एक जिल्हा - एक व्हाट्सअप नंबर
अहिल्यानगर जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी एक जिल्हा - एक व्हाट्सअप नंबर हा अभिनव उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमासोबतच, जिल्ह्यातील मतदारांसाठी ई-शपथविधीचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये मतदारांना शपथ घेतल्यानंतर क्यू आर कोडच्या माध्यमातून ई-प्रमाणपत्रही दिलं जातंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री मध्ये आमची स्वीपची टीम थेट शेतमजुरांपर्यंत पोहचली, सर्व शेतमजुरांनी काम तर बारा महिने चालतं, पण मतदानाच्या दिवशी आम्ही नक्की मतदान करणार असा संकल्प व्यक्त केला आहे. या अशा प्रयत्नांसोबतच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सर्व जिल्ह्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरूनही मतदार जागृती केली जाते, मतदार जागृतीच्या उपक्रमांना प्रसिद्धी दिली जातेय. समाजमाध्यमांवरून सेलिब्रिटी, समाजातील प्रभावी व्यक्तिमत्वांची आवाहनं प्रसिद्ध केली जात आहेत.
No comments:
Post a Comment