Friday, 28 February 2025

मराठी भाषा जगवली, वाढवली, जोपासली पाहिजे, भाषेचा सन्मान केला पाहिजे

 मराठी भाषा जगवलीवाढवलीजोपासली पाहिजेभाषेचा सन्मान केला पाहिजे

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी भाषा गौरव दिनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्यिकांचा गौरव

 

मुंबईदि. 27 : मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक जगभरात पसरलेले आहेत. परंतु काही मराठी माणसे एकमेकांना भेटल्यावर उगाच हिंदीइंग्रजीत बोलतात. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे मराठीतच बोललं पाहिजे. जे जे मराठी आहे ते ते सर्व आपण जगवले पाहिजेवाढवले पाहिजेजोपासले पाहिजेत्याचा सन्मान केला पाहिजेअसे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे गौरव व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवारकौशलरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाउद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंतआमदार डॉ.मनीषा कायंदेमराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच साहित्य क्षेत्रातील दिग्गजनामवंत साहित्यिकलेखकप्रेक्षक उपस्थित होते. यावेळी मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रावसाहेब रंगराव बोराडे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कन्या श्रीमती प्रेरणा दळवी यांना प्रदान करण्यात आला. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशनपुणे या संस्थेला प्रदान करण्यात आला. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना प्रदान करण्यात आला.

            उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणले कीआपल्या प्रत्येक वर्तनातून मराठीचा अभिमान जागवला पाहिजे. हिच खऱ्या अर्थाने माय मराठीची सेवा ठरेल. माय मराठीवर नुसते प्रेम करून भागणार नाही. तर मराठी साहित्यनाटकचित्रपटलोककलासंगीतखाद्य पदार्थ हे सगळं आपण टिकवले पाहिजे. मराठीत बोलणारामराठी ऐकणारा आणि मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजेवाढवला पाहिजे. मराठीचा आग्रह धरण म्हणजे इतर भाषाचा द्वेष करणे असे नाही. भाषा ही आपली अस्मिता आहेभाषा ही आपली ओळख आहेभाषा आपला अभिमान आहेभाषा हेच आपले अस्तित्व आहे. काळाच्या ओघात किती तरी भाषा नामशेष झाल्या आहेत. आपली भाषा संपली तर एक दिवस आपलं अस्तित्व संपेल. त्यामुळे भाषेचे जतन आणि संवर्धनाची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. केवळ जबाबदारीच नाही तर ते प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य असल्याचे श्री.शिंदे म्हणाले.

 उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीआता तर संगणक तंत्रज्ञान आलंज्ञान शाखांमधलं ज्ञानही मराठीत मिळतेय. आपली भाषा ही ज्ञान भाषा व्हायला हवी. ती व्यवहाराची भाषा झाली तर अजून समृद्ध होईल. मराठी भाषेचा व्यवहारात वापर केला पाहिजे. प्रसारविस्तारसंवर्धन या चारही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून त्यासाठी भाषातज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजेअसेही मत त्यांनी व्यक्त केले.

एआय’च्या सहाय्याने सुप्रशासन राबवावेअधिकाऱ्यांनी लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता यावर भर द्यावा

 एआय’च्या सहाय्याने सुप्रशासन राबवावे


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


· अधिकाऱ्यांनी लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता यावर भर द्यावा


· १०० दिवसांच्या आराखड्यादरम्यान उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक


 


मुंबई, दि. २७ : लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता या सुप्रशासनामध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) येत्या काळात सर्वच क्षेत्रात मोठा बदल घडून येणार असून सुप्रशासन राबविताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे १०० दिवसांच्या आराखड्यानुसार आतापर्यंत उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.


राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्या योजनांचा सर्वसामान्यांना सुलभतेने लाभ मिळावा या उद्देशाने प्रत्येक विभागाने १०० दिवसात करावयाच्या कामांचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजीच्या बैठकीत दिले होते. या आराखड्यानुसार होत असलेल्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, क्षेत्रीय अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. तर ६,८५४ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. ऑनलाईन बैठकीला सर्व स्तरातील इतके अधिकारी उपस्थित असण्याचा हा एक विक्रमच होय. तालुका स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती.


विविध विभाग आणि पातळीवर उत्कृष्ट काम करीत असलेल्या १५ विभागांच्या कामांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. नाविन्यपूर्ण काम केलेल्या अधिकारी आणि कार्यालयांचे कौतुक करून त्यांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रालयापासून गाव पातळीपर्यंत विविध कार्यालयांमधील सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांना सेवा सुविधांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे समाधान होईल यासाठी प्रयत्न करावेत. सुप्रशासन असेल तेथे गुंतवणूक वाढते. महाराष्ट्र हे यादृष्टीने अग्रेसर राज्य असून यामध्ये आणखी वाढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आराखड्यानुसार शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर विभाग आणि जिल्हा पातळीवर या कामांचे समीक्षण आणि मूल्यमापन केले जाईल. त्या आधारावर उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना १ मे रोजी सन्मानित केले जाईल. त्याचबरोबर 40 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विभागांची नकारात्मक दखल घेतली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


प्रभावी कार्यवाहीसाठीचे मुद्दे


शंभर दिवसांच्या आराखड्यानुसार प्रभावी कार्यवाही करण्यासाठी विभागाचे संकेतस्थळ, नागरिकांचे सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी व सुविधा, गुंतवणूक प्रसार, कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, ई ऑफिसचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदी मुद्दे ठरवून देण्यात आले होते.


निवड प्रक्रिया


राज्यातील ३६ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ३६ जिल्हाधिकारी यांच्यामधून विभागीय आयुक्त पातळीवर छाननी करून प्रत्येकी सहा जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी २ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तर २ जिल्हाधिकाऱ्यांची महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी निवड केली. २२ महानगरपालिका आयुक्तांमधून प्रशासनामार्फत ६ आयुक्तांची छाननी करण्यात येऊन नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी त्यापैकी २ आयुक्तांची निवड केली.


११ पोलिस आयुक्तांमधून गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी ४ आयुक्तांची छाननी केली ज्यामधून अपर मुख्य सचिवांनी एका पोलिस आयुक्तांची निवड केली. त्याचप्रमाणे सहा विभागीय आयुक्तांमधून महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी एका विभागीय आयुक्तांची निवड केली.


याचप्रमाणे सहा पोलिस परीक्षेत्रांमधून एका पोलिस महानिरीक्षकांची पोलिस महासंचालकांनी निवड केली. ३४ जिल्हा पोलिस अधीक्षकांमधून महानिरीक्षकांनी आठ पोलिस अधीक्षकांनी छाननी करून त्यापैकी गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी दोन अधीक्षकांनी निवड केली. सर्व आयुक्त / संचालक यांमधून यशदाच्या महासंचालकांनी सहा आयुक्त / संचालकांची छाननी केली ज्यामधून मुख्य सचिव यांनी दोन आयुक्त / संचालकांची निवड केली. तर सर्व विभागांच्या अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव यांमधून मित्रा च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सहा सचिवांची छाननी केली ज्यामधून उत्कृष्ट काम केलेल्या दोन सचिवांची निवड मुख्य सचिवांनी केली.


उत्कृष्ट कार्य केलेले १५ विभाग आणि कार्यालये


            १) पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर २) पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा ३) विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजी नगर ४) बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई ५) गृह विभाग मंत्रालय ६) पिंपरी चिंचवड महानगरपालिका ७) ठाणे महानगरपालिका ८) जिल्हा परिषद कार्यालय, धुळे ९) जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर १०) जिल्हा परिषद कार्यालय, चंद्रपूर ११) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव १२) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे १३) आदिवासी आयुक्त कार्यालय १४) वैद्यकीय शिक्षण आयुक्त कार्यालय आणि १५) मृद व जलसंधारण कार्यालय, मंत्रालय यांचा समावेश आहे.


लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.


 


पालघर पोलिस अधीक्षक : बाळासाहेब पाटील


सातारा पोलिस अधीक्षक : समीर अस्लाम शेख


 


छत्रपती संभाजीनगर आयजी : वीरेंद्र मिश्रा


मुंबई पोलिस आयुक्त : विवेक फणसाळकर


गृह, अतिरिक्त मुख्य सचिव: इकबालसिंग चहल


 


आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका: शेखर सिंग


आयुक्त, ठाणे महापालिका: सौरभ राव


 


मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे, जिप: विशाल नारवाडे


मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर, जिप: विवेक जॉन्सन


 


जिल्हाधिकारी, नागपूर: विपीन इटनकर


जिल्हाधिकारी, जळगाव: आयुष प्रसाद


 


विभागीय आयुक्त, पुणे: डॉ. पुलकुंडवार


 


आदिवासी आयुक्त: लिना बनसोडे


आयुक्त वैद्यकीय शिक्षण: राजीव निवतकर


सचिव, मृद व जलसंधारण: गणेश पाटील


0000मुख्य कार्यकारी अधिकारीधुळेजिप: विशाल नारवाडे

मुख्य कार्यकारी अधिकारीचंद्रपूरजिप: विवेक जॉन्सन

 

जिल्हाधिकारीनागपूर: विपीन इटनकर

जिल्हाधिकारीजळगाव: आयुष प्रसाद

 

विभागीय आयुक्तपुणे: डॉ. पुलकुंडवार

 

आदिवासी आयुक्त: लिना बनसोडे

आयुक्त वैद्यकीय शिक्षण: राजीव निवतकर

सचिवमृद व जलसंधारण: गणेश पाटील

विशेष: शंकराचे आत्मलिंग, श्रीपाद श्रीवल्लभ ३ वर्षे वास्तव्य

 ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️

      *🔸श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर.🔸*


*------------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील,  रत्नागिरी.*

*------------------------------------------*


*🟣२८/०२/२५- गोकर्ण महाबळेश्वर रथोत्सव...🙏*


*स्थान: कर्नाटक उत्तर, कन्नड जिल्हा...*

*विशेष: शंकराचे आत्मलिंग, श्रीपाद श्रीवल्लभ ३ वर्षे वास्तव्य...*


*या क्षेत्राचा उल्लेख श्रीमद गुरुचरित्र या ग्रंथात आढळतो... येथे श्रीपाद श्रीवल्लभ घरातून निघाल्यानंतर तीर्थ क्षेत्रे फिरत असता याठिकाणी ३ वर्षे राहिल्याचा उल्लेख आढळतो. हे अतिशय पुरातन शिव मंदिर असून अत्यंत प्रासादिक तीर्थक्षेत्र आहे. अनेक जन्मांची पापे येथे केवळ दर्शनाने नाश पावतात असा क्षेत्रामहात्म्यात उल्लेख आहे.....*


*गोकर्ण महाबळेश्वर आत्मलिंग माहात्म्य...*

*या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत पण या सर्व तीर्थक्षेत्रांत कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्हयात अत्यंत पवित्र व प्रेक्षणीय समुद्र किनारी गोकर्ण हे तीर्थक्षेत्र आहे... या ठिकाणी 'महाबळेश्वर' नावाचे स्वयंभू शिवलिंग (आत्मलिंग) आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळविले त्याची श्रीगणेशाने या क्षेत्री स्थापना केली.....*


*आत्मलिंगाची उत्पत्ती कशी झाली..?*

*कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता. त्या पशुला तीन शिंगे होती... एकदा ब्रम्हा- विष्णू- महेश शिकारीसाठी गेले होते. त्यांनी त्या पशूची शिकार केली. त्यांनी त्या पशूची तिन्ही शिंगे काढली. त्या प्रत्येक शिंगाखाली एकेक प्राणलिंग होते. ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली. यातील आत्मलिंग हे शंकरांना मिळाले होते. जो या आत्मलिंगाची तीन वर्षे पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल. हे आत्मलिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल.....*


*रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला व ते गोकर्ण म्हणजे गाईच्या कानाच्या आकारासारखे झाले पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही... तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. स्वत भगवान सदाशिव, भगवान विष्णू, ब्रम्हदेव, कार्तिकेय, गणेश व सर्व देवादिकांनी या ठिकाणी वास्तव्य केले असे गुरुचरित्रात सांगण्यात आले आहे.....*


*गोकर्णक्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश होतो... सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही त्याप्रमाणे गोकर्णक्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापनिष्कृती होत नाही. हजारो ब्रम्हहत्या केलेला मनुष्यही गोकर्णक्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्राचे माहात्म्य इतके थोर आहे की, कार्यसिद्धीसाठी ब्रम्हदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे. जो कोणी गोकर्णक्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो ब्रम्हपदाला जातो.....(संदर्भ- गुरुचरित्र अध्याय ७ वा व स्कंध पुराण)*


