सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 20 July 2021
वाटणी - एक उत्तम निर्णय
वडील - बापुराव
मोठा मुलगा - राकेश
मधला - सुरेश
धाकटा - मुकेश
राकेश -
"बाबा ! पंचमंडळी जमली आहे , आता वाटणी करा. "
सरपंच -
"जर एकत्र रहाण जमत नसेल तर मुलांना वाटुन दिलेल बरं, आता हे सांगा की तुम्ही कोणत्या मुला बरोबर रहाणार ?"
(सरपंचांनी बापुरावना विचारले. )
राकेश -
"हे काय विचारण झाल, चार महीने बाबा माझ्या कडे रहातील आणि चार महीने मधल्या कडे, चार महीने धाकट्या कडे रहातील "
सरपंच
" चला तर मग निर्णय पक्का झाला , आता संपत्तीची वाटणी करुया !"
बापुराव
(एवढा वेळ आकाशाकडे डोळे लावून बसला होता. अचानक ओरडला ,)
कसली वाटणी ?
वाटणी मी करणार , या तिघांनी अंगावरच्या कपड्यांवर माझ्या घरातून बाहेर निघावे "
"चार महीने आळीपाळीने माझ्या घरी रहायला याव, आणि बाकीच्या महिन्यांची व्यवस्था ज्याचीत्याने करावी ...."
"संपत्तीचा मालक मी आहे "
तीनही मुलं आणि पंचमंडळींचा आवाज बंद झाला , बापुरावनी वाटणीची नवीनच शक्कल लढवून सगळ्या वयस्कर मंडळींचे डोळे उघडले .
👌 याला म्हणतात निर्णय
वाटणी पोरांनी नाही,
आईबापांनी करायची,
येत्या २० तारखेला एकादशी आहे. आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।
भगरीचे आरोग्यासाठी फायदे...❗
भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.
सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.
पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.
आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.
खरंतर भगर हे काही धान्य नाही. भगर म्हणजे शेतात आपोआप उगवणाऱ्या गवताच्या एका प्रकारच्या बिया.
हिंदीमध्ये याला ‘सामा चावल’ म्हणतात.
शिजलेल्या भगरीची चव सुद्धा काहीशी भातासारखीच असते.
भगर हे पटापट वाढणारे पीक आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ‘बी’ पेरल्यापासून केवळ पंचेचाळीस दिवसात भगरीचे पीक तयार होते.
भगर हे अख्या भारतभर उपासाच्या दिवशी केले जाते, पण ते केवळ उपासापुरते मर्यादित न ठेवता इतर वेळेस पण खाण्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण आता बघणार आहोत.
जाणून घेऊयात भगरीत असलेली पोषकद्रवे आणि त्याचा आपल्या शरीराला होणारा उपयोग
१. जास्त प्रमाणात प्रोटीन
भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात. जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.
कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते.
२. फायबर रिच फूड
भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात.
आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते.
म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात.
भगर पचायला हलकी असते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो दूर होतो, गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते.
आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळासाठी टिकून राहते. त्यामुळे जेवण कमी जाते पण पोट भरते
या कारणामुळेच वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.
३. लो ग्लायसेमिक इंडेक्स
भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते.
यामुळे सुद्धा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर फायदेशीर आहे.
‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
मधुमेह असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.
अर्थातच मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असते.
४. ग्लूटेन फ्री
भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन म्हणजे आपण खातो त्या धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ.
आपण ज्या धन्याच्या पिठाला मळतो त्यात ग्लूटेन असते, उदाहरणार्थ गव्हाचे पीठ. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते.
ग्लूटेनमध्ये काही पोषक द्रव्ये नसतात, काही लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी सुद्धा असते.
ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटात दुखणे, अपचन यासारखे त्रास होतात.
अशांसाठी भगर जे पूर्णपणे ग्लूटेन फ्री आहे हा एक उत्तम पर्याय आहे, जो पचायला हलका आहे हे आपण वर बघितलेच आहे.
५. जास्त प्रमाणात आयर्न
भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते. म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) सरल तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.
इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात आयर्न भगरीतून मिळते.
साधारण १०० ग्राम भगरीतून १८.५ एमजी आयर्न मिळते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा आयर्नचा सर्वोत्तम स्रोत आहे.
६. व्हिटॅमिन्स आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त
भगरीत व्हिटॅमिन ‘सी’, ‘ए’ आणि ‘इ’ जास्त प्रमाणात असतात.
तसेच भगरीत खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.
७. सोडियम फ्री फूड
भगरीत सोडियम नसते ज्यामुळे बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.
८. भरपूर अँटिऑक्सिडंट्स
साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.
अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींची फ्री रॅडिकल्स नावाच्या धोकादायक मॉलिक्यूल पासून संरक्षण करतात.
मोठी माणसे भगर जरी उपसाला खात असले तरी बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना, अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून भगरीची खीर करून दिली तर बाळासाठी तो उत्तम पोषक आहार ठरतो.
कारण ती पचायला अतिशय हलकी असते.
भगरीसारखे इतके सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारात उपयोग झाला पाहिजे.
त्यासाठी च नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास करताना, आपले पुर्वज शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहण्यासाठी भगरीचा वापर सर्वात जास्त करत होते.
भगरीचे आरोग्यासाठी फायदे सांगणारा हा लेख आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा
Sunday, 18 July 2021
बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे जारी होणार 10 लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे
मुंबई, दि. 18 : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण 8 शैक्षणिक वर्षातील सुमारे 10 लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. शिवाय यामुळे योग्य उमेदवारांचीही होणारी गैरसोय रोखली जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
यासाठी क्रॉसफोर्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारा विकसित लेजीटडॉक हे इथरियम ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून या प्रणालीच्या मदतीने बनावटरहीत डिजिटल कागदपत्रे 10 सेकंदात जगभरातून कोठूनही ऑनलाईन पडताळणी करता येऊ शकतील. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत घेण्यात आलेल्या स्टार्टअप मेळाव्यातून ही संकल्पना पुढे आली असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रमाणपत्रांच्या हाताळणीकामी वापरले जाणारे मंडळाचे मनुष्यबळ आणि त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली
या उपक्रमाची नुकतीच जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कौशल्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव, मंडळाचे सचिव कृष्णा शिंदे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील, लेजीटडॉक स्टार्टअपचे सहसंस्थापक श्री. फ्रान्सिस, श्री. नील, श्री. विष्णू आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बनावटमुक्त शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी जगातील सर्वात मोठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले आहे. यामुळे सुमारे 10 लाख टँपरप्रूफ, डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे ऑनलाईन पडताळणीसाठी त्वरित उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक दस्तऐवज नोंदणीची आतापर्यंत माल्टा, सिंगापूर आणि बहरैन या तीनच देशामध्ये पूर्ण अंमलबजावणी झाली आहे. त्यांच्यात सामील होऊन महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास मंडळ हे जगातील सर्वात मोठे चौथे सरकारी संस्था बनले आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रांकरिता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचे अभ्यासक्रम वरदान
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम (ॲड ऑन कोर्सेस) चालविण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत विविध 28 गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार, तसेच सहा महिने कालावधीचे 156, एक वर्ष कालावधीचे 100 आणि दोन वर्ष कालावधीचे 45 अर्धवेळ (234) व पूर्णवेळ (67) असे एकुण 301 अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जिल्हा, तालुकास्तरावर तसेच ग्रामीणभागात मंडळाने मान्यता दिलेल्या 1 हजार 269 संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. विशेषत: खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतात, असे त्यांनी सांगितले.
000
मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी;
धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश
-पालकमंत्री आदित्य ठाकरे
मृतांच्या वारसांना शासनामार्फत पाच लाखांची मदत जाहीर;
जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या पालकमंत्री यांच्या सूचना
मुंबई, दि. 18- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्रीच प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांसाठी तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर विविध रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीच्या अशा प्रसंगी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन दुर्घटनाग्रस्तांना दिलासा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
दुर्घटनांची माहिती मिळताच पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी चेंबूरमधील भारतनगर, विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेत मुत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, स्थानिक नगरसेवक उमेश माने, निधी शिंदे, राजेश्वरी रेडकर, दीपमाला बडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, रात्रीतून २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली. दुर्घटनास्थळी पोहोचणे कठीण असतानाही बचाव पथकांनी अनेक अडचणींचा सामना करीत मदतकार्य सुरू केले आहे. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिठी नदीची पातळी वाढल्याने तेथेही किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचून समस्या निर्माण होतात तेथे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पाणी साठवणाऱ्या मोठ्या भूमिगत टाक्या बांधल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हवामान विभागाने मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन श्री ठाकरे यांनी केले आहे.
000
Monday, 12 July 2021
Featured post
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...