Sunday, 5 June 2022

 मंदिरात तुफान गर्दी होती. दर्शनासाठी एवढी लांबलचक रांग बघून एका विदेशी मुलीला कमालीचं आश्चर्य वाटलं , तोच एक पुजारी तिच्याजवळ जाऊन म्हणाला , " मॅडम , रांग खूपच लांब आहे , असं इथं उभं राहून दर्शन होणं कठीण आहे . ५०१ रुपयांचा VIP पास घ्या , लगेच दर्शन होईल ." ती विदेशी मुलगी म्हणाली ," मी ५०१ रुपये देते , देवाला सांगा, बाहेर येऊन भेट ." पुजारी म्हणाला , " मॅडम , चेष्टा करता का ? देव कधीतरी मंदिराच्या बाहेर येतो का ? " ती विदेशी मुलगी नेटाने म्हणाली , " मी ५००० रुपये देते , देवाला सांगा , मला माझ्या घरी भेटा " रागाने लाल झालेला पुजारी म्हणाला , " तुम्ही देवाला काय समजलात ? " विदेशी मुलगी नम्रपणे म्हणाली , " हेच तर मी तुम्हाला विचारू इच्छिते . तुम्ही देवाला काय समजता ? नोटा छापण्याची मशीन ?

 🌹देव दगडात असतो कि नसतो?

☝एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान(अतिहुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.

👉जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी  विवेकानंद यांना सहज हसत हसत म्हणटले की,

    " स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.

किती मूर्खपणा आहे. 

मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.

तेहतीस कोटी काय या जगात एकही देव अस्तित्वात नाही."

     सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?❔

       आणि.....

तो व्यक्ती खदखदा हसू लागला. 👉हे सर्व स्वामी विवेकानंदांनी 

शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,

 " तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? "

  त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."

  ✨    स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.

     तो व्यक्ती निरूत्तर झाला. 

त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं. 

     त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.

  स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि, 

🌟आता एक काम करा, या फोटोवर थुंका.

       तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला.  "काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो."

          स्वामी विवेकानंद म्हणाले, " तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत." 

त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो. त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."

 ✨🌟  

यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि

👉 "जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते."

 हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.

☝     परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे. कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.

  💐  संत तुकाराम महाराज म्हणतात.

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले । 

तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा।

   

☝ देव जाणून घेण्यासाठी पॆसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो.

  ☝देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा.

 






 





 

 स्वच्छता ही संस्कृती बनावी

                                                             -बाळासाहेब थोरात

            स्वच्छतामाझी वसुंधरा हे अभियान ही केवळ रोज राबविण्याची बाब नाही तर ती जनमानसात रूजून आपली संस्कृती बनली पाहिजेअसे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. मागील दोन वर्षांच्या कठीण काळात सर्वच अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाचे मोजमाप करता येणार नाही. पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान होत आहे ही आनंदाची बाब असून अशाच इतरही चांगल्या कामाची जाणीव सर्वांना झाली पाहिजेअसे त्यांनी सांगितले. पर्यावरणपर्यटन या विभागांमध्ये चांगली कामे होत असल्याचे सांगून त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. पुढील वर्षी पारितोषिकांचा हा कार्यक्रम यापेक्षाही मोठ्या स्वरूपात घ्यावाअसे ते म्हणाले.

इज ऑफ लिव्हिंगसाठी काम करायचे आहे

-आदित्य ठाकरे

            पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करतानाच शाश्वत विकास साधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करायचे आहेअसे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनोगताद्वारे व्यक्त केले. ग्रीन ग्रोथ हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर रोजगार निर्मिती आणि आर्थिक चक्र गतिशील राहण्यासाठी देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पंचतत्वाच्या रक्षणासाठी काम होत आहे. याकामामध्ये मंत्रिमंडळापासून गाव पातळीपर्यंत सर्वांचे पाठबळ आणि सहकार्य लाभल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

            नुकत्याच डावोस येथे झालेल्या परिषदेत गुंतवणुकीबरोबरच शाश्वततेवर भर दिला जात होताहा जागतिक पातळीवर होत असलेला मोठा बदल असून राज्याच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाबाबत कौतुकाने बोलले जात असल्याचा अनुभव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती देऊन यामुळे देशाला प्रगतीची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नवी दिशा दाखवणारे काम होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            प्रास्ताविकाद्वारे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन या अभियानाच्या वाटचालीचा आढावा घेतला. एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर यांनी राज्यात पर्यावरणाबाबत होत असलेली जागृती कौतुकास्पद असून हे काम देशाला दिशादर्शक असल्याचे सांगितले. सकाळ चे संपादक सम्राट फडणीस यांनी या अभियानाला माध्यमांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तरटाइम्स ऑफ इंडियाचे पार्थ सिन्हा यांनी देखील यावेळी बोलताना मानवाला राहण्यासाठी एकच पृथ्वी अस्तित्वात असल्याने तिला जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले.

            माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत विविध पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये अमृत शहरांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अभिजित बांगरउत्कृष्ट विभागीय आयुक्त सौरभ रावपुणेउत्कृष्ट जिल्हाधिकारी पातळीवरील पुरस्कार राहुल रेखावारकोल्हापूरउत्कृष्ट जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि आशिष येरेकरअहमदनगर आदींसह विविध संस्था आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी शालेय शिक्षणामध्ये प्रगतीसाठी शासन आणि सीईडब्ल्यू तसेच युनिसेफ यांच्यादरम्यान सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय भुस्कुटे यांनी केले.

 

00000








Featured post

Lakshvedhi