#कन्यादानच
गेले चार पाच दिवस समाज माध्यमातून एक विषय जोरदार चर्चेत आहे.आलिया भट नामक सिनेअभिनेत्री ने एका जाहिरातीत कन्यादान करण्याऐवजी कन्यामान करा असा अनाहुत सल्ला हिंदुंना दिला.वरवर पाहता एखाद्याला वाटेल की कन्येचा मान करायला सांगतेय यात काही चुकीचं नाही.परंतु त्या आधी ती कन्यादाना ऐवजी हे करायला सांगतेय ते १००%चुकीचे आहे.कसे ते आपण नीट पाहिले पाहिजे.
सनातन वैदिक हिंदु धर्मात काही संकल्पना मांडल्या आहेत.दान हि देखील एक उदात्त संकल्पना आहे.सत्पात्री व्यक्तीलाच दान दिले पाहिजे असा शास्त्राचा दंडक आहे.योग्य काळी,योग्य वेळी एखादि जबाबदारी योग्य व्यक्ती कडे सुपूर्द करणे हे दानात अभिप्रेत आहे.दान हे निर्जीव वस्तुचे होते हा एक गोड गैरसमज आहे.शास्त्रानुसार गोप्रदान,महिषीदान,मेषदान, भूदान अशी अनेक सजीवांची दाने देखील सांगीतली आहेत.त्यामुळे हा मुद्दा आपसुकच बाजूला होतो.
दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.शास्त्रानुसार कौमार्य अवस्थेत कन्येच्या संरक्षणाची व पालनपोषणाची जबाबदारी पित्याची आहे.कन्येच्या तारुण्यात हि जबाबदारी भर्त्याची म्हणजे नवर्याची आहे (कारण जेव्हा कन्या तरुण होते तेव्हा वडिल वृध्दत्वाकडे झुकलेले असतात तेव्हा तरुण मुलीची जबाबदारी पतीकडे सुपूर्द केलेली असते)व वृध्दापकाळात त्या कन्येची जबाबदारी तिच्या मुलांची असते ( कारण तेव्हा तिचा पती देखील वृध्द झालेला असतो तिथे जबाबदारी मुलांकडे सुपूर्द होते). तारुण्यात शारीरिक व मानसिक गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य जोडीदार जो #कुलशीलाने_संपन्न व #दहा_दोषांनी_वर्जीत (अपस्मार,फेफरे येणारा,अतीशूर,षंढ,पतीत,दूरदेशी राहणारा,जुगारी वगैरे)असलेल्या सद्गुण संपन्न मुलाला कन्या संकल्प पूर्वक #धर्म_अर्थ_काम या तीन पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता देव ,अग्नि,द्विज, नातेवाईक यांच्या साक्षीने अटी सह सुपूर्द करणे म्हणजे कन्यादान होय.
आता हि अट कोणती?तर चार पुरुषार्थ शास्त्रानुसार सांगितले आहेत.धर्म,अर्थ,काम,मोक्ष हि त्यांची नावे आहेत.त्यामधील धर्म,अर्थ ,काम हे तीन पुरुषार्थ पत्नीच्या सहकार्याने करावे त्यात कोणताही अतिरेक करु नये हि अट आहे.धर्म(व्रत वैकल्ये,कुलाचार,धर्मकृत्ये),अर्थ(द्रव्याचा योग्य पध्दतीने कमावणं व विनियोग,बचत,अन्य तरतूद),काम(सुप्रजा निर्माण करणे) या सर्व गोष्टी परस्पर सहयोगाने करण्यासाठी कन्यादान आहे.
शिक्षणाकरता आपण मुलांना जेव्हा शाळेत पाठवतो तेव्हा शिक्षकांना सांगतो आजपासून हा विद्यार्थी तुम्हाला सुपुर्द केलाय तुम्ही याला चांगला विद्वान व सदाचारी बनवा तेव्हा आपण गुरुजींकडे विद्यार्थ्याची जबाबदारी सुपूर्द च करतो.
तसंच योग्य काळी योग्य जोडीदारास कन्येची जबाबदारी देणे यात काही गैर नाही.
अनेक लोकांचा आक्षेप असतो की कन्यादान करताना मुलीच्या हातावर पाणी सोडतात आम्ही आमच्या मुलीवर पाणी सोडणार नाही.मुळात संकल्प करताना पाणी हे कर्मसाक्षी देवता असल्याने हातात उदक घेवुनच संकल्प करावा लागतो.एखादा श्रीमंत सांगेल की संकल्पास पाणीच का? मी दुध/दहि/मध/तूप हातावरुन सोडुन संकल्प करेन त्यात काय ?तर यांचे उत्तर आहे या पदार्थांनी संकल्प सोडला असता तर या पदार्थांचा लेश/लेप हातावर राहतो त्याचा चिकटपणा हातावर राहतो तो त्या कर्मास बाधक ठरतो लेशरहित /निर्लेप कर्म करावे हा शास्त्राचा दंडक आहे त्यामुळे तिथे संकल्पाचे उदक सोडताना शब्दशः अर्थ घेवुन गोंधळ करु नये.नरपुंगव हि संस्कृत मधे एक पदवी आहे.याचा शब्दशः मराठी अर्थ बैल असा घेतला तर मग गोंधळ होतो.हाणामारी पण होवु शकते.
त्यामुळे संकल्पनांचे शब्दशः अर्थ न काढता त्यातली अर्थपूर्णता ,गांभीर्यता व त्यातले मर्म समजवून घेणे महत्वाचे आहे.
आज हि नटी सांगतेय म्हणुन किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून ऋषी मुनींना चुक ठरवु नका.कन्या महत्वाची आहे म्हणुनच तिची जबाबदारी घ्यायला सांगितली आहे.
आज कन्यादान बंद करा म्हणुन सांगतील मग कालांतराने विधी ऐवजी कबुल है ,कबुल है हेच योग्य आहे अस सांगतील.
आपण कन्यादानावरच मात्र ठाम रहा.दोन्ही बाजुच्या१२ -१२
पिढ्यांचा उद्धार कन्यादानाने होतो एवढे पुण्यकारक हे कर्म आहे.तेव्हा कन्यादान च
कन्यादान कधी होत? जेव्हा दोन्ही पक्षांच्या सहमतीने विवाह होतो तेव्हा.पण परधर्मीयानी मुलीला पळवुन नेली तर कन्यादान होत नसत. कन्यादान नको कन्यामान करा हा द्रविडी प्राणायाम या करता नसेल कशावरून?निकाह व चर्च ,कोर्टमॅरेज मधे कन्यादान नसतं हेच कन्येच्या मनावर अप्रत्यक्ष बिंबवण्याचा हा खटाटोप तर नसेल ना?
सावध तो सुखी हे लक्षात ठेवा
©️ भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले