Wednesday, 6 July 2022

 


निर्देश

 CM’s watch on flood relief work;

Be ready, Instructed to NDRF

      Mumbai, July 5 – In view of the incessant rains in some parts of the state including Konkan region, chief minister Eknath Shinde is keeping a close watch on disaster management as well as rehabilitation and relief work. As a part of preventive measure, 11 NDRF as well as SDRF teams have been deployed and 13 teams including 9 NDRF teams and 4 SDRF teams have been kept ready at base station.

      There is heavy rainfall going on in a few Talukas of Amravati division and entire Konkan which has led to flood-like situation in some places. Various measures are being taken at local level since water level in rivers is on a rise and NDRF as well as SDRF teams have been deployed at places where it is necessary.

      Palghar district in Konkan region recorded more than 100 mm rainfall in last 24 hours till 12 noon on Tuesday. The rain is continuing and meteorological department has predicted forecast of excessive rains there. In Mumbai, Colaba has recorded 117 mm while SantaCruz has recorded 124 mm rainfall in last 24 hours.

      There is no flood situation in Ratnagiri district at present but district administration is prepared since 2 rivers are flowing above the danger mark. In addition to this, landslide incidents are repeatedly taking place and as a measure of security Parshuram Ghat section has been closed for traffic and vehicular traffic is diverted by alternative route.

      In Pune division, there is no flood situation in Kolhapur district but since water level in rivers is rising direction have been issued to deploy 2 NDRF battalions.

      In Amravati district Chandurbajar and Morshi in Tivasa Taluka are witnessing flood situation and local residents in the village are being shifted to safer places with the help of local rescue teams.

०००


 

स्टार्ट अप

 राज्यात स्टार्टअपचे जाळे विस्तारण्यासाठी व्यापक धोरण.                                                                                                              - मनीषा वर्मा

महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये ‘टॉप परफॉर्मर’

            मुंबई, दि. 5 : राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आदींसारख्या महानगरांमध्ये असलेले स्टार्टअप्स राज्याच्या इतर भागातही विस्तारले जावेत यासाठी राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत धोरणे आखण्यात येत आहेत, अशी माहिती, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिली.

            केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांची स्टार्टअप रँकिंग जाहीर करण्यात आली. यामध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने 'टॉप परफॉर्मर' क्रमांक पटकवला. २०२१ च्या आवृत्तीच्या या क्रमवारीची घोषणा आणि विजेत्या राज्यांचा सत्कार समारंभ केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली येथे संपन्न झाला. विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांनी हा पुरस्कार स्विकारला.

राज्याला स्टार्टअप हब बनविण्याचे ध्येय - प्रधान सचिव मनिषा वर्मा

            यासंदर्भात प्रतिक्रिया देताना श्रीमती वर्मा म्हणाल्या की, राज्य शासनाने स्टार्टअप आणि उद्योजकता विकासासाठी राबविलेली विविध धोरणे, निर्णय, राज्यातील पूरक वातावरण, अनुकूल इकोसिस्टीम याची ही फलश्रुती आहे. केंद्र शासनामार्फत मिळालेल्या पुरस्कारामुळे यापुढील काळातही अधिक प्रभावी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. उद्योजकता आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात अनुकूल धोरणे राबविण्यात येत आहेत. राज्य शासन, उद्योजक, स्टार्टअप्स, एंजेल गुंतवणुकदार, इनक्युबेटर्स या सर्वांच्या सहभागातून स्टार्टअप्सच्या विकासाला चालना मिळाली आहे. स्टार्टअप यात्रा, स्टार्टअप सप्ताह, इनक्युबेटर्सची निर्मिती, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमार्फत युवकांमध्ये उद्योजकतेला चालना, विद्यापीठांमध्ये इनक्युबेटर्स, स्टार्टअप्सना पेटंटसाठी अनुदान अशा अनेक निर्णयांमुळे राज्यात स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. राज्याला प्रमुख स्टार्टअप हब बनविण्याचे आमचे ध्येय आहे. सर्वांच्या सहभागातून याला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

            श्री. कुशवाह म्हणाले की, राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी आणि उद्दिष्ट ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. नाविन्यपूर्ण दृष्टीकोण व प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात नाविन्यपूर्ण उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी नाविन्यता सोसायटी यापुढील काळातही विविध उपक्रम राबवेल, असे त्यांनी सांगितले.

            कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसचे प्रमुख आणि केसीआयआयएलचे संचालक प्रा. भूषण एल. चौधरी यांनीही या कामगिरीत योगदान दिले. 

महाराष्ट्रात १३ हजार ४५० स्टार्टअप्स

            केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार मंत्रालयामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. देशातील एकूण ७२ हजार ७०२ मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी १३ हजार ४५० स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. याबरोबरच राज्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत स्टार्टअप्सही आहेत. यामध्ये मुंबई महानगर प्रदेशात १४ हजार ७१०, पुण्यामध्ये ८ हजार ६०३, नागपूर मध्ये २ हजार ०५२, तर सिंधुदूर्गमध्ये ३६ स्टार्टअप्स आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये ३२ तर नंदुरबारमध्ये ३७ स्टार्टअप्स आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २५ ते ३० स्टार्टअप्स आहेत.

            याबरोबरच देशभरात २०२१-२२ आर्थिक वर्षात सुरु झालेल्या  ४४ स्टार्टअप्स यूनिकॉर्नपैकी ११ यूनिकॉर्नस महाराष्ट्रातील आहेत. यूनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन ७ हजार ५०० कोटी ते 75 हजार कोटी रुपये आहे.

स्टार्टअपच्या विकासाचा चढता आलेख

            केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांची स्टार्टअप रँकिंग जाहीर करण्यात येते. रँकिंग जाहीर करण्याची यंदाची ही तिसरी आवृत्ती होती. या रँकिंगमध्ये २०१८ च्या आवृत्तीत महाराष्ट्र हे उदयोन्मुख राज्य श्रेणीमध्ये होते तर २०१९ च्या आवृत्तीत नेतृत्व श्रेणीमध्ये होते. आता २०२१ च्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्राने 'टॉप परफॉर्मर'च्या श्रेणीमध्ये स्थान मिळविले आहे.

स्टार्टअप वीक, महिला इनक्युबेशन सेंटरसारखे उपक्रम ठरले प्रभावी

            यंदा ही रँकींग जाहीर करताना 7 व्यापक सुधारणा क्षेत्रांचा विचार करण्यात आला. यामध्ये स्टार्टअप्स आणि परिसंस्थेच्या भागधारकांना नियामक तसेच धोरण आणि आर्थिक समर्थन देण्यासाठी आवश्यक असे 26 कृती मुद्दे होते. या सुधारणा क्षेत्रांमध्ये संस्थात्मक समर्थन, नाविन्यता आणि उद्योजकतेला चालना देणे, बाजारपेठेत प्रवेश, इनक्युबेशन समर्थन, निधी समर्थन, मार्गदर्शन आणि क्षमता निर्मिती यांचा समावेश होता. महाराष्ट्र स्टार्टअप वीक, स्टार्टअप पोर्टल आणि महिला इनक्युबेशन सेंटर या प्रमुख उपक्रमांमुळे तसेच स्टार्टअप्सना बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राबविलेल्या समर्पित कार्यक्रमामुळे या क्रमवारीत महाराष्ट्राने 'टॉप परफॉर्मर' क्रमांक पटकावला.

०००

सावधान

 भारतीय हवामान खात्याने आपल्या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. मंत्रालय, मुंबई.


वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे यांनी समन्वय ठेवावा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून घेतला परिस्थितीचा आढावा.

            मुंबई, दि. 5 : मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले 24 तासात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, रेल्वेची २५ अशी ठिकाणे आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी उपनगरी रेल्वे विभाग, बेस्ट, मुंबई महानगरपालिका यांनी समन्वय साधून लोकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी तसेच त्यांच्यासाठी अल्पोपहाराची देखील सोय करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने तत्काळ कार्यवाही करावी.

            मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण पावसाच्या सद्यस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवून सर्वसामान्य नागरिक पावसामुळे कुठे अडचणीत सापडल्यास त्यांना तत्काळ मदत करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केल्या.

            आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबई शहर, उपनगरात नियंत्रण कक्षातून सुरू असलेली कार्यवाहीबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना माहिती दिली. मुंबई शहर, उपनगरात पावसामुळे झाडे अथवा फांद्या पडल्याच्या घटना, सरासरी पडलेला पाऊस, पाण्याचा निचरा संथगतीने होणारी ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, रोजचे अहवाल अद्यावत करण्याबाबतची माहिती देण्यात आली.

            यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, डॉ. संजीव कुमार, पी.वेलारासू, आपत्कालीन संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे, उपायुक्त यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.


****

Suprabhat

 


Featured post

Lakshvedhi