*सर्व लोक कापुराचा उपयोग धार्मिक कार्यात करतात, पण काही आरोग्यदायक उपयोग पण आहे.*
जर एखाद्या ठिकाणी मुका मार लागला असेल तर स्नायूंना सूज येऊन तो भाग फुगल्याप्रमाणे वाटू लागतो. सूज आल्यामुळे त्या भागातून प्रचंड वेदना जाणवतात. अशावेळी सूज आलेल्या भागावर तुम्ही कापूर लावू शकता. कारण कापरामध्ये दाह आणि जळजळ कमी करण्याची क्षमता असते. कापराची पूड करून तेलासोबत त्या भागावर लावा आणि काही मिनीटे तो भाग बांधून ठेवा. असं नियमित केल्यामुळे हळूहळू त्या भागावरची सूज कमी होते.
त्वचेवरील रॅशेस कमी होतात
त्वचेच्या समस्यांमध्ये आणखी एक मोठी समस्या जाणवते ती म्हणजे त्वचेवरील रॅशेस. उष्णता, घाम, सतत पाण्यात काम करणे, अस्वच्छता अशा अनेक कारणांमुळे त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. त्वचेवरील पुरळ कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कापराचा वापर करणे. कारण कापरामुळे तुमच्या त्वचेवरील पुरळ आणि लालसरपणा लगेच कमी होतो. यासाठी पाण्यात थोडं कापराचं तेल मिसळा आणि पुरळ आलेल्या भागावर लावा. ज्यामुळे त्या भागावरील पुरळ हळू हळू कमी होईल. यासोबतच जाणून घ्या पुरळ घरगुती उपाय, असे कमी करा अंगावरील रॅशेस
भाजलेली त्वचा बरी होते.
कापराचे फायदे अनेक आहेत कारण कापरामध्ये वेदना कमी करणारे आणि त्वचेचा दाह कमी करणारे गुणधर्म असतात. म्हणूनच अनेक मलम अथवा क्रिममध्ये कापराचा वापर केला जातो. तुम्ही त्वचेवरील भाजलेली जखम बरी करण्यासाठी त्वचेवर कापराचे तेल लावू शकता. व्हॅसलीनमध्येही कापराचा अंशतः वापर केलेला असल्यामुळे ते वापरण्यासही काहीच हरकत नाही. व्हॅसलीन मुळेही त्वचेच्या अनेक समस्या बऱ्या होतात. याशिवाय कापूर तेलात मिसळून लावण्यामुळे त्वचेची जळजळ लगेच कमी होते.
आर्थ्राटीसवर उपचार :
जर तुम्हाला आर्थ्राटीस असेल तर सांध्याच्या दुखण्यामुळे तुम्ही पुरते बेजार होता. आर्थ्राटीसमुळे साधं उठणं आणि बसणं अशा दैनंदिन क्रिया करणंदेखील कठीण जाऊ शकतं. मात्र कापूर तुमच्या या त्रासावर वरदान ठरू शकतो. यासाठी तेलामध्ये कापूर मिसळा आणि सांध्यावर त्याने मालिश करा. कापरातील थंडाव्यामुळे तुमच्या सांधेदुखीवर आराम मिळतो. दाह आणि वेदना कमी झाल्यामुळे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे व्यवस्थित करता येऊ शकतात. यासोबतच जाणून घ्या आर्थ्रायटिसच्या रुग्णांसाठी आहार.
नखांचे फंगस कमी होते
कापूर हे एक परिणामकारक निर्जंतूक करणारे साधन असल्यामुळे याचा वापर तुम्ही तुमच्या नखांच्या फंगसवरही करू शकता. कापरामुळे अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या आणि बुरशी नष्ट होतात. यासाठीच जर तुमच्या नखांना फंगस होत असेल. तर तेलात कापूर मिसळा आणि त्या तेलाने नियमित नखांना मालिश करा.
शांत झोप लागण्यास मदत
निद्रानाश हा आजकाल अनेकांना जाणवणारी आरोग्य समस्या आहे. अपुरी झोप मिळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कारण चिंता, काळजी, नैराश्य, आरोग्य समस्या अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला रात्री उशीरापर्यंत झोप लागत नाही. झोप लागण्यासाठी सतत गोळ्या घेणं आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. यासाठीच या समस्येला बरं करण्यासाठी कापराचा वापर करा. कापरामुळे तुमचे मन शांत होते आणि तुम्हाला शांत झोप लागते. कापराचे तेल उशीवर टाकून त्या मंद सुवासात झोपण्याचा प्रयत्न करा.
सर्दी खोकला बरा होतो.
सर्दी खोकला हे संसर्गजन्य विकार संक्रमित व्यक्ती अथवा वातावरणातील बदलांमुळे होत असतात. सर्दी खोकला बरा करण्यासाठी तुम्ही कापराचा वापर करू शकता. कारण कापरामध्ये वातावरण निर्जंतूक करणारे गुणधर्म असतात. यासाठीच विक्स वेपोरेबमध्येही कापराच्या तेलाचा वापर केला जातो. तुम्ही घरात कापूर जाळून, कापराच्या तेलाचा अथवा विक्स वेपोरेबचा वापर करून तुमची सर्दी बरी करू शकता.
एक्नेवर घरगुती उपचार.
कापूर त्वचेसाठी अतिशय उत्तम असतो. त्यामुळे कापराचा फायदे तुम्ही तुमच्या त्वचेवरील एक्ने अथवा पिंपल्स कमी करण्यासाठी नक्कीच करू शकता. कापराच्या तेलामुळे तुमच्या त्वचेतील पिंपल्समुळे निर्माण झालेले डाग, काळसरपणा, लालसर लाली आणि दाह कमी होतो. यासाठीच नारळाच्या तेलात कापूर मिसळा आणि तुमच्या पिंपल्सवर लावा. याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होत नाहीत. कापराचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळतो.
केसांची वाढ चांगली होते
केस गळणे ही एक गंभीर समस्या आहे. कारण केस गळण्यामागे आणखी अनेक कारणे आणि आरोग्य समस्या कारणीभूत असू शकतात. त्यामुळे जर तुमचे प्रमाणाबाहेर आणि सतत केस गळत असतील तर त्यावर योग्य उपचार करायला हवेत. कापराच्या तेलाने केस गळणे कमी करून केसांच्या वाढीसाठी प्रयत्न करू शकता. यासाठी तुमच्या रेग्युलर तेलात कापराचे तेल मिसळा आणि केसांवर उपचार करा.
लहान मुलांना केसात उवा झाल्या तर त्या कमी करणे ही पालकांसाठी एक समस्याच असते. कारण लहान मुले इतर लहान मुलांच्या सतत संपर्कात येत असतात. उवा आणि लिखा या एकमेकांच्या संपर्कातून संक्रमित होत असतात. ज्यामुळे लहान मुलांच्या डोक्यात उवा होणे ही गोष्ट न थांबवता येण्यासारखी आहे. मात्र यावर तुम्ही कापराचा उपचार करू शकता. कारण उवांवर कापराचे चांगला परिणाम होतो. उवा कमी करण्यासाठी नारळाच्या तेलात कापूर भिजवा आणि ते तेल केसांना लावा. का
No comments:
Post a Comment