Saturday, 16 November 2024

विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….

 विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत

आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….

 

विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर काही उमेदवारांची ही दुसरी तिसरीचौथीवेळ असणार आहे. सन १९५७ ते १९६२ या कालावधीत पहिली विधानसभा स्थापन झाल्यापासून ते आताच्या चौदाव्या विधानसभे पर्यंत म्हणजे गेल्या ६७ वर्षांत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहात सहभाग घेण्याची संधी आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदारांना मिळालेली आहे. भारतात सर्व नागरिकांसोबतच मतदार म्हणून महिला मतदारांना ही मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मात्र आपल्याला विनासायस मिळालेल्या मतदानाच्या या अधिकारासाठी जगातील किती तरी देशांतील महिलांना प्रदिर्घ लढा द्यावा लागलेला आहे. ब्रिटनअमेरीकाव इतर अनेक देशांत महिला मतदारांना आपल्या मतदानाच्या अधिकारासाठी शंभर ,दिडेश वर्ष लढा देऊन मग तो अधिकार प्राप्त झालेला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi