Tuesday, 28 March 2023

जिन्दगी कैसी है paheli






 

कॅल्शियम म्हणजे काय तसेच कॅल्शियम कमतरता दूर करण्यासाठी

 *कॅल्शियम म्हणजे काय तसेच कॅल्शियम कमतरता दूर करण्यासाठी फॉलो करा🦴  'या' टीप्स*🦴🦴

 

मानवी शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात पोषकतत्व नियमित मिळणे फार गरजेचे आहे. कॅल्शियम हे एक असे रासायनिक तत्व ज्यामुळे माणसाच्या शरीरातील हाडे मजबूत राहतात. आहारातील अनेक पदार्थांमधून तुमच्या शरीराला कॅल्शियमचा पूरवठा होत असतो. माणसाप्रमाणेच इतर प्राणीमात्रांनादेखील कॅल्शियमची आवशक्ता असते. कॅल्शियमच्या अभावामुळे माणसाला निरनिराळ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. 

जर तुम्हाला सतत अंग दुखणे


अथवा थकवा जाणवत असेल तर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असू शकते. 


यासाठीच कॅल्शियम युक्त आहार घेणे आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचा आहे ते आपण पाहणार आहोत. मात्र अनेकजणी अशी अंगदुखी अंगावर काढतात किंवा कोणत्या आहारातून कॅलशियमचा पूरवठा होतो हे माहीत नसल्यामुळे केवळ कॅल्शियम सप्लीमेंटच्या आधारावर दुखणं बरं करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या भारतीय आहारात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यामुळे तुम्हाला भरपूर कॅलशियम मिळू शकते. शिवाय यासाठी प्रत्येकाला दररोज किती प्रमाणात कॅल्शियमची गरज आहे हेदेखील माहीत असायला हवे. म्हणूनच आम्ही तुम्हाला कॅल्शियमयुक्त आहार आणि कॅल्शियमच्या कमतरतेबाबत सर्व काही सांगत आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल.


 *क्रॅल्शियम शरीरासाठी कसे महत्त्वाचे आहे-* 


 *हाडांच्या मजबूतीसाठी*


मानवी शरीरातील हाडे आणि दातांमध्ये 99 टक्के कॅल्शियम असते. सहाजिकच हाडांचा विकास आणि मजबूतीसाठी शरीराला मुबलक कॅलशिमची गरज असते. वीस ते पंचवीस वयापर्यंत बोन डेसिंटी चांगली असल्यामुळे माणसाची हाडे नैसर्गिक पद्धतीने मजबूत असतात. मात्र जसे जसे तुमचे वय वाढू लागते तसे शरीरातील बोन डेसिंटी कमी होऊ लागते. त्यामुळे पंचविसीनंतर तुमच्या शरीराला कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळणे गरजेचे असते. कॅलशियमच्या अभावामुळे हाडांचे विकार होण्याची दाट शक्यता असते. शिवाय उतारवयात हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यामुळे फ्रॅक्चर आणि अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.


 *स्नायू बळकट करण्यासाठी* 


कॅल्शियममुळे तुमचे स्नायू बळकट राहण्यास मदत होते. यामध्ये ह्रदयातील स्नायूंचादेखील समावेश असतो. मांसपेशींना आकुंचन आणि प्रसरण पावण्यासाठी कॅलशियम गरजेचे असते.


 *ब्लड क्लॉटिंगसाठी* 


रक्ताच्या दाटपणासाठी कॅलशियम महत्त्वाची भूमिका बजावते. क्लॉटिंग प्रक्रियेमध्ये विविध केमिकल्सचा समावेश असते.कॅल्शिमय त्यामधील एक महत्त्वाचा घटक आहे.


 *कॅल्शियमची कमतरता* 


कॅल्शियम अभाव त्या लोकांमध्ये जास्तप्रमाणात आढळून येतो जे लोक आहारातून पूरेसे कॅल्शियम घेत नाहीत. आजकाल अनेक माणसे घर अथवा ऑफिसमधील कामांमध्ये व्यस्त असतात. सहाजिकच सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो. शिवाय आहारातूनदेखील कॅलशियम फारच कमी प्रमाणात घेतले जाते. सतत चहा-कॉफीचे सेवन करणे, सोडीयमयुक्त पदार्थ खाणे यामुळे कॅल्शियमचा अभाव निर्माण होऊ शकतो. कॅलशियमची कमतरता ही पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. याचे महत्त्वाचे कारण महिलांना त्यांच्या जीवनात मासिकपाळी, प्रेगन्सी, ब्रेस्टफिडींग, मॅनोपॉज अशा विविध टप्प्यांमधून जावे लागते. या गोष्टींमुळे हाडांची झीज झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.


https://chat.whatsapp.com/J3gm5TqJxhO4Vs619oeA8N


 *कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे* 


 ▪️ कॅल्शियमचा अभाव* असल्यास हाडे दुखू लागतात. ज्यामुळे अशा लोकांना उठता-बसताना त्रास होतो. सांधे जखडण्याची समस्यादेखील जाणवते. कधी कधी हा त्रास इतका वाढतो की त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये जावून उपचार घ्यावे लागतात.


 ▪️ कॅल्शियम कमी असल्यास लवकर थकवा येतो.* 


▪️ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात दुखतात आणि नखे लवकर तुटतात.


▪️ शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास त्या व्यक्तीचा कमरेखालील भाग वाकतो


▪️ केस मोठ्या प्रमाणावर गळतात.


▪️हाता-पायांना मुंग्या येतात.(बधीरपणा येणे)


▪️ झोप लागत नाही.


▪️ सतत भिती वाटते आणि ताण-तणाव जाणवतो


▪️ स्मरणशक्ती कमी होते


 *दररोज शरीरराला किती प्रमाणात कॅल्शियमची गरज असते* 


वयानुसार कोणी किती प्रमाणात कॅल्शियमचे सेवन करावे हे जरूर जाणून घ्या.


1 ते 3 वर्ष - दररोज 700 मिलीग्रॅम


4 ते 8 वर्ष - दररोज 1,000 मिलीग्रॅम


9 ते 18 वर्ष - दररोज 1,300 मिलीग्रॅम


19 ते 50 वर्ष - दररोज 1,000 मिलीग्रॅम


स्तनपान देणाऱ्या अथवा गरोदर महिला - दररोज 1,000 मिलीग्रॅम


51 ते 70 वर्षाचे पुरूष - दररोज 1,000 मिलीग्रॅम


51 ते 70 वर्षाच्या महिला - दररोज 1,200 मिलीग्रॅम


70 वर्षांच्या वरील माणसे - दररोज 1,200 मिलीग्रॅम


 *कॅल्शियमयुक्त आहार* 


कॅल्शियमची कमतरता असेल तर ती आहारातून नक्कीच दूर करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारावर पुरेसे लक्ष द्यावे लागेल. काही पदार्थांना आवर्जून तुमच्या आहारात सामिल करा आणि कॅल्शियमची कमतरता दूर करा.


 *बीया* 


खसखस, तीळ,ओवा, अळशी अशा अनेक प्रकारच्या बीयांना तुमच्या आहारात समाविष्ठ करा. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळू शकेल. एक चमचा खसखसमध्ये जवळजवळ 125 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. या बियांमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात. अळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात.


 *चीज* 


चीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅलशियम असते. इतर पदार्थांपेक्षा दुग्धजन्य पदार्थांपासून मिळणारे कॅल्शियम शरीर लवकर शोषून घेते.काही संशोधनानुसार दुधाच्या पदार्थांमध्ये अधिक निरोगी घटक असतात. एका संशोधनानुसार दुग्धजन्य पदार्थांमुळे ह्रदयरोगाचा धोका कमी होतो.


 *दही* 


एक कप दह्यामध्ये 175 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. शिवाय यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12 देखील असते. संशोधनानुसार जे लोक नियमित दही खातात त्यांना टाईप 2 मधूमेह, ह्रदयरोगासारखे मेटाबॉलिक विकार होण्याचा धोका कमी असतो.


 *दूध* 


सर्वात स्वस्त आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणारा पदार्थ म्हणजे दूध, एक कप दुधामध्ये 276 ते 352 मिलीग्रॅम कॅलशियम असते. दूध फुल फॅट आहे की कमी फॅटचे यावर हे प्रमाण अवलंबून असू शकते. दुधामधील कॅलशियम शरीर चांगल्या पद्धतीने शोषून घेते. शिवाय दुधामध्ये प्रोटीन,व्हिटॅमिन ए आणि डी देखील मुबलक प्रमाणात असते. बकरीच्या दूधामध्ये सर्वात जास्त कॅलशियम आढळते.


 *कडधान्ये आणि डाळी* 


डाळी आणि कडधान्ये कॅलशियमचा एक उत्तम स्त्रोत आहेत. शिवाय यांच्यामध्ये फायबर,प्रोटिन्स,मायक्रो न्युट्रिएंट्स, लोह, झिंक, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियमदेखील भरपूर असतात.


 *बदाम*


सर्वच प्रकारच्या सुकामेव्यामध्ये कॅलशियम असते. मात्र बदामामध्ये ते भरपूर प्रमाणात आढळते. 28 ग्रॅम बदामामध्ये तीन ग्रॅम फायबर, हेल्दी फॅट्स, प्रोटिन्स असतात. बदामामध्ये भरपूर प्रमाणाक मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई देखील असते. बदाम नियमित खाल्यास रक्तदाब, बॉडी फॅट वाढणे आणि मेटॉबॉलिक विकारांचा त्रास कमी होतो.


 *अंजीर* 


सुकलेल्या अंजीरमध्ये अॅंटिऑक्सिडंट आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. शिवाय यामध्ये कॅल्शियम,पोटॅशियम आणि व्हिटॅमिन केदेखील असते.


 *व्हे प्रोटिन* 


व्हे प्रोटिन्समधून कॅलशियम चांगल्या प्रमाणात मिळू शकते. याबाबत अनेक संशोधने करण्यात आलेली आहेत. वजन कमी करण्यासाठी आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हे प्रोटिनला आहारात समाविष्ठ करा. 28 ग्रॅम व्हे प्रोटिनमध्ये 200 ग्रॅम कॅलशियम उपलब्ध असते. व्हे प्रोटिन तुम्हाला ऑनलाईन विकत घेता येते.


 *गुळ* *(सेंद्रिय)*


गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. मात्र कॅलशियम यासाठी भरपूर गुळ खाऊ नका. कधी कधी चणे आणि गुळ खाणे फायद्याचे ठरू शकते.


 *सोयाबीन* 


सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असून ते पौष्टिकदेखील असते.


 *ताज्या हिरव्या पालेभाज्या* 


हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जरूर समावेश करा. कारण त्यामध्ये मोठ्या कॅल्शियम असते. पालक कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत आहे. यासाठी दररोज भरपूर पालेभाज्या खा.


 *टोफू* - (Tofu)


टोफूमध्येदखील चांगल्या कॅल्शियम असते. यासाठी दिवसभरामध्ये आहारातकमीतकमी एक कप टोफू जरूर घ्या.

 *दररोजच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करण्यासाठी कराल* 


▪️एक ग्लास उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा जिरे मिळावं. पाणी थंड झाल्यावर दिवसभरात दोनदा प्या. ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढेल.


▪️ नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश करा. नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.


▪️ तीळाच्या तेलाचा स्वयंपाकात वापर करा. सूप, सलाडमध्ये तुम्ही तिळाचे तेल टाकू शकता.


▪️ आवळ्यामध्ये भरपूर कॅलशियम असते. शिवाय आवळ्यामुळे रोग प्रतिकारशक्तीदेखील वाढते. दररोज ताज्या आवळ्यांचा रस घेतल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.


*आहारातून कॅल्शियम कमी प्रमाणात सप्लीमेंटच्या माध्यमातून कॅलशियम घ्यावे लागते. मात्र अती प्रमाणात कॅल्शियमच्या गोळ्या अथवा औषधे घेतल्यास अपचन उत्तम आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. यासाठी आहारातून पुरेसे प्रमाणात कॅल्शियम घ्या.*

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


सुप्रभात

 : *Life is not a music player to listen ur favourite songs*

*It is a radio,you must adjust yourself to every frequency & enjoyyy whatever comes in it.*

          🌹🌹🌹🌹🌹

         

   : _Memories remind us...._

_that nothing last forever..._


*Time is precious and*

*should not be wasted...*


_Enjoy life and remember,_

 _do not count the days,_

 _make the days count..._

       

            ☕️❤️🎼*

: *Your mind is the strongest and the most powerful healer of your body. Be positive, be happy.* 

* 😊

*_Talk to yourself like you would to someone you love._*


*_Make yourself priority once in a while._*

*_It's not selfish. It's necessary._*


*_GOOD day*🌹😊

आरोग्य संदेश -माका (भुंगराज)*

 *👉माका (भुंगराज)*


भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का! हा माका आहे माका.


औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो.


*आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात :* 


जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो..


केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.


जरा न येता पुष्कळ दिवस जगण्यासाठी व केस काळे राहण्यासाठी पुष्य नक्षत्री माक्याची झाडे उपटून आणून स्वच्छ धुऊन मुळे वेगळी करावी व झाड वेगळे करावं. यांना सावलीत दोन दिवस व उन्हात दोन दिवस वाळवून वेगवेगळे खलबत्यात कुटून वस्त्रगाळ चूर्ण करावे.


पुष्य नक्षत्री मुळीचे चूर्ण १ तोळा भाताच्या पेजेतून घ्यावे व दररोज फांद्याचे चूर्ण १ तोळा तिळ तेल २० मिली यातून घ्यावे. असे १ वर्ष घ्यावे किंवा ३ महिने घ्यावे.


माक्याचा रस चाई, टक्कल किंवा केस काळे करायचे आहे यासाठी आगोदर डोक्याचे सर्व केस काढून नंतर माक्याचा रस चोळावा व पोटात पण पंचवीस मिली घ्यावा किंवा माका चुर्ण एक चमचा व काळे तिळ एक चमचा असे खाऊ शकतो फक्त अट एवढीच आहे की २१ ते ४१ दिवस दुध भात हेच अन्न खाऊन राहायचे.


महिलांनी एक लीटर भृंगराज रस व एक लीटर खोबरेल तेलात शिजवून थंड करून गाळून घ्यावे व दररोज डोक्यास लावावे. केस गळणे, पिकणे, टक्कल पडणे ह्या समस्या जातात.


माका रस व दुध भात यावर ४१ दिवस काढले तर शरीर रोगमुक्त होऊन तारुण्य मिळते, कायापालट होतो. 


दाढ दुखत आहे तिच्या विरुद्ध कानात माका रस थोडा गरम करून चार थेंब टाकावा दाढ दुखी राहते.


भंगदरावर माक्याची चटणी बांधत जावी भंगदर बरा होतो. कानातील नाद, गोम, गोमाशी, किडा, मुंगी जाणे यावर माका रस कानात घालावा किंवा साधे मिठाचे पाणी घालावे. कावीळात दोन्ही वेळा दोन चमचा माका रस दररोज ७दिवस पाजावा, तेलकट वर्ज..


अर्ध डोके दुखीमध्ये माका रसात मिरे पावडर घालून मस्तकी लेप द्यावा.


उच्च रक्तदाब याच्या रसाने सामान्य होतो दोन चमचा रस दररोज साठ ते नव्वद दिवस घ्यावा.


मुले, महिला माती खात असतील तर स.-दु- सं. एक- एक चमचा माका रस द्यावा माती खाणे विसरून जातात.


पुरुषांनी डोक्यासाठी माकारस तीळ तेलात सिद्ध करून वापरणे व दररोज रात्री झोपतांना हे तेल लावावे.


संकलन-


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा lakshvedhimm.blogspot.com ⬇️⬇️⭕️*




_

जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची मुंबईत तीन दिवस बैठक

 जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची मुंबईत तीन दिवस बैठक.


जगभरातील शंभर प्रतिनिधी सहभागी होणार


- केंद्रीय वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल.

            मुंबई, दि. 27 : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील जी-20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची पहिली बैठक मंगळवार दि. 28 ते गुरुवार 30 मार्च 2023 दरम्यान मुंबईत होणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याविषयक चर्चेत, जी-20 सदस्य गटांचे 100 हून अधिक प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी, प्रादेशिक समूहांचे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी 50 पेक्षा अधिक प्रतिनिधींचे आज मुंबईत आगमन झाले आहे.


