Thursday, 11 November 2021

 दिलखुलासकार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची मुलाखत

 

         मुंबईदि. 11 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एअरया ॲपवर शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

              अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई यांनी दुर्मिळ होत जाणाऱ्या असंख्य देशी बियाण्यांचे जतन आणि संवर्धन केले आहे. ते करीत असताना त्यांना आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी कशी मात केलीबीजबँकेची केलेली उभारणी आदी विषयांची माहिती श्रीमती राहीबाई पोपेरे यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

000000

 महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बॅंकेचा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा

राज्य सहकारी बॅंक : सामान्य माणसाला

स्वबळावर उभे करणारे शक्तीकेंद्र

माजी केंद्रीय कृषिमंत्रीज्येष्ठ नेते खासदार शरद पवार

सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज

- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी

               मुंबई दि. 11 : राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्रीज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा 110 वा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा केंद्रीय कृषिमंत्रीज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. या सोहळ्याला विधानपरिषदेच्या  उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यातील जिल्हा बँकांचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

            खासदार श्री.पवार म्हणालेराज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी या राज्य सहकारी बँकेने मोठे योगदान दिलेले आहे. बँकेचा 11 दशकांचा प्रवास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे पान आहे.  वैकुंठभाई मेहताविठठ्लदास ठाकरसीधनंजय गाडगीळ हे बँकिंग क्षेत्राशी बांधिलकी असणारे आणि या क्षेत्रातील कर्तृत्ववान अशा या व्यक्ती आहेत.  या प्रत्येक व्यक्तीचे सहकार क्षेत्रात योगदान आहे. अनेक संस्था या बँकेमार्फत राज्यात उभ्या राहिल्या आहेत. मधल्या काळात बँकेची परिस्थिती पाहता सहकार क्षेत्राला चिंता वाटावी असे चित्र निर्माण झाले. मात्र आता राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत आहे. त्यामुळे या बँकेच्या उभारणीसाठी ज्यांनी योगदान दिले अशा व्यक्तींची तैलचित्रे इथे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या पिढीला या सर्वांची ओळख या माध्यमातून होईल. या तैलचित्रांसोबतच त्यांच्या योगदानाचे टिपणही आवश्यक आहे. बँकेची ही उत्तम वाटचाल पाहता लोकांच्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास श्री.पवार यांनी व्यक्त केला.

             केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील विकासाचा अनुभव आपण घेतला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची मुहुर्तमेढ करणाऱ्या व्यक्तिंच्या तैलचित्राचे अनावरण ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे मुल्यमापन केल्यास ग्रामीण जनजीवनातील घडलेले सामाजिक आणि आर्थिक बदल यातून सहकारातील दृष्टीकोन लक्षात येईल. देशाच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्रात 22 ते 24 टक्के, सेवाक्षेत्रात 25 ते 54 टक्के आणि कृषी क्षेत्रात 8 ते 12 टक्केच योगदान राज्यांचे आहे. कृषी क्षेत्रातील योगदान वाढण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळात गरीबी, भूकबळी आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. त्या जनतेला आर्थिक सक्षम, समृद्ध करण्याकरिता सहकाराचा विचार देशाला मिळाला. देशात 115 जिल्ह्यांचा विकासदर कमी असून त्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपणा आहे. येथील दरडोई उत्पन्न, विकास दर आणि कृषी विकास दर नगण्य असल्यामुळे देशाच्या विकासदराचा उच्चांक गाठण्यात अडचणी येत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी आणि परिवर्तन घडवून आणणे हेच सहकार चळवळीचे यश मानले जाईल.

            सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज आहे. वैशिष्टे जोपासून काळानुरुप बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी उपलब्ध ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास महाराष्ट्र आणि देशाचे रुप पालटेल, असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

            बँकेचे पहिले संस्थापकसंचालकांच्या स्मृतींना उजाळा देत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले110 वर्षांच्या मोठ्या कालखंडाची परंपरा असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही सर्व जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणून काम करते. विकास सोसायट्याजिल्हा बँका आणि राज्य सहकारी बँका यांच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. महाराष्ट्राच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा फार मोठा वाटा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडविण्यात या बँकेचे योगदान मोठे आहे. अलिकडच्या काळामध्ये सहकार क्षेत्रात बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करुन पुढे जात असताना भविष्यात या बँकेच्या माध्यमातून राज्यातील विकास सोसायट्याजिल्हा बँका आणि नाबार्डच्या माध्यमातून संगणकीकरण करण्याचे आव्हान सर्वांपुढे आहे.राज्य सहकारी बँकेच्या पाठीशी शासन नेहमीच असेलभविष्यात चांगले काम नक्कीच घडेल. राज्याच्या आर्थिक विकासामध्ये राज्य सहकारी बँकेचा मोलाचा वाटा असल्याचे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

            

 सर्पदंश आणि त्यावरील उपचारांबाबत जागृती करणे गरजेचे 

- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

 

            मुंबईदि. 11 : ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजग झाले पाहिजे. त्याचबरोबर सर्पदंशाबाबत व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहेअसे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

            विघ्नहर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आयोजित शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार अतुल बेनकेअपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यासप्रधान सचिव डॉ.निलीमा करकेट्टाआयसीएमआरच्या संचालिका डॉ.गीतांजली सचदेवआयएमएचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे आदी उपस्थित होते.

