Tuesday, 10 May 2022

भवताल

 


३५०० वर्षांपूर्वीचा इतिहास एका भांड्याने कसा उलगडला?

त्याची गोष्ट... (भवतालाच्या गोष्टी ०७)

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका. तिथे घोड नदीच्या काठावरील इनामगाव हे गाव. हा तसा दुष्काळी पट्टाच. तिथे अभ्यासकांना एक मातीचे भांडे मिळाले. लाल रंगाचे भांडे आणि त्याच्यावर काळ्या रंगात नक्षी आणि काही चित्रे. म्हटलं तर त्यात काय विशेष? पण याच भांड्याने प्राचीन काळातील हवामानाचा इतिहास उलगडला. किती प्राचीन?.. तर तब्बल ३५०० वर्षांपूर्वीचा. हे सारं रोमांचक आहे आणि विस्मयकारकसुद्धा. याच भांड्याची आणि त्याने उलगडलेल्या हवामानाच्या इतिहासाची ही गोष्ट.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील सातवी गोष्ट.)

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Earthen-Pot-tells-history

------.------ 

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

#भवताल #भवतालाच्यागोष्टी #मातीचेभांडे #काळवीट #इनामगाव #उत्खनन #हवामान #प्राचीनहवामान #Bhavatal #StoriesOfBhavatal #EarthenPot #Excavation #Inamgaon #Climate #AncientClimate #Blackbuck 

--

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Monday, 9 May 2022

स्त्री जन्मा कहाणी

 Mother's day, एक शोकांतिका....


खरं तर एक स्त्री रोग तज्ञ म्हणून हे प्रसंग मला नवीन नाहीत पण हे सगळे मागच्या तीन ते चार दिवसात एकत्रित घडलेत . Mother's day च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आईप्रती भावनांचा जो काही धुमाकूळ घातला जातोय, आजचा लेख त्यावर शोकांतिका म्हणून नक्की वाचा! एकच वाटतं, अजुनही २०२२ साली, नको तो जन्म बाईचा....

प्रसंग १

    १९ वर्षाची पहिलटकरीण, बाळाचे ठोके कमी होताय म्हणून सिझरला शिफ्ट करत असताना, नवरा हात जोडून, " मॅडम, बाळ वाचेल ना? लवकर करा सीझर ...." तोच नवरा मुलगी झाली हे कळल्यावर तोंडावर सांगून गेला, " आधीच्या दोन बायकांना मुलीच झाल्या म्हणून तिसरं लग्न केलं होतं, हिलाही मुलगीच झाली. माझा आणि हिचा काही संबंध नाही...." 

     तिसरं लग्न त्याचं, हिचं पहिलं? कोणी लावलं? इतके लग्न officially कसे करू शकतं कोणी? आता ही काय करणार? सगळे प्रश्न अनुत्तरित ठेवून तो माझ्या डोळ्यासमोर निघून गेला.

प्रसंग २

      प्रचंड सुजलेली , BP वाढलेली, दिवस पूर्ण भरलेली बाई आणि नवरा लेबर रुमला आले. येताच पहिलं वाक्य, पैसे नाहीत, करायला कुणी नाही. हॉस्पिटल मॅनेजमेंट ला फोन करून बिलात सवलत मिळवून घेतली. डिलिव्हरी झाल्यावर गुंतागुंतीमुळे पेशंटला ICU त ठेवले. पैशाची सोय करून येतो म्हणून तिला लेबर रूम मध्ये गेलेला नवरा अजुनही परत आलेला नाही. तिला घरच्यांचा नंबरही पाठ नाही. हॉस्पिटलने, डॉक्टरांनी कशी आणि किती जबाबदारी घ्यायची ? आहे उत्तर ? 

