Sunday, 28 November 2021

 *👉 जेष्ठ नागरिकांन साठी रेल्वे प्रवासी सवलती सविस्तर माहिती👇🏼👇🏼*

1⃣➖ पुरुष जेष्ठ नागरिक सवलती चे वय ६० वर्ष पूर्ण किंवा त्या पेक्षा जास्त

2⃣➖ स्त्री जेष्ठ नागरिक सवलती चे वय ५८ पूर्ण किंवा त्या पेक्षा जास्त 

3⃣ ➖पुरुषांना 40 % रेल्वे प्रवासी भाडे सवलत 

4⃣➖ स्त्रीयांना 50% रेल्वे भाड़े सवलत 

5⃣➖मेल/ एक्सप्रेस/राजधानी/ शताब्दी/ जनशताब्दी/ दुरंतो या रेल्वे प्रवासी गाड्या मध्ये कोणत्याही श्रेणी मध्ये ही सवलत मिळणार

 6⃣➖रेल्वे आरक्षण / अथवा सर्व साधारण टिकीट काढताना कोणताही वयाचा दाखला द्यावयाची आवश्यकता नाही

7⃣➖परंतु रेल्वे प्रवास करतांना मात्र रेल्वे टिकीट तपासणीस ( TC ) ने मगितल्यास वयाचे दाखला संबंधित पुरावा म्हणून पैनकार्ड ,आधारकार्ड ,वाहनचालन परवाना, अथवा कोणतेही फ़ोटो असलेले शासनमान्य ओलखपत्र देणे अनिवार्य 

8⃣➖जेष्ठ नागरिक आपले रेल्वे टिकिट कोणत्याही टिकिट / आरक्षण कार्यालयातून अथवा इंटरनेट द्वारे खरेदी करू शकता

 9⃣➖प्रवासी आरक्षण पद्धति (PRS) मध्ये जेष्ठ नागरिक, गरोदर स्रीयां, तसेच जांचे वय 45 पेक्षा जास्त असणाऱ्या महिला अशांना रेल्वे त प्रवास करताना लोअर बर्थ ची आरक्षित सेवा दिली जाते 

🔟➖प्रत्येक रेल्वे प्रवासी गाड़ी मध्ये स्लिपर क्लास मध्ये 6 बर्थ, एसी -3 ,एसी-2 मध्ये 3 बर्थ राजधानी/दूरंतो मध्ये 4 बर्थ वरील आरक्षण साठी नियोजित राहणार आहेत 

🆓➖ जेष्ठ नागरिक ,आजारी प्रवासी, दिव्यांग प्रवासी यांना व्हील चेयर मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे

 🆕➖ तसेच जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शी मदतनिस ( अधिकृत कुली) हवा असल्यास त्याचे वेगळे शुल्क भरावे लागणार आहे

 🆕➖ रेल्वे प्रशासन द्वारे काही महत्वपूर्ण रेल्वे स्थानका मध्ये आजारी, दिव्यांग, आणि जेष्ठ नागरिक प्रवासी साठी बैटरी वर चालणारी आधुनिक व्हीलचेयर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे 

➡➖जेष्ठ नागरिक ,दिव्यांग, आणि आजारी रेल्वे प्रवासी च्या सेवे साठी IRCTC विशेष ‼️यात्री मित्र सेवा‼️ अनेक मोठ्या रेल्वे स्थानकात सुरु केली आहे वरील सवलती साठी प्रवासी ऑनलाईन बुकिंग करू शकता

 ✅ रेल्वे प्रवासी गाडी सुटल्या नंतर वरील सवलती चे आरक्षित लोअर बर्थ रिकामे असल्यास रेल्वे टिकिट तपासणीस वेटिंग चार्ट मधील जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला यांना प्रथम प्राध्यान्य देवून उर्वरित बर्थ इतर सर्व सामान्य प्रवासी ना देऊ शकतात 

➖वरील सर्व महत्वपूर्ण माहिती सर्व रेल्वे प्रवासी पर्यंत पोहचवावी आणि गरजु नी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती.🌹दिनेश वावगे, वाशिम जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती सचिव.

