Monday, 30 September 2024

पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनमुख

 पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

सातारादि. २९: पाटण तालुक्यातील काळोली येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल तालुका बीज गुणन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल नावारूपास येईलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवराज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईकृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपोलीस अधीक्षक समीर शेखजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनकृषी सहसंचालक उमेश पाटीललोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाईजिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  माती परीक्षण प्रयोगशाळाधान्य व स्वच्छता प्रतवारी केंद्रडाळ प्रक्रिया केंद्रतेल घाणा केंद्र व भात प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. 

जिल्ह्यातील दुर्गम भागात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून १६.३३ हेक्टर क्षेत्रावर काळोली येथे बहुउ‌द्देशीय कृषी संकुल उभारण्यात आले. या बहुउद्‌देशीय संकुलासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४९८ लक्ष रुपये खर्चास मंजुरी मिळाली असून त्यापैकी ४९१ लक्ष रुपये वितरित करण्यात आले आहेत. या संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रक्षेत्रावर विविध पिकाचे प्रात्यक्षिक स्वरूपात असलेले निवासी प्रशिक्षणवेगवेगळ्या प्रक्रिया उ‌द्योगांचे प्रशिक्षण आणि माती परीक्षण या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

या कृषी संकुलात तालुका बीज गुणन केंद्र काळवली प्रक्षेत्रावर १२.२० हेक्टर लागवडीलायक क्षेत्र असून सध्या या क्षेत्रावर भातसोयाबीनऊस आणि रब्बी ज्वारी या पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते. पाटण तालुक्यात पिकांच्या लागवडीसाठी पोषक हवामान आहे. येथे भात सोयाबीनऊसभुईमूगसूर्यफूल या पिकांची लागवड करण्यात येते.

कृषी संकुलामध्ये २०० आसन क्षमता असलेले सुसज्ज शेतकरी प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कृषीउमेदमहिला आर्थिक विकास महामंडळग्रामविकास विभाग यांची शेतकरी तसेच महिला बचत गटासाठी प्रशिक्षणांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे दहा हजार शेतकरी या कृषी संकुलास भेट देतील.  कृषी संकुलामध्ये पीक उत्पन्न वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या माती परीक्षण  प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकऱ्यांना माती नमुने तपासण्यासाठी जिल्हास्तरावर यावे लागणार नाही. या बहुउ‌द्देशीय कृषी संकुलामध्ये पहिल्या टप्प्यात धान्य प्रतवारी केंद्रतेलघाणा औणि भात गिरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रिया केंद्रामध्ये शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर धान्याची प्रतवारी करणे भुईमूगसूर्यफूल इत्यादीचे तेल तयार करणे आणि भात कांडून देणे या सुविधा उपलब्ध आहेत. ही केंद्रे शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी महाविद्यालयातील वि‌द्यार्थी यांचे मार्फत कार्यान्वित करण्यात येतील. या प्रक्रिया केंद्रांमुळे दुर्गम भागातील युवकांना कृषी प्रक्रियेबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

काळोलीच्या बीज गुणन केंद्रावर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील ऊस प्रात्यक्षिके उपकेंद्राच्या माध्यमातून घेणे प्रस्तावित असून तसा प्रस्ताव महात्मा फुले कृषी वि‌द्यापीठात देण्यात येणार आहे. यामुळे पाटण आणि लगतच्या तालुक्यातील उसाचे उत्पादन वाढण्यासाठी उत्तम बियाणे शेतकऱ्याऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल.या संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी निवासस्थानउपहारगृहशीतगृह या सुविधा प्रस्तावित असून जिल्हा वार्षिक योजनेतून त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

0000

    

नाडे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

 नाडे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

 

सातारादि. २९ : पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी आयुष मंत्रालयआरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्रीराज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईकृष्णा खोरे विकास महामंडळाचे  उपाध्यक्ष महेश शिंदेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपोलीस अधीक्षक समीर शेखजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनशिवस्मारक समितीचे अध्यक्ष यशराज देसाईसमितीचे उपाध्यक्ष विजय पवार आदी उपस्थित होते.

या अश्वारुढ पुतळ्याची उंची ९ फूट असून हा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडियामुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती नाडे येथे उभारण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील हा पहिला अश्वारुढ पुतळा आहेही अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर

 सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार

राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर

सातारा (जिमाका), दि.२९ :  महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या  जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन महिलाशेतकरीयुवकज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य शासनाने दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतीलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

पाटण तालुक्यातील २८९ कोटींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि लोर्कापण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी   आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवराज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसेकरजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपोलीस अधीक्षक समीर शेखजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनलोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई आदी उपस्थित होते.

