Saturday, 16 November 2024

पहिल्या विधानसभेत आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला आमदार

 पहिल्या विधानसभेत आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला आमदार

आतापर्यंत स्थापन झालेल्या विधानसभेच्या कार्यकाळात पहिल्या विधानसभेत तीस इतक्या भरघोस संख्यने महिला आमदार सभागृहात होत्या. त्यानंतरच्या कुठल्याच विधानसभेत इतक्या मोठ्या संख्येने महिला आमदार राहीलेल्या नाहीत. त्याच्या खालोखाल १९७२ -७८ या कार्यकाळातील चौथ्या विधानसभेत २८ तर आणि सन २०१९- २०२४ मध्ये चौदाव्या विधानसभेत २७ इतक्या महिला आमदारांची संख्या बघायला मिळाली. आतापर्यंतच्या चौदा विधानसभांच्या कार्यकाळात सर्वात कमी महिला आमदार या सन १९९०-९५ मध्ये कार्यरत आठव्या विधानसभेत ६ तर १९७८-८० या कालावधीत कार्यरत पाचव्या विधानसभेत केवळ

८ महिला आमदार होत्या. म्हणजेच पहिल्या विधानसभेच्या १९५७ ते १९६२ या साली महिला आमदारांची संख्या ही सर्वात जास्त राहिलेली आहे. महिला आमदारांचे प्रमाण वाढत असल्याचे आश्वासक चित्र पुढच्या विधानसभेच्या कार्यकाळात बघायला मिळत नाहीये तर सातत्याने हे प्रमाण तीसच्या आत राहिलेले असून त्यात चढउतार झालेले दिसते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi