Sunday, 27 November 2022

जिंदगी

 ✍🏻... *जब तक साँस है,* 

          *"टकराव" मिलता रहेगा।*

              *जब तक रिश्ते हैं,* 

           *"घाव" मिलता रहेगा।*

           *पीठ पीछे जो बोलते हैं,*

            *उन्हें पीछे ही रहने दे।*

              *अगर हमारे कर्म,* 

       *भावना और रास्ता सही है ..*

            तो,

   *गैरों से भी " लगाव " मिलता रहेगा..*

       *शुभ प्रभात*

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते*

 *विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते*


ज्ञानोबारायांनी 'ज्ञानेश्वरी'मध्ये 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.

*उदय-अस्ताचे प्रमाणे |*

*जैसे न चालता सूर्याचे चालणे |*

*तैसे नैष्कर्म्यत्व जाणे |*

*कर्मींचि असता ||*

सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा 

ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध आहे.

मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात, तेव्हा 

नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. 

माऊली लिहितात,

*शुक्र-शोणिताचा सांधा |*

*मिळता पाचांचा बांधा |*

*वायुतत्व दशधा |*

*एकचि झाले ||*

शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात. शोणित पेशी स्त्रियांच्या 

बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत. सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. 

परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदती-शिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. 

इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते.

   

पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.

*पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा*

*तरी हा भूगोलचि काखे सुवावा |*

*तैसा विस्तारू माझा पाहावा |*

*तरी जाणावे माते ||*

भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय. 



       पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे. 

परंतु माऊली ज्ञानोबाराय 725 वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.

*तया उदकाचेनि आवेशे |*

*प्रगटले तेज लखलखीत दिसे |*

*मग तया विजेमाजी असे |* *सलील कायी ||*

सागराच्या पाण्याची वाफ होते. त्याचे ढग बनतात. त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो. त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो. इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो.

ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी,

*मी सूर्याचेनि वेषे |*

*तपे तै हे शोषे |*

*पाठी इंद्र होवोनि वर्षे |*

*मग पुढती भरे ||*

विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे. या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रम्हांडे आहेत म्हणून भगवान अनंतकोटी ब्रहांडनायक ठरतात. परंतु माऊलीं ज्ञानोबारायांनी 725 वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे

अस्तित्व सांगतात,

*ना तरी भौमा नाम मंगळ |*

*रोहिणीते म्हणती जळ |*

*तैसा सुखप्रवाद बरळ |*

*विषयांचा ||*


किंवा


*"जिये मंगळाचिये अंकुरी |*

*सवेचि अमंगळाची पडे पारी |*


किंवा 


*ग्रहांमध्ये इंगळ |*

*तयाते म्हणति मंगळ |*

या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल.


विज्ञानयुगात दिशाभुल झालेल्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन, मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्या-या संत वाड़मयाच्या सहवासात यावे.


१६ वर्षाच्या ज्ञानदेवांना हे कसं काय सुचलं असेल?

   

तर ज्ञानेश्वर माउली हे प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार असल्याकारणानं हे विश्वाचे गुढ मानवजातीला कळावे, म्हणुन ज्ञानदेवांच्या मुखातुन ९००० ओव्यांच्या माध्यामातून ज्ञानभांडार आपल्यापर्यंत आले. आजही काही हिंदूतेतर धर्म ग्रंथामध्ये पृथ्वी चाैकोनी आहे, असं लिहीलेलं आहे आणि पृथ्वी गोल आहे, हे सांगितलं. त्यांना जीवे मारलं आणि हिंदू धर्माला बुरसटलेले म्हणायचं.

      

😇🚩😇🚩😇🚩😇🚩😇🚩😇

" 🙏🏻🚩


*🚩 आजच्या ज्ञानेश्वरी माऊली समाधी सोहळायास अभिवादन 🚩*

 

कौशल्य विकास, रोजगारविषयक विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवू

 कौशल्य विकास, रोजगारविषयक विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवू.

                                                                                               - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी चेंबूर येथे

आयटीआय इमारतीचे उद्घाटन संपन्न.

            मुंबई, दि. 26 : जगामध्ये सध्या सर्वात जास्त मागणी ही कौशल्याला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी आज मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आयटीआयमधून सर्वांना संधीची समानता मिळू शकेल. तरुणांना कौशल्य आणि रोजगार मिळवून देण्यासाठी येत्या काळात शासनामार्फत विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.


            चेंबूर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) इमारतीचे आज उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, सध्या पदवी इतकेच महत्त्व कौशल्याला प्राप्त झाले आहे. पदवीसोबत कौशल्य असेल तर त्याला अधिक मागणी आहे. यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाने कौशल्य विकासावर अधिक भर दिला आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना प्रभावी कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून आज चेंबूर येथे सुरू होत असलेल्या आयटीआयमधून याला चालना देण्यात येईल. अर्थव्यवस्थेच्या बदलत्या परिस्थितीत संधीची समानता यामुळे तयार होईल. देशामध्ये असलेले सर्वोत्तम व्यवसाय अभ्यासक्रम या आयटीआयमध्ये सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.


अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी आयटीआयचा उपक्रम स्तुत्य - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


            केंद्रीय राज्यमंत्री श्री.आठवले म्हणाले की, आजच्या काळात नोकरीसाठी प्रभावी कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. चेंबूरमध्ये अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू होत असलेल्या आयटीआयमधून या समाजातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल. आयटीआयसाठी भव्य इमारत बांधण्यात आली असून शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. परिसरातील अनुसुचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन उत्कर्ष साधावा, असे आवाहन त्यांनी केले.


आयटीआयमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यातील सर्वच आयटीआयचे बळकटीकरण करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. उद्योगांमधील बदलते तंत्रज्ञान आणि त्यांच्या मागणीप्रमाणे आयटीआयमधील अभ्यासक्रम आणि यंत्रसामग्रीत बदल करण्यात येत आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनाही चांगल्या प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. चेंबूर येथे आज सुरू होत असलेल्या आयटीआयला राज्यातील एक सक्षम आयटीआय बनविण्यात येईल. येथे प्रशिक्षणासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास केंद्राचाही प्रारंभ


            या आयटीआयमध्ये अल्पमुदतीचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्रही सुरु करण्यात आले असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व इलेक्ट्रीकल वायरमन या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. साधारण 3 ते 6 महिन्यांचे अल्पमुदतीचे विविध अभ्यासक्रम या केंद्रावर विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत.

आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रम शिकण्याची संधी

            या आयटीआयमध्ये विजतंत्री, तारतंत्री, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इंटेरिअर डिझाईन अॅण्ड डेकोरेशन, प्रशितन व वातानुकुलीत टेक्नीशियन, ड्राफ्ट्समन ऑर्क्टीचर, लेदर गुड्स मेकर, फुटवेअर मेकर, आयओटी टेक्निशियन अशा 10 व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी 2 तुकड्या 440 प्रशिक्षणार्थ्यांकरीता सुरु करण्यात येणार आहेत. या व्यवसायातील प्रवेश शैक्षणिक वर्ष 2023- 24 पासून डी. जी. नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त करून सुरु करण्यात येणार आहेत.


००००

Saturday, 26 November 2022

वंडर्स ऑफ जिऑलॉजी!

 वंडर्स ऑफ जिऑलॉजी!

अद्भुत महाराष्ट्र एक्सप्लोर करणारी फिल्ड टूर


दगडांच्या देशा अशी ओळख असलेला आपला दक्खन अर्थात महाराष्ट्! साडेसहा कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या खडकाने या राज्याला घडवलेइथे त्याची असंख्य अद्भुत भूरूपे दडली आहेतत्यांची निर्मिती थक्क करणारी आहे आणि कोट्यवधी वर्षांचा इतिहास सांगणारीसुद्धा! या भूरूपांचा शोध घेणारी आणि त्यांची रहस्यं उलगडणारी तीन दिवसांची अफलातून टूर...

 

बॅच 

शुक्रवार-शनिवार-रविवार; १६ ते १८ डिसेंबर २०२२

(सहभागी संख्या २५)

 

बॅच 

शुक्रवार-शनिवार-रविवार; २३ ते २५ डिसेंबर २०२२

(सहभागी संख्या २५)

 

माहिती व नावनोंदणीसाठी:

https://bhavatal.com/EcoTour/Geology

 

संपर्कासाठी :

९५४५३५०८६२ bhavatal@gmail.com


...चला, खराखुऱ्या महाराष्ट्राचा शोध घ्यायला सुरुवात करूया !



--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

येथे माझे कर जुळती

 






जपानी माणसांकडून खुप शिकण्या सारखं आहे

 फुटबॉल विश्व चाषकाचा उद्घाटन सामना संपला .जपानी प्रेक्षकांनी स्टेडियम साफ करायला सुरुवात केली.यजमान कतार च्या प्रेक्षकाने त्यांना आश्चर्याने विचारले ." तुम्हीं का हे करताय ? कामगार येतील ना !"

 जपानी प्रेक्षक म्हणाले 

" आमच्या देशाने आम्हांला हे शिकवलंय. "

   असं म्हणंत त्यांनी सार स्टेडियम साफ केलं.कतार च्या यजमान प्रेक्षकांस प्रेमळ आलिंगन द्यायला देखील ते विसरले नाहीत.

   भारतीय प्रेक्षकासाठी टायटलस मुद्दाम भाषांतरित केलेत.

 जपानी माणसांकडून खुप शिकण्या सारखं आहे.

 त्यांना उगीच फिनिक्स पक्षी म्हणत नाहीत .

  राखे तून उठून ते झेपावले


आहेत.

Featured post

Lakshvedhi