प्रसंग ३

     २७ वर्षीय बाई, परवा रात्रीपासून ब्लिडिंग होतंय म्हणून अर्धवट बेशुद्ध अवस्थेत दाखल. नाडी १३०, bp ८०/५०, पांढरीफटक पडली होती. हिमोग्लोबिन रिपोर्ट आला ३ ग्रॅम. योग्य ते उपचार, रक्त देऊन तिला सेटल केल्यावर रागावले, "इतकं कशाला अंगावर काढायचं? यायचं ना लगेच... जीवावर बेतलं असतं" तिचं त्यावर उत्तर, " ताई, नवऱ्याला दोन दिवस सांगते आहे, दारूला पैसे असतात पण मला दवाखान्यात न्यायला नाही. चक्कर येऊन पडले म्हणून उचलून आणली "

    काय बोलणार, आहे उत्तर ?

प्रसंग ४

     गर्भनलिकेत राहिलेला गर्भ फुटून ( ectopic pregnancy ) पोटात रक्तस्त्राव झाला होता. Emergency ऑपेरेशन करून त्या बाजुची गर्भनलिका काढून टाकली आणि बाईचा जीव वाचला. नवऱ्याची प्रतिक्रिया, " दुसऱ्या नळीवर प्रेग्नन्सी राहीलच असं लिहून द्या, तरच बिल भरतो. नाहीतर एवढ्या बिलात तर दुसरं लग्न होईल माझं...." 

    चूक डॉक्टरची , तिची की नवऱ्याच्या प्रवृत्तीची ? 

    काल २४ तासांची ड्युटी करून हा लेख लिहिण्याचा अट्टहास मी एवढ्यासाठी केला की उद्या mother's day म्हणून खूप कौतुक करतांना ह्या असहाय आयांची तुम्हाला आठवण यावी. अरे, नका देऊ आईला लाखोंचे गिफ्ट्स, द्या एका स्त्रीला सन्मान, काळजी घ्या तिच्या आरोग्याची. बदला दृष्टिकोन तिला creation आणि recreation चे साधन म्हणून बघण्याचा !

    एक कळकळीची विनंती, आजुबाजुला अशी महिला दिसली तर जरूर मदत ( उपकार नाही ) करा. Mothers day ला घ्या ना विकत १०० लोहाच्या गोळ्या आणि वाटा तुमच्या घरातल्या कामवाल्या बायांना, सिक्युरिटीच्या बायकांना किंवा साईटवर काम करणाऱ्या महिलांना. घेऊन जा एखाद्या प्रेग्नन्ट गरीब महिलेला दवाखान्यात किंवा द्या तिला सकस आहाराचं पॅकेट !

   प्रत्येक स्त्री मध्ये आई बघा, आई बघा....

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

 


 एकजण एका म्हाताऱ्याला विचारतो की 75 व्या😚 वर्षी पण तुम्ही बायकोला

डार्लिंग, जानु, स्वीटी, बेबी, हनी, माय लव्ह! कसं काय बोलता...

या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय?

               😜😜😜

            म्हातारं म्हणालं...

*कसलं प्रेम अनं कसलं गूपीत 1 वर्षे झालय म्हातारीचं नाव विसरलोय...तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही..*.

        🤗😇😇😁😁

 *वयाची ६० वर्षे उलटल्यावर व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही.*

*१.* :- जस-जसे वय वाढत जाते तस-तसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळू-हळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल, व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यग्र-व्यस्त असेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा, हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे.    

*२.* :- उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्वायुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल, अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल, तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला वार्धक्य हे येणारच आणि वार्धक्यात तुमच्या आजू-बाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी-हांजी करणारे लोक तुमच्या पासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे त्याचे कुठलाही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे, त्याला पसंती दर्शवणे, हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे.

*३.* :- वय झाल्यावर आता पुढचा रस्ता अडचणींचा व अडथळ्यांचा आहे. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूसंबंधी विविध विकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासमोर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी-खुपणी यांना तुमचे मित्र समजा, कारण यांच्याबरोबरच आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशा भ्रमात राहू नका. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार-विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे.    

