Wednesday, 7 May 2025

मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार,महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर,pl share,महाराष्ट्रात १६ ठिकाणी संकटकाळी बचाव प्रशिक्षण संकटकाळी बचाव प्रशिक्षण

 मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण

 

प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की, अशा परिस्थितीत मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात. अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवावी. गृह मंत्रालयाने देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये १०० हून अधिक संवेदनशील ठिकाणांची निश्‍चिती केली आहे. या मॉक ड्रिलमध्ये अनेक उपाययोजना समाविष्ट असणार आहेत. त्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणेनागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देणेशत्रूच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणेतसेच बंकर आणि खंदकांची स्वच्छता व तपासणी करणे यांचा समावेश आहे.

 

महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर

केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हायअलर्ट जारी केला आहे. राज्य प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने अंतर्गत स्तरावर हालचालींना गती दिली असूनसर्व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना संबंधित प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्या राज्यातील १६ ठिकाणी मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट होणार आहे.

महाराष्ट्रात १६ ठिकाणी मॉकड्रिल

 मुंबईउरण-जेएनपीटीतारापूरपुणेठाणेनाशिकथळ-वायशेतरोहा-धाटाव-नागोठाणेमनमाडसिन्नरपिंपरी-चिंचवडछत्रपती संभाजीनगरभुसावळरायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi