3. राज्यातील लोकसभेच्या 16 - नांदेड या एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | मतदार संघाचे नाव | पुरुष मतदार | महिला मतदार | तृतीयपंथी मतदार | एकूण | निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या |
1 | 16 नांदेड लोकसभा मतदार संघ | 9,78,234 | 9,30,158 | 154 | 19,08,546 | 19 |
I. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे.
II. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे सरमिसळीकरण (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
III. मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही सरमिसळीकरण (Randomization) देखील झाले आहे. तसेच या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय सिलींग करण्यात आले आहे.
IV. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.
V. मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
VI. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी 86,462 अर्ज मंजूर करण्यात आले. दिनांक 16.11.2024 पर्यंत गृह मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
VII. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाले तर उचित कार्यवाही करण्यात येत आहे.
VIII. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.
IX. मतदान करण्याकरीता सर्वसाधारण वेळ सकाळी 07.00 ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत आहे. तसेच संध्याकाळी 06.00 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन क्रमांक देऊन त्यांना मतदान करु देण्यात येईल.
X. मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी सर्व 288 विधानसभा मतदार संघामध्ये शांतता काळ आहे. सबब या विधानसभा मतदार संघांमध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच त्या मतदार संघातील रहिवासी नसलेली व राजकीय प्रचारासाठी आलेली राजकीय व्यक्ती त्या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता सर्व तयारी झालेली आहे. या निवडणूकीमध्ये मोठया प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.