Tuesday, 4 June 2019

पैशापेक्षा माणसांना किंमत द्या

जन्माला आला तो
वंशाचा दिवा झाला 
पहिल्याच दिवशी त्याला
जबाबदारीचा शिक्का लागला 

थोडा मोठा झाला तो
भावंडांचा भाऊ झाला 
आपल्या खेळण्यातला
अर्धा हिस्सा वाटू लागला 

वयात आला तो
बहिणीचा रक्षक झाला 
रक्षाबंधनाला तर
स्वतःची मनिबॅंक ही फोडू लागला 

कॉलेजला गेला तो
मैत्रिणींचा मित्र झाला 
तिच्या सुख दुःखाचा
आपसूक वाटेकरी बनला 

लग्नामध्ये त्याच्या तो
नवरदेव झाला 
बोहल्यावरच्या रुबाबतही
जबाबदारीचा पुतळा ठरला 

लग्नानंतर मात्र तो
दोन भूमिकेत आला 
बायकोचा नवरा की आईचा मुलगा यात अडकला 

आईबाप्पाच्या उतारवयात
त्यांच्या काठीचा आधार झाला 
स्वतः साठी कमी अन
घरासाठी जास्त जगू लागला 

बाळाच्या चाहुलीने तो
बाप झाला 
छकुलीच्या हास्यासाठी
रात्रंदिवस झटू लागला 

छकुलीच्या लग्नामध्ये तो
वरबाप झाला 
सगळ्यांच्या आनंदासाठी
आपले अश्रू लपवू लागला 

नातवंडांच्या मेळ्यामध्ये तो
आजोबा झाला 
दुधापेक्षा साईला
तळहाताच्या फोडासारखा जपू लागला 

आत्ता कुठे त्याला
थोडा निवांतपणा मिळाला 
जोडीदाराचा हात त्याने
खूप घट्ट पकडला 

तो पर्यंत त्याच्या
पिंजऱ्यातील पिल्ले उडून गेली 
बायकोची आणि त्याची
हाडेही आत्ता थकून गेली 

मनात असतानाही तो
मनाप्रमाणे जगला नाही 
ठाम मते असतानाही
मत आपले मांडले नाही 

आज देवाकडे तो
साथ फक्त मागतो आहे 
बायकोच्या आधी ने मला
देवाला म्हणतो आहे 

आजपर्यंत आयुष्यभर तो
घरासाठी झटला आहे 
स्मशानात जाताना मात्र
रित्या ओंजळीने जातो आहे 

ओंजळ रिकामी असली तरी
मन त्याचे भरले आहे 
अंत्यविधीची गर्दी पाहून
माणुसकीचे फळ मिळाले आहे 

जाता जाता सगळ्यांना
एकच तो सांगतो आहे 

पैशापेक्षा माणसांना किंमत द्या म्हणतो आहे..

माणसाला संवादाची गरज असते....!

माणसाला संवादाची गरज असते....!
का,,,? कशासाठी...? 

     समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली आहे. तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही. तर काय होईल...? कुकरचा स्फोट होईल. समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आहे. आत येणारा झरा नाही. बाहेर जाणारा मार्ग नाही. तर काय होईल. आतलं पाणी आतल्या आत कुजून जाईल. वास येऊ लागेल. दुर्गंधी येऊ लागेल. 
मनाचंही असंच असतं. विचारांची देवाणघेवाण झाली नाही. भावनांना वाट मिळाली नाही. की मनात विकृती निर्माण होते. अन यासाठी गरज असते संवादाची! अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीराच्या मूलभूत गरजा असतील तर संवाद ही मनाची मूलभूत गरज आहे. 

संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. एकाच घरात रहाणारे भाऊबहीण, पतीपत्नी, पितापुत्र यांच्यात संवाद नसतो. आपली सुखदु:ख, भावना, विचार यांची देवाणघेवाण करायला वाव नसतो.  काय गंमत आहे बघा, संवादाच्या खिडक्या बंद करुन माणसं ‘सहजीवन’ जगत असतात. मग काय होतं, मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळविक्राळ रुप धारण करतो. संवादच संपला की उरतो तो वाद...

 संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे. संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण. दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो. आपल्या स्रुजनशीलतेला नवे पैलू पडतात. आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं, आपल्या उणिवांचं आपल्याला मूल्यांकन करता येतं. आपलं मानसिक आरोग्य सुद्र्ढ रहातं. थॊडक्यात काय तर संपन्न व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक आहे आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज आहे.

तेव्हा बोलू लागा... ऐकू लागा... समजू लागा... संवाद साधू लागा...!

