Thursday, 6 June 2019

पाणी यायचंच बंद होईल....

पाणी यायचंच बंद होईल.... 
      हे खरंच होऊ शकतं.....?? 

 पाच - सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने,कुणाशी विवाह करून कुठचा मौर्य जन्माला घातला, 

 आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बास झाला.. 

 त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात Water Management हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे.. 

तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं Compulsion असायला हवं..

 आज इजरायईल सारख्या देशात आपल्या १० टक्के पाऊस पडतो तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं.. 

 ह्याचं कारण म्हणजे त्यांचे Water Management 

 त्यांचा हा अभ्यास इतका पक्का आहे, कि एकदा नळातून पडलेलं पाणी, हे जवळपास सात वेळा Recycle & Reuse होऊनच शेवटी जमिनीवर पडतं.. 
हे आपण अमलात का आणू शकत नाही ?

आपण स्वतःला 'शेती प्रधान 'देश म्हणवतो..आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाउस पडूनही, आपल्याकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे ही लाजिरवाणी गोष्ट नाही ?

 पाउस पडायला आज चार दिवस उशीर झाला तर सगळ्यांची 'हवा टाईट ' होईल ही परिस्थिती येतेच कशी ? 

स्वतंत्र मिळून ७० वर्ष झाली तरीही आपल्याकडच्या पाइप-लाईन्स ह्या गळक्या किंवा फुटक्याच..
एक पाईप लाइन फुटली तर लाखो लिटर पाणी, गटारात जातं आणि त्याचं कुणालाही वाईट वाटत नाही...... 
एकाचाही जीव जळत नाही..... 

जपान मध्ये पाणी कसं वाचवतात हे फोटो नुसते इथे शेअर करून भागणार आहे का ?ते अमलात कोण आणणार ?

 इथे पाणी वाचवा हे ओरडायचं आणि दुसऱ्या दिवशी मात्र ३२ दात घासायला ३२ भांडी पाणी ओतायचं हे चालणार आहे का ? 

आज आपल्याला बटन दाबलं कि वीज मिळते, आणि नळ सोडला कि पाणी पडतं ह्याचा माज आलाय असं मला आता वाटतं..

गणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात ,कुठलेतरी पांचट विनोद मारणारे कलाकार बोलावण्यापेक्षा, 
किंवा कुठल्यातरी हिडीस गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यापेक्षा,
 'पाणी वर्षभर कसं वाचवता येईल 'ह्यावर व्याख्यान देणारा एखादा वक्ता बोलवावा.. 

सण-वार-उत्सव साजरा करताना सुद्धा पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल ह्याची खबरदारी प्रत्येक मंडळाने घ्यावी.प्रत्येक धर्माच्या लोकांनी, आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं.गणपती असो कि बकरी-ईद,कुणीही ह्याला अपवाद असता कामा नये..शेवटी पाणी आणि वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे..ती वाचवायलाच हवी..

 अन्यथा... 

 आज आपण  चंद्रावर,  मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यानं सोडतोय..... 

 मात्र  आज  आपण  पाण्याचा  असाच  अनिर्बंध  वापर  करत  राहीलो  तर  भविष्यात  कदाचित  पृथ्वीवरच कुठे पिण्यासाठी पाणी सापडतंय का हे शोधण्यासाठी यान सोडावं लागेल.... 

 क्रुपया  यावर  फार  गंभीरपणे  विचार  करा...........  अन्यथा....??????

अर्थात पक्के पुणेकर

अर्थात पक्के पुणेकर कसे असतात ते बघाच

- कालची तुझी नोकरीसाठी मुलाखत कशी झाली ? 

- काल ना...मी मुलाखतीसाठी आत शिरलो, तिथे एक गुबगुबीत ढोल्या आरामखुर्चीत समोरच्या टेबलावर दोन्ही पाय ठेवून मोठ्या रूबाबात बसला होता.

त्याच्या लॅपटाॅपकडे बोटाने इशारा करून तो म्हणाला, हा लॅपटाॅप बाहेर ने, नी परत येऊन मला विकायचा प्रयत्न कर.

तो हाॅलिवूडचा सुपरस्टार असल्यासारखा माज दाखवत होता. मी तो लॅपटाॅप उचलला नी तडक बाहेर रस्त्यावर आलो.

