Tuesday, 6 September 2022

भवताल,हाफकिन संस्था


 हाफकिन नावाचा माणूस की संस्था?... याची गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी ५५)

सध्या ‘हाफकिन’ हे नाव वेगळ्याच कारणासाठी गाजत आहे. ती ‘व्यक्ती की संस्था?’ याबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे कथित अज्ञान दाखवून देणारी बातमी व त्याबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. या निमित्ताने का होईना ‘हाफकिन’ ची चर्चा होत आहे हे चांगलेच. कारण या नावाच्या व्यक्तीने १२५ सव्वाशे वर्षापूर्वी आपल्यासाठी प्लेगची पहिली लस विकसित केली आणि लाखो लोकांचे प्राण वाचवले. तेव्हापासून आजपर्यंत या माणसाचे आणि या नावाच्या संस्थेचे लसनिर्मिती आणि औषधनिर्मितीच्या क्षेत्रातील योगदान थक्क करणारे आहे. त्याची याच संस्थेच्या माजी संचालकांनी सांगितलेली ही गोष्ट!

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Haffkine

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५५ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


राष्ट्रीय पुरस्कार

 महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्रदान

            नवी दिल्ली, 05 : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यामध्ये मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद, क्लस्टर प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.


        येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह, अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्रशिक्षण ) राकेश रंजन, यासह वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते.


       याप्रसंगी देशभरातील एकूण 45 शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ने गौरविण्यात आले. राज्यातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. मानचिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


            मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल शाळेच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळावा, यासाठी वेगवेगळे प्रयोग प्रत्यक्ष राबवितात. यासह वर्ष 2020 मध्ये ‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणा’ची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना हे कसे उपयोगी ठरेल यावर त्या भर देतात. श्रीमती सांघवी यांनी 'ग्लोबल आउटलुक' नावाचा स्टीम-आधारित अभ्यासक्रम तयार केला आहे. त्या उत्तम प्रशासकही आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील या नाविण्यपूर्ण कामाची दखल घेत त्यांना आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            बीड जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद, क्लस्टर प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांनी लोकसहभागातून शाळेसाठी 15 लाख रूपयांपेक्षा अधिक निधी उभारून शाळेचा कायापालट केला. शाळेच्या भौतिक सुविधेत वाढ झाली, शाळेत रेकॉर्डिंग स्टुडियो, म्युझिक स्टुडियो उभे केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळू लागला. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी रोबोटीक, कोडींग, ड्रोन संदर्भातील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान अर्जित करीत नसून ते जीवनाचे ज्ञान अर्जित करण्यावर भर देत असल्याचे श्री. वाळके त्यांनी सांगितले. श्री. वाळके यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामंध्ये सर्वांचा वाटा असल्याचे व्यक्त केले.


            बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे हे ज्या शाळेत शिकवितात त्या शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे बंजारा समाजातील आणि ऊसतोड कामगार कुटूंबातील आहेत. स्थालांतरित कुटूंबातील विद्यार्थी या शाळेत शिकत असल्यामुळे श्री. कुलथे यांनी या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह तयार केले. शाळेमार्फत येथील विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आली आहे. या शाळेत येणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांची भाषा ‘गोलमाटी’ असल्याने त्यांना प्रमाण मराठी भाषा यावी यासाठी गोलमाटी आणि मराठी भोषेचे सचित्र पुस्तकाचे लेखन करून बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे येण्याचा प्रयत्न श्री. कुलथे यांनी केला. यासह ते संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कवितेत गोडी निर्माण करण्याचा प्रयत्नही करतात. आज शाळेतील विद्यार्थी मराठी, इंग्रजीतून आयसीटी, जॉयफुल शिक्षण प्रणाली अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे श्री. कुलथे यांनी यावेळी सांगितले.



धोरण शिक्षणाचे

 नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 

            मुंबईदि. 5 : देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. श्री. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पोवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन आज करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसखासदार पूनम महाजनखासदार मनोज कोटकएल अँड टी चे अध्यक्ष ए.एम नाईकसीईओ एस.एम. सुब्रमण्यमचेरिटेबल ट्रस्टचे जिग्नेश नाईकप्राचार्य मधुरा फडकेशिक्षक आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. शाह म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण बहुआयामी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ होणार आहे. शिक्षकांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मानवतावादीआध्यात्मवादी विचार देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा मनात रुजवावेत. एक उत्तम शिक्षक कसा असावायांचा बोध घ्यायला हवा. शिक्षकांनी  बालकांना समाजातील उत्तम नागरिक बनवावे. पंचतंत्र सारख्या बोधकथांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवावेत, असेही आवाहन श्री. शाह यांनी केले.

            भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एल अँड टी ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशा या राष्ट्रनिर्माण कार्यात ए. एम. नाईक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले आहे. आता श्री. नाईक यांनी पायाभूत सुविधांसोबतच व्यक्तिनिर्माण करुन   राष्ट्रनिर्माण करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेनवीन शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांचे चांगले चारित्र्य निर्माण होणार आहे. या धोरणामुळे समाजातील सर्व वर्गातील व्यक्तींना समान संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी हे हिऱ्यासारखे मौल्यवान असून त्यांना पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक करतात, असे सांगून शिक्षक दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


Monday, 5 September 2022

निवडणूक

 


दिलखुलास' कार्यक्रमात मुंबई उपनगरच्याजिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुलाखत.

             मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संकलित करणे’ या विषयी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवरून मंगळवार दि.६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. सहायक संचालक श्रीमती संध्या गरवारे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            या मुलाखतीत निवडणूक कायदा व नियमातील बदलामुळे अर्जात झालेले बदल, त्यामुळे मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती कशा प्रकारे संग्रहित करण्यात येत आहे, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट, ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने माहिती भरणे याबाबत मतदारांना केलेले आवाहन याबाबत सविस्तर माहिती, जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

00000

शिक्षक दिनानिमित्त

 शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश

            मुंबई, दि. 5 : राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितानाच विशेषत: सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            वर्षा येथील समिती सभागृहातून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सचिव रणजितसिंग देओल, संचालक कैलास पगारे उपस्थित होते तर, राज्यातील जिल्हाधिकारी यांच्यासह शिक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राने शिक्षणामध्ये दिशादर्शक काम करुन देशाला नेहमीच नवनवीन प्रयोग आणि विचार दिले आहेत. राज्यातील सर्व मुलांना समान व गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासनाने केंद्र शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत काही महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरीता धोरणात्मक निर्णय

            शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरीता अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला असून, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावर ६ टक्के खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण, शिक्षकांच्या योग्य मूल्यमापनाची प्रक्रिया या सर्वच बाबींचा नवीन शैक्षणिक धोरण आणताना या निर्णयांमध्ये विद्यार्थी केंद्रीत विचार असून संपूर्ण शिक्षण विभाग फक्त मुलांच्या शिक्षणासाठी सर्व स्तरांवरुन काम करेल. यासाठी पोषक वातावरण या माध्यमातून निर्माण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील सुसंवादाने शिक्षण आनंददायी..

            राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात आपल्या राज्याने शिक्षणात मागील काही कालावधीपासून मोठी झेप घेतली असून, प्रगतीकडे वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांचा व समाजाचा सरकारी शाळांबद्दल आत्मविश्वास वाढला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून नवे प्रयोग विद्यार्थी करु लागले आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील सुसंवादाने शिक्षण अधिक आनंददायी होऊ लागले आहे, असे त्यांनी यावेळी सागितले.

आदर्श शाळांची संख्या वाढवूया

            राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील काही उल्लेखनीय बाबींचा उल्लेख करतांना मुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद श्रीरामतांडा येथील शाळेमुळे १०० टक्के स्थलांतरण रोखल्याचे सांगतानाच पटसंख्येत वाढ झाली असे सांगितले. कोणत्याही सुट्टीविना शाळा ३६५ दिवस अविरत सुरु राहणारी चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह येथील जिल्हा परिषद शाळा, तोरणमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा आजूबाजूच्या २९ पाड्यावरील १६०० मुलांसाठीची आदर्श निवासी शाळा झाली आहे, असे असंख्य नाविन्यपूर्ण प्रयोग केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. आदर्श शाळा निर्माण करण्याचे खरे शिल्पकार शिक्षक असून अशा शाळांची संख्या वाढविण्यासाठी निर्धार करूया आणि उर्वरित सरकारी शाळांचा विकास करून त्यात भरीव पटसंख्या वाढवूया, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

शिक्षकांची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही

            ध्येयवादी आणि प्रयोगशील शिक्षकांची मोठी परंपरा या राज्याला लाभली असून या परंपरेमुळे इथली शिक्षण व्यवस्था अधिक समृद्ध झाली आहे. शिक्षकांची जागा कुणीही किंवा कोणतेही तंत्रज्ञान भरु शकत नाही इतके महत्त्वाचे स्थान त्यांचे आहे, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये चांगल वाइट शोधण्यासाठी शिक्षकांनी अधिक सजगपणे प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शाळाबाह्य मुलांच्या समस्या, मध्यान्ह भोजन व व्यक्तिगत लाभाच्या इतर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतील त्रुटी शोधून त्यांच्या सुलभतेने अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रीत करतानाच शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरतील असे महत्त्वाचे विषय, उपक्रमांना प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.



कोरोना काळातील आव्हानाचे संधीत रुपांतर

            आई-वडीलांबरोबरच शिक्षकांचाही प्रत्येकाच्या जीवनात मोठा वाटा असतो. हे सांगतानामुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधील शिक्षणाचा आणि शिक्षक रघुनाथ परब यांच्याविषयीची आठवण सांगितली. कोरोनाकाळातील आव्हानाचे संधीत रुपांतर करुन राज्यात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शिक्षकांचे वेतन खात्यात वेळेवर जमा व्हा

            शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होतील यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना विभागाला देतानाच केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील त्याचबरोबर शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बीड जिल्ह्यातील सोमनाथ वाळके व शशिकांत कुलथे या दोन शिक्षकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भिवंडी, सिंधुदूर्ग, पुणे, सोलापूर, नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, हिंगोली, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशीम, उस्मानाबाद, वर्धा, येथील शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी श्री. देओल यांनी आभार मान

००००ले..वे

जागतिक महोत्सव जय गणेश ,


 

आदर्श ghya आदर्श


 

Featured post

Lakshvedhi