Life is Very Beautiful

गुरुमंत्र

उत्तम आयुष्य जगण्याचे १५ गुरुमंत्र 

१. हार मानू नका. आजचा दिवस वाईट आहे, उद्याचा कदाचित आणखी वाईट असेल पण परवाचा दिवस उत्तम असेल. कारण सगळेच दिवस सारखे नसतात. - जॅक मा. 

२. खेळ म्हटले कि हरणे- जिंकणे आलेच. हरण्याच्या भितीने खेळ खेळणे सोडू नका. - बेब रुथ.

३. अधून मधून चुकणे हा तुमचा अधिकार आहे. सतत बरोबर असण्याचा अट्टाहास करू नका. - डॉ. डेव्हिड बर्न्स.  

४. एकाच जागी स्थिर राहू नका. तुमची प्रत्येक कृती नव्या गोष्टीला जन्म देते, त्यामुळे सतत काहीतरी करत राहा. - जॉर्ज बर्नार्ड शॉ. 

५. तुमच्याकडे अमाप वेळ असल्यासारखे वागू नका. - ओग मंदिनो. 

६. इतरांच्या टीकांकडे लक्ष देऊ नका. लक्षात ठेवा, टीकाकारांच्या सन्मानासाठी पुतळा कधीच उभा करत नाहीत. - जीन सिबेलीअस. 

७. देवाने स्वल्पविराम दिलेल्या जागी कधीही पूर्णविराम देऊ नका. म्हणजेच, आयुष्यात काही चुकीचे घडले म्हणजे तो शेवटच असेल असे नाही. - ग्रेसी एलन. 

८. लक्षात ठेवा, प्रवाहा बरोबर केवळ मेलेले मासे जातात. आपली वाट आपण शोधा. - मॅलकाॅम मगेरिज.

९. इतरांसारखे होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कोण आहोत ते ओळखा आणि स्वतःचे अस्तित्व जपा. - इजराईलमोर आयिवोर. 

१०. कोणतीही कल्पना पैसा, ताकत, मनुष्यबळ किंवा वेळेच्या कमतरतेमुळे नाकारू नका. - सैय्यद एथर.

११. अशक्य गोष्ट आहे असे सांगून देखील जे प्रयत्न करत असतील, त्यांच्या कामात व्यत्यय आणू नका. - अमेलिया एरहर्त. 

१२. स्वतःचे आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या. इतरांना आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ देऊ नका. - रॉबर्ट फ्रॉस्ट. 

१३. अपयशापासून दूर पळू नका. त्यापेक्षा अपयश कशामुळे आले ह्याचा अभ्यास करा आणि आपल्या चुका सुधारा. - मायकल कोरडा. 

१४. गरजेपेक्षा जास्त बोलू नका. - रिचर्ड शेरिदान. 

१५. वेळेअभावी आपले स्वप्न अर्ध्यातच सोडून देऊ नका. - एर्ल नाईटिंगे

विचारवेध

 विचारवेध

मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला.

आयुष्य फार लहान आहे.
जे आपल्याशी चांगले वागतात, त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात,त्यांना हसून माफ करा.

जीवनात अडचणी येणे हे 'Part of life' आहे.आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही 'Art of life' आहे.

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं. कारण, यशाची व्याख्या लोकं ठरवितात, समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात.फरक एवढाच आरश्यात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपली माणसेच दिसतात म्हणून त्यांची कदर करा.

Monday, 3 June 2019

बोधकथा


व्यवसायात काहीच प्रगती होत नसल्याने बॉस वैतागला होता. ऑफिसमध्ये स्टाफ भरपुर होता पण काम होत नसे.  एके दिवशी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावले अन सांगितले की मी तुमच्या सोबत एक खेळ खेळणार आहे, यात जो जिंकेल त्याला फॉरेन टूरला पाठविले जाईल. सर्व स्टाफ खुश झाला अन खेळ काय आहे, हे जाणण्यास उत्सुक झाला.

बॉसने सर्वांच्या हातात एक फुगा दिला अन सांगितले की शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल, त्यालाच विजयी ठरविले जाईल आणि फॉरेन टूरला पाठविले जाईल. 


एवढं सांगताच एकच कल्ला झाला. जो तो आपल्या शेजारच्याचा फुगा फोडू लागला. काही आपला फुगा कोणी फोडू नये म्हणून, वाचविण्याचा प्रयत्न करू लागली पण कोणी ना कोणी ते फोडत असत. 
असे करता करता सर्व फुगे फुटले कोणाच्याच हातात फुगा उरला नाही आणि कुणीच विजेता होऊ शकले नाही.