- रस्त्यावर आलास ? मग नंतर ?? 
- काहीच नाही..अर्ध्या तासानी त्याचा मला काॅल आला. फोनवर तो लॅपटाॅप परत देण्यासाठी गयावया करत होता कारण त्यात त्याचे सर्व कामकाज नी महत्त्वाचे पेपर्स होते...

मग मी त्याला विचारले: 
केवढ्याला घेशील बोल... ??

गुरु कृपा

गुरु कृपा म्हणजे काय?
पैसा गाडी बांगला म्हणजे गुरु कृपा नव्हे...

आयुष्यात येणारे अनेक संकटे 
आपल्या नकळत टळून जातात
ते टळलेले संकट म्हणजे  गुरु कृपा...

गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो
ते सावरणे म्हणजे   गुरु कृपा...

एकवेळचे जेवणाचे वांदे असताना
मिळालेले दोन वेळच पोटभर जेवण म्हणजे  गुरु कृपा...

कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला
पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते, ती ताकत म्हणजे  गुरु  कृपा...

'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते
ती उमेद म्हणजे  गुरु कृपा...

आडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे  गुरु कृपा...

प्रसिद्धी च्या शिखरावर असतांना 
तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे  गुरु कृपा....

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे
ते नसताना आयुष्यात असलेले 
' समाधान ' म्हणजे  गुरु कृपा....

Wednesday, 5 June 2019

गरम दूध व गूळ एकत्र घेण्याचे फायदे


गरम दुधात साखर ऐवजी गूळ मिसळून प्यायल्याने काय होते ?
तुम्ही थक्क व्हाल हे पाहून दुधात गूळ मिसळा आणि बघा इथे काय होते ह्यामुळे.

