कदम सर, माणगाव
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 8 May 2022
पुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट.
सातारा दि. 7: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली. भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहेत. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपट दाखविण्यात आला. प्रशांत भिलारे यांच्या मंगलतारा या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज, गडकिल्ले, शिवकालीन इतिहासावर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहेत. येथेही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख,उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील तसेच भिलार येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
सर्वांसाठी पाणी हे धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका देशात पहिली महानगरपालिका;
सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकर
मुंबई, दि.7: मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या धोरणाच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसाला हक्काचे पाणी मिळणार आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका देशात पहिली महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, नागरी निवारा परिषद गोरेगांव येथे बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील सर्व निवासी रहिवाशांसाठी असणाऱ्या “सर्वांसाठी पाणी” धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सर्वश्री सुनिल प्रभू, राजहंस सिंह, रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ.इकबालसिंह चहल आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळी “सर्वांसाठी पाणी !” धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पर्यावरणाची कमीत कमी हानी करून विकास कामे करावयाची आहेत. महानगरपालिकेची बेस्ट सेवा ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून वाहतूक,पाणी, आरोग्य सुविधा, महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा वाढविण्याच्या होत असलेल्या कामाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
सर्वांसाठी पाणी हे धोरण जाहीर करणे हा ऐतिहासिक क्षण- पालकमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई शहरामध्ये 16 विविध संस्था कार्यरत आहेत. या सर्वांना एकत्रित घेऊन मुंबई शहराला एक दिशा दिली आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण जाहीर करणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
मुंबई 24 तास काम करणारी, स्वप्न बघणारी आणि ती पूर्ण करणारी आहे. ट्रान्स हार्बर लिंक, मालमत्ता करामध्ये सूट, सर्वांसाठी पाणी असे अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांबरोबरच 2026 पर्यंत सुमारे तीन हजार इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत, असे अनेक निर्णय घेत शाश्वत विकास करत मुंबईला पुढे नेण्याचे काम होत असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले
सर्वांसाठी पाणी हा कौतुकास्पद उपक्रम –प्रा. वर्षा गायकवाड
अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर पाणी ही मूलभूत गरज आहे. सर्वांसाठी पाणी हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
सर्वांसाठी पाणी धोरणाची उद्दिष्ट्ये
खासगी जमिनीवरील अघोषित झोपडपट्टीधारकांना पाणीपुरवठा करणे. तटीय नियमन क्षेत्रातील (सीआरझेड) झोपडपट्टी धारकांना सार्वजनिक नळ खांबाद्वारे पाणीपुरवठा करणे. क्षमापित निवासी इमारतींमधील अनधिकृत वाढीव बांधकामांना नळ जोडणी देणे. प्रकल्पबाधित झोपडपट्टी धारकांना पाणीपुरवठा करणे. निवासी इमारती किंवा त्यांचा काही भाग ज्याचे नकाशे मंजूर नाहीत, परंतु बांधकाम प्रारंभ पत्राशिवाय झाले आहे, त्यांना नळ जोडणी देणे ही या धोरणाची उद्दिष्टे आहेत.
0000
भवताल
या पावसाळ्यात भवताल सोबत
तुम्हीपण पाऊस मोजणार ना?
- पुढील आठवड्यात नावनोंदणी सुरू
उन्हाच्या झळा वाढल्यामुळे पावसाळ्याचे वेध लागले. आणि पावसाळा म्हणजे ‘भवताल’चा सामूहिकरित्या पाऊस मोजण्याचा ‘भिजूया आणि मोजूया’ हा उपक्रम. त्यात गेल्या वर्षी महाराष्ट्रभरातून २७७ जणांनी पाऊस मोजला. येत्या पावसाळ्यात हा उपक्रम आणखी व्यापक केला जाणार आहे. त्यासाठी ‘भवताल’ची टीम आणि अद्ययावत वेबसाईटसुद्धा सज्ज आहे. पुढील आठवड्यापासून नावनोंदणी सुरू होईल. त्यात तुम्हीसुद्धा भाग घेणार ना? याबाबतच्या चुकवू नका, घोषणेवर लक्ष ठेवा.
सविस्तर माहितीसाठी लिंक-
https://www.bhavatal.com/Rainfall-2022-announcement-soon
भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय: bhavatal.com
(इतरांसोबतही शेअर करा)
#भवताल #भिजूयाआणिमोजूया #पाऊसमोजण्याचाउपक्रम #पाऊस #पर्जन्यमापक #पावसाळा #मान्सून #Bhavatal #RainfallMeasuringActivity #BhijuyaAniMojuya #Rain #Rainfall #Monsoon #RainySeason
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
Saturday, 7 May 2022
वांद्रे येथील भूखंडाबाबत मागील दोन दिवस काही वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत
या बातम्यांबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेले स्पष्टीकरण :
1.सदर जागेचा भाडेपट्टाबाबतची वस्तुस्थिती
सदर जागा पहिल्यांदा ब्रिटिश सरकारचा कार्यालयात श्री.जलभाय आर्देशिर सेट यांना 1 जानेवारी 1901 ते 31 डिसेंबर 1950 अशा 50 वर्षांसाठी निवासी प्रयोजनाने वांद्रे जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या अंधेरी येथील प्लॉट नंबर 202 भाडेपट्टयाने देण्यात आला. तसेच वांद्रे उपनगर जिल्ह्यातील कार्यालयाकडे असलेल्या कागदपत्रांनुसार 29 एप्रिल 1910 सदर भूखंड डी.जे.टाटा आणि इतर यांच्या नावे निवासी प्रयोजनासाठी हस्तांतरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर भाडेपट्टयाची मुदत संपुष्टात आल्यानंतर ट्रस्टीज ऑफ बांद्रा पारसी कॅन्वलसेंट होम यांना 17 सेप्टेंबर 1975 रोजीचा आदेशान्वये 30 वर्षांच्या कालावधीकरिता निवासी प्रयोजनासाठी वार्षिक भाडेपट्टा रक्क्म 4 हजार 65 रुपये निश्चित करुन मुदत वाढविण्यात आली असून या दरामध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नव्हती.
2.सदर जागा सार्वजनिक प्रयोजनासाठी दिली होती का
नाही, या कार्यालयात उपलब्ध असलेल्या सर्व दस्तावेजान्वये सदर जागेचा भाडेपट्टा निवासी प्रयोजनासाठीच देण्यात आला होता.
3.सदर जागेचा भाडेपट्टा नूतनीकरण करण्यात आला होता का
होय. शासन निर्णय 12 डिसेंबर 2012 आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 30 मार्च 2013 च्या पत्रानुसार निवासी प्रयोजन विचारात घेऊन भाडेपट्टयाने प्रदान करण्यात आलेली जमीन नुतनीकरण/कब्जेहक्काने घेणेबाबतचा विकल्प भाडेपट्टेदार संस्थेस उपलब्ध करुन देण्यात आला होता. अर्थातच सदर जागा निवासी प्रयोजनासाठीच होती व कधीही याचा प्रयोजन बदललेल्या दिसत नाही.
दरम्यान शासन अधिसूचना दि. 08/03/2019 नुसार भाडेपट्टयाने दिलेली जमीन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करणेकामी भाडेपट्टेदार यांनी अर्ज केला व दि.24 जून 2021 च्या आदेशान्वये या प्रकरणात 31 डिसेंबर 2011 पर्यंत मानीव नुतनीकरण करुन 1 जानेवारी 2012 पासून पुढील 30 वर्षांकरिता निवासी प्रयोजनार्थ नुतनीकरण करण्यात आलेले आहे. तसेच याबाबत 13 जुलै 2021 रोजी भाडेपट्टा करारनामा करण्यात आला आहे तसेच 1 सप्टेंबर 2021 रोजी हा भाडेपट्टा करारनामा नोंदणीकृत करण्यात आला आहे.
4.सदर जागेच्या भाडेपट्टा सवलतीच्या दराने करण्यात आला होता का?
नाही, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सवलतीचा दर विचारात घेऊन भुईभाडे आकारण्यात आलेले नाही. तसेच कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन प्रदान करण्यात आलेली नसून ती निवासी प्रयोजनास्तव प्रदान केलेली आहे. म्हणून निवासी प्रयोजनासाठी दिलेल्या जागेवर अनुज्ञेय असलेल्या शुल्क लावूनच सर्व कार्यवाही झालेली दिसून येत आहे.
5.वर्ग 1 रूपांतरणासाठी अनुज्ञेय रूपांतरण शुल्क घेण्यात आला आहे का
होय. 8 मार्च 2019 रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार रहिवासी प्रयोजनासाठी भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनीवर प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रातील दराप्रमाणे येणा-या किंमतीच्या 25% एवढी रक्कम आकारून वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्याची तरतूद आहे व त्याप्रमाणेच भाडेपट्टेदार संस्थेकडून भोगवटादार वर्ग-1 चे रुपांतरण शुल्काची रक्कम 28 कोटी 34 लाख 85 हजार 111 वसूल करुन घेवून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने 14 ऑक्टोबर 2021 रोजी भाडेपट्टयाचे रुपांतरण भोगवटादार वर्ग- 1 मध्ये केले आहे.
6.सदर रूपांतरणास शासनाचे नुकसान झालेले आहे का
नाही. सदर रूपांतरण संपूर्ण महाराष्ट्रात लागू असलेल्या शासन अधिसूचना 8 मार्च 2019 अन्वये वार्षिक विवरण दर (2021) अन्वये लागू असलेल्या रूपांतरण शुल्क आकारून करण्यात आलेला असल्याने शासनाचे नुकसान होण्याचा प्रश्नच उद्वभवत नाही.
0000
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबार
सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण करावे
पालकमंत्री असलम शेख
मुंबई, दि.7: वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यां बाबत आज मुंबई मा.जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला. या मध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सर्व तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश श्री.शेख यांनी दिले.
या वेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे संजय पाटील, झोपडपट्टी पुनर्वसनचे सहायक अभियंता संतोष शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिका व म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या जनता दरबारामध्ये उपस्थित नागरिकांनी आपले विनंती अर्ज मंत्री श्री.शेख यांच्याकडे सपूर्द करत आपले म्हणणे मांडले. यामध्ये माझगांव विभागातील बीआयटी चाळीचा पुनर्विकास, गिरगांव चौपाटी सेल्फीपॉईंट करिता निधी उपलब्ध करणे, आमदार व खासदार यांच्या स्थानिक निधीतून बांधण्यात आलेल्या जागांचे मालमत्ता कर माफ करणे, वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामामुळे आचार्य दोंदे मार्ग परळगाव रस्त्यावर वाहतुकीमुळे होणारी गैरसोय, मलबार हिल परिसरातील मुलभूत कामे, धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकर पूर्ण करणे, वाळकेश्वर येथील तलावाची साफसफाई होणे, तसेच दक्षिण मुंबई येथील ए, सी आणि डी वार्ड मधील पाणीपुरवठा सुरळीत करणे आदी तक्रारींबाबत तातडीने निवारण करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना मंत्री श्री.शेख यांनी दिल्या.
0000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...