*४.* :- एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे, ह्याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून ह्या जगात आलो ते प्रथम पलंगावरच. आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढ-उतार, हेलकावे, जीवनसंघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे, पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार ह्या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोचतो, फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण ह्या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही. असे कोणी असले तरी ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. 

परिचारिका { 'nursing staff' } वगैरेंवर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळात येऊ शकते, पण त्यांच्या जवळ आईची माया कुठून असणार ? चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने, कंटाळून, त्या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा.  

*५.* :- आता जीवनमार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतीलच. त्यातील बहुतेक जणांना माहित असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे, आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेजेस पाठवतील, ई-मेल करतील. तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील, 'लवकर श्रीमंत व्हा' यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील, दीर्घायुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील, वगैरे वगैरे. थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोकं कुठल्याही थराला जातील. म्हणूनच सावध राहा, काळजी घ्या,आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाहीत तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही, म्हणून ह्या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा.

शेवटची घटीका येण्यापूर्वी, आयुष्यातील संधीकालात, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्वकाही अंधारून आल्यासारखे वाटेल, आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच, ...

*एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका* व तसे इतरांना दाखवू पण नका.

 *उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल.* 

आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. 

*कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे.* 

निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत , जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील आपले मार्गक्रमण संतुलित करा.    


आपण सर्वांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे, खूप छान, खूप सुंदर

आत्ताच दिवस सुरु झाला ... आणि बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले.

काल सोमवार होता असे वाटत होते ... आणि आज शुक्रवार आला सुद्धा.  

*... महिना संपत आला,*

*... वर्ष संपायला आले,*

*...आणि वयाची ५०, ६०, ७० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही*

*..आपले आई-वडील,आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे ?*  

चला तर मग, जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ.

*आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...*

*आपल्या आयुष्यात रंग भरुया ...* 

*छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया ...*  

*हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया ...*  

उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे

तरमग कुठलीही कृती पुढे ढकलू नका

*... हे नंतर करेन*

*... हे नंतर सांगीन*

*... यावर नंतर विचार करेन*  

'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे .....

कारण, आपण हे समजून घेत नाही की

चहा थंड झाल्यानंतर ...

प्राधान्य बदलल्यानंतर ...

उत्साह निघून गेल्यानंतर...

आरोग्य बिघडल्यानंतर ...

मुले वयात आल्यानंतर ...

आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...  

आश्वासन न पाळल्यानंतर...

दिवसाची रात्र झाल्यानंतर ...

आयुष्य संपल्यानंतर ...

आणि ह्या सगळ्या 'नंतर' नंतर आपल्याला कळते अरे बापरे... उशीर झाला की ...  

*" आणि म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका.

'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात

उदाहरणार्थ ... उत्तम अनुभव, उत्तम मित्रमंडळी, उत्तम कुटुंब "*

*दिवस आजचा ... आणि क्षण आत्ताचा ...*  

*आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही, कारण आता आपले वय उतरणीस लागलेय.*

तर बघूया की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोचवत आहे ? कारण..,

 *हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ... तर कदाचित तो पुढे कधीच पाठविला जाणार नाही.*

*जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंत सुद्धा हा संदेश पोचावा.*

*सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा.*

 🙏 🙏 🙏 🙏 🙏

*एका इंग्रजी लेखाच उत्कृष्ट मराठी अनुवाद!*

माहिती संग्रहीत व संकलित

घोंगडी

 **घोंगडी हे पवित्र वस्त्र*


 "वीर्यस्पृष्टं शवस्पृष्टं स्पृष्टं मूत्रपुरीषयोः । रजस्वलादिसंस्पृष्टमाविकन्तु न दुष्यति ।।"

आविक म्हणजे घोंगडी वस्त्रास वीर्य, प्रेत, मल, मूत्र व रजस्वला यांचा स्पर्श झाला तरी ते वस्त्र दूषित होत नाही असे शास्त्र वचन आहे.


*धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडीचे महत्व:*


प्रत्येक साधकाकडे घोंगडी असणे गरजेचे असते

आपण करत असलेल्या साधनेला उच्च स्थरावर घेऊन जायचे असेल तर साधना घोंगडीवर करावी.


पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी , धार्मिक अनुष्ठान करण्या साठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीचा माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांचा पेहरावा मध्ये घोंगडीचा वापर होता. 

अध्यात्मिक साधना, ध्यान-धारणा, योग आणि मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी असलेले घोंगडीचे महत्व हे ऋषींनी आणि संत महात्म्यांनी पुराणकाळापासून वर्णलेले आहे. शरीरातील उर्जा आणि तापमान नियंत्रित राहत असल्याने घोंगडी वर केलेल्या साधनेतून अत्युच्च मानसिक समाधान मिळते. श्री गुरुचरित्र पारायण, श्री गुरुलीलामृत, श्री गजानन विजय, श्री साईं सत्चरित्र, श्री दुर्गा सप्तशती आणि इतर सर्व आध्यात्मिक साधना व मंत्रांच्या अनुष्ठानासाठी घोंगडी चा उपयोग करावा. वारकरी संप्रदाय मध्येही घोंगडी वापरला अत्यंत महत्व आहे. पितृदोष असणाऱ्यांनी काळे घोंगडे दान करावे कारण घोंगडे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पितृदोष असणाऱ्यांना. महालक्ष्मी पूजनासाठी सुद्धा घोंगडे वापरले जाते.


*घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-*


▪️पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून                 आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड         प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.

▪️झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.

▪️उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

▪️कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.

▪️घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. .

▪️हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.

▪️घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.

▪️अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.

 🙏🌹


 "वीर्यस्पृष्टं शवस्पृष्टं स्पृष्टं मूत्रपुरीषयोः । रजस्वलादिसंस्पृष्टमाविकन्तु न दुष्यति ।।"

आविक म्हणजे घोंगडी वस्त्रास वीर्य, प्रेत, मल, मूत्र व रजस्वला यांचा स्पर्श झाला तरी ते वस्त्र दूषित होत नाही असे शास्त्र वचन आहे.

*धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडीचे महत्व:*

प्रत्येक साधकाकडे घोंगडी असणे गरजेचे असते

आपण करत असलेल्या साधनेला उच्च स्थरावर घेऊन जायचे असेल तर साधना घोंगडीवर करावी.

पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी , धार्मिक अनुष्ठान करण्या साठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीचा माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांचा पेहरावा मध्ये घोंगडीचा वापर होता. 

अध्यात्मिक साधना, ध्यान-धारणा, योग आणि मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी असलेले घोंगडीचे महत्व हे ऋषींनी आणि संत महात्म्यांनी पुराणकाळापासून वर्णलेले आहे. शरीरातील उर्जा आणि तापमान नियंत्रित राहत असल्याने घोंगडी वर केलेल्या साधनेतून अत्युच्च मानसिक समाधान मिळते. श्री गुरुचरित्र पारायण, श्री गुरुलीलामृत, श्री गजानन विजय, श्री साईं सत्चरित्र, श्री दुर्गा सप्तशती आणि इतर सर्व आध्यात्मिक साधना व मंत्रांच्या अनुष्ठानासाठी घोंगडी चा उपयोग करावा. वारकरी संप्रदाय मध्येही घोंगडी वापरला अत्यंत महत्व आहे. पितृदोष असणाऱ्यांनी काळे घोंगडे दान करावे कारण घोंगडे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पितृदोष असणाऱ्यांना. महालक्ष्मी पूजनासाठी सुद्धा घोंगडे वापरले जाते.

*घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-*

▪️पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.

▪️झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.

▪️उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

▪️कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.

▪️घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. .

▪️हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.

▪️घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.

▪️अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.

 🙏🌹

कच्चा पापड पक्का पापड


 

Featured post

Lakshvedhi