सी.एम. म्हणजे कॉमन मॅन असल्याचे समजून कार्य करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेसर्वसामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. लोकांच्या हाताला काम देण्याचे कार्य शासन करीत आहे. समाजातल्या विविध घटकांसाठी अत्यंत महत्वकांशी योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून कार्य करित असल्यानेच महाराष्ट्र आज उद्योगविकासपायाभूत सुविधापरदेशी गुंतवणूक आदी बाबींमध्ये अग्रेसर आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेया योजनेमुळे महाराष्ट्रातील असंख्य बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. ही योजना कधीही बंद न होता टप्प्याटप्प्याने यामध्ये मिळणाऱ्या निधीत वाढ होत राहिल. वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत असणारी अन्नपूर्णा योजनाशेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाचे मिळून  १२ हजार रुपये देण्यात येत असलेली शेतकरी सन्मान योजनाराज्यातील युवकांना हाताला काम देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण भत्ता देण्यात येत असलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाशेतकऱ्यांसाठी साडेसात हॉर्स पावर मोफत वीज योजना१ रुपयात पीक विमा योजनामुलींना मोफत शिक्षण योजनाज्येष्ठांसाठी वयोश्री योजनातिर्थदर्शन योजना यासारख्या अभिनव योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यामुळे राज्याच्या व सामान्य माणसांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील.

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन चालणारे राज्य आहे. येणाऱ्या शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभा करुन त्यांना अभिवादन करण्यात येईलअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाटण येथे मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवारायांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पुढाकार घेतला होता. त्याच धर्तीवर पाटण येथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

पाटण तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणालेपाटण तालुका डोंगरदऱ्यामध्ये विखुरलेला आहे. यापूर्वी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी फार बिकट अवस्था होती. या तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे काम केले. जिल्ह्यातील जल पर्यटनाला चालना देण्याचे काम करण्यात आले. तारळी नदी उपसा सिंचन प्रकल्पातील पाणी  १०० मीटरपर्यंत पोहोचवले. मोरणा गुरेघरच्या उजव्या- डाव्या कालव्याला बंदिस्त पाईप लाईन करण्याचे काम दोन दिवसात सुरू होईल.  नाटोशी हे संपूर्ण गाव आणि वाड्या- वस्त्या पाण्यापासून वंचित होत्या. त्यासाठी जलसिंचन योजनेचे काम लवकरच सुरू होईल.

पाटण तालुक्यातील नाडेगावात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहेही अभिमानाची बाब आहेअसे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणालेडोंगरी भागातील विकासासाठी पूर्वी मंजूर केलेला २०० कोटींचा आचार संहितेपूर्वी  निधी मिळाल्यास कामे सुरु करता येतील.  यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी १० कोटी रुपये दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल काळोली , ता.पाटण ५ कोटीच्या कामांचा लोकार्पणनाडे ता.पाटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पणवाटोळे ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ९४ कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्राचे ई भुमिपुजन, तारळी प्रकल्पामधील ५० व १०० मी उंचीवरील उपसा सिंचन योजनेच्या ७९ कोटींच्या कामांचे लोकार्पणपाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमीपुजनमल्हारपेठ येथील ग्रामसचिवालय नूतनीकरण इमारतीचे लोर्कापण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

आधुनिक पीक पद्धतीचा अंगीकार करून बळीराजाचे उत्पादन वाढविण्याचे कार्य कौतुकास्पद - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सन 2020, 2021 व 2022 वर्षातील राज्यस्तरीय कृषी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा

 आधुनिक पीक पद्धतीचा अंगीकार करून

बळीराजाचे उत्पादन वाढविण्याचे कार्य कौतुकास्पद

-         राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

सन  20202021 व 2022 वर्षातील राज्यस्तरीय कृषी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा

 

मुंबईदि. 29: महाराष्ट्र हे देशात प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेवून आपला ठसा उमटविणारे राज्य आहे. कृषी क्षेत्रातही राज्याची भरारी वाखणण्याजोगी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असताना सगळीकडे शेतकरी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे प्रकर्षाने दिसले. उत्पादन वाढीसाठी बळीराजा करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहेअसे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी काढले. यावेळी त्यांनी पुरस्कार विजेत्या शेतकरी बांधवांचे अभिनंदन केले.

कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या  सन 20202021 व 2022 या तीन वर्षाचे सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वरळी येथील एन. एस. सी. आय डोम येथे करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवारकृषी मंत्री धनंजय मुंडेआमदार विक्रम काळेकृषी विभागाच्या सचिव जयश्री भोजकृषी आयुक्त रवींद्र बिनवडेफलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्ण म्हणालेराज्याची एक रुपयात पीक विमा योजना ही देशात एकमेव आहे. या योजनेचा अन्य राज्य अंगीकार करत आहे. राज्यात कृषी क्षेत्रात अनुदान योग्य मार्गाने दिले जात आहे. शेततळ्याकरीता अनुदान देण्यात येत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेततळे घेवून शेतीला संरक्षित सिंचन उपलब्ध करत आहे. ठिबक सिंचन अनुदान ही राज्याची एक मोठी योजना आहे,  यामुळे प्रत्येक थेंबाचा उपयोग उत्पादन वाढीसाठी होत आहे.

महाराष्ट्र राज्य कापूससोयाबीनकेळी व द्राक्ष उत्पादनात देशात अव्वल आहे. राज्यातील बळीराजाची मेहनत व आधुनिक तंत्रज्ञानाचा होत असलेला अंगीकार यामुळे महाराष्ट्र हे देशात कृषी क्षेत्रातील अग्रगण्य राज्य बनले आहेअसेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले. पुरस्कार वितरणावेळी शेतकरी माझ्यासोबत छायाचित्र काढत नाही,  तर मीच शेतकऱ्यांसोबत छायाचित्र काढणार आहेअसे बोलून राज्यपाल श्री.  राधाकृष्णन यांनी बळीराजाच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाला राज्यभरातून आलेले शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संचालक (कृषी व विस्तार) विनयकुमार आवटे यांनी मानले.

 

कापूस- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हजार 500 कोटी अर्थसाहाय्याचे वितरण - उपमुख्यमंत्री अजित पवार

आपल्या काळ्या आईची सेवा करून मोठ्या कष्ट,  मेहनतीने अन्नधान्याचे उत्पादन बळीराजा घेत असतो. कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन बळीराजाच्या पाठीशी आहे. २०२३ मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या दरामध्ये झालेल्या नुकसानीपोटी प्रती हेक्टरी पाच हजार दोन हेक्टर मर्यादेत देण्यात येणार आहे. राज्यातील आधार संलग्न बँक खात्यांची पडताळणी झालेल्या 65 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे. या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात उद्यापासून करण्यात येणार आहेअशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली. तसेच ऊर्वरित शेतकऱ्यांच्या खात्याचे आधार संलग्नता व कागदपत्रांची पडताळणी करून अर्थसाहाय्याचे वितरण करण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले,  शेतकऱ्यांच्या साडेसात अश्‍वशक्तीपर्यंत कृषी वीजपंपाचे देयक माफ करण्यात आले आहे. यापुढे साडेसात एचपीपर्यंत वीज पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना देयक येणार नाही. दिवसा वीज देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.  त्यानुसार 9 हजार 500 मेगावॅट वीज सौर उर्जेवर निर्माण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिन्यात शेतकऱ्यांना दिवसा पूर्णपणे वीज मिळणार आहे.  शेतकऱ्यांना 24 हजार कोटी रुपये खर्चून साडेआठ लाख सौर कृषी पंपाचे वितरण हे करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिथे केंद्र शासनाची मदतीची आवश्यकता असतेतिथे केंद्रशासन राज्याला मदत करीत आहे. कांदा व  बिगर बासमती तांदुळावरील  निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. सोयाबीन खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविल्यामुळे सोयाबीनच्या किमती वाढणार आहे. याचा लाभ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. ऊसाला किमान आधारभूत किंमत  वाढवीण्यासाठी केंद्र शासनाची चर्चा झाली आहे. शासन गायीच्या दुधाला सात रुपये प्रति लिटर अनुदानअटल बांबू समृद्धी योजनानळगंगा -  वैरागंगा नदी जोड प्रकल्पपश्चिमेकडून समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणे अशा महत्त्वाच्या योजनांवर शासन काम करीत आहेअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. बळीराजाला त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रक्कम चौपट करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

शेती क्षेत्रात संशोधन करून शेतकऱ्यांनी समाजात सुबत्ता आणली - कृषी मंत्री धनंजय मुंडे

हजारो वर्षांपूर्वी शेतीची जेव्हा सुरुवात झालीतेव्हापासून शेतकरी या व्यवसायात आहे. शेती क्षेत्रात संशोधन करून शेतकऱ्यांनी समाजात सुबत्ता आणली आहे,  असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सत्कार व पुरस्कार वितरण समारंभात केले.

कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणालेकृषी विभागाने मिशन मोडवर पुरस्कारांची छाननी पूर्ण करून मागील तीन वर्षांचे पुरस्कार देण्यात येत आहे. बळीराजाला मुंबईत सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्याच्या कार्याचा यथोचित गौरवाने काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजाचे ऋण फेडण्याची ही संधी आहे.

