महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज
- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, दि. 17 : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी 7:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत राहील. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 बाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :-
अ.क्र. | मतदार संघांची संख्या | मतदान केंद्रे | सहाय्यक मतदान केंद्र
| क्रिटीकल मतदान केंद्रे | निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या | बॅलेट युनिट (बीयु) | कंट्रोल युनिट (सीयु) | व्हीव्हीपॅट |
1 | 288 | 100186 | 241 | 990 | 4,136 | 1,64,996 | 1,19,430 | 1,28,531 |
राज्यातील एकूण 1,00,427 इतक्या मतदान केंद्रांपैकी, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान 67,557 इतक्या मतदान केंद्रांवर वेबकास्टींग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
2. मतदारांची संख्या
अ.क्र. | मतदारांचा तपशील. (दिनांक 30.10.2024 रोजी) | पुरुष मतदार | महिला मतदार | तृतीयपंथी मतदार | एकूण |
1 | मतदारांची संख्या | 5,00,22,739 | 4,69,96,279 | 6,101 | 9,70,25,119 |
2 | दिव्यांग (PwD) मतदार | 3,84,069 | 2,57,317 | 39 | 6,41,425 |
3 | सेना दलातील मतदार (Service Voters) | 1,12,318 | 3,852 | - | 1,16,170 |
No comments:
Post a Comment