            जी - 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या पहिल्या बैठकीसंदर्भात आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल यांनी आज बांद्रा येथील ताज लॅन्ड एंड्स येथे माहिती दिली. यावेळी सह सचिव एल. सत्या श्रीनिवास उपस्थित होते.


            बैठकीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे 28 मार्च रोजी, ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य” या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. व्यापार आणि वित्तपुरवठा यातील तफावत कमी करण्यासाठी, बँका, वित्तीय संस्था, विकास वित्तीय संस्था आणि निर्यात पतसंस्था यांची भूमिका तसेच व्यापारविषयक वित्तपुरवठ्याचे सहाय अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल यावर या परिषदेतील दोन सत्रात सविस्तर चर्चा होईल. भारतातील तसेच परदेशातील या क्षेत्रात नामवंत तज्ञांना या बैठकीत विचार मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.


            परिषदेसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना त्यानंतर ‘भारत डायमंड बोर्स’ या मुंबईतील हिरे व्यापार उद्योगाची भेट घडविली जाईल.


            जी - 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ, भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन (Experience Zone) बैठकीत मांडले जाणार आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले जाणार आहे.


            29 मार्च रोजी, जी - 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकीचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होईल. जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रम, ज्याचा भारत जी 20 चा अध्यक्ष या नात्याने पाठपुरावा करत आहे, त्यासंदर्भातील चार तंत्रज्ञानविषयक सत्रांमध्ये 29 आणि 30 मार्च रोजी चर्चा केली जाईल.


            29 मार्च रोजीच्या सत्रात, विकास आणि समृद्धीसाठी व्यापाराला चालना आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी निर्माण करण्यावर चर्चेचा प्रामुख्याने भर असेल.


            तसेच समावेशक आणि लवचिक विकासासाठी, जागतिक मूल्य साखळीत विकसनशील देशांचा आणि ग्लोबल साउथचा सहभाग वाढवण्यासाठी आणि भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी लवचिक जागतिक मूल्य साखळी तयार करण्यासाठी सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यावर भर दिला जाईल.


            30 मार्च रोजी आयोजित, बैठकीच्या दोन सत्रांमध्ये, जागतिक व्यापारात एमएसएमईचे एकात्मीकरण तसेच व्यापारासाठी कार्यक्षम लॉजिस्टिक व्यवस्था उभारण्याला प्राधान्य अशी दोन सत्रात चर्चा केली जाईल. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांमधील उपजीविका टिकवून ठेवण्याला प्राधान्य देणे आणि जागतिक व्यापारात एमएसएमईचे एकात्मीकरण यांना यापूर्वी जी 20 अध्यक्ष असलेल्या देशांनी केलेले कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा भारताचा मानस आहे. विविध देशांच्या सीमांदरम्यान आणि देशांतर्गत दुर्गम भागात वाहतुकीवरील खर्च कमी होऊ शकेल अशी मजबूत लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या उपायांवर देखील जी 20 प्रतिनिधी चर्चा करतील .


            जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देताना उद्भवणारी आव्हाने आणि मानव-केंद्रित ठोस निष्कर्ष आणि धोरणे आखण्यासाठी विद्यमान संधींचा कसा उपयोग करता येऊ शकतो याबाबत सामायिक समज निर्माण करणे हे भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे उद्दिष्ट आहे.


            मुंबई नंतर केवडीया, बंगळूर, जयपूर आणि दिल्ली येथे देखील या कार्यगटाच्या बैठका होणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.


            यावेळी पत्रसूचना कार्यालय पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनीदिपा मुखर्जी उपस्थित होत्या.


