 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार कार्ड वापरता येईल. तथापिज्या मतदारांकडे मतदार कार्ड नसेल त्यास आयोगाने निश्चित केलेल्या 9 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानावेळी जवळ बाळगणे आवश्यक आहे.

            या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहेत्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची निवड का केली याबाबतची माहिती वृत्तपत्रेदूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/3.10.22


 


नेतृत्व विकास, आर्थिक व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण

 मौलाना आझाद महामंडळातील कर्मचाऱ्यांना

नेतृत्व विकासआर्थिक व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण

 

            मुंबईदि. 3 : जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नुकताच नेतृत्व विकास प्रशिक्षण आणि आर्थिक जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नेतृत्वप्रेरणाआव्हानात्मक परिस्थितीत व्यवस्थापकीय निर्णय क्षमता विकसित करणेआर्थिक निरोगीपणाजोखीम व्यवस्थापन पद्धती आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

            अल्पसंख्याक विकास विभागाच्या तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जमनालाल बजाज संस्थेचे संचालक प्रा. डॉ. श्रीनिवासन आर. अय्यंगारमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

            प्रा. डॉ. अय्यंगार यांनी जमनालाल बजाज संस्थेमार्फत आयोजित केलेल्या काही प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. ते म्हणालेजमनालाल बजाज संस्थेने नेहमीच गुणवत्तेला महत्त्व दिले आहे. सध्याचा प्रशिक्षण कार्यक्रम महामंडळाच्या आवश्यकतेनुसार तयार करण्यात आला आहे. सहभागींना हा कार्यक्रम अतिशय नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त वाटेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            डॉ. शेख यांनी महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत माहिती सांगितली.  महामंडळाच्या विविध समस्या आणि आव्हानांचा उल्लेख केला. जमनालाल बजाज संस्थेच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाद्वारे महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्याबरोबरच त्यांचे अधिक सक्षमीकरण होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            महामंडळातील अधिकारी - कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण यशस्वी केल्याबद्दल डॉ. शेखप्रा. डॉ. अय्यंगारयांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

0000

इरशाद बागवान/विसंअ/3.10.22


 

700 'बालासाहेब ठाकरे अपना दवाखाना

 राज्य के स्वास्थ्य क्षेत्र के लिए देंगे दोगुनी धनराशि

राज्य भर में शुरू करेंगे 700 'बालासाहेब ठाकरे अपना दवाखाना'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का आश्वासन

 

             मुंबईदि.०३: राज्य की ग्रामीण स्वास्थ मशीनरी को सशक्त बनाने की हमारी सर्वोपरि प्राथमिकता है। स्वास्थ्य क्षेत्र को दोगुनी निधि दी जाएगी। ऐसा आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने एनडीटीवी समाचार चैनल के 'स्वस्थ बनेगा इंडियाकार्यक्रम के दौरान दिया। राज्य के प्रत्येक जिले में मेडिकल कॉलेज शुरू करनेराज्य भर में लगभग 700 'बालासाहेब ठाकरे अपना दवाखानाशुरू करना और बाल स्वास्थ्य पर विशेष ध्यान केंद्रित किया जाएगा ऐसा मुख्यमंत्री ने बताया। इस अवसर पर वरिष्ठ फिल्म अभिनेता अमिताभ बच्चन और वरिष्ठ पत्रकार प्रणव रॉय ने मुख्यमंत्री से संवाद साधा।

मुंबई में 227 स्थानों पर 'बालासाहेब ठाकरे हमारा दवाखाना'

            इस दौरान मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि महाराष्ट्र के ग्रामीण अंचलों में स्वास्थ्य मशीनरी के जाल को सशक्त बनाने पर बल दिया जाएगा। राज्य में लगभग 700 स्थानों पर 'बालासाहेब ठाकरे अपना दवाखानाशुरू किया जाएगा। मुंबई में 227 स्थानों पर 'बालासाहेब ठाकरे अपना दवाखानाशुरू किए जाएंगे। उसमें से 50 दवाखाना 2 अक्टूबर से शुरू हो गए हैं। अपना दवाखाना के माध्यम से नागरिकों के घर के पास ही स्वास्थ्य सुविधा उपलब्ध कराने का प्रयास है। 