जर तुम्हांला साखरे शिवाय गोड दूध प्यायचे असेल तर दूध आणि गूळ ह्यांचे सेवन करायला सुरुवात करा. गूळ हे प्रसिद्ध गोड पदार्थ आहे ज्यात अनेक औषधी गुणधर्म सामावलेले आहेत. दुधासोबत गुळाचे सेवन हे व्हिटॅमिन आणि खनिज ह्यांचे उत्तम स्रोत आहे. आपल्यापैकी अनेक जण साखरेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करतात, जे भरपूर आजाराचे कारण मानले जाते. साखरेच्या ऐवजी गूळ हा एक चांगला पर्याय आहे. हे तुमच्या चहा किंवा दुधाच्या चवीला स्वादिष्ट आणि हेल्थी बनवेल. दुधासोबत गुळाचे अनेक फायदे घेण्यासाठी वयस्कर व्यक्ती रोजच्या आहारात एक भाग म्हणून ह्याचे सेवन करू शकतात. हे अदभूत मिश्रण तुमची त्वचा, केस आणि अन्य अवयवांवर चमत्कारिक लाभ देते.
जर तुम्ही रोज एक कप दुधाचा आनंद घेण्यासाठी एक वेगळ्याच चवीच्या शोधात असाल तर गूळ हा चांगला पर्याय आहे. तर मग चला जाणून घेऊया गुळासोबत दूध प्यायल्याने होणारे फायदे :
१. वजन कमी करते :
तुम्ही जर लठ्ठपणाने त्रासलेले आहात आणि दूध किंवा चहा मध्ये साखर टाकू इच्छित नाही, तर तुम्ही दुधासोबत गुळाचे सेवन चालू करा. कॅल्शिअमयुक्त दुधासोबत पोटॅशिअमयुक्त गुळ तुम्हांला सडपातळ आणि स्लिम बनवेल. दुधासोबत गुळाचा सर्वात हेल्थी फायदा घेण्यासाठी हे सेवन नियमित घेत जा.
२. अशक्तपणा दूर करते :
बहुतेक महिलांना आयर्न टॅब्लेट्स घेण्यास समस्या असतात, जे अशक्तपणा रोखण्याचे चांगले काम करतात. आपल्या शरीरातील आयर्न ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही गुळाचा उपयोग करू शकता. ह्याने तुम्ही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय अशक्तपणाची समस्या दूर करु शकता. गुळासोबत दुधाचा एक ग्लास अशक्तपणाशी लढण्यासाठी गर्भवती महिलांना मदत करतात.
३. त्वचा आणि केस ह्यासाठी फायदेशीर :
दूध आणि गूळ दोन्हीही त्वचा आणि केसांच्या सुंदरतेत महत्वाची भूमिका निभावतात. जर ह्या दोन्हीचे मिश्रण तुम्ही आहारात समाविष्ट केले तर तुम्ही चमकदार आणि तजेलदार त्वचे सोबत लांब मजबूत केसं सुद्धा मिळवू शकतात.
४. पिरिएडस चे दुखणे कमी करते :
गूळ मासिक पाळीच्या दुःखाने त्रासलेल्या महिलांसाठी एक चांगला उपाय आहे. मासिक पाळीच्या दरम्यान पोटातील twitch पासून वाचण्यासाठी नियमित काळासाठी दुधासोबत गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. गुळ एक कुलिंग एजंट आहे जे तुमच्या पोटाला शांत करते आणि पोटातील तापमान सामान्य ठेवण्यास मदत करते, विशेष करून उन्हाळ्यात.
५. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते :
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात सोपा आणि चांगला उपाय आहे एक ग्लास दुधासोबत गुळाचे मिश्रण. हे दोन्हीही घटक आजारांपासून लढण्यासाठी मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
६. सांधेदुखीवर उपाय :
आपल्या बालपणीपासून आपण ऐकतोय कि मजबूत हाडांसाठी दूध हे सर्वात चांगला उपाय आहे. दुधासोबत गूळ सुद्धा हाडं आणि मांसपेशींना पोषण देण्यास मदत करतात. हा सल्ला नेहमी दिला जातो, गुळासोबत दूध घेतल्याने सांधेदुखी आणि हाडांच्या समस्या कमी करतात.
७. पचनक्रिया सुधारते :
गुळाचे सेवन पचनक्रिया वाढवते. ज्यांना अपचन, आतड्यांचे आजार, अतिसार सारख्या समस्यांनी त्रासलेले असतात त्यांच्यासाठी गुळाचे सेवन हा एक चांगला पर्याय आहे. गुळाचे सेवन तुमची पचनक्रिया आणि आतड्यांच्या कार्यांना नियंत्रित करते. अनेक गुणांनी समृद्ध गूळ आणि दूध तुमच्या आहारात समाविष्ट करा. दुधासोबत गुळाचे नियमित सेवन तुमचे आरोग्य चांगले बनवेल.
गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. 
रोज दुध पिल्याचे फायदे तसे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण गरम दुधाबरोबर गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं, तसंच त्वचेला निखार येतो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक ऍसिड असतं. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड असतं. 
शरीरातलं अशुद्ध रक्त होतं साफ
गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरिरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं. त्यामुळे गरम दुध आणि गुळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. 
लठ्ठपणा नियंत्रणात
गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते. 
पोटाचे विकार होतात दूर
गरम दुध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दुर होतात. 
सांधेदुखी वर उपाय
गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करुन खाल्ला तर सांधे मजबूत होतात. 
त्वचा होते मुलायम
गरम दुध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते. एवढच नाही तर यामुळे केसही मजबूत होतात.
मासिक पाळीचा त्रास होतो कमी
मासिक पाळीवेळी महिलांनी गरम दुध आणि गूळ खाल्ला तर त्रास कमी होतो. मासिक पाळी यायच्या एक आठवडा आधी 1 चमचा गूळ रोज खाल्ला तर त्रास कमी होतो. 
थकवा होतो कमी
कामाच्या ताणामुळे तुम्ही जास्त थकले असाल तर गरम दुध आणि गूळ खा. यामुळे लगेच आराम मिळतो. रोज 3 चमचे गूळ खाल्ल्यानं थकवा दूर होतो. 
संकलक : प्रमोद तांबे

सर्व खादाडांकरता

Dr. Vijay Athalye.

थोडा वेळ जगन्नाथ दीक्षित, र्ऋतुजा दिवेकर बाजूला ठेवा, 
शांततेने वाचा,
   
Enjoy करा......कारण "ब्राम्हण भोजन प्रीया: असे सुभाषीत आहे" 

माणसासारखंच पदार्थांना पण सहजिवन असावे असे मला नेहमी वाटते.. एकमेकांना खमंग खुसखुशीत साथ देत ते एकमेकांमधली रूची वाढवत असावेत..

जसं गोबऱ्या गालाच्या टम्म फुगलेल्या पुरीला साथ द्यावी ती श्रीखंड, बासुंदीनेच..
कोणात तिचे लाड पुरवायची ताकद नाही.. 

सौंदर्यवती जिलबीला साजेसा राजस जोडीदार म्हणजे मसाले भातच.. बाकी मठ्ठा म्हणजे तिचा सेवक.. तिचं सगळं सगळं एकणारा..

