Friday, 30 September 2022

भगर उत्पादन नमुने

 अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी

घेतला विभागाच्या कामाचा आढावा

भगर उत्पादनाचे नमुने घेण्याचे दिले आदेश

 

            मुंबईदि. 29 : औरंगाबाद विभागातील जालनाबीड व औरंगाबाद येथील भगरीपासून विष बाधेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भगर विक्री करणाऱ्या सर्व उत्पादक व विक्रेत्यांकडील प्रति जिल्हा दहा नमुने तपासणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

            मंत्री श्री. राठोड यांनी विभागाच्या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतलीत्यावेळी ते बोलत होते. यावेळी सचिववैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागआयुक्तअन्न व औषध प्रशासनसह आयुक्तअन्न व औषध प्रशासन व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            अन्न व औषध तसेच सौंदर्य प्रसाधने मध्ये गैरप्रकार करणाऱ्या विरुदध कडक कार्यवाही करण्याच्या मंत्री श्री. राठोड यांनी सूचना दिल्या. औषध विभागातील सर्व कंपन्या जागतिक स्तरावरील तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतात किंवा कसे याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कॅन्सरडायबिटीज यावरील औषध उत्पादक कंपन्या त्यांचेकडील कर्मचारी वर्ग यांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना, कंपनीमधील औषधाचा दर्जा हा केंद्रशासनाने नेमुन दिलेल्या संगणक प्रणाली प्रमाणे मशीनरीचा वापरतात काय हे तपासण्याच्या सूचना यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

            अन्न विभागामध्ये भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिले.  केंद्र शासनाने परवानगी दिलेल्या अन्न उद्योगामधील उत्पादन प्रकरणात तपासणी करता येत नाही अशी अडचण अधिकाऱ्यांनी उपस्थित केली. अशा सर्व पदार्थांच्या वितरक व विक्रेते यांचेकडील नमुने कायदेशीर पद्धतीने तपासण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाने अलीकडे पारीत केलेल्या अन्नपदार्थसर्व प्रकारचे पेये यामध्ये तपासण्या काटेकोर होतील याकडे विभागाने लक्ष देण्याचे निर्देश दिले.

            प्रतिबंधित माल येणारे आंतरराज्य सिमाटोल नाकेगोदाम याबाबत तपासणी करुन प्रतिबंधित मालाची वाहतूक करणारे मोठे व्यापारी, वाहतुकदार यांना शोधून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.


रोजगाराभिमुख शिक्षण; बारावी

 बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण;

1 ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 29 : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची सुरूवात येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

            शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरशालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओलसमग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे तसेच टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार या अभ्यासक्रमासाठी https://admissions.tiss.edu या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेशाची अंतिम तारीख असेल. तरजानेवारी 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अभ्यासक्रमाची सुरूवात होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आधारित प्रमाणपत्र देण्यात येईल. यामध्ये पहिल्या वर्षानंतर डिप्लोमा कोर्सदुसऱ्या वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स तर तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळेल.

            टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या नामांकित मानद विश्वविद्यालय संस्थेच्या ‘स्कुल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन’ या विभागाद्वारे युजीसी निकषानुसार पदविका व पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ‘कमवा व शिका’ या तत्वावर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इयत्ता बारावीनंतर प्रवेश घेऊ शकेल. या संस्थेने अभ्यासक्रमाकरीता 3 हजार 750 उद्योगांसोबत करार केला असून विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर त्यांच्या आवडीनुसार विषय अथवा जॉबरोल निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणतेही प्रवेश क्षमतेचे बंधन नाही. यामध्ये प्रामुख्याने अॅग्रीकल्चरऑटोमोटिवचाइल्ड केअरइलेक्टॉनिक्सलाईफ सायन्सरिटेल मॅनेजमेंटमॅनेजमेंट अॅन्ड आंत्रेप्युनरशिपटुरिजम अॅन्ड हॉस्पिटॅलिटीमाहिती तंत्रज्ञानमीडिया व एंटरटेनमेंटबँकींग व वित्तीय क्षेत्र यामधील संधींचा समावेश आहेअशी माहिती यावेळी देण्यात आली.

            मंत्री श्री. केसरकर म्हणालेकामाला प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी व्यवसाय शिक्षण आवश्यक असून याद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थी हा जागतिक स्तरावर आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचा भाग बनू शकतो. केंद्र पुरस्कृत व्यवसाय शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर या योजनेअंतर्गत राज्यामध्ये एकूण 646 शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 12 व्यवसाय शिक्षण विषय शिकविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये 70 हजार विद्यार्थी व्यवसाय शिक्षण घेत आहेत.

            समग्र शिक्षा कार्यालयाने जागतिक बँक पुरस्कृत स्टार्स’ (STARS) प्रकल्पांतर्गत मिलाप’ (Maharashtra Young Leaders Aspirations Development Programme) हा कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. याआधी एचसीएल या नामांकित माहिती तंत्रज्ञान कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून त्याअंतर्गत इयत्ता बारावी गणित या विषयासह उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ‘कमवा आणि शिका’ तत्वावर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या संधीचा समावेश आहे. या नोंदणीसाठी https://registrations.hcltechbee.com/ हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. आतापर्यंत 34 हजार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. तर या दोन्ही करारांच्या माध्यमातून सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती समग्र शिक्षा कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

            या सामंजस्य कराराद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तरीजास्तीत जास्त गरजू व इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी केले आहे.


मुंबई महानगर पालिका बोनस

 मुंबईकरांसाठी मनापासून चांगले काम करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महापालिका, बेस्टचे कर्मचारी, शिक्षक यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर.

            मुंबई, दि. 29 :- मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

            मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टच्या २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस मिळणार आहे.

            विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे' असे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना ' आनंदात दिवाळी साजरी करा. पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,' असे आवाहन केले.

            बैठकीस खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच संदिप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी, उत्तम गाडे, अशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, कोविडच्या बिकट परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मुंबईतील कोविडची परिस्थिती नियंत्रणात राखण्यात डॉक्टर्स, सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. विकास कामांवर खर्च झालाच पाहिजे. पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहनही मिळाले पाहिजे. विकास काम आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजना यांचा समतोल राखावा लागेल. कर्मचारी आणि नागरिक आपलेच आहेत.'

            दिवाळी बोनसची घोषणा करतानाच मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबई महापालिकेशी निगडीत विकास कामांतील तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी या प्राधान्याने सोडविल्या जातील. सगळ्यांनी आता मुंबईकरांसाठी मनापासून काम केले पाहिजे. रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे नागरिकांच्या मनासारखी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी अभियंत्यांपासून ते सर्वांनीच दक्षता घ्यावी,'असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            बैठकीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठीची 'श्रमसाफल्य' आणि 'आश्रय' या योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकास यंत्रणांना सोबत घेऊन अशी घरे मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावीत यासाठी स्वतंत्र समन्वय बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            दिवाळी बोनसची मागणी आणि त्यातील वाढीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिकेच्या सर्वपक्षीय कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन बैठक घेतली. त्याबद्दल आणि बोनससाठी विविध घटकांचा सहानुभूतीने विचार केल्याबद्दल उपस्थित संघटना पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले.

00000



भास हा आभास


 

रिचार्ज मारा दहा चा


 

रावण की बात


 

सुप्रभात, नमो माय, महामाय






 

Featured post

Lakshvedhi