हर जिले में मेडिकल कॉलेज

            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि प्राथमिक स्वास्थ्य केंद्रोंउप-केंद्रों और ग्रामीण अस्पतालों को मजबूत बनाने के लिए स्वास्थ्य संस्थानों को अपग्रेड किया जाएगा ताकि ग्रामीण क्षेत्रों के नागरिकों को स्थानीय स्तर पर गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सुविधा उपलब्ध हो सके। आम आदमी को केंद्र बिंदु में रखकर स्वास्थ्य संस्थाओं को सशक्त बनाया जा रहा है। हर जिले में मेडिकल कॉलेज शुरू किए जाएंगे। स्वास्थ्य क्षेत्र के लिए निधि की कमी न होइसके लिए दोगुना धनराशि दी जाएगी। इस अवसर पर मुख्यमंत्री ने यह भी कहा कि निजी संस्थाओं की मदद से स्वास्थ्य के बुनियादी ढांचे को मजबूत करने पर जोर दिया जाएगा।

कैथलैब भी शुरू की जाएंगी

            मुख्यमंत्री ने इस अवसर पर कहा कि राज्य में कॅथलॅब शुरू करने का भी फैसला किया गया है। जिन क्षेत्रों में स्वास्थ्य संस्थाओं का कार्य 80 से 90 प्रतिशत तक पूर्ण हो गया हैवहां निधि उपलब्ध कराकर कार्य को शत-प्रतिशत पूरा करने और नागरिकों को स्वास्थ्य सुविधा उपलब्ध कराने को प्राथमिकता दी जा रही है। ग्रामीण अंचलों में स्वास्थ्य क्षेत्र में आशा स्वयंसेविकाओं का योगदान महत्वपूर्ण है। उन्होंने कोरोना के दौरान भी उल्लेखनीय काम किया है। राज्य सरकार उन्हें और अधिक सुविधाएं देने का प्रयास करेगी।

            मेडिकल कॉलेजों के माध्यम से पर्याप्त मात्रा में डॉक्टरों और नर्सों की उपलब्धता होगी। मेडिकल कॉलेज के विद्यार्थियों को ग्रामीण इलाकों में काम करने के लिए प्रोत्साहित किया जाएगा। ऐसा भी उन्होंने कहा।

००००


 

Top Priority, Doubling of Funds For Maharashtra’s Health Sector. 700 ‘Balasaheb Thackeray Aapla Davakhanas’ in state soon

- MAHA Chief Minister Eknath Shinde

 

            Mumbai, October 32022: Maharashtra Chief Minister Eknath Shinde said today “The strengthening of the rural health system of our state is the top priority and we will double the funds to be made available for the health sector.” He was addressing a news channel under the 'Swasth Banega India' program featured by the NDTV news channel.

      The Chief Minister added that he would start a medical college in every district of the state along with setting gup about 700 'Balasaheb Thackeray aapla dawakhanas' across the state, with special emphasis on child health. Veteran actor Amitabh Bachchan and senior journalist Pranab Roy interacted with Chief Minister Shri Shinde on the occasion.

'Balasaheb Thackeray Aapla Dawakhanas' at 227 places in Mumbai

            Chief Minister Shri. Shinde further said, “Emphasis is being laid on strengthening the health system network in rural areas of Maharashtra. 'Balasaheb Thackeray Aapla Dawakhanas' will be started at around 700 places in the state. Such clinics will also be set up at 227 locations in Mumbai itself. Already, 50 such clinics have commenced operations since October 2. Through these medical facilities we intend to provide healthcare to citizens right next door to their homes.”

Medical college in every district

            “Health institutions will be upgraded to strengthen primary health centres, sub-centres and rural hospitals so that citizens in rural areas get quality health care even locally. Health institutions are being further empowered by placing the common man as the centre of our emphasised focus. Medical colleges will be started in every district. There will be no shortage of funds for the health sector in fact, double the quantum of funds will be given for it,'' Chief Minister Shri Eknath Shinde said. He added that the emphasis would be on strengthening the health infrastructure in collaboration with private organizations.

MAHA Cathlab to be started

            “It has also been decided to start a cathlab in the state. In areas where the work of health institutions is 80 to 90 percent complete, priority is being given to make the work 100 percent complete by providing funds to ensure high end health facilities for citizens. The contribution of Asha volunteers is important in the field of primary health in rural areas. They have done remarkable work even during Corona. The state government will try to provide more facilities to them also," the Chief Minister further said on the occasion.

            Adequate number of doctors and nurses will be available through medical colleges. He also said that students of medical colleges will be encouraged to work in rural areas.

0000


हॅलो नव्हे - वंदे मातरम्"

 हॅलो नव्हे - वंदे मातरम्"

 

        राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यभरात "हॅलो नव्हे - वंदे मातरम्" या अभियानाचा शुभारंभ झाला असून अभियानाविषयी...

 

            महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात दि. 2 ऑक्टोबरपासून "हॅलो नव्हे - वंदे मातरम्" या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजेच गांधी जयंती दिनीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ वर्धा येथून झाला.

       जनगणमनहे आपले राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् हे राष्ट्रीय गाणे हे सर्वमान्य झाले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास ‘हॅलो’ या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी ‘जय हिंद’ तर काही ठिकाणी ‘नमस्ते’ असेही संबोधले जाते. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर "वंदे मातरम्" हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते,
"वंदे मातरम्" हा फक्त नारा किंवा संबोधन नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास आहे. "वंदे मातरम्"बाबत प्रचार-प्रसार व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या गीताचा इतिहास व त्याच्याशी निगडित घटना यांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.

            वंदे मातरम् हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1875 या वर्षामध्ये लिहिले होते. संस्कृत भाषेतील हे मूळ गीत पाच कडव्यांचे होते. मात्र सध्या पाचपैकी फक्त एक कडवेच गायले जाते. 1896 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत सर्वप्रथम गायले गेले. 1905 ला झालेल्या बंगालच्या फाळणी दरम्यान, "वंदे मातरम्" हा परवलीचा शब्द होता. अनेक क्रांतिकारकांनी या गीताचा उद्घोष करत बलिदान दिले. "इन्कलाब जिंदाबाद" व "वंदे मातरम्" या दोन शब्दांनी स्वातंत्र्य चळवळ भारावून गेली होती. या गीतावर व त्याच्या गायनावर इंग्रजांनी बंदीही घातलेली होती. मात्र तत्कालीन राजकीय पक्षक्रांतिकारक व सर्वसामान्य नागरिक यांनी ही बंदी झुगारून वंदे मातरम् गायनास सुरुवात केली होती.

            स्वातंत्र्य चळवळीतील धगधगत्या अग्निकुंडात बलिदान देणाऱ्या अनेक वीरांच्या मुखातून ‘वंदे मातरम्’ हा शब्द आला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मंत्र ठरलेले हे गीत सर्वमान्य होते. दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या संविधान परिषदेच्या बैठकीची सुरुवातही या गीताने झाली होती. 1950 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी "वंदेमातरम्" या गीताबद्दल पुढीलप्रमाणे नमूद केले होते :"शब्दों व संगीत की वह रचना जिसे जन गण मन सम्बोधित किया जाता हैभारत का राष्ट्रगान हैबदलाव के ऐसे विषयअवसर आने पर सरकार अधिकृत करे और वन्दे मातरम् गानजिसने कि भारतीय स्वतन्त्रता संग्राम में ऐतिहासिक भूमिका निभायी हैको जन गण मन के समकक्ष सम्मान व पद मिले। (हर्षध्वनि)। मैं आशा करता हूँ कि यह सदस्यों को सन्तुष्ट करेगा। (भारतीय संविधान परिषदद्वादश खण्ड, 24-01-1950). या विधानावरून या गीताची महती स्पष्ट होते. मद्रास उच्च न्यायालयाने शाळा व महाविद्यालये यांमधून "वंदे मातरम्" हे गीत देशभक्तीची भावना रुजविण्याकरिता आठवड्यातून किमान एकदा तरी गायले जावे, असा निर्णय दिला होता. थोडक्यात ‘वंदे मातरम्’ हा शब्द सर्वांसाठीच प्रेरणादायी व सन्माननीय आहे.

            "हॅलो नव्हे - वंदे मातरम्" या अभियानाबाबत बोलताना मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणतात की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच "वंदे मातरम्" ने शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावीअशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी ‘जय हिंद’ तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. वास्तविक पाहता दोन व्यक्ती एकमेकांशी होणाऱ्या संवादातसुरुवातीस संबोधित करताना वेगवेगळी अभिवादने वापरताना आढळून येतात. महाराष्ट्रात ‘नमस्कार’ व ‘राम राम’ हे दोन शब्द आजही मोठ्या प्रमाणात संबोधनात्मक वापरण्यात येतात. त्याशिवाय हॅलोहायगुड मॉर्निंग सारखे शब्दही दिसून येतात. वेगवेगळे समूहसमुदायधर्म यांमध्येही अभिवादन करण्याच्या विविध प्रथा आहेत. वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात या प्रथा सर्वजण आपापल्या परीने जोपासत आहेत व त्या जोपासण्याचा त्यांना अधिकारही आहे. शासकीय कार्यालयात किंवा शासन व्यवहारात दूरध्वनीवरून किंवा समोरासमोर भेटल्यानंतर कोणत्या शब्दाने अभिवादन करावे याबाबत स्पष्ट निर्देश कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर "वंदे मातरम्" हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप मिळेल असे मला वाटते.

            लघु चित्रपटाच्या माध्यमातून "वंदे मातरम्" बाबत जाणीवजागृती करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांबरोबर निमशासकीय कार्यालयेशासकीय अनुदानित व विना अनुदानित कार्यालयेस्थानिक स्वराज्य संस्थाविद्यापीठेशाळामहाविद्यालयेशैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना कार्यालयात दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत व सहकारी यांना संवाद साधण्याच्या सुरुवातीस हॅलो असे न म्हणता "वंदे मातरम्" असे अभिवादन करावेअसे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केले असूनयासाठीची काही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे नमूद केली आहेत.

            1. सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून "हॅलो" संबोधन न वापरता, "वंदे मातरम्" म्हणावे.
            2. शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालयेशासन सहाय्यित / अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालयेस्थानिक स्वराज्य संस्थाशाळा / महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्याससुरुवातीला "हॅलो" असे न म्हणता "वंदे मातरम्" असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधतांना "वंदे मातरम्" असे संबोधन करावे.

            3. कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस "वंदे मातरम्" हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
4. कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात "वंदे मातरम्" ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.

5. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
6. विविध बैठका / सभांमध्ये वक्त्यांनी "वंदे मातरम्" या शब्दांनी संभाषणाची सुरुवात करावी.

आपला दवाखाना’ सुरू

 राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार

राज्यभर 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

 

            मुंबईदि. ३ : ‘राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणेराज्यभर सुमारे ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणेबाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चनज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद साधला.

मुंबईत २२७ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेमहाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात सुमारे ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून, त्यापैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.’’

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय

            प्राथमिक आरोग्य केंद्रउपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही, त्यासाठी दुप्पट निधी दिला जाईल,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. खासगी संस्थांच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कॅथलॅब देखील सुरू करणार

            राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे, तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात डॉक्टरनर्स यांची उपलब्धता होईल. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईलअसेही त्यांनी सांगितले.

००००

बांधकाम विभागातील सर्व भूखंडांची

 सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व भूखंडांची एकत्रित माहिती असणे आवश्यक

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

 

            मुंबईदि. 3 : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे राज्यात अनेक भूखंड आहेत. यापैकी अनेक भूखंडांचा सध्या वापर होत नाही. तर बहुतेक जागांवर विविध विभागांची शासकीय कार्यालये भाडे तत्वावर आहेत. या सर्व भूखंडाची एकत्रित माहिती गोळा करुन त्या सर्व भूखडांची एक ‘लॅण्ड बॅंक’ तयार करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

            सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणेसोलापूरकोल्हापूर व सातारा या मंडळाच्या विभागाची आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडली. या बैठकीत चारही विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागाच्या रस्त्यांची स्थितीपदांची स्थितीप्रस्तावित नवीन योजनाप्रगतीपथावर सुरु असलेली कामेविभागाला आवश्यक निधी आदी विविध मुद्द्यांचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले.

            मंत्री श्री. चव्हाण म्हणालेसार्वजनिक बांधकाम विभाग अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने नवीन योजनानवीन प्रकल्प उभारण्यासाठी विभागाच्या अधिका-यांनी आपापल्या नवीन कल्पना प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत व त्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

            मंत्री श्री. चव्हाण म्हणालेसार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडाच्या माध्यमातून अधिक महसूल प्राप्त होण्यासाठी विभागाच्या सर्व भूखंडांची एक ‘लॅण्ड बॅंक’ तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात या ‘लॅण्ड बॅंक’चा विभागाला खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकेल असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

            मंत्री श्री. चव्हाण म्हणालेराज्यातील रस्ते बनविताना ते कायमस्वरुपी टिकाऊ व दर्जेदार कसे राहतील याची काळजी विभागाच्या अधिकऱ्यांनी घेतले पाहिजे. कारण रस्त्यांचा दर्जा सुधारल्यास जनेतला जास्तीत जास्त दिलासा मिळेल त्याचप्रमाणे विभागाची व राज्य सरकारची प्रतिमा सुधारु शकेल असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

            यावेळी सचिव (रस्ते) स. शं. साळुंखेसचिव (इमारती) प्र. द. नवघरे  यासह इतर अधिकारी उपस्थित होते.


Featured post

Lakshvedhi