*या गोकर्णक्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत... सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाषाणाचे होते. त्रेतायुगात ते तांबूसवर्णाचे होते, द्वापारयुगात ते पीतवर्ण आणि कलियुगात ते कृष्णवर्णाचे होते, गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे. परमपवित्र असे हे गोकर्णक्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. तेथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते तसेच रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा गोकर्ण क्षेत्री केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होमहवन अनंत फळ देणारे आहे. या ठिकाणी श्री गणेशाचे सुद्धा मंदिर आहे तसेच गोकर्णापासून ३० कि मी अंतरावर मुरुडेश्वर हे अत्यंत प्रेक्षणीय स्थळ आहे. हे गोकर्णक्षेत्र पुण्यवान स्थान आहे, म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ या पवित्र क्षेत्री ३ वर्षे वास्तव्यास होते.....*


*पूजा व अभिषेक...*

*रुद्राभिषेक, नवधान्य, चांदीचा नागकेशर, व सोन्याचा नागकेशर इत्यादी अभिषेक या ठिकाणी होतात..... (रुपये २५१ /- पासून १५००/- पर्यंत)*


*निवास...*

*या ठिकाणी भक्तांना निवासाकरिता शुल्करहित मंदिरातील ब्राम्हणांची घरे आहेत व तसेच लॉजसुद्धा उपलब्ध आहेत.....*


*महाप्रसाद...*

*या ठिकाणी दिवसातून दोन वेळेस महाप्रसाद मिळतो दुपारी १२:०० ते २:०० व रात्री ७:३० ते ८:३०*


*गोकर्ण महाबळेश्वरला कसे जाल..?*


*गाडीने...*

*कर्नाटक राज्यात हे ठिकाण आहे... नांदेड वरून गाडीने जाणार असाल तर एकूण ७०० कि. मी. प्रवास होतो व १४ ते १५ तास लागतात. मार्ग- नांदेड - लातूर - सोलापूर - हुबळी - येल्लापूर - अंकोला - गोकर्ण महाबळेश्वर.....*


*रेल्वेने...*

*रेल्वेने प्रवास असेल तर नांदेड वरून सकाळी ८:३० मि. देवगिरी एक्सप्रेस ने सिकंदराबाद ला जावे... लगेच दुपारी ४:०० वाजता हुबळी एक्सप्रेस ने हुबळी स्टेशन वर सकाळी ६;०० वाजता उतरावे व तेथून बसने अंकोला व गोकर्ण महाबळेश्वर ला उतरावे. (हुबळी ते गोकर्ण एकूण ५ तास लागतात). तसेच मुंबई, पुणे येथून आठवड्यातून एकदा गोकर्ण महाबळेश्वर ला जाण्याकरिता रेल्वे आहे.....*


*गोकर्ण महाबळेश्वर निर्मिती कथा  (संदर्भ- गुरुचरित्र...)*

*त्रेतायुगात राक्षसांचा राजा ‘रावण’ हा लंकेवर राज्य करीत होता. लंकाधीश रावण हा अत्यंत दृष्ट व महापराक्रमी राजा असला तरीदेखील शिवभक्त म्हणून ओळखला जाई... रावणाची माता कैकसी हीदेखील शिवभक्त होती. कैकसी रोज समुद्रकिनारी जाऊन मातीचे शिवलिंग तयार करी, त्याची प्राणप्रतिष्ठा करुन पूजा व अभिषेक करत असे. मात्र समुद्राच्या प्रवाहात हे मातीचे शिवलिंग वाहून जाई. तरीदेखील कैकसीचा नित्यनेम चुकत नसे. हे पाहून एकदा रावण कैकसीस म्हणाला “माते तू रोज मातीचे शिवलिंग तयार करुन त्याची पूजा का करतेस? मी तुला प्रत्यक्ष भगवान शंकरांचे आत्मलिंग आणून देतो. आत्मलिंग म्हणजे शंकरांच्या आत्म्यातून निघालेले शिवलिंग, ज्याची पूजा केल्याने प्रत्यक्ष भगवान शंकराची पूजा केल्याचे फळ मिळते.....”*