सर्व शांत झाल्यावर बॉसने सांगितले की, शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल, तोच विजयी ठरेल, असे मी बोललो. याचा अर्थ प्रत्येकाने दुसऱ्याचा फुगा फोडावा, असा होत नाही. 
तुम्ही इतरांचा फुगा फोडला नसता तर , प्रत्येकाच्या हातात आता फुगा असता आणि सर्वच विजयी ठरले असते. 

तात्पर्य :- यश मिळविण्यासाठी व जिंकण्यासाठी इतरांना हरविणे गरजेचे नाही. इतरांना हरविण्याच्या नादात आपण सर्वच हरवून बसतो. 

इतरांना जिंकण्यास मदत करा, आपोआप सर्वजण जिंकू शकाल.

पोस्ट कार्ड

१५ पैशाचं पोस्ट कार्ड 
खुशाली कळवत होतं
अर्धं लिहिलेलं कार्ड
रडायला लावत होतं....
एक रुपया सुट्टा घेऊन
एसटीडीच्या लाईनमध्ये उभा रहात होतो
फोन लागला की...
मन भरुन येत होतं.
whatsapp वर आता
२४ तास संपर्कात राहातोय.
ना कोणाला ती ओढ आहे....
ना कोणाला ती हुरहुर आहे.
काळ बदलला बदलली साधने
मी अजूनही जिव्हाळा शोधतच आहे.
१५ हजाराच्या मोबाईलला
१५ पैशाची सर नाही...
नात्याची तर नाहीच नाही,
अजून काय काय बदलेल.. 
पण
ते दिवस.. ती माया...ती आपुलकी 
पुन्हा कधीच मिळणार नाही....
पुन्हा कधीच मिळणार नाही.

मराठी पाऊल पढती पुढे......

परप्रांतियांच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा, मराठी माणसा वाच आणि कामाला लाग....

