Wednesday, 29 June 2022

, मंदिर

 *Fact today*

*चिदंबरम रहस्यम*

*गुगल मुळे आपल्या लक्षात आले की भारतातील ५ प्राचीन शिवमंदिरे एका अक्षात उभी आहेत. यातील एक आहे चिदंबरम शिवमंदिर.*

*दहाव्या शतकात चोल राजांनी पाषाण आणि सुवर्ण वापरून या मंदिराची निर्मिती केली होती. श्री. थिरुमुलर या कवी आणि शास्त्रज्ञाने ५००० वर्षांपूर्वी "थिरुमंदिरम्" हा ग्रंथ लिहिला होता. यात मंदिर निर्माण करण्यासाठी शास्त्र सांगितले आहे. ते सांगताना नटराज रुपात शिवाच्या उजव्या पायाचा अंगठा नेहमी पृथ्वीच्या सर्वात जास्त चुंबकीय प्रभाव असलेल्या भागावर असतो हे नमुद केले आहे.*

*चिदंबरम मंदिर बांधताना थिरुमंदिरम् या ग्रंथाचा आधार घेतला गेला.*

*१. हे मंदिर सर्वोच्च चुंबकीय क्षेत्र असलेल्या अक्षावर बांधले गेले.*

*२. या अक्षावरची पाच मंदिरे ही पंचमहाभूतांची स्थाने आहेत. चिदंबरम म्हणजे आकाश तत्वाचे मंदिर, कलाहस्ती हे वायू तत्वाचे मंदिर, कांची एकांबरेश्वर हे पृथ्वी तत्वाचे मंदिर ४९ डिग्री, ४१ मिनिटे रेखांश वर आहेत.*

*३. या मंदिराला ९ दरवाजे आहेत जे मानवी शरीरातील ९ दरवाजे दाखवतात.*

*४. या मंदिराच्या गोपूरासाठी २१६०० सोन्याचे पत्रे वापरले गेले. मनुष्य एका दिवसात २१६०० वेळा श्वास घेतो.*

*५. हे सुवर्ण पत्रे बसवण्यासाठी ७२००० सोन्याचे खिळे वापरले गेले. मनुष्याच्या शरीरात ७२००० नसा असतात.*


*६. या मंदिराचे सभापटल म्हणजे पोनंबलम् आणि या तामीळ शब्दाचा अर्थ सुवर्णाचा हॉल. हेच नाव पुरुषांचे देखील असते. या मंदिराचे सभापटल डाव्या बाजूला आहे (मधोमध नाही) कारण मनुष्याचे ह्रदय डाव्या बाजूला असते.*

*७. या सभागृहात जाण्यासाठी ५ पायऱ्या आहेत. याला पंचाक्षर पदी म्हणतात. शि. वा. या. न. मः.*

*८. या मंदिराच्या दरबाराला कनघासाबाई म्हणतात. याचा अर्थ सुवर्ण दरबार. कनघ् म्हणजे सुवर्ण, साबाई म्हणजे दरबार. हा चार खांबांवर उभा आहे. चार खांब चार वेद आहेत. वेद म्हणजे ज्ञान. शिवाचा दरबार देखील ज्ञानाच्या आधारावर उभा आहे.*


*९. पोनंबलम् वर २८ खांब आहेत जे २८ आगम् दर्शवितात आणि या खांबांवर ६४ आडव्या बीम आहेत ज्या ६४ कला दर्शवितात.*

*१०. सुवर्ण पत्र्यांचे गोपूरावर ९ कळस आहेत जे उर्जेचे ९ प्रकार दाखवतात.*

*११. अर्थ मंडप चे ६ खांब हे ६ शास्त्रे दाखवतात.*

*१२. अर्थ मंडपाशेजारी आणखी एक मंडप आहे ज्याला १८ खांब आहेत, जे १८ पुराने दाखवतात.*

*एवढी सगळी माहिती तेथील सांगणाऱ्या कडून लिहून घ्यावी लागली कारण ती लक्षात राहणे अशक्य होते.*

*आपले शरीर हेच मंदिर आहे आणि आत्मा हाच शिव आहे असेच चिदंबरम मंदिर सांगतो, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल हेच सर्व विद्वान सांगत आहेत. कोणीतरी एकाने असे सांगितले आहे असे मुळीच नाही.*👌🏾👌🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

अधिवेशन


विधानसभेचे विशेष अधिवेशन ३० जूनला

 सर्व सदस्यांना सूचना जारी.

            मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या गुरूवार, दिनांक ३० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विधान भवन, मुंबई येथे अभिनिमंत्रित करण्यात आले आहे. सर्व विधानसभा सदस्यांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयामार्फत सूचित करण्यात आले असून सर्वांनी सभागृहात उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. राज्यपाल यांच्या निदेशानुसार हे विशेष अधिवेशन बहुमत चाचणीसाठी अभिनिमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


0000


 





 

सुप्रभात

 



शेती

 पाऊस असमाधानकारकपेरण्या खोळंबल्या

मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

 

            मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबतही गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्यांची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्के (20.30 लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार

            कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो.  त्यामुळे उद्या (29 जून ) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्तजिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठा नियोजनाबाबतचा आढावा घेणार आहेत.

राज्यात 496 टँकर्सने पाणीपुरवठा

            राज्यात 27 जूनअखेर 610 गावे आणि 1266 वाड्यांना 496 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या 66 तर खाजगी टँकर्सची संख्या 430 इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत 31 ने तर टचाईग्रस्त गावांच्या संख्येत 24 ने आणि वाड्या वस्त्यांच्या संख्येत 130 ने घट झाली आहे.

राज्यातील पाणीसाठा

            राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 28 जूनअखेर 21.82 टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात 33.80 टक्केमराठवाडा विभागात 27.10 टक्केकोकण विभागात 34.43 टक्केनागपूर विभागात 26.81 टक्केनाशिक विभागात 20.02 टक्केपुणे विभागात 12.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

-----०-----


आलेख शिक्षणाचा

 .

जिल्ह्यांचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल’ प्रकाशित.

            नवी दिल्ली, दि. 28 : केंद्र शासनाच्या ‘जिल्ह्यांच्या श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकात’ महाराष्ट्राने एका श्रेणीच्या वाढीसह उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये शेवटच्या क्रमांकाहून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेत सातारा जिल्ह्याने या निर्देशाकांत ‘अती उत्तम श्रेणी’ गाठली आहे.

               केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय आणि साक्षरता विभागाने सोमवारी शैक्षणिक वर्ष 2018-19 आणि 2019-20 साठीचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला. अशा प्रकारचा हा पहिलाच अहवाल असून याद्वारे शालेय शिक्षणाच्या प्रगतीचा राज्यांतर्गत तुलनात्मक आलेख मांडण्यात आला आहे.

            केंद्राच्या शालेय आणि साक्षरता विभागाने राज्यांसाठी ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ (PGI) तयार केला आणि संदर्भ वर्ष 2017-18 ते 2019-20 हे धरून अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वर्ष 2018-19 साठी 725 जिल्ह्यांची तर वर्ष 2019-20साठी 733 जिल्ह्यांची गुणात्मक क्रमवारी प्रकाशित करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावला

         देशातील सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधून प्राप्त माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या राज्यांच्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने वर्ष 2018-19 मधील ‘श्रेणी १’ वरून वर्ष 2019-20मध्ये ‘श्रेणी १+’ अशी प्रगती केली आहे. या अहवालांतर्गत देशातील राज्यांना प्रगतीच्या आधारे एकूण १००० गुणांकानुसार एकूण १० श्रेणीत विभागण्‍यात आले आहे. वर्ष 2018-19 मध्ये महाराष्ट्राने ८०१ ते ८५० गुणांच्या ‘श्रेणी १’ मध्ये स्थान मिळविलेल्या दोन राज्यांत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर वर्ष 2019-20मध्ये राज्याने या अहवालात ८६९ गुण मिळवून ‘श्रेणी १+’ मध्ये स्थान मिळविले आहे. याच श्रेणीत देशातील एकूण ७ राज्यांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

              ‘जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांका’त महाराष्ट्रातील जिल्ह्यांतर्गत सातारा जिल्ह्याने उत्तम कामगिरी करत वर्ष 2018-19 मधील शेवटच्या स्थानाहून (प्रचेष्टा-३) वर्ष 2019-20मध्ये थेट ‘अती उत्तम श्रेणीत’ स्थान मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.  


          जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाच्या–(PGI-D) रचनेत, ‘परिणाम, वर्गांमधील व्यवहारांचा प्रभाव, शाळेतील पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल शिक्षण आणि नियमन प्रक्रिया’अशा ६ श्रेणींमध्ये एकूण 83 निर्देशकांआधारे 600 गुण देण्यात आले आहेत. एकूण प्राप्त गुणांची प्रतवारी ९ श्रेणीत केली असून यात ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त जिल्ह्याची प्रतवारी ‘दक्ष’ श्रेणीत केली आहे. ८१ ते ९० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘उत्कर्ष’, ७१ ते ८० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘अतीउत्तम’, ६१ ते ७० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘उत्तम’, ५१ ते ६० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘प्रचेष्टा १’, ४१ ते ५० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘प्रचेष्टा २’ आणि ३१ ते ४० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘प्रचेष्टा ३’ अशा श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.

वर्ष 2019-20मध्ये राज्यातील २५ जिल्हे ‘उत्तम श्रेणी’त

       वर्ष 2019-20 मध्ये ‘अती उत्तम श्रेणी’त देशातील २० जिल्ह्यांनी स्थान मिळविले तर महाराष्ट्रातून सातारा या एकमेव जिल्ह्याने ४२३ गुणांसह या श्रेणीत स्थान मिळवून राज्यात प्रथम स्थान पटकाविले आहे. याच वर्षी उत्तम श्रेणीत राज्यातील २५ जिल्ह्यांनी स्थान मिळविले आहे, या श्रेणीत देशातील ९५ जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांचा समावेश ‘प्रचेष्टा १’ तर एका जिल्ह्याचा समावेश प्रचेष्टा २ मध्ये आहे.

        वर्ष २०१८-१९ मध्ये ‘उत्तम श्रेणी’त देशातील ८९ जिल्ह्यांनी स्थान मिळविले तर महाराष्ट्रातून १२ जिल्ह्यांनी.

देवदूत मराठी

 *"मराठी देवदूत"* 

हा मानवी जीवनाशी निगडित असलेल्या वेगवेगळ्या विषयासंबंधी महत्वपूर्ण व दर्जेदार माहिती उपलब्ध करून देणारा ब्लॉग....


*या ब्लॉगवरील नवनवीन पोस्टचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा..*

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.facebook.com/MarathiDevdoot/

Featured post

Lakshvedhi