            गृहमंत्री श्री.दिलीप वळसे-पाटील म्हणालेग्रामीण भागात सर्पदंश ही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाबाबत काही गैरसमजुती आहेत. या दूर करण्यासाठी शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्प उपयुक्त ठरेल. सर्पदंशावरील लशी महाग आहेत. सर्पदंशाबाबत जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने असे कार्यक्रम आयोजित करावेत असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे यांनी सांगितले कीसर्पदंशाने होणारे मृत्यू कमी करण्याचे आव्हान आहे. जुन्नरआंबेगावमंचर तालुक्यातील सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी करण्यात यश आले आहे. मात्र राज्यभरात अशा प्रकारे काम करायला हवे. यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी प्रशिक्षण संस्था तयार करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल.

            सर्पदंशाने होणारा मृत्यू नोटीफाईड डिसीज म्हणून समावेश करण्यात येईल. सर्पदंशावर होणा-या उपचारासाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्याचा विचार केला जाईलअसेही श्री. टोपे यांनी सांगितले.

            डॉ. सदानंद राऊत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले कीसर्पदंशामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना विशेषत: करुन शेतकरी शेतमजूर यांना या समस्येला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल.

            यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगटडॉ. डी. सी. पटेलडॉ. प्रियंका कदमअशोक हांडेडॉ. संदेश राऊत आदी उपस्थित होते.


 राज्यातील सर्व नागरिकांना 30 नोव्हेंबरपर्यंत

कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची व्हीसीमध्ये माहिती

 

            मुंबई, दि. 11 : राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहेअशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

            केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज सर्व राज्यांचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत श्री. टोपे मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास उपस्थित होते.

            श्री. टोपे यांनी सांगितले कीराज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणाची गती वाढावी यासाठी मिशन कवच कुंडलमिशन युवा स्वास्थ्य सारखे अभियान राबविण्यात आले. याचा लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी फायदा झाला. आता लसीकरणाची शिबीर आणि वेळही वाढवली जात आहे. लसीकरणाच्या मोहिमेत आरोग्यमहसूलनगरविकासशिक्षण अशा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्रित काम करीत आहेत.

            लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी ओपिनियन लीडर्सधर्मगुरु यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेतअसेही त्यांनी सांगितले.

            कोविड प्रतिबंधात्मक कोवैक्सिन लशीच्या दोन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांमध्ये ८४ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रा मधील अंतर कमी केले तर लसीकरणाच्या वेगाला गती देता येईल. याबाबत विचार केला जावा अशी विनंती श्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांना केली.

            मुंबई मध्ये लोकल ट्रेन मध्ये प्रवास करायचा असेल तर लशींच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहेअशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावर ही अतिशय चांगली कल्पना आहेअसे श्री. मांडविया यांनी सांगितले.

            या आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारविविध राज्यांचे आरोग्य मंत्रीआरोग्य विभागाचे सचिवलसीकरण अधिकारी सहभागी झाले होते.


 


000000

 महाराष्ट्र मंत्रालय को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मंत्रालय शाखेचे

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

अनेकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन आणणाऱ्या

सोसायटीचे कार्य कौतुकास्पद

                                             -  सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

 

मुंबईदि. 11 : अनेकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन आणणाऱ्या महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने घेतलेली भरारी कौतुकास्पद असून नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत सोसायटीकडून यापुढेही अधिक दर्जेदार सेवा पुरवली जाईलअसा विश्वास सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मंत्रालय विस्तार शाखेचे आज सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेयावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुंबईचे जिल्हा उपनिबंधक जे.डी. पाटीलसहकारी संस्था उपनिबंधक प्रशांत सातपुतेसोसायटीचे अध्यक्ष प्रकाश डांगेमानद सचिव प्रकाश खांगळमहाव्यवस्थापक रामचंद्र तावडे आदी उपस्थित होते.

93 वर्षांपूर्वी मुहुर्तमेढ रोवलेल्या महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने नवी मुंबईत स्वतःची चार मजली इमारत उभी केली आहे. अनेक ठिकाणी शाखा स्थापन करुन एटीएममोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या खातेदारांना सेवा उपलब्ध करुन दिली. कोरोनाच्या काळात या सोसायटीमधील कर्मचाऱ्यांनी दर्जेदार सेवा पुरवून आपले कर्तव्य बजावल्याबद्दल सहकारमंत्री श्री. पाटील यांनी सोसायटीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री. डांगे यांनी तर मानद सचिव श्री.खांगळ यांनी आभार मानले.

महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीविषयी….

10 मे 1929 रोजी जुने सचिवालय येथे 100 शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. मंत्रालयकोकण भवनकुर्लागोरेगाव आणि पालघर येथे सोसायटीच्या शाखा असून सुमारे साडेपाच हजारांपेक्षा अधिक कर्मचारी बॅंकेचे सभासद आहेत. पावणे दोनशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या या सोसायटीने सभासदांसाठी एसएमएसमोबाईल ॲपसंकल्प भवन आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सोसायटीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 10 लाख रुपयांचे आर्थिक योगदान दिले आहे.

 

००००

 

 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ऍग्रीकल्चर  च्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची निवड


95 वर्षात दुसर्‍यांदा पश्‍चिम महाराष्ट्राला संधी... 
उर्वरीत 65 जागांसाठी 126 उमेदवार रिंगणात.... 
15 नोव्हेंबर च्या माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार

मुंबई ः महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणुन गेल्या 95 वर्षापासुन कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड ऍग्रीकल्चर च्या अध्यक्षपदी ललित गांधी (कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या द्वीवार्षिक निवडणुकीची प्रक्रीया सुरू असुन 9 व 10 नोव्हेंबर च्या छाननी प्रक्रीयेनंतर 11 नोव्हेंबर रोजी निवडणुक अधिकारी सागर नागरे यांनी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली. ‘अध्यक्ष’ पदासाठी राज्यातुन एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता त्यामुळे ललित गांधी यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली.
महाराष्ट्र चेंबर च्या व्यवस्थापन समितिच्या सहा जागा व गव्हर्निंग काऊन्सील च्या 92 जागांसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू असुन, ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील दोन उपाध्यक्ष व गव्हर्निंग काऊन्सील वरील 27 सदस्य बिनविरोध निवडुन आले असुन व्यवस्थापन समितिच्या उर्वरीत तीन जागांसाठी 9 उमेदवार रिंगणात असुन, गव्हर्निंग काऊन्सील च्या उर्वरीत 62 जागांसाठी 117 उमेदवार रिंगणात आहेत.
15 डिसेंबर ही अर्ज माघारीची शेवटची तारीख असुन या तारखेनंतर उर्वरीत जागांवरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
स्वातंत्र्यपुर्व काळात भारतीय उद्योजकांसाठी ब्रिटीशांशी संघर्ष करणारे व भारताची पहिली स्वदेशी मोटार, पहिले स्वदेशी जहाज व पहिले स्वदेशी विमान निर्माण करणारे दृष्टे उद्योजक शेठ वालचंद हिराचंद यांनी महाराष्ट्रातील लोकांना उद्योग व व्यापारात येण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी 1927 साली ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर  ची स्थापना केली वालचंद हिराचंद यांनी त्यांचे सहकारी आबासाहेब गरवारे, शंतनुराव किर्लोस्कर, बाबासाहेब डहाणुकर यांच्या सोबतीने महाराष्ट्रभर दौरे करून महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पाया रचला.
औद्योगिक सहकारी वसाहतींची स्थापना, अनेक नवीन रेल्वे सेवा, विमान सेवा यांच्या सुरूवातीबरोबरच राज्यातील जकात रद्द करणे, विविध कर सुधारणा, उद्योग धोरणातील सुधारणा, निर्यातवृध्दीसाठी प्रोत्साहन योजना यासाठी चेंबरने यशस्वी कार्य केले आहे.
राज्यातील 550 हुन अधिक व्यापारी, औद्योगिक संघटना तसेच चार हजार हुन अधिक व्यापारी, उद्योजक चेंबरशी संलग्न असुन, 550 संलग्न सभासदांच्या माध्यमातुन चेंबर राज्यातील 7 लाख व्यापारी व उद्योजकांचे प्रतिनिधित्व व नेतृत्व करीत आहे.
ललित गांधी गेल्या 21 वर्षापासुन महाराष्ट्र चेंबरमध्ये कार्यरत असुन गव्हर्निंग काऊन्सील सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले असुन विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ललित गांधी म्हणाले की, शतकमहोत्सवाकडेे वाटचाल करणार्‍या राज्याच्या शिखर संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही दुर्मिळ व महत्वपुर्ण घटना असुन महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रासह चेंबरच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागांतील व्यापार-उद्योग-कृषी व कृषि पुरक उद्योग व पायाभुत सुविधांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहु छोट्यात छोट्या व्यापारी - उद्योजकांचे प्रश्‍नही प्राधान्याने हाती घेऊ तसेच महाराष्ट्राला संपुर्ण देशात पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या बरोबर कार्य करून यश मिळवु असे सांगितले.


 

Featured post

Lakshvedhi