००००


जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करणार

 जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना जिल्ह्यातील विविध विषयांबाबत बैठक


            मुंबई, दि. 27 :- जालना हे औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होणारे शहर असून जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जालना आणि अंबड शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जालना जिल्ह्यातील विविध विषयांबाबत बैठक झाली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, अभिषेक कृष्णा, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जालना शहर राज्यातील व मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असून शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण करण्यात येईल. यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. योजनेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. कोणत्याही योजनेबाबत, प्रकल्पाबाबत शाश्वत विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून प्रस्ताव सादर करण्यात यावेत. जेणेकरून संबंधित योजना, प्रकल्प स्वयंपूर्ण होतील. शहरातील अन्य सुविधांच्या प्रस्तावासंदर्भाही लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण गरजेचे


            केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले, जालना शहरातील पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण उपयुक्त ठरणार आहे. याद्वारे शहराला रोज पाणीपुरवठाही उपलब्ध होऊ शकतो. शहरातील मोती तलावाचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विकास करणे शक्य असल्याने त्यादृष्टीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबरच शहरातील अन्य सुविधांच्या कामांनाही गती देण्याची कार्यवाही करण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले. जालना जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील केटीवेअरचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी यावेळी मांडली.


            यावेळी आमदार श्री. कुचे, आमदार श्री. दानवे यांनी देखील जालना शहर व जिल्ह्यातील विविध विषयांसंदर्भात सूचना मांडल्या.


            यावेळी जालना नगर परिषदेची पाणीपुरवठा बळकटीकरण योजना - जालन्यासाठी अतिरिक्त 35 द.ल.ली वॉटर ट्रीटमेंट प्लांट सहित घानेवाडी योजनेची दुरुस्ती, अंबड नगरपालिकेसाठी जालना पाणीपुरवठा योजनेतून अतिरिक्त उपाययोजना करून पाणीपुरवठा, शहराअंतर्गत पाणी व्यवस्थापनाचे बळकटीकरण, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, मुख्य रस्त्यांचे बांधकाम, देखभाल दुरुस्तीसाठी निधी, शहरात मार्केट विकसित करणे, जवाहरबाग/ मोती तलाव गार्डन विकसित करणे, कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह विकसित करणे यासंदर्भातील प्रस्ताव याबरोबरच जालना जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील केटीवेअरचे बॅरेजमध्ये रुपांतर करणे, भोकरदन शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, भोकरदन-जाफ्राबाद-जालना-बदनापूर-अंबड तालुक्यासाठी जायकवाडी धरणावरून ग्रीड पाणीपुरवठा योजना यासंदर्भातील प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


------000-------

लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट


अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा.

            मुंबई, दि. 27 :- लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात आली.


            यावेळी अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन शर्मा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृषी आधारित उद्योग तसेच अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारते आहे. या क्षेत्रातील उद्योगांसाठी मोठ्या संधी आहेत. राज्यातील शेतकरी प्रयोगशील असून राज्यातील विविध शहरांमध्ये यासाठी इकोसिस्टिम तयार करण्यात आली आहे. या क्षेत्रातील उद्योग समूहांना नक्कीच सहकार्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन म्हणाले, अन्न प्रक्रिया उद्योगांत विस्तार करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी उत्सुक असल्याचे श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.


            मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर येथे मॉल्स उभारण्यासाठी ग्रुप उत्सुक असल्याचे तसेच नागपूर येथे अन्न प्रक्रिया युनिट उभारणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच लवकरच ग्रुपचे अध्यक्ष भारतास भेट देणार असून त्यावेळी सामंजस्य करार करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.


हायपरमार्केट क्षेत्रातील हायपरमार्केट व्यवसायाचा प्रणेता


LuLu Group


            जगभरातील महत्वाच्या ठिकाणी यशस्वी व्यावसायिक संस्थांसह वैविध्यपूर्ण असा LuLu समूह आहे. समूह आखाती प्रदेशाच्या आर्थिक स्थितीत एक प्रमुख योगदानकर्ता बनला आहे. हायपरमार्केट ऑपरेशन्सपासून ते शॉपिंग मॉल डेव्हलपमेंट, वस्तूंचे उत्पादन आणि व्यापार, आदरातिथ्य मालमत्ता आणि रिअल इस्टेटपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात ग्रुप अग्रणी आहे. LuLu समूह प्रामुख्याने मध्य पूर्व, आशिया, अमेरिका आणि युरोपमधील 23 देशांमध्ये कार्यरत आहे.


            LuLu Group हा ‘LuLu Hypermarket’ या क्षेत्रातील हायपरमार्केट व्यवसायाचा प्रणेता आहे. त्याने शॉपिंग मॉल्सचा पोर्टफोलिओ तयार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


------000-------

Featured post

Lakshvedhi