एक हजार ते पंचवीस  हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय.
..
१ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा. 
२】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा. 
३ 】मासे विकणे. दिडपट नफा.
४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे. 
५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात
६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात 
७】 कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात. 
८ 】वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.
९ 】मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा. 
१०】 ढोकळा विक्री. घरी ढोकळा बनवा. चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका. 
११ 】चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या. याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात. 
१२】 घरीच पोळी भाजी बनवुन कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा. 
१३】 फळ विक्री करा. 
१४ 】शहाळे आणून विका. रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात. 
१५ 】कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई मशीन असेल व कोणाले शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे करून विका. टाकाऊतुन टिकाऊ बनवा. 
१६】 फ्लेक्स बोर्ड तयार करुन, आणून, चिटकवून, लावून द्या. दोनशे ते पाचशे रुपये प्रती मिळतात. 
१७ 】सातारा येथे राजवाड्याजवळ सुट्ट्या उदबत्त्या वजनावर विकतात तशा आपल्या स्वतःच्या गावातही विकता येईल. 
१८】मुंबई येथे होलसेल मार्केट मध्ये कपड्यांचा लाॅट विकत आणून घरी सुध्दा बिझिनेस सुरु करु शकता. दादर रेल्वे स्टेशन शेजारीच होलसेल मार्केट आहे. 
१९】 मंदिराजवळ नारळ विक्री करा
२० फुलांच्या मार्केटमधुन फुलं आणा व त्याचे हार करुन विका. यात खुप फायदा आहे. 
२१】 हाॅटेलला कडधान्ये पुरवणे. 
२२】 हाॅटेलला बटाटे खुप लागतात. सप्लाय करा. 
२३ 】घरी चटणीचे चार पाच प्रकार तयार करुन थेट फूड मार्ट ला विका किंवा स्वतः रिटेल करा. 
२४】 लेदर शिलाईची जुनी मशीन घ्या व सिटकव्हर तयार करुन विका. चांगले मार्जिन मिळते. 
२५】 मार्केटला लसणाच्या पाकळ्या होलसेलमध्ये मिळतात. घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळुनही साले निघतात. हाॅटेल, भाजीवाले यांना छोटी मोठी पाकिटे करुन विका. 
२६】 एलईडी बल्ब स्टाॅल लावून विका. आपल्या ग्रुपवर त्याचे होलसेलर आहेत
२७】 ज्यांना योगासने येतात त्यांनी त्याचे क्लास सुरु करावेत. 
२८】 महिलांसाठी घरगुती बिझिनेस, पाळणाघर सर्वात बेस्ट बिझिनेस करु शकता. भांडवल लागतेच. खेळणी, दूध, इ. ठेवावे लागते 
२९】 प्लॅस्टीक बंदी होणार असल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे. घरी तयार करा. दुकानदारांना थेट विका. खुप स्कोप आहे. 
३०】 पेस्टकंट्रोल कसे करतात शिकून घ्या. हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो. रुमनुसार रेट असतात. 
३१】 प्लंबिंग काम शिकून घ्या. दररोज हजार रुपये 'सहज कमवा'.
३२】 विको दंतमंजनच्या मागे लिहिलेले साहित्य काष्टौषधीच्या दुकानातुन आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा. खुप परवडते. 
३३】 काही औषधी जंगलात जाऊन गोळा करुन आणून आयुर्वेद डाॅक्टरांना विका. 
३४】 गोमुत्र गोळा करुन बाटलीत पॅक करुन विका. 
३५】 खेडेगावात असाल तर दुध गोळा करुन शहरात जाऊन विका. देशी गायीचे दूध शहरात सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिलीटर विकले जाते. 
३६】 गावाकडे उन्हाळ्यात कडबा कुट्टी खुप चालते. ज्याच्याकडे यंत्र आहे त्याच्याकडे जाऊन पोती भरुन घरपोच करता येतील. 
३७】 फाईल तयार करायचा पुष्ठा मिळतो. पट्ट्याही मिळतात. फक्त कटिंग मशीनने कटींग करुन ऑफिसला सप्लाय करु शकता. प्रिंटिंग करुन पाहिजे असल्यास प्रेसमधून करुन घेऊ शकता. 
३८】 स्टेपलर, त्याच्या पिना, पंच मशीन ऑफिसला सप्लाय करुन वीस ते पंचवीस टक्के फायदा मिळतोच. फक्त तुम्हाला बरेच ऑफिस शोधावे लागतील. 
३९】 आता लगीनसराई सुरु झाली आहे. नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे टेलरींगचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे 
४०】 भगव्या फेट्यांची फॅशन जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. चार महीने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्याचे कापडही भाड्याने द्या. 
४१】 उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करुन विकू शकता.  शिरे व टरफले यांची पुड बनवुन त्यात मीठ मिसळुन तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करु शकता. चिंचोक्याचे भट्टीतुन लाह्याही बनवतात.
४२】 उन्हाळ्यात होलसेल दही आणून त्याचे घुसळुन लोणी व ताक काढले जाते. मसाला ताक करुन विकणे हा खुप फायदेशीर बिझिनेस आहे. फक्त त्यात बर्फ टाकू नये. त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते. तसे विका
४३】देवदेवतांचे साचे विकत मिळतात. त्यात POP टाकून मुर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खुप गरज आहे. कलेतुन पैसे जास्त मिळतात. 
४४】रद्दी खरेदी करणे गठ्ठे बांधून होलसेल विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे. अनुभवातुन हा व्यवसाय मोठा करता येईल
४५】जिमचा अनुभव असेल तर शहरामध्ये जाम कोच म्हणून सेलिब्रेटीजना गाईडंस करुन भरपूर फी मिळते. 
४६】शेवचिवडा होलसेल आणायचा. चुरमुरे पोत्याने आणायचे. चुरमुरे चाळण मारुन साफ करून घ्यायचे. चिंचपाणी घरीच तयार करुन ओली व सुकी भेळ विकता येईल. अगदी हातगाडीसुध्दा चालेल. नाट्यगृह, समुद्र बीच, गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बागेबाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात. 
४७】धोबी अर्थात लाँड्रीवाले कामगार ठेवतात. धुवायचे कपडे, ड्रायक्लिन कपडे बाहेरच्या माणसाकडुन घेतले जाते. हल्ली हा बिझिनेस कोणीही करत आहे. शहरात जाऊन टाकला तर मी खात्रीने सांगतो तुम्ही हा बिझिनेसमध्ये यशच मिळवणार. कारण शहरात महिला नोकरीचे प्रमाण खुप आहे. 
४८】रेडियम चा बिझनेसही खुप चांगला आहे पण मशीनरी आवश्यक आहे. सध्या सर्वात जास्त चालणारा बिझिनेस आहे. नंबर प्लेट ते गाडीचे डेकोरेशन सर्वात रेडियम वापरतात. रोल होलसेल मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करुन विकता येते. 
४९】रिचार्ज चा बिझनेसही खुप चांगला आहे. एक हजारपासून सुरु करता येतो. विशिष्ठ टारगेट पुर्ण केले तर स्कीमनुसार अनेक जादाचे फायदेही मिळतात. 
५०】 सर्वात सुंदर व लेटेस्ट बिझिनेस म्हणजे मोबाईल अॅक्सेसरीज विकणे....


पक्ष आणि शाखा खोलण्यात वेळ वाया घालवू नकोस

मराठा पाऊल पढती पुढे...... 

Featured post

Lakshvedhi