पुरणपोळीच्या सुखदुःखात तिला साथ देते प्रत्यक्ष तिची सवत कटाची आमटीच.. काही लोक तिला आमरसाचं स्थळ आणू पाहतात पण ते काही खरं नाही..

ढोकळा या पदार्थांच्या अंगात इतक्या नाना कळा आहेत ना.. त्या सहन कराव्या त्याच्या girlfriend चिंच खजुराच्या चटणीनेच.. दोघं एकत्र आले की धमाल करतात..

मिसळ बहुधा मेषेची किंवा सिंह राशीची असावी.. तिच्या जहालपणाशी समतोल ठेवतो तिचा लाडका पाव.. मुळातच शांत स्वभावाचा.. काही कमी पडू देत नाही तो तिला..

उपम्याचा मात्र वरचष्मा शेवेवर.. तिला काही भाव खाऊ देत नाही तो..
इडली, डोसा, सांबार, चटणी सगळे एकत्र सुखाने नांदतात.. अगदी न भांडता..

लोण्याने तर जणू जन्म भराच्या आणाभाका घेतल्या असाव्यात थालीपीठासोबत..

चिवडा आणि चकली मात्र खेळगडीच.. आपल्याच मस्तीत खेळणारे.. जणू चिवडा खेळ हरायला लागला की चकलीला चिडवत असावा चक चक चकली..

मोठ्या घरचा लाडू कधीकधीच खेळायला येतो त्यांच्यासोबत.. आणि लाडू बेसनांकडचा असेल तर त्याची आई त्याला बेदाण्याची तीट लावून मगच बाहेर पाठवत असावी.. 

शंकरपाळी अन् करंजी सारख्या भांडतात.. एका वेळी खेळायला येत नाहीत..

ह्या सगळ्यांमध्ये सोज्वळ ब्रम्हचारी एकच.. ऊकडीचा मोदक.. त्याचा दिमाखच वेगळा.. नाही म्हणायला तुपाकडून सेवा करुन घेतो.. पण जोडीदार मात्र कोणी नाही त्याचा.. तो असाच एकटा.. अनभिषिक्त राजासारखा...!!

सर्व खादाडांकरता

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना हि नवीन योजना राज्यात सुरु करण्यास मान्यता देणेबाबत







पुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र.


हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच!

प्रिय नचिकेत, 
(प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो).
चिरंजीव, आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे, ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर.
हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल.

हल्ली आपण खोकत असता.

खोकला थंड पेयाचा दिसत नाही.

आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन फाप्या मारता असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.

हल्ली खाण्याच्या पण कुरबुरी असतात.

जेवण जात नाही.

त्यावरून आपल्याला इराणी रोग जडलाय कि काय अशी दाट शंका येऊ लागली आहे.

गणपती उत्सवात आपण ढोल बडवताना आढळलात.

पण एक सांगतो ढोल बडवून पोटाची खळगी भरत नाहीत.

तेच केल्यास जीवनाची हलगी वाजेल.

आमची मिलेट्री अकौंटमधील नोकरी आता काही दिवसाची राहिली आहे, तेव्हा पुढची भिस्त आपल्यावर रहाणार नसली तरी आपली भिस्त आमच्यावर ठेऊ नये हि माफक अपेक्षा.

प्रेमं जरुर करा, पण सोबत अर्थार्जन पण हवे.

प्रेमाने मंडईत भाजी फुकट मिळत नाही कि वाण्याकडुन किराणा माल.

अधिक काही बोलत नाही.

आपण सुज्ञ असाल किवा आहात अशी आशा करतो.

आपल्या लग्नानंतर आपणास आमच्या घरात रहायचे असल्यास लिव लायसन्स चे अॅग्रीमेंट बनवण्यात येईल. 

सोबत वीजपट्टी आणि पाणीपट्टी आकारण्यात येईल.

जेवण मातोश्रींना बनवण्यास लावलेत तर त्याचा आकार त्या त्या वेळी लावण्यात येईल व ती रोख स्वरूपात वसुल केली जाईल.

अगदी थोडक्यात आणि मोजकेच सांगायचे झाल्यास लवकर कामाला लागा.

आपला जन्मदाता!

                  - पु. रा. खवचट.

               पुणे  तेथे  काय   उणे.

Featured post

Lakshvedhi