*रावण जसा शिवभक्त होता तसाच तो मातृभक्तही होता... आपल्या मातेस महादेवांचे आत्मलिंग आणून देण्यासाठी त्याने कैलासावर जाऊन शंकराची कठोर तपश्चर्या केली. रावणाच्या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले व म्हणाले, “लंकाधीश, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग.” मातृभक्त रावणाने शंकराकडे आपल्या मातेसाठी शंकराच्या आत्मलिंगाची मागणी केली. शंकरांनी आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करुन ते रावणाच्या हाती दिले व म्हणाले, “लंकाधिपती, हे माझे आत्मलिंग आहे. हे तुझ्या लंकापूरीत घेऊन जा, तिथे याची स्थापना कर. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, लंकेत जाईपर्यंत हे आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवू नकोस. हे जिथे ठेवले जाईल तिथेच ते स्थापन होईल.” भगवान शंकरांची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेस निघाला.....*


*भगवान शंकरांनी महापराक्रमी पण दृष्ट रावणास आत्मलिंग दिल्याचे समजताच सर्व देवदेवता चिंतेत पडले... साक्षात महादेवांचे आत्मलिंग पूजेस लाभल्याने दृष्ट रावण अधिक बलशाली व दिग्वीजयी होईल. त्याचा उन्मतपणा आणखी वाढेल व देवगणांना याचा त्रास होईल या विचारांनी सर्व चिंताग्रस्त देवदेवतांनी श्रीनारदमुनींसह विघ्नहर्त्या श्रीगणेशाकडे धाव घेतली. श्रीगणेशास आपली विवंचना सांगून रावण आत्मलिंग घेऊन लंकेस पोचता कामा नये अशी विनंती केली. श्रीगणेशाने देवांची विनंती मान्य करुन त्यांना निश्चिंत होण्यास सांगितले.....*


*श्रीगणेश एका ब्राह्मण बालकाचे रुप धारण करुन रावणाकडे निघाले... रावण समुद्रकिनाऱ्याजवळ येताना दिसताच, श्रीहरी विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने सूर्यास झाकून टाकले. सूर्यास्त झाला असे समजून रावण चिंतेत पडला. रावण एक अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. तो दररोज नित्यनेमाने संध्या करायचा. आपल्या रोजच्या संध्येची वेळ झाली. भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार आत्मलिंग खाली ठेवायचे नाही मग आता संध्या कशी करायची? असा विचार करीत असतानाच, रावणाचे लक्ष जवळच गुरे राखीत असणाऱ्या बालकाकडे गेले. रावणाने बालगुराख्यारुपी गणेशास मदत मागितली. रावण गणेशास म्हणाला, “मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे. मला एक मदत कर. मी समुद्रात जाऊन संध्या करुन येईपर्यंत तू हे आत्मलिंग सांभाळ, मी लगेचच येतो. पण मी येईपर्यंत हे हातातून खाली ठेवू नकोस.” बालगुराखीरुपी गणेशाने रावणाची विनंती मान्य केली व त्यास सांगितले, “महाराज, मी आपणांस मदत करण्यास तयार आहे. परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरुन राहणे मला शक्य होणार नाही. मी आपणांस तीनदा हाक मारेन तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या अन्यथा मी हे खाली ठेवीन” बालगुराखीरुपी गणेशाचे म्हणने मान्य करुन रावण संध्येस निघून जातो.....*


*रावणाने संध्या सुरु करताच गणेश आपल्या लीलेस सुरुवात करतो... तो घाईघाईने रावणास तीनदा हाक मारतो व हातातील आत्मलिंग जमीनीवर ठेवू लागतो. ते जमिनीवर ठेऊ नकोस अशा इशारा रावण लांबून करुनही तिकडे लक्ष न देता गणेश आपल्या हातातील आत्मलिंग जमीनीवर ठेऊन देतो. श्रीगणेशाने देवतांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने सर्व देवदेवता आनंदाने श्रीगणेशावर फूलांची वृष्टी करतात. हे पाहून रावणास कळून चुकते की, हे काम देवदेवतांचेच आहे. क्रोधीत रावण आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु आत्मलिंग तसूभरही हलत नाही. मग आत्मलिंग उचलत नाही म्हणून रावण सर्वशक्तीनीशी आत्मलिंग जोरजोरात हलवितो आणि त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा होतो. अनेक प्रयासानंतरही आत्मलिंग जागचे न हलल्याने शेवटी रावण निराश होऊन लंकेस परततो.....*