परंपरागत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे.  शेतीमध्ये ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.  शेतीमालाच्या दरासाठी ऍग्रोथॉन ॲप  विकसित करण्यात आले आहे.  सोयाबीन संशोधनासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. डॉ.  पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनसोयाबीन उत्पादन वाढ व मूल्य साखळीचा विकासएक रुपयात पिक विमाकृषी यांत्रिकीकरणगोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजनाबाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आदींची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

परळी (जि. बीड) येथे सोयाबीन संशोधन संस्थानागपूर येथे आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रचांदूरबाजार (जि. अमरावती) येथे सिट्रेस इस्टेट,  दिवे आगार येथे सुपारी संशोधन केंद्रबुलढाण्यात शासकीय कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. सन 2023 - 24 मध्ये राज्यात 142. 64 लाख मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादन घेण्यात आले आहे. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 3. 39 टक्क्याने वाढ नोंदविण्यात आली आहे.  हे सर्व माझ्या बळीराजाचे यश आहेअशा शब्दात कृषी मंत्री श्री मुंडे यांनी बळीराजाचे कौतुक केले.

राज्याच्या कृषी क्षेत्राच्या भरीव कामगिरीची  दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली आहे.  वर्ल्ड अग्रिकल्चर फोरमने राज्यला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित केले आहेअसेही कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

 

विविध कृषी पुरस्कारांचे वितरण

सन 20202021 व 2022 करिता विविध कृषी पुरस्कारांचे वितरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,  उपमुख्यमंत्री अजित पवारकृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते आज  विविध 448 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यामध्ये 5 शेतकरी बांधवांना डॉ.  पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार27 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार26 शेतकऱ्यांना जिजामाता कृषी भूषण पुरस्कार25 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार21 शेतकऱ्यांना कृषी भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार25 शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार25 शेतकऱ्यांना उद्यान पंडित पुरस्कार96 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)17 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) शेतकऱ्यांना देण्यात आले. तर  27 अधिकारी व कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार  देण्यात आले.  तसेच  राज्यस्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्या 154 शेतकऱ्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. अशा प्रकारे  448 शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले.

 

०००००

 


Sunday, 29 September 2024

वाळकेश्वर येथील जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

 वाळकेश्वर येथील जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना




 

मुंबई दि.29 : भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी  रविवारी (दि. 29) वाळकेश्वर येथील श्रीपाल नगर जैन मंदिर येथून झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी राज्यपालांनी जैन मुनींचे दर्शन घेतले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढाविश्वस्त रमण शहाहिऱ्यांचे व्यापारी भरत शहाहितेंद्र मोटा आदी उपस्थित होते.

 

Maha Governor flags off Maha Ratha Yatra of Jain Sanghs

 

Mumbai Dt. 29 : Maharashtra Governor C P Radhakrishnan flagged off the Maha Ratha Yatra organised by all the Jain Sanghs of Mumbai on the occasion of 2550th Bhagwan Mahavir Nirvan Mahotsav from Shripal Nagar Jain Mandir at Walkeshwar Mumbai. The Governor had the darshan of Munis and addressed the people assembled on the occasion.

 

Minister of Skill Development and Entrepreneurship Mangal Prabhat Lodha, Trustee Raman Shah, Diamond Merchant Bharat Shah, Hitendra Motaa and others were present.

 

राज्यपालांची स्वामीनारायण मंदिराला भेट

 

मुंबई दि.29 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज दादर मुंबई येथील स्वामीनारायण मंदिरास भेट देऊन तेथील नीलकंठ   

वर्णी यांचे दर्शन घेतले व अभिषेक केला.

राज्यपालांनी अक्षर पुरुषोत्तम भगवानस्वामी नारायण भगवानहरिकृष्ण महाराज व इतर देवतांचे दर्शन घेतले.

यावेळी राज्यपालांनी योगी सभागृह येथे प्रगट ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले तसेच उपस्थित भक्तांशी संवाद साधला. यावेळी साधू तीर्थस्वरूप दास व साधू निष्काम जीवन उपस्थित होते.

 

Governor visits Swaminarayan Mandir

 

Mumbai Dt. 29 : Maharashtra Governor C P Radhakrishnan visited the Swaminarayana Mandir at Dadar, Mumbai and performed the Puja and Abhishek of Neelakanth Varni. The Governor had the Darshan of Akshar Purshottam Bhagwan, Swami Narayan Bhagwan, Harikrishna Maharaj and other deities.

The Governor had the blessings of Pagat Brahmaswarup Mahant Sami Maharaj and interacted with the devotees at the Yogi Sabhagriha. Sadhu Teerthaswarup Das and Sadhu Nishkam Jeevan were present.

 

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची

66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 

मुंबई दि.29 : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान  येथे संपन्न झाली.

या सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषय सर्व साधारण चर्चा करुन मंजूर करण्यात आले.

पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी-विक्री व पणन संस्थांची शिखर संस्था असून राज्यातील 827 "अ" वर्ग सहकारी संस्था पणन महासंघाचे सभासद आहेत. संस्थेने आजवरच्या काळात शेती व शेतकरी आणि ग्राहक यांच्या विकासासाठी आणि हितसंरक्षणासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. पणन महासंघाने शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या असून शासनाने पणन महासंघावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल सालामध्ये धान व भरडधान्यकडधान्य व तेलबिया खरेदीखत व पशुखाद्य विक्रीचे काम केलेले आहे. शेतीमालाला लाभप्रद व वाजवी भाव मिळावा यासाठी विविध भरडधान्य व तेलबिया / कडधान्ये यांची केंद्रशासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने राज्यात खरेदी केली आहे. नाफेडमहाराष्ट्र शासन व एफ.सी.आय. करीता पणनमहासंघामार्फत कडधान्य (तूउडीद, मूचणा) व तेलबिया (सोयाबीन) खरेदी झालेली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी यावेळी दिली.

यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील सरव्यवस्थापक प्रभाकर सावंतनितीन यादवदेविदास भोकरे यांच्यासह महासंघाचे संचालक मंडळपदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

 

Health tips *"झोपेचा सौदा"*

 Health tips 


              *"झोपेचा सौदा"*                


मित्रांनो, नेटफ्लिक्स आज उघडपणे म्हणतंय की त्यांची स्पर्धा माणसाच्या झोपेशी आहे... तो जितका कमी झोपेल आणि नेटफ्लिक्स बघण्यात वेळ घालवेल तितकं बरं..! 

खरंतर नेटफ्लिक्सने हे उघडपणे सांगितलं इतकंच बाकी अमेझॉन, हॉटस्टार यांचीही स्पर्धा झोपेशीच आहे... इतकंच कशाला या सगळ्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आधी आलेल्या युट्युबनेही न बोलता कायम आपल्या झोपेशी स्पर्धा केली आहे... 

फेसबुकही तेच करतंय. झोपेतून उठत नाही तोच फेसबुक आणि व्हाट्सअप उघडणारे अनेकजण आहेत... मध्यरात्री अचानक उठून फेसबुक व व्हाट्सअप बघणार्‍यांची आणि मग त्याच तंद्रीत परत झोपणार्‍यांची संख्या वाढतेय... 

`रात्री झोपताना तरी किमान फोनचा डाटा बंद केला पाहिजे हा विचार आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे...`


रोजचा दीड-दोन जीबी डाटा ही स्वस्ताई नाहीये, त्या दीड-दोन जीबीसाठी आपण झोपेच्या निमित्ताने प्रचंड मोठी किंमत चुकती करतो आहोत... _ज्याचा संबंध थेट आपल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आरोग्याशी आहे..._ आपल्याला आभासी जगात एखादी गोष्ट स्वस्तात किंवा फुकट मिळते म्हणजे ती खरोखर फुकट नसते... फेसबुक वापरण्याचे खिश्यातून पैसे आपण देत नाही. नेटफ्लिक्स वापरण्याचे जे पैसे देतो त्याच्या कितीतरी पट अधिक मनोरंजन आपल्या हातात असतं, ज्यामुळे ते जवळपास फुकट आहे असं आपल्याला वाटत असतं... पण आधुनिक काळात, आभासी जगाच्या दुनियेत बाजार निराळ्या पद्धतीने पैशांची वसुली करत असतो... `इथे कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही...` `स्वस्तातही मिळत नाही...` 

प्रत्येक गोष्टीची किंमत असते. मनोरंजन अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित बनत चाललंय कारण सध्या सौदा आपल्या झोपेचा आहे...


मित्रांनो, आपण जितके कमी झोपणार, डिजिटल माध्यमातून मनोरंजन देणार्‍या कंपन्या तितक्याच मोठ्या होत जाणार, हे भयंकर आहे आणि अस्वस्थ करणारं आहे... `प्रत्येकजण बोली लावतोय, माणसांची झोप कमी व्हावी यासाठी...` 


तेंव्हा मित्रांनो, आपल्या झोपेचा सौदा किती होऊ द्यायचा याचाही ज्याने त्याने विचार करण्याची वेळ आली आहे...

Featured post

Lakshvedhi