Saturday, 16 November 2024

महिला मतदारांची संख्या

 महिला मतदारांची संख्या

सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन २०१९ साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे ९२५ इतकेहोते. हे प्रमाण वाढवण्याकरिता महिला मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे २०२४ मध्ये या प्रमाणात ९३६ अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतकी झाली आहे. म्हणजे एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात महिला मतदारांचा टक्का हा जवळपास पन्नास टक्के इतका आहे. राज्यात विविध जिल्हयात महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारां इतकी काही ठिकाणी त्या पेक्षा जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi