सर्व सोयीसुविधायुक्त मतदान केंद्र
मतदान प्रक्रियेला मतदारांना आकर्षित करणारी असावी यासाठीही राज्यात अनेक ठिकाणी विशेष संकल्पना घेऊन मतदान केंद्र उभारली जात आहेत. यात वन्यजैवविविधता, सांस्कृतिक - सामाजिक वारशाचं दर्शन, स्तनदा - गर्भवती महिलांसाठी हिरकणी मतदान केंद्र, युवा - दिव्यांग - महिला संचलित विशेष मतदान केंद्र उभारली जात आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सहकार्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था, मतदारांसाठी शेड - पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध असतील हे पाहिलं जातंय. अभिनव पद्धतीनं मतदारांचं स्वागत करून त्यांचा मतदानाचा अनुभव संस्मरणीय करण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी केला जातोय.
अशा या विविधांगी प्रयत्नांच्या माध्यमातून ९ कोटी ७० लाखापेक्षा जास्त मतदारांपर्यंत ज्यात, २ कोटी पेक्षा जास्त युवा म्हणजे १८ ते २९ वयोगटातलेही मतदार आहेत आणि वयाची शंभर पूर्ण केलेले ४७ हजारापेक्षा जास्त मतदार आहेत त्या सर्वांपर्यंत पोहचून सजग, जाणकार, आणि शिक्षित मतदार घडवण्याचा आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा मतदानाच्या दिवसासाठी सज्ज झाली असून आता प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे आपला मतदानाचा हक्क बजावण्याची.
No comments:
Post a Comment