Thursday, 29 June 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआरोग्य शिबिरास भेट

 




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआरोग्य शिबिरास भेट


            पंढरपूर दि. 29 : आषाढी वारीत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिरास भेट दिली. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थित वारकरी भाविकांना आषाढी एकादशी आणि वारीच्या शुभेच्छा दिल्या. आषाढी वारीत आरोग्य विभागाने वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व त्यांच्या समुहाचे अभिनंदन केले.


            राज्य शासनाने सामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विषयक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना दीड लाखांऐवजी 5 लाख रुपये एवढे आरोग्य संरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगतिले.


आरोग्य शिबिरास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


            वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वारकरी भाविक आपल्या आरोग्य समस्येची संबंधित आरोग्य कक्षात तपासणी करून औषधोपचार घेत आहेत. डॉक्टरांकडूनही भाविकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून आरोग्य तपासणी केली जाते.


            आषाढी वारीत शासनाने आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल भाविकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे.


०००००

नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल

 नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


कृषी पंढरी प्रदर्शन व तृणधान्य महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची भेट


            पंढरपूर, दि. 29 : पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक पद्धतीने शेतीतून उत्पादन घेतल्यास बळीराजा समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी त्याच मेहनतीत दुप्पट उत्पादन देणाऱ्या प्रजातीची लागवड करावी. अशा नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.


            कृषी विभागाच्यावतीने आयोजित ‘कृषी पंढरी प्रदर्शन व तृणधान्य महोत्सव २०२३’ कार्यक्रमात ते बोलत होते. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आयोजित या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे आदी उपस्थित होते.


            शासकीय महापुजेवेळी आपण विठुरायाला बळीराजाच्या समृद्धीसाठी साकडे घातले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शासनाने बळीराजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. शेती आणि शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार २.०, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, केवळ 1 रुपयांत पीकविमा, उत्पन्नवाढीसाठी महाकृषीविकास अभियान आदी योजना सुरू केल्या आहेत. एक रुपयात पीक विमा देण्यासाठी विमा हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे प्रति वर्षी सहा हजार रूपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे ते म्हणाले.


            शेतकरी सुखी संपन्न व्हावा, त्याचे आरोग्य चांगले राहावे, अशी सदिच्छा व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आहे. यानिमित्ताने प्रदर्शनात तृणधान्य व त्याचे उप पदार्थ पाहावयास मिळाले. हे प्रदर्शन शेतकऱ्यांना समृद्ध करणारे ठरेल. त्यातून माहिती आणि प्रेरणा घेत शेतकऱ्यांनी प्रयोग केल्यास नवीन कृषि क्रांती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कृषी पंढरी प्रदर्शन व तृणधान्य महोत्सव 2023


            कृषीविषयक आधुनिक विकसित तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी - शास्त्र विस्तार यंत्रणा साखळी सक्षमीकरण करणे, शेतकरी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, बाजाराभिमुख कृषि उत्पादनास व विपणनास चालना देणे, आहारातील तृणधान्याचे महत्व पटवुन देणे हा या महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू आहे.


            या प्रदर्शनात एकूण 125 स्टॉल्स उभारण्यात आले असून, शासकीय विभागाचे स्टॉल 29 आहेत. महामंडळ, शेतकरी उत्पादक कंपनी, मिलेट उत्पादने, प्रक्रियायुक्त पदार्थ, सेंद्रीय व औषधी पदार्थ, बियाणे खते औषधे कंपनी, ठिबक व तुषार सिंचन उत्पादक, कृषी यांत्रिकीकरण आणि गृहोपयोगी वस्तुचे स्टॉल्स आहेत.


000000



 

सर्व लोक कापुराचा उपयोग धार्मिक कार्यात करतात, पण काही आरोग्यदायक उपयोग पण आहे.*

 *सर्व लोक कापुराचा उपयोग धार्मिक कार्यात करतात, पण काही आरोग्यदायक उपयोग पण आहे.*

 

जर एखाद्या ठिकाणी मुका मार लागला असेल तर स्नायूंना सूज येऊन तो भाग फुगल्याप्रमाणे वाटू लागतो. सूज आल्यामुळे त्या भागातून प्रचंड वेदना जाणवतात. अशावेळी सूज आलेल्या भागावर तुम्ही कापूर लावू शकता. कारण कापरामध्ये दाह आणि जळजळ कमी करण्याची क्षमता असते. कापराची पूड करून तेलासोबत त्या भागावर लावा आणि काही मिनीटे तो भाग बांधून ठेवा. असं नियमित केल्यामुळे हळूहळू त्या भागावरची सूज कमी होते.


त्वचेवरील रॅशेस कमी होतात 

त्वचेच्या समस्यांमध्ये आणखी एक मोठी समस्या जाणवते ती म्हणजे त्वचेवरील रॅशेस. उष्णता, घाम, सतत पाण्यात काम करणे, अस्वच्छता अशा अनेक कारणांमुळे त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. त्वचेवरील पुरळ कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कापराचा वापर करणे. कारण कापरामुळे तुमच्या त्वचेवरील पुरळ आणि लालसरपणा लगेच कमी होतो. यासाठी पाण्यात थोडं कापराचं तेल मिसळा आणि पुरळ आलेल्या भागावर लावा. ज्यामुळे त्या भागावरील पुरळ हळू हळू कमी होईल. यासोबतच जाणून घ्या पुरळ घरगुती उपाय, असे कमी करा अंगावरील रॅशेस

भाजलेली त्वचा बरी होते.

कापराचे फायदे अनेक आहेत कारण कापरामध्ये वेदना कमी करणारे आणि त्वचेचा दाह कमी करणारे गुणधर्म असतात. म्हणूनच अनेक मलम अथवा क्रिममध्ये कापराचा वापर केला जातो. तुम्ही त्वचेवरील भाजलेली जखम बरी करण्यासाठी त्वचेवर कापराचे तेल लावू शकता. व्हॅसलीनमध्येही कापराचा अंशतः वापर केलेला असल्यामुळे ते वापरण्यासही काहीच हरकत नाही. व्हॅसलीन मुळेही त्वचेच्या अनेक समस्या बऱ्या होतात. याशिवाय कापूर तेलात मिसळून लावण्यामुळे त्वचेची जळजळ लगेच कमी होते. 

आर्थ्राटीसवर उपचार :

जर तुम्हाला आर्थ्राटीस असेल तर सांध्याच्या दुखण्यामुळे तुम्ही पुरते बेजार होता. आर्थ्राटीसमुळे साधं उठणं आणि बसणं अशा दैनंदिन क्रिया करणंदेखील कठीण जाऊ शकतं. मात्र कापूर तुमच्या या त्रासावर वरदान ठरू शकतो. यासाठी तेलामध्ये कापूर मिसळा आणि सांध्यावर त्याने मालिश करा. कापरातील थंडाव्यामुळे तुमच्या सांधेदुखीवर आराम मिळतो. दाह आणि वेदना कमी झाल्यामुळे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे व्यवस्थित करता येऊ शकतात. यासोबतच जाणून घ्या आर्थ्रायटिसच्या रुग्णांसाठी आहार.


नखांचे फंगस कमी होते

कापूर हे एक परिणामकारक निर्जंतूक करणारे साधन असल्यामुळे याचा वापर तुम्ही तुमच्या नखांच्या फंगसवरही करू शकता. कापरामुळे अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या आणि बुरशी नष्ट होतात. यासाठीच जर तुमच्या नखांना फंगस होत असेल. तर तेलात कापूर मिसळा आणि त्या तेलाने नियमित नखांना मालिश करा. 

शांत झोप लागण्यास मदत 

निद्रानाश हा आजकाल अनेकांना जाणवणारी आरोग्य समस्या आहे. अपुरी झोप मिळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कारण चिंता, काळजी, नैराश्य, आरोग्य समस्या अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला रात्री उशीरापर्यंत झोप लागत नाही. झोप लागण्यासाठी सतत गोळ्या घेणं आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. यासाठीच या समस्येला बरं करण्यासाठी कापराचा वापर करा. कापरामुळे तुमचे मन शांत होते आणि तुम्हाला शांत झोप लागते. कापराचे तेल उशीवर टाकून त्या मंद सुवासात झोपण्याचा प्रयत्न करा. 

सर्दी खोकला बरा होतो.

सर्दी खोकला हे संसर्गजन्य विकार संक्रमित व्यक्ती अथवा वातावरणातील बदलांमुळे होत असतात. सर्दी खोकला बरा करण्यासाठी तुम्ही कापराचा वापर करू शकता. कारण कापरामध्ये वातावरण निर्जंतूक करणारे गुणधर्म असतात. यासाठीच विक्स वेपोरेबमध्येही कापराच्या तेलाचा वापर केला जातो. तुम्ही घरात कापूर जाळून, कापराच्या तेलाचा अथवा विक्स वेपोरेबचा वापर करून तुमची सर्दी बरी करू शकता. 

एक्नेवर घरगुती उपचार.

कापूर त्वचेसाठी अतिशय उत्तम असतो. त्यामुळे कापराचा फायदे तुम्ही तुमच्या त्वचेवरील एक्ने अथवा पिंपल्स कमी करण्यासाठी नक्कीच करू शकता. कापराच्या तेलामुळे तुमच्या त्वचेतील पिंपल्समुळे निर्माण झालेले डाग, काळसरपणा, लालसर लाली आणि दाह कमी होतो. यासाठीच नारळाच्या तेलात कापूर मिसळा आणि तुमच्या पिंपल्सवर लावा. याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होत नाहीत. कापराचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळतो. 


केसांची वाढ चांगली होते 

केस गळणे ही एक गंभीर समस्या आहे. कारण केस गळण्यामागे आणखी अनेक कारणे आणि आरोग्य समस्या कारणीभूत असू शकतात. त्यामुळे जर तुमचे प्रमाणाबाहेर आणि सतत केस गळत असतील तर त्यावर योग्य उपचार करायला हवेत. कापराच्या तेलाने केस गळणे कमी करून केसांच्या वाढीसाठी प्रयत्न करू शकता. यासाठी तुमच्या रेग्युलर तेलात कापराचे तेल मिसळा आणि केसांवर उपचार करा. 

लहान मुलांना केसात उवा झाल्या तर त्या कमी करणे ही पालकांसाठी एक समस्याच असते. कारण लहान मुले इतर लहान मुलांच्या सतत संपर्कात येत असतात. उवा आणि लिखा या एकमेकांच्या संपर्कातून संक्रमित होत असतात. ज्यामुळे लहान मुलांच्या डोक्यात उवा होणे ही गोष्ट न थांबवता येण्यासारखी आहे. मात्र यावर तुम्ही कापराचा उपचार करू शकता. कारण उवांवर कापराचे चांगला परिणाम होतो. उवा कमी करण्यासाठी नारळाच्या तेलात कापूर भिजवा आणि ते तेल केसांना लावा. का

बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध

'बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखीसमृद्ध कर

- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न

 

            पंढरपूर दि. 29 (उ. मा. का.) : बळीराजाला चांगले दिवस येऊ देतत्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू देराज्य सुजलामसुफलाम होऊ दे. शेतकरीकष्टकरीकामगारवारकरीधारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देतअसे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले.

            आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दांपत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

            यावेळी महसूलपशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलसार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंतग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजनबंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसेशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरमंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेआषाढी वारीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनास आले आहेत. पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे विठ्ठल पुजेसारखेच आहे. या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठल दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकऱ्यांचे दर्शन जलद व सुलभ झाले.

            राज्य शासनाने या एक वर्षाच्या काळात जनकल्याणाचे अनेक निर्णय घेऊन सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी नगरोत्थानमधून १०८ कोटी रुपये आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल. तसेच३० खाटांचे रूपांतर १०० खाटांमध्ये लवकरच करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सलग दोन वर्षे आपल्याला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


 

अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्य ठरले मानाचे वारकरी

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब मोहनीराज काळे (वय ५६) मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) मु. पो. वाकडीता. नेवासाजि. अहमदनगर या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला. काळे दांपत्य २५ वर्षापासून भास्करगिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दांपत्यास एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सेवा दिली जाते. त्या मोफत पासचे वितरण श्री. शिंदे यांच्या हस्ते या वारकरी दांपत्यास करण्यात आले.

            कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रताप जाधवआमदार समाधान आवताडेभरत गोगावलेमंगेश चव्हाणबबनराव पाचपुतेजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीपोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

            वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन 'निर्मल वारी हरित वारी अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावाया उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्यामार्फत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडीपुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री तारकेश्वर गड दिंडीता. आष्टीजि. बीड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह)द्वितीय क्रमांक नांदेडकर मंडळीची दिंडीता. हवेलीजि. पुणे (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थायशवंतनगरपैठण जिल्हा औरंगाबाद (५० हजार व सन्मान चिन्ह) या दिंडीला प्रदान करण्यात आले.

            यावेळी भुवैकुंठ या वारीसंदर्भातील छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन तसेच 'आरोग्यदूतया पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री.औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले.

00000


'बा विठ्ठला… समाज के प्रत्येक वर्ग को सुखीसमृद्ध करो

मुख्यमंत्री ने विठ्ठल के चरणों में प्रार्थना की

आषाढी एकादशी के औचित्य पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों

श्री विठ्ठल-रुक्मिणी की महापूजा संपन्न

 

            पंढरपुर दि. 29 : किसानों के अच्छे दिन आएँ और उनकी सारी विपत्ति दूर हो जाएअच्छी बारिश होराज्य समृद्ध होसुजलामसुफलाम हो. राज्य के किसान,  मजदूरश्रमिकवारकरी ऐसे सभी वर्ग में सुखसमाधान आए. सभी के जीवन में अच्छे दिन आने की कामना करते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज आषाढ़ी एकादशी के मुख्य सरकारी महापूजा के दौरान विठ्ठल के चरणों में प्रार्थना की.

            आषाढ़ी एकादशी के अवसर पर मुख्यमंत्री श्री. शिंदे ने अपनी पत्नी लता शिंदे और सम्मानित दंपत्ति भाऊसाहेब मोहिनीराज काळे और मंगल भाऊसाहेब काळे के साथ विट्ठल-रुक्मिणी की महापूजा की। महापूजा के बाद वें श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर समिति द्वारा आयोजित वारकरी के सम्मान कार्यक्रम में बोल रहे थे.     

            इस अवसर पर राजस्वपशुपालन एवं दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटिलसार्वजनिक स्वास्थ्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंतग्रामविकास और चिकित्सा शिक्षा मंत्री गिरीश महाजनबंदरगाह और खनिकर्म मंत्री दादाजी भुसेशालेय शिक्षा मंत्री दीपक केसरकरमंदिर समिति के सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदि उपस्थित थे.

            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहाआषाढ़ी वारी के दौरान लाखों श्रद्धालु पांडुरंग का दर्शन करने आए हैं. इससे पंढरपुर और उसके आसपास का माहौल विठ्ठलमय हो गया है. सरकार ने आषाढ़ी वारी के वारकारियो के स्वास्थ्य को सर्वोच्च प्राथमिकता दी है। इसके लिए तीन स्थानों पर महास्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया है. उन्होने कहा कि इस शिविर से भक्तों को स्वास्थ्य सेवाएं प्रदान करना विट्ठल पूजा के समान ही है.  

            उन्होने कहा कि इस साल के वारी में स्वच्छता का अच्छा काम हुआ है. सरकार की ओर से दिए हुए सुचनाओं के अनुसार प्रशासन ने उत्तम नियोजन करते हुए वारकरियो को सेवा-सुविधा उपलब्ध कराई है. विठ्ठल दर्शन के लिए आए वारकरियो के मुख दर्शन की कतार में सरकारी पूजा के समय रुकावट न आ सके,  इसलिये पूजा के समय मुख दर्शन की कतार को यथावत जारी रखने का निर्णय लियाजिससे कतार में लगे वारकरियो का विठ्ठल दर्शन शीघ्र और आसानी से हुआ.

            इसके अलावा राज्य सरकार ने इस एक वर्ष की अवधि में जनकल्याण के अनेक निर्णय लेकर आम जनता को राहत पहुंचाई है। पंढरपुर नगर परिषद के कार्यों के लिए नगरोत्थान से 108 करोड़ रुपये और शहर की जल आपूर्ति योजना के लिए 109 करोड़ रुपये के कामो को मंजूरी दी हैं. मंदिर परिसर के विकास प्रारूप  के लिए 73 करोड़ रुपये निधि उपलब्ध कराया गया है.

            मुख्यमंत्री ने कहा कि पंढरपुर शहर विकास प्रारूप सभी का भरोसा जीतकर ही तैयार किया गया है. बताया कि 30 बेड को 100 बेड में तब्दील किया जाएगा. लगातार दो वर्षों तक आषाढ़ी एकादशी की सरकारी महापूजा का सम्मान प्राप्त होना हमारा सौभाग्य ही हैयह भावना भी उन्होंने इस दौरान व्यक्त की.

अहमदनगर जिले के काळे दंपत्ति को मिला सम्मान

             मुख्यमंत्री श्री समेत सम्मानित दंपत्ति के रूप में किसान परिवार के भाऊसाहेब मोहनीराज काळे (उम्र 56 वर्ष) और मंगल भाऊसाहेब काळे (उम्र 52 वर्ष) मु. पो. वाकडीत. नेवासाजि. अहमदनगरइन वारकरी दंपत्ति को सरकारी पूजा का सम्मान प्राप्त हुआ।

            काळे दंपत्ति पिछले 25 वर्षों से भास्करगिरी महाराज के साथ देवगढ़ से पंढरपुर तक पैदल यात्रा कर रहे है. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल की ओर से आषाढ़ी एकादशी के शासकीय महापूजा से सम्मानित वारकरी दंपत्ति को एक वर्ष के लिए मुफ्त यात्रा सेवाएं दी जा रही हैं. उस निःशुल्क पास का वितरण श्री. शिंदे के हाथों किया गया.

            कार्यक्रम में सांसद डॉ. श्रीकांत शिंदे और प्रताप जाधवविधायक समाधान आवताडेभरत गोगावले,  मंगेश चव्हाण,  बबनराव पाचपुते,  जिलाधिकारी मिलिंद शंभरकरकोल्हापुर परिक्षेत्र के विशेष पुलिस महानिरीक्षक सुनील फुलारी,  जिला परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीपुलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदि उपस्थित थे.

निर्मल दिंडी पुरस्कार का वितरण

            वारी में शामिल होनेवाली अनेक दिंडी सामाजिक जनजागरण का कार्य करते है. इन दिंडीयो  का आदर्श लेकर 'निर्मल वारी हरित वारी इस अभियान में नागरिकों की सहभागिता बढ सकेइसी उद्देश से श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिति की ओर से  'श्री विठ्ठल निर्मल दिंडीपुरस्कार दिया जाता है.  मुख्यमंत्री के हाथो इस पुरस्कार का भी इस अवसर पर किया गया. कार्यक्रम में प्रथम क्रमांक का पुरस्कार श्री तारकेश्वर गड दिंडीत. आष्टीजि. बीड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह),  द्वितीय क्रमांक नांदेडकर मंडल की दिंडीत. हवेलीजि. पुणे (75 हजार व सन्मान चिन्ह) और तृतीय क्रमांक का पुरस्कार श्री. एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था,  यशवंतनगरपैठण जिला औरंगाबाद (50 हजार व सन्मान चिन्ह) इन विजेता दिंडी को पुरस्कार प्रदान किया गया.   

            इस दौरान भुवैकुंठ इस वारीसंदर्भ के फोटो बुक एवं 'स्वास्थ्यदूतइस पुस्तिका का विमोचन मान्यवरो के हाथो किया गया. कार्यक्रम का प्रास्ताविक श्री. औसेकर महाराज ने किया.




Lord Vitthal…Make every section of society happy and prosperous


– Chief Minister Eknath Shinde prays Lord Vithal


Chief Minister Eknath Shinde performs MahaPooja of Sri Vitthal-Rukmini to mark Ashadhi Ekadashi


            Pandharpur, June 29 – Chief Minister Eknath Shinde today performed Mahapooja to mark Ashadhi Ekadashi at Pandharpur with a prayer to Lord Vitthal. He prayed Lord Vitthal to bring good Monsoon to sate along with happy days for the farmers in the State. Praying Lord to make the State prosperous, he prayed Lord Vihal for happiness and satisfaction of every element of society including farmers, workers, peasants and annual pilgrims who visit Pandharpur during the annual pilgrimage.


            Chief Minister Eknath Shinde along with his wife Lata Shinde as well as couple selected to perform Pooja along with him Bhausaheb Mohiniraj Kale and his wife Mangal Bhausaheb Kale performed MahaPooja of Vitthal and Rukmini deities. He was speaking after felicitating the Kale couple on behalf of Sri Vitthal Rukmini Mandir committee.  


            Minister for Revenue, Animal Husbandry, Dairy Development and Guardian Minister for Solapur Radhakrishna Vikhe-Patil, Minister for Health Tanaji Savant, Rural Development and Medical Education Minister Girish Mahajan, Minister for Ports and Mines Dadaji Bhuse, Minister for School Education Deepak Kesarkar, the Temple Committee joint chairman Gahininath Maharaj Ausekar and others were present.


            Pointing out that lakhs of devotees have arrived in Pandharpur to seek Lord Vitthal’s Darshan by participating in the annual pilgrimage, Chief Minister Shinde said that entire Pandharpur and adjoining areas are filled with Vitthal essence. Stating tha the State Government has given highest priority to health of these pilgrims and mega-health camps have been organized at three places. He said that providing health services to these pilgrims was nothing but worshipping Lord Vitthal. He said that this year, the annual pilgrimage was much cleaner and the administration after the directions from the sate Government has made available necessary amenities and facilities by planning in best possible manner. He said that during the Mahapooja performed by him facility of availing Mukh-Darshan was kept going on in the queue so that the annual pilgrims who wanted to seek Mukh-Darshan of the deity were not deprived of it due to official Government Pooja.   


            Recalling that in last one year, the state Government has taken various welfare decisions to provide a relief to common man, Shinde said that through renewal mission, Rs. 108 crores were given to Pandharpur city council works and Rs. 109 crores were provided for the water supply scheme within Pandharpur city. He said that Rs. 73 crore funding is made available for Temple area development plan and Pandharpur city development plan would be prepared by taking every section in confidence. He assured that he 30 bed hospital would be converted in to 100-bed hospital. Stating that he was performing MahaPooja for the second consecutive year he expressed the feeling hat he was fortunate to do so. 


The Kale couple from Ahmednagar district became revered couple to perform MahaPooja


            Every year a couple who participates in annual pilgrimage on foot is selected for performing MahaPooja along with the chief minister and his wife. This year, Bhausaheb Mohiniraj Kale (age 56 years) and his wife Mangal Bhausaheb Kale (age 52 years), who are a farmer family from Post Wakadi, Taluka Nevasa in Ahmednagar district received this honour. The Kale couple is coming to Pandharpur on foot for last 25 years with Bhaskar Griri Maharaj right from Devgad. MSRTC gives one-year free journey pass to the revered couple which receives MahaPooja respect and this pass was handed over to Kale couple by Chief Minister Shinde.


            MP Dr Shrikant Shinde, Pratap Jadhav, MLA Samadhan Autade, Bharat Gogawale, Mangesh Chavan, Babanrao Pachpute, district collector Milind Shambharkar, Kolhapur range IG Sunil Fulari, Zilla Parishad CEO Dilip Swamy, district SP Shirish Sardeshpande were present.


Nirmal Dindi award distribution


            There are many Dindis (group of Warkaris or annual pilgrims which bear particular names and reach Pandharpur on foot) that perform the task of social awakening in many ways while walking on foot to Pandharpur. Taking a cue from these Dindis, Sri Vitthal Rukmini Temple Committee gives Sri Vitthal Nirmal Dindi award so that participation of citizens is increased in the initiative of Nirmal Dindi, Harit Dindi which is Clean Dindi, Green Dindi. Chief minister Shinde gave away these awards. The first award of Rs. One lakh was given to Sri Tarkeshwar Gad Dindi Taluka Ashti, District Beed (Memento and Rs. 1 lakh), the second award was given to Nandedkar Mandali Dindi Taluka Haveli District Pune (Mememnto and Rs. 75,000) while third award was given to Sri Eknath Maharaj Warkari Shiskan Sanstha Yashwannagar, Paithan District Aurangabad (Memento and Rs. 50 thousand).


            A book of photographs of Wari titled Bhu-Vaikunth and Aarogyadoot booklet was released by dignitaries. Sri. Ausekar Maharaj 

gave opening remarks.


0000


Wednesday, 28 June 2023

अब तेरा वेटा मेरा हैं

 


वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

 वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

            वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            ११ हजार ३३२ कोटी रुपये खर्चाचा हा सागरी सेतू ९.६ किमीचा असा असून तो आठपदरी आहे. तसेच याला ७.५७ किमी जोड रस्ता असेल. डिसेंबर २०२६ पर्यंत हा सागरी सेतू पूर्ण होईल.


राज्यातील देवस्थानांवर महिलांना योग्य प्रमाणातप्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा

 राज्यातील देवस्थानांवर महिलांना योग्य प्रमाणातप्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा


- डॉ. नीलम गोऱ्हे यांची धर्मादाय आयुक्तांना सूचना


            मुंबई, ता. २७ : राज्यभरात असलेल्या विविध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. विशेषत: पंढरपूर, एकविरा देवी, तुळजापूर, अष्टविनायक अशा देवस्थानांमध्ये भाविकांसाठी सुविधा होणे अत्यावश्यक आहे. महिला भाविकांसाठी पायाभूत सुविधा करण्याची आवश्यकता नेहमीच भासते. प्रवास, निवास, हिरकणी कक्ष, सुलभ शौचालये, महिलांसाठी अनुषंगिक सुविधा यावर विचार करण्याची अजूनही गरज आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानांच्या विश्वस्त समितीमध्ये योग्य प्रमाणात महिलांचा समावेश असावा. यासाठी नियमावलीमध्ये काय सुधारणा करता येतील याचा विचार व्हावा अशी सूचना आज विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी धर्मादाय आयुक्तांना केली.


            विधान भवनात जेजुरी देवस्थानच्या विषयावर विनंती अर्ज समितीच्या वतीने एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.


            यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे जेजुरी देवस्थानबाबत एक अहवाल सादर करण्यात आला. मंदिराच्या आवारातील दुरुस्ती, डागडुजी कामे याबाबत पुरातत्व खात्याकडून माहिती सादर करण्यात आली. जेजुरी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून भाविकांकडून घेण्यात येणाऱ्या दर्शन पासच्या व्यवस्थेबाबत यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी विचारणा केली. गेल्या काही वर्षातील झालेल्या बैठकांच्या कागदपत्रांची तपासणी धर्मादाय आयुक्तांनी करावी. मंदिरात लावण्यात आलेल्या मेटल डिटेक्टरची नियमित देखभाल करून ते सुधारित स्वरूपात लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. जेजुरीमधील चिंचेची बाग परिसरात भाविकांकडून होत असलेल्या विविध विधींबाबत एक नियमावली करावी. मंदिर परिसरात भाविकांकडून उधळण्यात येणाऱ्या भंडारा (हळद) आयुर्वेदिक असली पाहिजे असा आग्रह धरतानाच त्यांनी आता वापरण्यात येणाऱ्या हळदीच्या नमुन्यांची चौकशी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.


            मंदिर देवस्थानच्या विश्वस्त नेमणुकीबाबत निर्णय हा धोरणात्मक असल्याने संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी यामध्ये निर्णय घेणे उचित असल्याचे त्या म्हणाल्या. जेजुरी देवस्थानमध्ये नेमणूक केलेल्या विधिज्ञ यांची माहिती देण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. मंदिराचे कार्यकारी अधिकारी यांनी पुरातत्व खात्याच्या अहवालावर केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांच्याकडून येत्या ८ दिवसांत खुलासा मागवला आहे. जुलै महिन्यात डॉ. गोऱ्हे जेजुरीला भेट देणार असून याबाबत विभागीय आयुक्त स्तरावर आणखी आढावा बैठक घेणार आहेत.


            या बैठकीला विधान परिषद सदस्य उमा खापरे, विधी व न्याय विभागाचे सचिव नंदकिशोर मोरे, सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, महेंद्र महाजन, जेजुरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चारुदत्त इंगळे, पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, प्रांत राजेंद्र सावंत, पुरातत्व खात्याचे विलास वाहने, तेजस्विनी आफळे, जेजुरी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.


0000

Featured post

Lakshvedhi