सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 3 October 2022
गांधी विचार
महात्मा गांधी यांचे विचार कृतीत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप
हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा प्रारंभ
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 नद्यांच्या परिक्रमेस प्रारंभ
वर्धा, दि. 02 : सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठया जनांदोलनात परावर्तित केला. बापूजी सर्वसामान्य माणसाच्या सेवेला ईशसेवा - देशसेवा मानत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपित्याचे विचार कृतीत आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी जाणिवेने काम केले जात आहे म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा सर्वार्थाने औचित्यपूर्ण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 नद्यांची परिक्रमा, हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा प्रारंभ आणि वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाच्या उद्घाटनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, दादाराव केचे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यावेळी उपस्थित होते.
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन वास्तू केवळ प्रशासकीय असू नये. ती जनतेची व्हावी. ती सर्वसामान्यांना न्याय देणारी ठरावी, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जगातील सर्व संस्कृती नदीच्या काठावरच निर्माण झाल्या आणि बहरल्या. जेव्हा या नद्या नष्ट झाल्या तेव्हा संस्कृती नष्ट झाल्या. सर्वांनी नद्यांचे महात्म्य जाणून घ्यावे. ती आपली माता आहे ती वाचली तरच आपण वाचणार आहोत. त्यामुळे या भावनेने साऱ्या नद्या समजून घ्याव्यात. त्यासाठी आवश्यक असणारी जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी तसेच या नद्या प्रवाही, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आज सुरू करण्यात आलेला 75 नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. या उपक्रमामुळे नद्यांशी असलेले आपले नाते पुनरुज्जीवित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्य लढ्यात ‘वंदे मातरम्’ हे शब्द खऱ्या अर्थाने राष्ट्रभावना चेतवणारे ठरले होते. 'हॅलो' ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणणे म्हणजे गुलामगिरीच्या शृंखला तोडणे. 'वंदे मातरम् 'च्या माध्यमातून इतिहासातील तीच ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करण्याचा निर्धार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. पालकमंत्री म्हणून वर्धा जिल्ह्याची जबाबदारी आपण घेतली असून महिलांच्या उद्योगासाठी क्लस्टर निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच जिल्ह्याच्या विकासाठी अडचणी दूर केल्या जातील. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी 365 कोटी रुपयांची मदत पंधरा दिवसात जिल्ह्याला देण्यात आली. त्यापैकी सुमारे 52 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांना सात दिवसात मदत मिळेल, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सर्वसामान्य व्यक्तींना विकासाचा केंद्रबिंदू मानून सेवा पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात आला. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रेरणा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याची ऊर्जा घेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखले घरपोच देण्यात आले. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात आला. यापुढेही जनतेचे प्रश्न गतीने सोडविण्याचे काम शासनामार्फत करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ते यावेळी म्हणाले.
सुशासनाचा संकल्प घेवून काम करणारे नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते सुराज्याची संकल्पना मांडणारे महात्मा गांधी यांच्या जयंतीदरम्यान आयोजित करण्यात आलेला सेवा पंधरवडा यशस्वी झाल्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. स्वातंत्र्य लढ्याचा जाज्ज्वल्य इतिहास स्मरणात राहावा, यासाठी 'हॅलो' ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणून संभाषणाची सुरुवात करावी. ‘वंदे मातरम्’ हे आपले राष्ट्रगान असून त्याचा सन्मान करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गॅझेटियरच्या धर्तीवर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्रातील शूर वीरांचा इतिहास, भौगोलिक वारसा श्राव्य स्वरुपात नव्या पिढीला उपलब्ध करून देण्याची घोषणा श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. तसेच सर्व जिल्ह्यांचे गॅझेटियर नव्याने प्रकाशित केले जाणार असून त्याची सुरुवात वर्धा जिल्ह्यापासून झाल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा येथे इको-टुरिझम पार्क उभारण्यासाठी 20 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी जाहीर केले.
जलसंधारण आणि जलसाक्षरता या दोन्ही संकल्पनांची सांगड घालणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, असा गौरव करून प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून राबवण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान हे खऱ्या अर्थाने जनआंदोलन ठरले. महाराष्ट्र इतर राज्यांना मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आजच्या काळात पाणी हेच अमृत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त आयोजित 75 नद्यांची परिक्रमा हा राज्यातील नद्या अमृतवाहिनी करण्याचा उपक्रम आहे. त्या माध्यमातून नदी जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. अतिक्रमण, अस्वच्छतेसारख्या विविध प्रकारच्या समस्यांपासून आता नद्यांनाही स्वातंत्र्य हवे आहे. त्यासाठी असे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. या संदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. उत्सवांना लोककल्याणकारी योजनांशी जोडण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय असल्याचेही ते म्हणाले.
महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या सर्वांगीण विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांना घरकूल, वीज, पाणी, अन्नधान्य देऊन त्यांच्या विकासाला हातभार लावला आहे. तसेच बापुजींची स्वच्छतेची शिकवण प्रत्यक्षात आणण्यासाठी यशस्वी अभियान राबविल्याचे खासदार श्री. तडस यांनी सांगितले.
समाजासाठी काहीतरी करणे, हीच महात्मा गांधी यांना खरे अभिवादन ठरेल, अशी भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार सर्वांनी समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आमदार डॉ. भोयर यावेळी म्हणाले.
सेवा पंधरवड्याअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अतिक्रमित घरकुल पट्टे, आयुष्मान भारत पत्रिका, कृषि अभियांत्रिकी उपअभियान अंतर्गत ट्रॅक्टर आदी लाभांचे वितरण करण्यात आले. तसेच या पंधरवड्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. ‘चला जाणुया नदीला’ या अभियानांतर्गत राज्यातील 75 नद्यांची परिक्रमा करण्यात येणार असून या मोहिमेत सहभागी झालेल्या चमूंना मंगल कलश आणि तिरंगा सुपूर्द करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागाने तयार केलेल्या वर्धा जिल्हा विशेष गॅझेटियरचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. 'हॅलो' ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाच्या चित्रफितीचे प्रकाशन करून अभियानास प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांच्या दालनांची आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या चित्रकला प्रदर्शनीची मान्यवरांनी पाहणी केली. खासदार रामदास तडस यांच्या विकास निधीतून दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचे वितरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या 'वैष्णव जन ते...' आणि गायक नंदेश उमप यांच्या 'गर्जा महाराष्ट्र माझा...' या गीतांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आभार मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
वैद्यकीय उपकरणांना परवाना
वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक
मुंबई दि २:- वैद्यकीय उपकरण संबंधितचा नविन कायदा जानेवारी, २०१८ अस्तित्वात आला आहे. या उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना घेणे, ऑक्टोबर २०२२ बंधनकारक करण्यात आले आहे; असे, जी.बी.ब्याळे, सह आयुक्त (औषधे) बृहन्मुंबई विभाग, अन्न व औषध प्रशासन यांनी कळविले आहे.
रुग्णांच्या उपचारासाठी व रोगनिदानासाठी वैद्यकीय उपकरणांचा वापर केला जातो. यापूर्वी ३७ वैद्यकीय उपकरणांचे नियमन केले जात होते. आता नव्या कादयानुसार सुमारे २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित केले जाणार आहे. वैद्रयकीय उपकरणे अधिनियम (Medical Device Rules) २०१७ नुसार १ ऑक्टोबर २०२२ पासून वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना असणे आवश्यक आहे. (परवाना घेणे सक्तीचे करण्यात आले आहे).
नेब्युलायझर, डिजीटल थर्मामिटर, रक्तदाबाचे मॉनिटर, ग्लुकोमिटर या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणा-या वैद्यकीय उपकरणांना औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या अंतर्गत औषधे या वर्गवारीत गणले जाणार आहे.
यापूर्वी फक्त कार्डियाक स्टेंट, हार्ट व्हॉल्व्ह, ऑर्थोपेडिक्स इम्प्लांट, यासारख्या वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी उत्पादन परवाने दिली जात होते. याव्यतिरिक्त इतर काही वैद्यकीय उपकरणांची (जसे ब्लड प्रेशर मशीन, एमआरआय आणि एक्स-रे मशीन) मोठया प्रमाणात विनापरवाना आणि नियंत्रणाशिवाय उत्पादन विक्री होत होती.
मात्र २०१७ च्या नव्या नियमानुसार २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित करण्यात येणार आहे. कमी जोखीम आणि जास्त जोखमीच्या उपकरणांना अ आणि ब श्रेणीत ठेवले आहे. यामध्ये १ हजार ६४ प्रकारची उपकरणे आहेत. त्यांना १ ऑक्टोबरपर्यंत परवाने घ्यावे लागतील, असे अन्न व औषध विभागाने कळविले आहे.
000
घर घ्या घर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'नारेडेको' च्या प्रदर्शनाचा समारोपसर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात
- मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन
मुंबई दि. 2 : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यात, याकरिता बांधकाम क्षेत्राने पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
‘नारेडेको’ म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो 2022 मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक , नारेडेकोचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप रुणवाल, नारेडेकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी, राजन भालेकर,अभय चांडक आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला त्याच्या हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. 'सर्वांसाठी घरे: या संकल्पनेतून ही योजना सामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातही शहरी आणि ग्रामीण भागात या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले, ही योजना राबविण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. शासनाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध सवलती दिल्या जातात.
बांधकाम क्षेत्र हे कृषी क्षेत्रानंतर रोजगार निर्मिती करणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र ओळखले जाते. हे खूप मोठे क्षेत्र असून यावर लक्ष देण्याची गरज आहे.त्यामुळे या क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
सण उत्सव काळात अहोरात्र पोलीस आपल्या कर्तव्य बजावत असतात, विकासकाने घरे बांधत असताना एक सामाजिक बांधीलकी म्हणून पोलिसांना घरे द्यावीत असे सांगून पोलिसांसाठी घरांना प्राधान्य देण्याकरिता योजना तयार करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईत दरवर्षी 50 कि.मी. चे रस्ते बनवले जात होते. हे सरकार आल्यानंतर आता दरवर्षी 500 कि.मी. चे रस्ते तयार केले जाणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या कामासाठी 550 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत उर्वरित रस्त्याचे संपूर्ण कॉक्रेंटीकरण होईल. तसेच दोन ते अडीच वर्षात एकही रस्ता डांबराचा आढळून येणार नसून संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यापुढे मुंबईतील रस्त्यावर एकही खड्डा आढळून येणार नाही असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
शासनामार्फत मुंबई आणि महानगरामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्राचा होणारा विकास लक्षात घेऊन त्याभागात गृहनिर्माण प्रकल्प देखील झपाट्याने उभे राहत आहेत. राज्यभरात बांधकाम क्षेत्रात सुसूत्रता यावी आणि शहरांच्या विकासात एकत्रितपणा यावा, यासाठी नगरविकास विभागाने युनिफाइड डीसीपीआर राज्यभर लागू केला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी मोकळ्या जागेवरील नव्या बांधकांमाऐवजी जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुढे आले पाहिजे. मुंबईच्या धर्तीवर समुह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) व झोपडपट्टी पुनर्विकास (SRA) नियमावली मध्ये ठाणे तसेच राज्यातील इतर शहरासाठी लागू केल्यामुळे जुन्या शहराच्या भागाचा पुनर्विकास आता अधिक चांगल्या प्रकारे व नियोजनबध्द पध्दतीने करता येईल. सुधारित नियमांमुळे पुनर्विकासासाठी अधिक एफएसआय उपलब्ध होणार आहे. अनेक किचकट नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे प्रकल्प विकासक आणि रहिवासी या दोघांसाठीही व्यवहार्य ठरतील त्यातून पुनर्विकासाला गती मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
गृहनिर्माण क्षेत्राबरोबरच पायाभूत आणि दळणवळण प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहे. सद्यस्थिती अनेक माठ्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.
मुंबईतील वांद्रे कुर्ला काँम्प्लेक्स येथील जिओ कन्वेक्शन सेंटर येथे नारेडेको महाराष्ट्र होमेथॉन एक्पो 2022 आयोजन करण्यात आले होते. रिअल इस्टेट संबंधित असलेल्या या प्रदर्शनामध्ये 125 हून अधिक स्टॉल्स होते, मुंबईसह पुणे, नाशिक आणि विदर्भातील विकासक या प्रर्दशनात सहभागी झाले होते.
Sunday, 2 October 2022
लावा खोबरेल तेल आरोग्यासाठी
*हाता-पायाच्या तळव्यावरखो (कोकोनट) तेल लावा आणि अनेक रोगांपासून मुक्त व्हा*
१. एका सौ.शेट्टी या महिलेने लिहिले की, माझ्या आजोबांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले, त्याना पाठदुखी नाही, सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही ना दात दुःखी नाही.
माझे आजोबा सांगायचे,ते मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याचा सल्ला दिला होता. आणि हाच तेंव्हापासून आजोबांचा स्वास्थ्याचा एकमेव स्त्रोत होता. त्यामुळे त्याना कधीही कोणताही त्रास झाला नाही.
२. मणिपाल येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की, लहान असताना त्याची दृष्टी क्षीण झाली होती. जेव्हापासून तो हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याची ही प्रक्रिया सुरू ठेवली, तेव्हा १ महिन्यानंतर माझ्या डोळ्याचा प्रकाश हळूहळू पूर्णपणे नियमित झाला.
३. उडुपी येथील एक व्यापारी गृहस्थ श्री. कामथ सुट्टीसाठी केरळला गेले असता, तिथल्या हॉटेलमध्ये ते झोपू शकले नाही. म्हणून बाहेर चालू लागले. तेव्हा रात्री बाहेर बसलेला म्हातारा पहारेकऱ्याने विचारले, "काय झाले आहे, असे का भटकता?"
ते म्हणाले "मला झोप येत नाही!"
तो हसला आणि म्हणाला, "तुमचा कडे नारळ तेल आहे का?"
मी म्हणालो "हो".
तो म्हणाला, "मग त्याने आपल्या हाता-पायाच्या तळव्याना काही मिनिटे मालिश करा, शांत झोप येईल."
आता श्री कामथ स्वस्थ आणि सामान्य आहेत.
४. रात्री झोपण्यापूर्वी हाता-पायाना नारळ तेलाने मालिश केल्यास अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो .
५. पोटाचा त्रास- हाता-पायाच्या तळांवर नारळाच्या तेलाने मालिश केल्यानंतर पोटाचा त्रास 2 दिवसात बरे होते.
६. लहान मुलांच्या पायाच्या तळव्यांवर नारळ तेलाने मालिश देखील केल्यास, त्यांना खूप आनंदी आणि निरोगी ठेवते.
७. पाय दुखणे/मुंग्या येणे- रात्री झोपायला जाण्यापूर्वी दररोज 2 मिनिटांसाठी नारळाच्या तेलाने पायांच्या तळव्यांची मालिश करण्यास सुरवात करावे. या प्रक्रियेमुळे पायांच्या दुखण्यापासून व मुंग्या येणे यापासून बराच आराम मिळातो.
८. पाय नेहमी सुजलेले आणि चालत असताना थकवा येत असेल, तर, रात्री झोपायला जाण्यापूर्वी पायांच्या तळांवर नारळ तेलाने मालिशची ही प्रक्रिया सुरू करावी. फक्त दोन दिवसातच, पायांची सूज अदृश्य होते.
९. पायाला जळजळ होत असल्यास आपल्या हाता-पायाचा तळव्यांवर नारळाचे तेल लावायला सुरुवात करा. आठव्या दिवसापासून वेदना कमी होतील आणि परत जळजळ कधीच होणार नाही.
१०. थायरॉईड रोगाने पाय सर्व वेळ दुखत असल्यास झोपायच्या आधी पायाच्या तळांवर नारळ तेलाची मालिश करा आणि स्वस्थ व्हा.
११. पायाला फोड असल्यास रात्री झोपायच्या आधी चार दिवस नारळ तेलाने पायातील तळांची मालिश करावे. बराच मोठा फरक दिसेल.
१२. हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने झोपेत घोरणे प्रतिबंधित करते.
१३. हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने गुडघ्यात वेदना कमी होतात.
१४. रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेलाची हाता-पायाचा तळव्यावरील मालिश या पद्धतीने पाठीचा, मणक्याचा त्रास कमी होतो.
दक्षिण भारतीय रहस्य खालीलप्रमाणे आहेः
एकमात्र रहस्य आणि प्रत्येकासाठी खूप सोपे, आहे.
झोपेच्या वेळी पायांच्या तळांवर मालिश करणे सुरू करा आणि त्याच प्रकारे मुलांचा सुद्धा पायावर मालिश करा आयुष्यभर याचा एक नित्य कर्म बनवा नंतर निसर्गाची परिपूर्णता पहा तुम्ही आयुष्यभर अनेक आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.
प्राचीन चिनी औषधानुसार पायाखाली सुमारे 100 एक्युप्रेशर पॉइंट असतात.
ते अवयव दाबून आणि मालिश करून अनेक आजार देखील बरे होतात. याला - *फूट रिफ्लेक्सोलॉजी*
असं म्हणतात. ही फुट मालिश थेरपी संपूर्ण जगभरात वापरली जाते.
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.*
*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक*
*संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९*
(अशी आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन ९२ ७१ ६६९ ६६९ या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल)
*संजीवनी आर्टलाईफ वेलनेस सेंटरला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
https://sanjeevani-artlife-wellness.business.site
आरोग्य शिबिर
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्विवि धान भवनात अभिवादन
विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचा शुभारंभ
मुंबई, दि.2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यांचे औचित्य साधून विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या पुढाकाराने विधानमंडळ सचिवालयात आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष यांनी दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 पर्यंत चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन केले. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्रामार्फत स्माआरोग्य हेल्थकेअर संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी प्रधान सचिव, राजेंन्द्र भागवत, कल्याण केंद्राचे सरचिटणीस, मनिष पाटील, राजपत्रित अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष, अजय अग्रवाल, स्माआरोग्याचे संचालक अरुण रामचंद्र, डॉ.सुजाता अरुण यावेळी उपस्थित होते. उपसचिव विलास आठवले, म.वि.स. यांनी प्रथम तपासणी केली. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांनी सर्वांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि "उत्तम कार्यक्षमतेसाठी उत्तम आरोग्याची उपासना करावी," असे आवाहन केले.
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...