*गाईच्या कानासारखे म्हणून गोकर्ण तर महाबलशाली रावणाने अनेक प्रयत्न करुनही आत्मलिंग हलले नाही म्हणून महाबळेश्वर (महा+बळ+ईश्वर)... अशा प्रकारे महादेवांच्या या आत्मलिंगास ‘गोकर्ण महाबळेश्वर’ असे नाव पडले व कर्नाटकच्या कुमठा तालुक्यातील हे ठिकाण ‘गोकर्ण महाबळेश्वर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे ठिकाण मोक्षाचे द्वार समजले जाते त्यामुळे या ठिकाणास दक्षिण काशी असेदेखील संबोधले जाते.....*


*आत्मलिंगाची स्थापना झालेली पाहून रावणाने संतापून आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली (उदा. आत्मलिंग आणलेला डब्बा, डब्ब्याचे झाकण, आत्मलिंगावर टाकलेले कापड, धागा इ.) या चारही वस्तू वेगवेगळया ठिकाणी जाऊन पडल्या... गोकर्ण महाबळेश्वरबरोबरच या चारही ठिकाणांस धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. भगवान शंकर व पार्वती यांनी खालीप्रमाणे या ठिकाणांस पंचक्षेत्र असे नाव दिले:*


*१) गोकर्ण महाबळेश्वर- महादेवांचे मुख्य आत्मलिंग...*

*२) सज्जेश्वर- आत्मलिंग आणलेला डबा पडला ते ठिकाण... (३५ कि. मी. अंतरावर)*

*३) धारेश्वर- आत्मलिंगास बांधून ठेवलेला धागा पडला ते ठिकाण... (४५ कि.मी. अंतरावर)*

*४) गुनावंतेश्वर- जेथे आत्मलिंगाचे झाकण पडले ते ठिकाण... (६० कि. मी. अंतरावर)*

*५) मुरुडेश्वर- आत्मलिंगास झाकलेले कापड ज्या ठिकाण पडले ते ठिकाण ... (७० कि. मी. अंतरावर)*


*अशा प्रकारे भगवान शंकरांच्या आत्मलिंगाची श्रीगणेशामुळे 'गोकर्ण महाबळेश्वर' या ठिकाणी स्थापना झाली.....*

*स्रोत: आंतरजाल,  dattamaharaj.com*

❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️

अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता; नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब

 अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता;

नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

अध्यापक निवड प्रक्रिया पारदर्शक, निःपक्ष राबविण्यासाठी गुणवत्ताधारित नवीन कार्यपद्धती जाहीर

 

मुंबई, दि. 27 : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस  मान्यता देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता  येण्यासाठी यापुढे राज्यात अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी  नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहेअशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेराज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापकसहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे.  यामध्ये शैक्षणिक  क्रेडेन्शियल आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरण्यात येणार आहे. या  दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शकनिष्पक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  शैक्षणिक गुणवत्तासंशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के गुण (वेटेज) तर मुलाखतीसाठी २० टक्के गुण (वेटेज) देण्यात येणार आहे. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र असतील.

अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्राविण्य (aptitude) यांचे मुल्यमापन परिसंवाद (seminar) अथवा व्याख्यान प्रात्यक्षिक (lecture in a classroom situation) अथवा अध्यापन आणि संशोधन यामधील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरील चर्चा या बाबी मुलाखतीच्या टप्प्यावर विचारात घेण्यात येतील. निवड समितीच्या बैठकांचे दृक-श्राव्य चित्रिकरण करण्यात  येणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दृक-श्राव्य चित्रिकरण,बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने सीलबंद  करण्यात येईल.

मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. ही सर्व निवड प्रकिया सहायक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहील. नवीन निवडप्रक्रियेच्या  अधीन राहून  विद्यापीठांमधील सध्या सुरू असलेली अध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास  मान्यता देण्यात येत आहे.  तसेच भविष्यात होणाऱ्या  विद्यापीठांमधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेकरिता याच कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठांमध्ये पारदर्शक आणि जलद निवड प्रक्रिया राबविणे शक्य होणार आहे.  या सुधारित कार्यपद्धतीमुळे गुणवत्ताधिष्ठित अध्यपकांची  निवड होईल.  तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईलअसे उच्च व तंत्र शिक्षण  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

0000

श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा

 श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा

- सभापती प्रा.राम शिंदे

अहिल्यानगर दि. 27 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांचे  जीवन आणि त्यांच्या कार्याचे सर्व पैलू देशवासियांना एकाच ठिकाणी पाहता व अनुभवता यावेत यासाठी श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा  10 मार्चपर्यंत तयार करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

चौंडी येथे श्री क्षेत्र चौंडी बृहत विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत प्रा.शिंदे बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरउपविभागीय अधिकारी नितीन पाटीलजिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे म्हणालेअहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आणि कार्य हे निःस्वार्थ सेवाप्रशासनिक कुशलता आणि धार्मिक सहिष्णुतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांचे कार्य समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठीच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने या विकासाचा सुंदरआकर्षक व नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आराखडा तयार करावा.

            अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या जीवनात कृषीव्यापार विकासआदर्श राज्यकारभारधार्मिक स्थळांचा विकास व संवर्धन आदी बाबींना प्राधान्य दिले. देशातील बारा ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धाराचे कार्यही त्यांनी केले. त्यांच्या देशभरातील कार्याचा इतिहास एकत्र करून ऐतिहासिक वारसा व आध्यात्मिक भावनेची जपणूक व्हावीयासाठी त्याची प्रतिकात्मक स्वरूपात संग्रहालयातून मांडणी करण्यात यावी.

            चौंडी येथील विकास कामातून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणा सर्वदूर पोहोचण्याबरोबरच पर्यटनाला अधिक चालना मिळून रोजगार निर्मिती होण्याच्यादृष्टीने विविध बाबींचा आराखड्यात समावेश करावा. विकासकामांसाठी चौंडी परिसरात असलेल्या शासकीय जमिनीची पाहणीमोजणी करून त्याचा नकाशा तातडीने तयार करण्यात यावा. याठिकाणी बाराही महिने पाण्याची उपलब्धता राहील यासाठी नदी पुनरुज्जीवन व संवर्धनाचा समावेश आराखड्यात करण्यात यावा. चौंडीकडे येणारे रस्ते प्रशस्त असावेत. दरवर्षी ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनामित्त चौंडी येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीही उत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने करण्यात येणारी विकास कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीतअसे त्यांनी सांगितले.

चौंडी येथील विकास कामांना गती

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन आणि कार्याचा आदर्श जनतेसमोर असावा  व नवीन पिढीला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी या उद्देशाने चौंडी या गावाचा विकास करण्याच्यादृष्टीने अनेक विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत.            सद्यस्थितीत प्रादेशिक पर्यटन योजना व ग्रामविकास विभागाच्या  ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या दोन योजनांतर्गत मौजे चौंडीता. जामखेड. जि. अहिल्यानगर येथे एकुण रु. २४ कोटी ११  लक्ष रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

 प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ९ कोटींची कामे  पूर्ण झाली आहेत. यापैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मगाव चौंडी येथील गढीचे नूतनीकरण करणे,  नक्षत्र उद्यान,  संरक्षण भिंत बांधणे,  चौंडी येथे उद्यानातील गढी व परिसरातील शिल्प,  मुख्य प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण आहेत. तर संग्रहालय,  सिना नदीवर पश्चिम बाजूस घाटाचे बांधकाम करणे आदी कामांना मंजुरी मिळाली आहे.

ग्रामविकास विभागाकडील  मौजे चौंडी  येथे अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान येथे संग्रहालय बांधकाम करणे,  अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान नदीकाठी घाट बांधकाम व सुशोभिकरण करणे,   अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान येथे दोन स्वागत कमानींचे बांधकाम करणे या कामांसाठीदेखील निधी मंजूर झालेला आहे. चौंडी  परिसराच्या विकासासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना गती देण्यासाठी व्यापक विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या.

***


शेतीपूरक ई-वाहनामुळे शेतकऱ्यांना होणार लाभ pl share***

 शेतीपूरक ई-वाहनामुळे शेतकऱ्यांना होणार लाभ

- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरपॉवर टिलर व कटरचा समावेश

 

मुंबईदि. 27 : राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरपॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले होते. मात्रसुरुवातीला या धोरणात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरपॉवर टिलर आणि कटरचा समावेश नव्हता. त्यावर विचार करून, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या वाहनांचा समावेश धोरणात केला आहे. यासंबंधीच्या शासन निर्णयाचे शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांसाठी फायदे

शेतीकामांसाठी ईलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यास शेतकऱ्यांचा इंधनावरील खर्च कमी होईल आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक प्रभावही कमी होईल. यामुळे वातावरणातील वायू प्रदूषणात घट होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या देखील फायदा होईल. याशिवायइलेक्ट्रिक वाहने जास्त वेळ चालतातदेखभाल खर्च कमी होतो आणि कमी इंधनाची आवश्यकता भासते.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसारबॅटरीवरील वाहनांची खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा फायदा आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरपॉवर टिलर आणि कटर खरेदी करतांना होईल. राज्य सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे.

या धोरणामुळे फक्त शेतकऱ्यांना फायदे होणार नाहीततर पर्यावरण व वातावरणीय बदलाचा प्रभावही कमी होईल. इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करण्यास मदत करतीलज्यामुळे स्वच्छ हवा मिळवता येईल. याशिवायग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची आवड निर्माण होईलजेणेकरून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची स्वीकृती वाढेल. या धोरणामुळे महाराष्ट्र राज्यात शेतीच्या कामामध्येही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक सुलभ आणि किफायतशीर साधने मिळतीलअसे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

००००

Thursday, 27 February 2025

महावितरण’च्या आर्थिक सुस्थितीसाठी राज्य शासन प्रयत्नशील

 महावितरण’च्या आर्थिक सुस्थितीसाठी

राज्य शासन प्रयत्नशील :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमहावितरण ही ऊर्जा क्षेत्रातील देशातील मोठी कंपनी आहे. 28% वीज वापर हा कृषीसाठी असून प्रमाण देशात सर्वाधिक आहे. 1.12 लाख कोटींवर महसूल असून 49% महसूल हा उद्योगांकडून मिळतो. महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करत आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना आणली असून त्यातून सौरऊर्जेवर मोठे काम करीत आहोत. यातून वीज वितरण हानी कमी होईल. विजेचे दर सुद्धा कमी होईल. यातून जो पैसा वाचणार त्यातून सामान्य ग्राहकापासून ते उद्योगापर्यंत सर्वांना वीज स्वस्तात मिळेल असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सौर कृषीपंप सुद्धा मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व घरांसाठी सौर ऊर्जा देण्यात येणार आहे. जवळजवळ 30 लाख घरांना ही वीज मिळेल. त्यातून सुद्धा मोठी क्रांती होणार आहे. अशा सर्व उपायातून 52% वापर हा नवीकरणीय ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न आहे. या क्षेत्रात ‘एआय’ चा वापर मोठ्या प्रमाणात वाढविला आहे असेही ते म्हणाले.

               राज्य शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ७.५ HP पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४७ लाख कृषी पंपांचे वीज बिल सरकार थेट ‘महावितरण’ला अदा करत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना  2.0 अंतर्गत १६,००० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील ४७ लाख कृषी पंपांना १००% सौरऊर्जा पुरवठा होणार असून, ‘महावितरण’च्या वीज खरेदी खर्चात मोठी बचत होईल. ‘महावितरण’ने विविध उपाययोजना राबवून वीज खरेदी खर्चात ₹६६,००० कोटींची बचत करण्याचा प्रस्ताव  महाराष्ट्र वीज नियामक आयेागाकडे सादर केला आहे. तसेचपुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीज दर कमी करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. उद्योगांवरील क्रॉस-सबसिडी हटवूनसर्वसामान्य ग्राहकांसाठी वीज दर आणखी परवडणारा करण्याचा मानस आहे, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

       पॉवर फायनान्स कमिशनप्रयासगुजरातमहाराष्ट्रआंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान राज्यातील ऊर्जा विभागांनी यावेळी सादरीकरण केले.

            बैठकीला अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्लामुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रामहापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. यासह केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                        *******

Featured post

Lakshvedhi