 


 


 आता वेळ आली आहे की करदात्यांची अखिल भारतीय संघटना स्थापन करावी.

 जी जगातील सर्वात मोठी संघटना असेल!!

 आता देशात टॅक्स पेअर्स युनियनची स्थापना झाली पाहिजे. शासन कोणतेही असो, या करदाता संघाच्या मान्यतेशिवाय, ना मोफत वीज, ना मोफत पाणी, ना मोफत वितरण, किंवा कर्जमाफीची घोषणा कोणीही करू शकत नाही, ना कोणतेच सरकार. यासारखे काहीही अंमलात आणा.

 पैसा आपल्या कर भरणामधून येतो, त्यामुळे त्याचा वापर कसा करायचा हे सांगण्याचा अधिकारही आपल्याला असायला हवा.

 पक्ष मतांसाठी फुकट वाटून आमिष दाखवत राहतील, कारण त्याचा फायदा त्यांना होतो. ज्या काही योजना जाहीर करायच्या त्या आधी त्याची ब्ल्यू प्रिंट द्या, युनियनची संमती घ्या आणि हे अगदी खासदार आणि आमदारांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या इतर सवलतींनाही लागू व्हायला हवे.

 लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित आहे का?

 त्यानंतर आम्हाला कोणते अधिकार आहेत??


 राईट टू रिकॉल अशा कोणत्याही ‘फ्रीबीज’चीही लवकरच अंमलबजावणी व्हायला हवी.


 तुम्ही सहमत असाल तर कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. हे करण्यासाठी, पोस्ट शेअर करा.


 


 

Saturday, 27 November 2021

 मुंबई शहर मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवारी


विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा संबंधितांनी लाभ घ्यावा

-राजीव निवतकर जिल्हाधिकारी मुंबई शहर

            मुंबई, दि.26 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ( Special Summary Revision Programme) जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सदर कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणे / मतदारांचे नाव, पत्ता, फोटो यामध्ये दुरुस्ती करणे आणि मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची वगळणी इ. बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदार, महिला आणि समाजातील वंचित घटकांतील मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर, २०२१ व दि. २८ नोव्हेंबर, २०२१ रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

            मुंबई जिल्हयातील नवमतदार दिव्यांग/अपंग व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच वंचित घटकातील व्यक्ती किंवा ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांच्यासाठी २७ व २८ नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी मतदारांनी जवळच्या मतदार मध्यवर्ती नोंदणी कार्यालयास भेट देवून आपले नाव नोंदणी करावी.

            मतदारांनी नाव नोंदणी करण्यासाठी जवळचे मध्यवर्ती मतदान केंद्र व पदनिर्देशित ठिकाणी भेट द्यावी मतदार केंद्रांची व पदनिर्देशित ठिकाणांची यादी electionmumbaicity.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन online पद्धतीने किंवा Voter Helpline App द्वारे मतदार यादीत आपले नाव नोंदणी करावे, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, राजीव निवतकर यांनी केले आहे.

 Continue कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम


        कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम पुढीलप्रमाणे आहेत.कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. कोविड अनुरूप वर्तनाचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे,सर्व संस्थांनी त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत,ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती,त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा कार्य करताना त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था जबाबदार असतील. सर्व कर्मचान्यांनी कांविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक (thermal scanner), इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.


       नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.) जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा.साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.योग्य श्वसन स्वच्छता(आरोग्य) राखा.,पृष्ठभाग निर्वामितपणे आणि बाई सर स्वच्छ व निर्जंतुक करा.खोकताना किंवा शिकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा. जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपरा नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिकावे,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार अथवा अभिवादन करा. कोविड-१९ विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही


  कोविड अनुरूप वर्तनविषयक नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती व संस्थांना दंड :


           कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.


           ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किया आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.


          जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.


         जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.


        जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोबिड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल,


        तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.


          वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.


         कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी कोविड वर्तणूकीसंदर्भातील मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केलेल्या आहेत.


0 0 0



Featured post

Lakshvedhi